तीतला लीखेल पौलनी चीठी
1
पौल सोतानी बद्दल सांगय
1 मी पौल, देवना येक सेवक सय. आनं माला येसु ख्रीस्तनी द्वारा धाडामं ईयेल सय. जे लोकंसला देव नीवाडेल सय, तेसला वीस्वासना प्रचार करानी करता माला धाडामं ईयेल सय. आनं जो सत्य तेसला नीतीवान जीवन जगाना रस्ता दखाडय, तेनी बद्दल शीकाडानी करता बी माला धाडामं ईयेल सय. 2 कायमना जीवन भेटी मनीसनं आपुन येक आसा ठेयेल सत. ती आसाघाई तो वीस्वास आनं सत्य भेटय. जगनी सुरुवात व्हवानी आगुदार देव आपुनला कायमना जीवन देवाना वचन देयेल सय. तो देव कधी खोटा बोलय ना. 3 आनं तो देव तेना बरोबर टाईमला कायमना जीवननी बद्दल वचन जगमं प्रगट करना. आनं तो वचन प्रगट कराना काम देव मना हातमं देयेल सय. आनं त्या गोस्टीसनी बद्दल मी प्रचार करना. कजं का ता करानी करताज आपला तारन देनार देव माला आज्ञा देयेल सय.
4 मी तीतला हाई चीठी लीखय. तीत, तु मना खरा पोर्या सारका सय. कजं का आपुन दोनी जन येसु ख्रीस्तवर वीस्वास ठेवत. मी प्राथना करय का, देवबाप आनं आपुनला तारन देनार येसु ख्रीस्त तुला दया आनं शांती देईत.
क्रीतमं तीतनी जवाबदारी
5 क्रीत नावना बेटमं जो काम बाकी रहेल व्हताल, तो पुरा कराला पायजे मनीसनं मी तुला तई सोडीसनं वना. आनं मी जशा तुला आज्ञा देयेल व्हताल, तशा प्रतेक शेहेरनी दर मंडळीमं आगेवान मानसंसला नीवाडीसनं ठेव. 6 जेसला तु नीवाडशी, तो बीगर दोसना आनं येकंज बाईना नवरा पायजे. तेनं पोरेसोरे देववर वीस्वास ठेवनारं पायजे. आनं ते मायबापसना आधीनमं रहनारं पायजे. आनं जेसला तु नीवाडशी तेसवर वाईट गोस्टीसना आरोप नोको रव्हाला पायजे.
7 मंडळीनं आगेवान लोकं देवनी सेवा करनारं सत. तेमन ते बीगर दोसना रव्हाला पायजे. ते सोताना मनथीन चालनारं नोको, लगेज राग करनारं नोको, दारुड्या नोको, कज्या करनारं नोको आनं फसाडीसनं पयसा कमावनारं नोको पायजे. 8 पन ते पावनसार करनारं, चांगला काम करानी आवड धरनारं, चांगली वागनुकमं जीवन जगनारं, नीतीवान आनं पवीत्र जीवन जगनारं आनं सोताना जीवनला ताबामं ठेवनारं पायजे. 9 जो शीकाडेल देवना वचनवर आपुन वीस्वास ठेवु शकत, तेला ते धरी ठेवाला पायजे. आशा करीसनं ते लोकंसला खरा शीक्षन शीकाडु शकीत आनं जे लोकं खरा शीक्षनना वीरोध करत, तेसना चुक दखाडीसनं तेसना तोंड बंद करु शकीत.
10 कजं का वीरोध करनारं आनं बीगर कामना बोलनारं आनं फसाडनारं बरज लोकं सत. खास करीसनं जे ✞यहुदी लोकं वीस्वासमं ईयेल सत, तेसनी बद्दल मी सांगय. 11 ते सोताना तोंड बंद करालाज पायजे. कजं का जा नोको शीकाडाला पायजे, ता ते शीकाडत. आनं आशा करीसनं ते पुरा कुटुमना वीस्वासना नास करी टाकत. आनं ते फक्त पयसा कमावानी करता आशा वाईट शीक्षन देत. 12 तेस मईन तेसनाज येक बुधीवान मानुस सांगय का, क्रीत नावना बेटनं लोकं कायम लबाड करत. ते पक्का खराब जनावरं सारकं सत, आनं ते आळसी आनं खावगुल्या सत.
13-14 हाई गोस्टं खरज सय. तेमन तु तेसला जोरमं डोकाडीसनं सांग का, ते लोकं यहुदीसनं मनघढन गोस्टीस कडं आनं खरा पईन भटकी जायेल मानसंसना शीक्षन कडं ध्यान नोको देवाला पायजे. येनी करता का ते वीस्वासमं भक्कम बनाला पायजे. 15 जे लोकंसना रुदय आनं मन चांगला सय, तेसना साठी आखंकाही चांगला सय. पन जे लोकं वीस्वास ना ठेवनारं सत, तेसना साठी काही बी चांगला ना सय. कजं का तेसना मन आनं वीचार पापमं भरी जायेल सय. 16 आमं देवला वळखत मनीसनं ते सांगत, पन तेसना कामघाई ते तेला नाकारत. ते वाईट आनं आज्ञा मोडनारं सत. आनं ते कोनता बी चांगला काम कराना लायक ना सत.