10
ख्रीस्‍त आपला पापनी करता येकंज दाउ बलीदान व्हयना
1 मोसाना देयेल नीयम खरा ना सय, पन ज्या खर्‍या आनं चांगल्या गोस्टी आपुनला भेटनार सत, तो नीयम फक्‍त तेनी सावलीज सय. आनं तो नीयम प्रमानं पापना पस्तावानी करता घडीघडी दर वरीस देवना जवळ जाईसनं बलीदान करना पडता. तेमन जे लोकं देवपन भक्‍तीनी करता येत, तेसला तो नीयमनी द्वारा पाप‍ पईन पुरा रीतथीन कधीज सुटका भेटु शकय ना. 2 आनं जर तो मोसाना नीयम लोकंसला पाप‍ पईन पुरा सुटका करु शकता व्हई तं, जे लोकं देव कडं ईसनं भक्‍ती करतत ते कायमनी करता शुधं व्हई जातत आनं तेसला आजुन बलीदान करनी काही गरज पडती ना. आनं तेसना करेल पापनी बद्दल ते आजुन सोताला दोसी मानतत ना. 3 पन ते दर वरीस तेसना करेल पापनी बद्दल सोताला दोसीज मानतत, तेमन ते घडीघडी बलीदान करतत. 4 कजं का बैलंसना आनं बकरीसना रंगतघाई पाप कधीज मीटु शकय ना. 5 तेमन जवं येसु ख्रीस्‍त हाई जगमं वना, तवं तो देवबापला आशा सांगना का,
"हे देवबाप, तुला जनावरंसना बलीदान आनं आर्पन ना पायजे व्हताल. पन बलीदान करानी करता तु हाई मना शरीरला बनाडीसनं माला देयेल सय. 6 आनं जनावरंसला पुरा चेटाडीसनं जो आर्पन करामं येय, तेमं तुला आनंद वाटय ना. आनं पापना पस्तावानी करता आजुन जो आर्पन करामं येय तेमं बी तुला आनंद वाटय ना. 7 तेमन जशा तुना नीयममं मनी बद्दल लीखेल सय, दख, तशाज तुनी ईशा प्रमानं करानी करता मी ई लागना सय."
8 ते आखं बलीदान आनं आर्पन मोसाना देयेल नीयम प्रमानं करामं ई रहनंलत, तरी बी येसु ख्रीस्‍त पईला सांगना का,
"तुला जनावरंसना बलीदान आनं आर्पन ना पायजे व्हताल. आनं जनावरंसला पुरा चेटाडीसनं जो आर्पन करामं येय, तेमं तुला आनंद वाटय ना. आनं पापना पस्तावानी करता आजुन जो आर्पन करामं, तेमं बी तुला आनंद वाटय ना. 9 आनं तेनी नंतर तो आखु सांगना, दख, तुनी ईशा प्रमानं करानी करता मी ई लागना सय." \qt*
तेमन जे जुना नीयमना आखा बलीदान आनं आर्पननी रीत व्हतल्यात, ते आखंसला देव बंद करी टाकना आनं तेसनी जागामं येसु ख्रीस्‍तना बलीदानला ली वना. 10 आनं देवनी जी ईशा व्हतील, ती येसु ख्रीस्‍त करना, मंजे तो येकंज दाउ सोताला बलीदान करी दीना. आनं तेनी द्वारा आपुन आपला पाप प‍ईन शुधं व्हई गयं सत.
11 प्रतेक याजक लोकं दर रोज वेदीपन हुबं रहीसनं देवनी सेवा करत. आनं ते घडीघडी तोज बलीदान आनं आर्पन करानी सेवा करत. पन ते जा बलीदान करत, ता लोकंसला पाप प‍ईन कधीज सुटका करु शकता ना. 12 पन आपला मोठा याजक ख्रीस्‍त आखं लोकंसनी करता येकंज दाउ कायमनी करता बलीदान करी दीना सय. आनं आशा करीसनं आतं तो देवनी जेवनी कडं बसना सय. 13 आनं तवं पईन देव तेनं दुशमनंसला तेना पायनी खाल ली येय ताव, तो वाट दखी रहना सय. 14 आनं जे लोकंसला शुधं करामं करामं ई रहना सय, ते आखंसला येसु ख्रीस्त तो येकंज बलीदान दीसनं कायमनी करता बीगर दोसना बनाडी दीना सय. 15 आनं येनी बद्दल पवीत्र आत्मा बी आपुनला साक्षी दीसनं आशा सांगय का,
16 "परभु सांगय, येनारा दीवसमं मी मनं लोकंसनी संगं येक करार करसु. तो आशा सय का, मी मना नीयमंसला तेसना मनमं ठेवसु आनं तेसना रुदयमं ते लीखी ठेवसु.
17 आजुन तो आशा सांगय का,
"मी तेसना आखं आपराधंसला माफ करसु. आनं येनी पुडं तेसना करेल पापला मी भुलाय जासु."
18 तं मंग जवं ये आखा पापनी माफी व्हई जायेल सय तं, येनी नंतर आजुन पापनी करता बलीदान कराना काही गरज ना सय.
आपुन देवना जवळ जावाला पायजे
19 तेमन मनं भाऊ आनं ब‍ईन, येसु ख्रीस्‍त आपला साठी बलीदान करी दीना सय मनीसनं ती पक्‍की पवीत्र जागामं जावानी करता आपुन आखंसला हीम्मत भेटी गयी सय. 20 आनं आपुन त‍ई जावाला पायजे मनीसनं तो मजारना पडदा मयथीन येक रस्ता बनाडी दीना सय. मंजे सोताना शरीरला बलीदान करीसनं तो आपला साठी देवनी कडं जावानी करता येक नवीन आनं जीवन देनार रस्ता बनाडी दीना सय. 21 आनं येसु ख्रीस्‍त आपला मोठा याजक सय, जो देवना घरवर राज करी रहना सय. 22 तेमन आपुन खरा रुदय लीसनं आनं तेवर पुरा भरोसा ठेईसनं देवनी शेजार जावाला पायजे. कजं का जशा याजक जनावरंसना रंगत लोकंसवर शीतडता तं, तेसला वाटता का, ते पापना दोस प‍ईन सुटका व्हई गयं सत, तशाज येसु ख्रीस्‍तना रंगतघाई आपुन बी पापना दोस प‍ईन सुटका व्हई गयं सत आनं आपला शरीर शुधं पानीघाई धवाय गया सय. 23 आनं जी आसा आपुन ठेवनं सत आनं कबुल करेल सत, तीला आपुन भक्‍कम धरी ठेवाला पायजे. कजं का आपुन देववर भरोसा ठेवु शकत का, तो जा कराना वचन देय, ता नक्‍की पुरा करय. 24 आनं मया करानी करता आनं चांगला काम करानी करता आपुन येक दुसरंसला हीम्मत देवानी बद्दल ध्यान देवाला पायजे. 25 आनं आपुन देवनी भक्‍ती करानी करता येकजागं गोळा व्‍हवाना बंद नोको कराला पायजे. कजं का काही लोकं येनी बद्दल काळजी करत ना. आनं हाई तेसनी सवय पडी जायेल सय. पन येनी बद्दल आपुन येक दुसरंसला आजुन जास्त हीम्मत देवाला पायजे. कजं का तुमला मायती सय का, परभुना परत येवाना जवळ ई लागना सय.
26 कजं का खरा काय सय, हाई मायती रहीसनं बी जर आपुन पाप करतंज रहसुत तं, कोनता बी बलीदान आपुनला पाप पईन शुधं करु शकय ना. 27 पन जे लोकं देवना वीरोध करत, तेसना साठी येक भयानक न्‍याय ठेवामं ईयेल सय. आनं तेसला भयानक ईस्तुघाई नास करामं येई. 28 जे लोकं मोसाना देयेल नीयमला पाळतत ना, तेसनी वीरुद न्‍याय करताना दोन नातं तीन लोकं साक्षी दीनत तं, बीगर दया करीसनं तेसला जीवता मारामं ईता. 29 मंग वीचार करा का, जो कोनी देवना पोर्‍याला पायनी खाल चेंदी टाकय तेला कीतला मोठा दंड भेटी! कजं का जो करारना रंगतघाई तो सोता पवीत्र बनना तेला तो पवीत्र समजय ना. आनं जो पवीत्र आत्मा देवनी दया आपला साठी ली येय, तेला तो आपमान करय. 30 कजं का देवना वचनमं लीखेल सय का,
"बदला लेवाना काम मना सय. आनं मी बदला लीसु .
आनं आखु आशा बी लीखेल सय का,
"परभु तेनं लोकंसना न्‍याय करी."
मंग जो देव या गोस्टी सांगय, तेला आपुन वळखत. 31 तो जीवता देवना हातमं सापडाना मंजे पक्‍की भयानकनी गोस्टं सय.
आपुन हीम्मत नोको सोडाला पायजे
32 जवं पयला दाउ तुमं सुवार्ता आयकनत आनं तीला स्वीकार करनंलत, ते सुरुवातना दीवसंसला याद करा. तवं तुमं पक्‍कं दुख सहन करी रहनंलत, तरी बी तुमं वीस्वासमं भक्‍कम रहनत. 33 आनं काही दाउ लोकंसनी समोर तुमना आपमान करामं वना आनं वीरोध करामं वना. आनं आजुन काही दाउ जे लोकंसला आशा करामं वना, तुमं सोता व्हईसनं तेसमं भागीदार बननत. 34 मंजे जे लोकं जेलमं कोंडायेल व्हतलत, तेसला तुमं मदत करीसनं तेसना दुखमं भागीदार बननत. आनं तुमना आखा धन संपती ली जावामं वनी, तरी बी तुमं आनंद करनत. कजं का तुमला मायती व्हताल का, तुमना साठी सोरगंमं येक पक्‍का चांगला धन ठेवामं ईयेल सय आनं तो धन कायम रहनार सय. 35 तेमन जवं तुमवर दुख येय, तवं हीम्मत सोडु नोका, कजं का देव तुमला येना साठी मोठा बक्षीस देनार सय. 36 तुमं धीर धरनारं बनाला पायजे. येनी करता का जवं तुमं देवनी ईशा प्रमानं चालशात, तवं जा देवाना वचन देव देयेल सय, ता तुमला भेटी. 37 कजं का देवना वचनमं लीखेल सय का,
"थोडाज टाईम रही गया सय. आनं जो ख्रीस्‍त येनार सय, तो ई लागी. तो उशीर करावु ना. 38 आनं जे लोकं मनी नजरमं नीतीवान सत, ते मावर वीस्वास ठेईसनं जीवन जगीत. पन जर ते मांगं फीरी जाईत तं, तेसवर मी खुस रव्हावु ना."
39 पन जे लोकं मांगं फीरी जात आनं तेसना नास व्हई जाय, तेसनी सारकं आपुन ना सत. पन आपुन आशे लोकं सत जे वीस्वास ठेईसनं तारन भेटाडेल सत.