याकोबनी लीखेल चीठी
1
याकोब सलाम सांगय
1 मी देवना आनं परभु येसु ख्रीस्तना सेवक ✞याकोब सय. आनं देवना वीस्वासी लोकं, जे आखं जगमं पसरेल सत तेसला मी हाई चीठी लीखय. तुमं आखंसला मना सलाम.
वीस्वास आनं बुधीनी बद्दल याकोब सांगय
2 मनं भाऊ आनं बईन, जवं तुमवर नारी नारी परीक्षा येत, तवं हाई तुमना साठी आनंदनी गोस्टं माना. 3 कजं का तुमला मायती सय का, वीस्वासना जीतला पारख वय, तीतला सहन करानी शक्ती भेटय. 4 ती सहन करानी शक्तीला तुमना मजार वाढु द्या. आनं तुमं सहन करामं भक्कम बना. तवं तुमं कशामं बी कमी पडावुत ना आनं तुमं पुरी रीतथीन चांगला बनशात.
5 जर तुम मईन कोनी बुधीमं कमी व्हई तं, तो देवपन प्राथना करीसनं मांगाला पायजे. तवं तेला ती भेटी. कजं का देव कोनला बी दोस ना लाईसनं, आखंसला मोकळा मनथीन देय. 6 पन जवं तुमं प्राथना करीसनं मांगत, तवं तुमना मनमं काही शंका ना धरीसनं वीस्वासथीन मांगाला पायजे. कजं का जो मानुस मनमं शंका धरय, तो समुद्रना लाटासनी सारका सय. जशा समुद्रना लाटा वारानी द्वारा आतातथा फीरीसनं वर उठय आनं खाल पडय, तो मानुस तशाज सय. 7 आशा मानुस माला परभु पईन काहीतरी भेटी मनीसनं नोको वीचार कराला पायजे. 8 कजं का तो दोन मनना सय, आनं तो कोनता बी काममं स्थीर ना सय.
खरी धननी बद्दल याकोब सांगय
9 जर वीस्वासु भाऊ आनं बईन ✞गरीब सत तं, ते मोठयाळ कराला पायजे. कजं का देव तेसला आत्मीक धन दीसनं मोठा बनाडेल सय. 10 आनं श्रीमंत वीस्वासु भाऊ आनं बईनीसला देव नीचा करना तं, ते बी मोठंयाळ कराला पायजे. कजं का श्रीमंत मानुस येखादा चाराना फुल सारका नास व्हई जाई. 11 सुर्य तेना कडंक ऊन लीसनं ऊगय आनं चाराला सुकाडी देय. तवं तेना फुल पडी जाय आनं तेनी सोभा नास व्हई जाय. तशाज श्रीमंत मानुस बी तेना कामधंदामंज नास व्हई जाई.
देव मानुसला पापमं पाडाला परीक्षा करय ना
12 जो मानुस परीक्षाना टाईममं बी वीस्वासमं टीकी रहय, तेला देवना आशीर्वाद भेटय. आनं जवं तो परीक्षामं वीजय व्हई जाय, तेला कायमना जीवनना मुगुट भेटी. कजं का, जे लोकं देववर मया करत तेसला हाई मुगुट देवाना वचन देव देयेल सय. 13 जर येखादा मानुस वाईट गोस्टीसना परीक्षामं पडना तं, तो नोको सांगाला पायजे का, देव माला हाई परीक्षामं टाकेल सय. कजं का देव सोता कधी वाईट गोस्टीसना परीक्षामं पडय ना, आनं तो कोनला बी वाईट गोस्टीसना परीक्षामं टाकय ना. 14 पन आखं जन सोता वाईट कामं करानी ईशा ठेवत आनं फसी जात. आनं ते परीक्षामं पडत. 15 मंग वाईट ईशा मनमं जाईसनं पापला जल्म देय. आनं पाप पुरा वाढीसनं मरनला जल्म देय.
16 मनं भाऊ आनं बईन, तुमं सोता फसु नोका. 17 आकासमं जे काही बी सत आनं ऊजाळा दी रहनं सत, ते आखंसला सोरगं मतला देवबाप बनाडना सय. जवं ते आकासमं फीरत, तेसना ऊजाळा बदली जाय. पन देवबाप कधी बदलावु ना. आनं तोज देव पईन आखं चांगला दान आपुनला भेटय. 18 देवनी ईशा आशी व्हतील का, आपुनला येक नवीन जीवन भेटाला पायजे. मनीसनं तो तेना खरा वचन आपुनला दीना सय. तो येनी करता हाई करना का, जशा पयला जल्म व्हयेल जनावरंसला यहुदी लोकं देवला आर्पन करतत, तशाज आपुन बी तेनाज बनाला पायजे. आनं हाई जगमं तो जो काही बी बनाडेल सय, तेस मईन आपुन तशे बनाला पायजे.
देवना वचन आयकाना आनं पाळाना
19 मनं भाऊ आनं बईन, हाई गोस्टं मनमं ठेवा का, तुमं आखं जन लवकर आयकनारं आनं वीचार करीसनं बोलनारं बनाला पायजे. आनं तुमं जास्त राग नोको करनारं बनाला पायजे. 20 कजं का मानुसना राग द्वारा, जो धार्मीकताना काम व्हवानी करता देवनी ईशा सय, ता वय ना. 21 तेमन तुमं आखा वाईट काम आनं मन मतला आखा वाईट वीचार सोडा. आनं जो देवना वचन तुमला सांगामं ईयेल सय, तेला नम्र बनीसनं तुमं स्वीकार करा. कजं का तुमना रुदयमं जो देवना वचन तुमं स्वीकार करेल सत, तो तुमना तारन करु शकय. 22 तुमं देवना वचनला फक्त आयकु नोका, पन ता आयकीसनं पाळा. कजं का जे लोकं वचन आयकीसनं पाळत ना, ते सोताला फसाडी लेत. 23 जर कोनी वचन आयकीसनं तेला पाळय ना तं, तो आरसामं तेना तोंड दखनार मानुसनी सारका सय. 24 तो सोताला आरसामं दखय आनं तथाईन नींगी जाय. आनं तो कशा दखाय, हाई लगेज भुलाय जाय. 25 पन जो मानुस देवना वचनवर मन लावय, आनं आयकीसनं भुलाय जाय ना, पन पाळय, तेला देव आशीर्वाद करी. कजं का देवना वचन चांगला सय आनं आपुनला वाईट काम पईन सुटका देय.
खरा धार्मीकपना
26 जर येखादा मानुस सोताला धार्मीक समजय, आनं सोतानी जीबला ताबामं ठेवय ना तं, तो सोताला फसाडय. आनं तो मानुसना धार्मीकपना वायबार सय. 27 पन जो मानुस पोसले आनं वीधवासना दुखमं तेसनी काळजी लेय, आनं सोताला जगन्या वाईट गोस्टीस पईन दुर ठेवय, तोज खरा धार्मीक मानुस सय. आशा धार्मीकपना आपला देवबापनी नजरमं चांगला आनं खरा सय.