2
आखं लोकंसवर मया करा
1 मनं भाऊ आनं ब‍ईन, जो परभु येसुला मोठा मान भेटय, तेवर तुमं वीस्वास ठेवत. तेमन तुमं तोंड दखीसनं वागु नोका. 2 जर येखादा मानुस सोनानी मुंदी आनं चांगलं कपडं घालीसनं तुमनी मीटींगमं वना, आनं आजुन येक गरीब मानुस फाटेल आनं खराब कपडं घालीसनं त‍ई वना, 3 आनं जर तुमं चांगलं कपडं घालेल मानुसला मान दीसनं तेला सांगनत का, 'आठी तुना साठी चांगली जागा सय, आठी बस', पन जर तुमं तो गरीबला सांगनत का, 'तु त‍ई हुबा रह' नातं 'त‍ई खाल बस'. 4 मंग आशा करीसनं तुमं भेदभाव करनत ना का? आनं तुमं वाईट वीचारथीन न्‍याय करनारं व्हई गयत ना का? 5 मनं भाऊ आनं ब‍ईन, आयका, लोकंसनी नजरमं जे गरीब सत, तेसला देव नीवाडेल सय. येनी करता का, ते वीस्वासमं धनवान बनाला पायजे आनं देव तेवर मया करनारं लोकंसला जो राज्य देवाना वचन देयेल सय, तो राज्यना वारीस बी ते बनाला पायजे. 6 पन तेज गरीब लोकंसना तुमं आपमान करेल सत. आनं जे धनवान लोकंसला तुमं मान दीनत, तेज तुमवर जुलुम करत आनं तुमला कोर्टमं वडी ली जात. 7 आनं जो येसु ख्रीस्‍तला मोठा मान भेटय आनं जेला तुमं स्वीकार करेल सत, तेनी नींदा तेज करत.
8 देवना वचन मंजे देवना राज्यना नीयम सय. आनं तो नीयममं आशा लीखेल सय का,
"जशा तुमं सोतावर मया करत, तशा तुमनं शेजारनंसवर बी मया करा".
जर तुमं हाई नीयम पाळत तं, तुमं चांगला करत. 9 पन जर तुमं तोंड दखीसनं वागत तं, तुमं पाप करत, आनं नीयम मोडाना दोस तुमवर येय. 10 कजं का जर येखादा मानुस देवना आखा नीयम पाळीसनं येकंज नीयम चुकायना तं, तो आखा नीयमना दोसी ठरय. 11 कजं का 'शीनाळीना काम करु नोका' आशा जो सांगेल सय, तो आशा बी सांगय का, 'खुन करु नोका'. जर तुमं शीनाळीना काम करत ना, पन खुन करत तं, तुमं नीयम मोडत. 12 जेना न्‍याय पाप पईन सुटका देनारं नीयम प्रमानं व्‍हनार सय, आशे लोकंसनी सारका तुमं बोला आनं वागा. 13 कजं का जो दया करय ना, तेना न्‍याय बी देव बीगर दया दखाडीसनं करी. पन जो दुसरंसवर दया करय, तो न्‍यायना दीवसमं आनंद करी.
वीस्वास आनं चांगला काम
14 मनं भाऊ आनं ब‍ईन, जर येखादा मानुस सांगय का, 'मी येसु ख्रीस्‍तवर वीस्वास ठेवय', पन तशा काम तो करय ना तं, तेना काही फायदा ना सय. कजं का तेना वीस्वास तेला तारन देवु शकावु ना. 15 जर येखादा भाऊ नातं ब‍ईनपन कपडं ना व्हई आनं तेसला रोजना जेवन बी भेटय ना, 16 आनं तुम मयथीन येखादा तेसला सांगय का, 'देवबाप तुमला आशीर्वाद देई, आनंदमं रवा, चांगलं कपडं घाला आनं चांगला जेवन करा'. पन तुमं तेना आंगला जा गरज सय, ता देत ना तं, ते प‍ईन काय फायदा सय? 17 कजं का वीस्वासनी संगं जर काम ना सय तं, तो वीस्वास फक्‍त मरेल सारका सय. 18 पन येखादा सांगु शकय का, 'तु वीस्वास ठेवनार सय, आनं मी काम करनार सय'. पन मी तुमला सांगय का, बीगर काही काम करीसनं तुमना वीस्वास मला दखाडा आनं मी तुमला मना वीस्वास काम करीसनं दखाडसु. 19 तुमं वीस्वास ठेवत का, येकंज देव सय. हाई गोस्टं चांगला सय. आनं भुतं बी आशा वीस्वास धरत आनं थरथर करत. 20 आरे मुर्ख मानुस, बीगर कामना वीस्वास वायबार सय. येना तुमला पुरावा पायजे का? 21 जवं आपला बाप आब्राहाम तेना पोर्‍या ईसहाकला होम वेदीवर परमेस्वरनी करता आर्पन करला तयार व्हताल, तवं तो तेना कामघाई धार्मीक ठरना ना का? 22 तुमं दखत का, तो देववर जो वीस्वास ठेवना आनं जो काम करना ते दोनीसनी द्वारा तेला फळ भेटना. आनं तेना कामनी द्वारा तेना वीस्वास पुरा व्हयना. 23 तवं देवना वचनमं जा लीखेल सय, ता पुरा व्हयना. तो आशा सय का,
"आब्राहाम देववर वीस्वास ठेवना मनीसनं तेला धार्मीक गनामं वना".
तेमन आब्राहामला देवना सोपती सांगामं वना. 24 तुमं दखत का, मानुस फक्‍त वीस्वासघाई ना, पन तेना कामघाई देवनी नजरमं धार्मीक ठरावामं येय.
25 तशाज राहाब नावनी येक वेशया बाई यहोशवाना धाडेल ईस्रायेल लोकंसला आसरा दीसनं तेसला दुसरी वाट धरी नींगी जावाला मदत करनी. तवं ता कामघाई तीला धार्मीक ठरावमं वना ना का? 26 तेमन जशा शरीर आत्मा शीवाय मरेल सय, तशाज वीस्वास बी काम शीवाय मरेल सय.