11
वीस्वासनी शक्ती
1 मंग ज्या गोस्टीसवर आपुन आसा ठेवनं सत त्या भेटीत मनीसनं नक्की व्हई जावाना आनं ज्या गोस्टी आपुनला दखात ना त्या गोस्टी सत मनीसनं बी नक्की व्हई जावाना हाई वीस्वास सय. मंग काही गोस्टी ज्या आपुनला दखात ना, तीसनी करता आपुन आसा ठेवत. आनं आपुन भरोसा ठेवत का, जर आपुन देववर वीस्वास ठेवुत तं त्या गोस्टी आपुनला भेटी जाईत. 2 कजं का आपलं वाडावडील लोकं देववर वीस्वास ठेवनंलत मनीसनं देव तेसनी बद्दल चांगली साक्षी दीना. 3 आनं आपला वीस्वासघाई आपुनला मायती पडय का, जगना आनं आकासना आखंकाही देव तेना वचन द्वारा बनाडना सय. मंजे जेला आपुन दखु शकत ना तेनी द्वारा, ज्या गोस्टी आपुनला दखात त्या आख्यासला बनाडामं ईयेल सय.
4 आनं वीस्वासघाई हाबेल तेना भाऊ काईन पेक्षा देवपन चांगाला आर्पन करना. आनं तो देववर वीस्वास ठेवना मनीसनं देव आनंदमं तेना आर्पनला स्वीकार करना आनं तेनी नजरमं तेला नीतीवान बनाडना. आनं आतं तो मरी जायेल सय, तरी बी तेना वीस्वासनी द्वारा आपुनला देववर वीस्वास ठेवानी बद्दल शीकाला भेटय.
5 मंग देववर वीसवस ठेवना मनीसनं हनोख मरना ना, पन तेला वर सोरगंमं लेवामं वना. आनं तो कोनला बी सापडना ना, कजं का देव तेला जग मईन सोरगंमं ली गयाल. आनं देवना वचनमं लीखेल सय का, तेला सोरगंमं लेवानी आगुदार तो देवला खुस करनार व्हताल. 6 आनं देववर वीस्वास ठेवा शीवाय, कोनी बी देवला खुस करु शकय ना. कजं का जे लोकं देव कडं येत, ते पयलंग आशा वीस्वास करालाज पायजे का, देव खरज सय आनं जे तेना शोध करत तेसला तो नक्की आशीर्वाद देय.
7 आनं नोहा देववर वीस्वास ठेवना मनीसनं ज्या गोस्टी तो कधी बी दखेल ना व्हताल, आशी गोस्टंनी बद्दल देव तेला सावध करनाल. आनं तो देवनी गोस्टंला मान दीना आनं तेना कुटुमनं लोकंसला वाचाडानी करता येक जाहाज तयार करना. आनं तेना वीस्वासघाई तो दखाडी दीना का जे लोकं तेना सांगेलवर वीस्वास ठेवनत ना ते देवना दंडना लायक सत. आनं वीस्वास ठेवानी द्वारा लोकं जशा नीतीवान बनत, तशा तेला देवनी नजरमं नीतीवान बनाडामं वना.
8 मंग जो देश देव आब्राहामला देवाना वचन देयेल व्हताल, तो देशला जावाला तेला सांगना. आनं तो देववर वीस्वास ठेवना मनीसनं तेनी आज्ञा पाळना. आनं तो कई जाई रहना सय हाई तेला मायती बी ना व्हताल, तरी बी तो देवना आयकीसनं तेना सोताना देश सोडीसनं नींगी गया. 9 आनं तो देववर वीस्वास ठेवना मनीसनं जो देश देवाना वचन देव देयेल व्हताल, तो देशमं येक पारका मानुसनी सारका रहु लागनाल. आनं तई तो झोपड्या बनाडीसनं रहना. आनं तेना पोर्या ईसहाक आनं नातु याकोब बी तशेज तई रहनत. कजं का ते दोनी जनंसला बी देव तो देश देवाना वचन देयेल व्हताल. 10 येनी करता आब्राहाम आशा करनाल का, देवनी योजना द्वारा आनं तेना हातघाई बांधेल येक कायम रहनार ✞शेहेरमं रव्हानी करता तो दखी रहनाल.
11 मंग आब्राहामनी पोर्या व्हवानी वय नींगी जायेल व्हतील आनं सारा बी वांज व्हतील. तरी बी जो देव तेसला वचन देयेल व्हताल, तो वचन पुरा करी मनीसनं ते वीस्वास ठेवनत मनीसनं ते पोर्याला जल्म देवु शकनत. 12 आनं आब्राहाम पक्का धयड्या व्हई जायेल व्हताल आनं मरनना काटवर व्हताल, तरी बी तो येकंज मानुस पईन आकासन्या चान्न्या आनं समुद्रनी काटनी वाळु ईतलं पोरेसोरे व्हयनत.
13 मंग ते आब्राहाम, ईसहाक आनं याकोब मरनत ताव देववर वीस्वास ठेवनत. आनं देव जा देवाना वचन देयेल व्हताल, ता तेसला भेटना ना. पन देववर वीस्वास ठेवनत मनीसनं दुरथीनंज ते ता दखनत आनं खुस व्हई गयत. आनं ते सोता कबुल करनत का, ते हाई जगमं नवलं आनं पारकं सत. 14 आनं जे लोकं आश्या गोस्टं करत, ते दखाडी देत का, ते तेसना सोतानी करता येक देशना शोध करी रहनं सत. 15 आनं जर जो देशला ते सोडीसनं नींगी ईयेल व्हतलत, तेनी बद्दल ते वीचार करत बसतत तं, तेसला परत जावानी संधी भेटी जाती. 16 पन ते लोकं रव्हानी करता येक पक्का चांगला देशना शोध करी रहनंलत, तो मंजे सोरगंना देश. तेमन देव सोताला तेसना देव सांगानी करता तेला लाज वाटनी ना. कजं का तेसना साठी तो येक शेहेर बनाडी ठेयेल सय.
17-18 मंग जवं देव आब्राहामनी परीक्षा लीना, तवं तो देववर वीस्वास ठेवना मनीसनं तेना पोर्याला बी बलीदान करानी करता ली गया. देव तेला बरज पोरेसोरे देवाना वचन देयेल व्हताल आनं तेला सांगेल व्हताल का, ईसहाक पईनंज तुनी पीढीनी वाढ व्हई. तरी बी तेना येकुलता येक पोर्या ईसहाकला बलीदान करानी करता तो तयार व्हई गया. 19 कजं का आब्राहामना वीस्वास व्हताल का, देव मरेल लोकंसला बी परत जीवता करु शकय. आनं जर दखाला गयत तं, खरज ईसहाक मरी जायेल सारका व्हताल आनं आब्राहामला तो परत भेटना.
20 मंग ईसहाक देववर वीस्वास ठेवना मनीसनं तो तेनं दोन पोरे याकोब आनं येसावला तेसना भवीस्यमं चांगला व्हवाला पायजे मनीसनं आशीर्वाद दीना. 21 आनं याकोब बी देववर वीस्वास ठेवना मनीसनं तो मरानी आगुदार योसेफना आखं पोरेसला आशीर्वाद दीना. आनं तेनी काठी टेकीसनं तो देवनी भक्ती करना. 22 आनं योसेफ देववर वीस्वास ठेवना मनीसनं मरनना काटवर रहताना ईस्रायेल लोकंसला देव मीसर देश मयथीन ली जावानी बद्दल तो सांगना. आनं तेना सोताना हाडकंसला बी मीसर मयथीन तो देशला ली जावाला तेना भाऊसंसला तो सांगना.
23 मंग मोसाना मायबाप देववर वीस्वास ठेवनत मनीसनं मोसाना जल्मनी नंतर तेला ते तीन महीना परन दपाडीसनं ठेवनत. कजं का ते दखनत का, तो पोर्या पक्का भारी सय. आनं मीसर देशना राजा सांगेल व्हताल का, ईस्रायेल लोकंसनं आखं पोरेसला मारी टाकालाज पायजे. पन मोसाना मायबाप राजाना तो आज्ञाला बी भीवनत ना. 24 मोसाला फारो राजानी पोर वाढावनी. मंग जवं तो वाढना, तवं तो देववर वीस्वास ठेवना मनीसनं फारो राजाना नातु बनाला बी तो नाकारी दीना. 25 आनं पाप करानी द्वारा जो थोडा टाईमनी करता सुख भेटय, तेला तो नाकारीसनं देवनं लोकंसनी संगं दुख सहन करानी करता तो नीवाडना. 26 आनं तेला वाटना का, मीसर देशना धन संपती पेक्षा ✞ख्रीस्तनी करता आपमान सहन कराना पक्का चांगला सय. कजं का देव पईन जो बक्षीस पुढं तेला भेटनार व्हताल, तेनी वाट तो दखी रहनाल. 27 आनं तो देववर वीस्वास ठेवना मनीसनं राजाना संतापला बी घाबरना आनं मीसर देश मयथीन ईस्रायेल लोकंसला लीसनं नींगी गया. आनं जो देव कोनला बी दखाय ना, तेला दखानी सारका तो धीर धरना आनं पुढं जात रहना. 28 आनं नास करनार देवदुत ईस्रायेल लोकंसना पयलं पोरेसला हात बी नोको लावाला पायजे मनीसनं तो देववर वीस्वास ठेईसनं ✞वल्हांडनना सन पाळना आनं आखं ईस्रायेल लोकंसना घरला मेंडाना रंगत शीतडना.
29 मंग ईस्रायेल लोकं देववर वीस्वास ठेवनत मनीसनं ते जाताना तामडा समुद्रमं रस्ता बनी गया. आनं जशे कोयडी जमीनवर चाली जात, तशे समुद्र मयथीन ते नींगी गयत. पन जवं मीसर देशनं लोकं बी जावानी कोशीत करनत, तवं पानी ई लागना आनं ते बुडीसनं मरनत.
30 मंग ईस्रायेल लोकं देववर वीस्वास ठेईसनं सात दीवस परन यरीहो शेहेरन्या भीतासनी चारीमेर फेर्या मारनत. तवं जशा देव सांगेल व्हताल तशाज त्या भीता पडी गयात.
31 आनं राहाब व्यभीचार काम करनारी येक बाई व्हतील. पन ती देववर वीस्वास ठेवनी मनीसनं जे लोकं देवनी आज्ञा मोडनत तेसनी संगं तीला बी मारामं वना ना. पन देव तीला वाचाडना, कजं का जे लोकंसला यहोशवा जासुस मनीसनं धाडेल व्हताल तेसला ती तीना घरमं जागा दीनी.
32 आनं जे लोकं देववर वीस्वास ठेवनंलत तेस मयथीन मी आजुन कोनी बद्दल सांगु? गीदोन, बाराक, शमशोन, ईफ्ताह, दावीद, शमुवेल आनं देवना वचन सांगनारं आजुन बरज लोकंसनी बद्दल सांगाला जासु तं, टाईम पुरावु ना. 33 तेस मयथीन काही लोकं देववर वीस्वास ठेईसनं दुसरं राजासनी संगं लढाई करनत आनं जीकी गयत. आनं काही लोकं चांगला काम करीसनं लोकंसवर राज करनत. आनं तेसना साठी देव जे वचन देयेल व्हताल तेसला ते भेटाडी लीनत. आनं काही लोकं सीहंसना तोंडला बी बंद करी टाकनत. 34 आनं काही लोकं ईस्तुनी नास करनार शक्ती पईन बी वाची गयत. आनं काही लोकंसला तलवारघाई वार करामं वना, तरी बी ते वाची गयत. आनं ते कमजोर व्हतलत, पन तेसला शक्ती देवामं वनी. आनं ते लढाई करामं पक्कं शक्तीवान बननत आनं दुसरं देशंसना राजासला हाराय दीनत. 35 मंग काही बाया देववर वीस्वास ठेवन्यात मनीसनं तीसनं नातेवाईक जे मरी जायेल व्हतलत, ते बी जीवतं व्हई गयत. आनं आजुन दुसरं लोकं जे देववर वीस्वास ठेवनत, तेसला बरज दुख सोसना पडना आनं तेसला मारी टाकामं वना. तरी बी ये आखं त्रास पईन सुटका व्हवाला ते दखनत ना. कजं का हाई जीवन पेक्षा आजुन येक चांगला जीवन लीसनं परत उठानी करता ते दखी रहनंलत. 36 आनं काही लोकंसला आपमान करीसनं काकडाघाई मारामं वना. आनं आजुन काही लोकंसला साकळीसघाई बांधीसनं जेलमं कोंडामं वना. 37 आनं तेसला दगडमार करीसनं मारामं वना. आनं करवतघाई कापामं वना आनं तलवार घाई मारामं वना. आनं ते मेंडीसना आनं बकरीसना कातडं पांगरीसनं फीरनत. आनं तेसना कोनी बी आधार ना व्हतलत. तेसला त्रास आनं दुख देवामं वना. 38 आनं ते लोकं ईतलं चांगलं व्हतलत का, हाई जग तेसनी करता योग्य ना व्हताल. तेमन ते सुना रानंसमं, डोंगरंसनं, कपारंसमं आनं जमीनना खड्डासमं दपीसनं फीरी रहनंलत. 39 पन ये लोकंसना वीस्वासनी बद्दल चांगली साक्षी देवामं वनी, तरी बी देव जा देवाना वचन देयेल व्हताल, ता तेस मयथीन कोनला बी भेटना ना. 40 कजं का देव आपुन आखंसनी करता येक आखु चांगली योजना करी ठेयेल व्हताल. येनी करता का जवं ते आनं आपुन आखं जन येकसंगं व्हसुत, तवंज आपुन पुरी रीतथीन देवनी ईशा प्रमानं बनसुत.