12
देवबाप आपुनला वळन लावय
1 मंग देववर वीस्वास ठेवनारं आशे लोकंसनी मोठी गरदी आपला चारीमेर सय जेसना जीवननी द्वारा वीस्वास मंजे काय सय, हाई आपुनला मायती पडय. तेमन ज्या गोस्टी आपला वीस्वासना जीवनमं आडथळा करत आनं जो पाप आपुनला पक्का धरी ठेवय तेसला आपुन दुर करी देवाला पायजे. आनं जशा येखादा रवनार बक्षीस भेटानी करता चांगला रीतथीन रवय, तशाज आपला साठी बी देव जो बक्षीस ठेयेल सय, तेला भेटाडानी करता आपुन बी रुदय पईन पक्का कोशीत कराला पायजे. 2 आनं आपुन आपला ध्यान फक्त येसु ख्रीस्तवर ठेवला पायजे. कजं का देवबापवर वीस्वासना सुरुवात करानी करता तोज आपुनला तेनी कडं ली जाय आनं शेवट परन वीस्वासना जीवनमं भक्कम रव्हानी करता तोज आपुनला मदत करय. नंतर तेला जो आनंद भेटनार व्हताल, तेना साठी तो मरनना दुखला बी स्वीकारी लीना. आनं कुरुस खांबावर मराना आपमान तेला काहीज वाटना ना. तेमन तो आतं देवना सीहासननी जेवनी बाजुला मंजे मोठा माननी जागामं बसेल सय.
3 मनं भाऊ आनं बईन, पापी लोकंसनी द्वारा जो वीरोध तो सहन करना तेनी बद्दल तुमं वीचार करा. मंजे तुमं हीम्मत धरीसनं देवनी संगं कायम टीकी रहशात. 4 आनं तुमं पापना वीरुद लढाई करताना जीव बी दी देवा ईतला तयार व्हयनत ना. 5 आनं तुमला तेनं पोरेसोरे मनीसनं देव जो हीम्मत देवाना वचन सांगेल व्हताल, तेला तुमं भुलाय गयत का? तो वचन आशा सय का,
✞"मना पोर्या, परभु तुला जो वळन लावय, तेला आशाज वायबार मानु नोको. आनं जवं तो वळन लावानी करता तुला शीक्षा करय, तवं हीम्मत सोडु नोको. 6 कजं का देव जेवर मया करय, तेलाज तो वळन लावय. आनं जेला तो पोर्या मनीसनं स्वीकार करय, तेलाज शीक्षा करय."
7 मंग देव तुमला वळन लावय मनीसनं जी शीक्षा तुमला भेटी रहनी सय, तीला सहन करा. कजं का देव तुमनी संगं येक बापनी सारका वागी रहना सय. आनं प्रतेक बाप तेसना पोरेसोरेसला वळन लावानी करताज शीक्षा देत. 8 जशा देव तेनं आखं पोरेसोरेसला वळन लावय, तशाज जर तो तुमला वळन लावय ना तं, तुमं तेनं खरं पोरेसोरे ना सत. 9 आनं आपुन जगन्या गोस्टंसनी बद्दल दखुत तं, आपला आखंसना बाप सत. आनं ते आपुनला वळन लावत आनं आपुन तेसना मान राखत. मंग जो आपला सोरगंना बाप सय, तेना आपुन कीतला आधीनमं रहीसनं जीवन जगाला पायजे! 10 कजं का आपलं जगनं बाप आपुनला थोडाज टाईमनी करता वळन लावत. आनं जशे तेसला चांगला वाटय, तशेज ते वळन लावत. पन देव आपला चांगला साठीज आपुनला वळन लावय. येनी करता का जशा तो पवीत्र सय, तशा आपुन बी पवीत्र बनाला पायजे. 11 आनं जवं वळन लावामं येय, तवं तोज टाईमला कोनला बी आनंद वाटय ना पन दुख वाटय. पन जे लोकंसला शीक्षा करीसनं वळन लावामं येय, तेसना जर आनुभव ई लागना तं, नंतर ते नीतीवानना जीवन जगु शकत, तवं तेसना जीवनमं शांती रही. 12 तेमन तुमं जे कमजोर व्हई गयं सत आनं हीम्मत सोडी दीनं सत, तुमं ताकतवान बना आनं हीम्मत ठेवा. 13 आनं सरळ रस्तामं चालानी सारका तुमं नीतीवानना जीवन जगत रव्हा, येनी करता का तुमना वीस्वासना जीवनमं तुमं कमजोर ना, पन भक्कम बनाला पायजे.
देवला नाकारु नोका
14 मनं भाऊ आनं बईन, तुमं आखंसनी संगं शांतीमं रव्हानी आनं पवीत्र जीवन जगानी पक्की कोशीत कर ज्या. कजं का पवीत्र जीवन जगा शीवाय कोनी बी देवला दखु शकावु ना. 15 आनं देवनी दया मीळाडामं तुम मयथीन कोनी बी मांगं नोको रव्हाला पायजे मनीसनं लक्ष द्या. जशा येखादा कडु झाड वाढीसनं लोकंसला कडुपना करी देय, तशाज दुसरंसनी बद्दल वाईट गोस्टं तुमना जीवनमं वाढीसनं तेसला त्रास नोको देवाला पायजे आनं तेसला पापमं नोको ली जावाला पायजे. 16 आनं तुम मयथीन कोनी बी शीनाळी करनारं नोको बनाला पायजे. आनं जशा येसावा फक्त येकंज जेवननी करता तेना मोठा पोर्या बनाना आधीकार ईकी टाकनाल, तशा तुमं बी तेनी सारका जगन्या गोस्टीस कडं मन लावनारं बनु नोका. 17 आनं तुमला मायती सय का, नंतर जवं तो तेना बाप कडथीन मोठा पोर्याला भेटाला पायजे तो आशीर्वाद भेटाडानी करता ईशा ठेवना, तवं तेला नाकारामं वना. आनं तो रडी रडीसनं तेना बापना आशीर्वाद भेटाडानी कोशीत करी रहनाल, तरी बी तो तेना बापना मनला बदलाडु शकना ना.
18 जवं तुमं देव कडं वनत, तवं जशे ते ईस्रायेल लोकंसला सीनाय नावना डोंगरवर व्हयना, तशा तुमला व्हयना ना. आनं जो डोंगरला ते हात नोको लावाला पायजे मनीसनं देव तेसला सांगेल व्हताल, तई ते गयत. आनं तई ईस्तुनी जाळ पक्की पेटी रहनील आनं तई पक्का आंधारा व्हताल. आनं तई पक्की वावधन चालु व्हतील. 19 तवं ते तुतारीना आवाज आनं देवना बोलाना आवाज बी आयकनत. आनं तो आवाज ईतला भयानक व्हताल का, जे लोकं ता आयकनत, ता बंद व्हवाला पायजे मनीसनं ते रावन्या करनत. 20 आनं जी आज्ञा देव तेसला सांगना, तीला ते सहन करु शकनत ना. कजं का ती आज्ञा पक्की कडक व्हतील. आनं ती आशी व्हतील का,
✞"जर येखादा जानावर बी तो डोंगरवर गया तं, तेला दगडमार करीसनं मारी टाकालाज पायजे."
21 आनं जा तेसला दखायना, ता खरज ईतला भयानक व्हताल का, मोसा बी सांगना,
✞"मी बी भीवाईसनं थरथर करी रहना सय."
22 पन सोरगं मतला सीयोन नावना डोंगरवर जो जीवता देवना शेहेर सय, तई तुमं ईयेल सत. आनं जई हाजार हाजार देवदुतं आनंदमं गोळा व्हत, तो सोरगं मतला यरुशलेम शेहेरमं तुमं ईयेल सत. 23 आनं जे लोकं देवनं पयलं जल्मेल पोरे सारकं सत आनं जे लोकंसना नाव सोरगंमं लीखामं वना सय, तेसनी जोडमं तुमं ई लागनं सत. आनं जो देव आखंसना न्याय करनार सय, तेपन बी तुमं ई लागनं सत. आनं जे लोकंसला शुधं बनाडामं ईयेल सय, ते नीतीवान लोकंसनी कडं बी तुमं ई लागनं सत. 24 देव आनं लोकंसमं जो येसु ख्रीस्त नवीन करार बनाडना सय, तो येसुनी कडं तुमं ईयेल सत. आनं तेना जो रंगत आपला साठी तो दी दीना सय, तेनी कडं बी तुमं ईयेल सत. जवं हाबेलला तेना भाऊ मारी टाकना, तवं पईन तेना रंगत बदला लेवानी करता दखी रहना सय पन येसु ख्रीस्तना रंगतघाई आपुनला पापनी माफी भेटी जाय. तेमन येसु ख्रीस्तना रंगत हाबेलना रंगत पेक्षा बी येक चांगली गोस्टं देवाना वचन आपुनला देय.
25 आनं जो देव तुमला बोलय, तेनी कडं तुमं जास्त ध्यान द्या. कजं का जवं ईस्रायेल लोकंसला मोसा हाई जगमं सावध करना आनं ते तेना आयकनत ना, तवं ते देवना दंड पईन सुटु शकनत ना. मंग जवं देव सोरगं मईन सावध करय आनं जर तेना आपुन आयकावुत ना तं, आपुन बी कधीज तेना दंड पईन सुटु शकावुत ना. 26 जवं देव सीनाय नावना डोंगरवर बोलना, तवं तेना आवाजघाई धरती बी हालाला लागी गयी. पन आतंना काळनी बद्दल तो आशा वचन दीसनं सांगना सय का,
✞"मी आजुन येक दाउ फक्त धरतीलाज ना, पन आकासला बी हालाडी टाकसु."
27 मंग "आजुन येक दाउ" हाई शब्द सांगाना आर्थ मंजे जा काही बी देव बनाडेल सय, ता आखंसला हालाडीसनं काडी टाकामं येई. येनी करता का ज्या गोस्टीसला हालडता येवावु ना, तेसला तशाज ठेवामं येई.