4
1 देवनी समोर आनं जो येसु ख्रीस्‍त लोकंसवर राज्य कराला येई, आनं जीवता लोकंसना आनं मरेल लोकंसना न्‍याय करी, तेनी समोर मी तुला आज्ञा दीसनं सांगय का, 2 तु देवना वचनना प्रचार कर. लोकं तुना आयकत का ना आयकत, तरी बी कायम तयार रह. धीर धरीसनं लोकंसला शीकाड आनं तेसना दोस दखाड. तेसला जोर दीसनं शीकाड आनं हीम्मत दे. 3 कजं का आशा दीवस येईत का, लोकं चांगला शीक्षनला आयकावुत ना. पन जा तेसनी ईशा सय, ताज ते करीत. आनं सोतानी करता बरज शीकाडनारंसला गोळा करीत. आनं लोकंसला आयकाला जा चांगला वाटय, ताज ते शीकाडनारं शीकाडीत. 4 आनं ते लोकं जा खरा सय, ता आयकावुत ना. पन मनगढन गोस्टीस कडं मन लाईत. 5 पन तु सावध रह. आनं सोताला कायम ताबामं ठेव आनं दुख सहन कर. आनं तु सुवार्ता प्रचार कराना काम कर. आनं देव तुना हातमं जी सेवा देयेल सय, ती पुरी कर.
6 मी तुला या गोस्टी येनी करता सांगय का, आतं मना जीवनला देवनी करता आर्पन कराना टाईम आनं मराना टाईम शेजार ई लागना सय. 7 येक लढाईनी सारका मी देवना काम चांगला करना सय. आनं जो काम देव मना हातमं देयेल व्हताल, ता मी पुरा करना सय. आनं मी मना वीस्वास धरी ठेवना सय. 8 आतं मना साठी येकंज बाकी रहना सय. तो हाई सय का, मी नीतीवानना जीवन जगना मनीसनं मना साठी सोरगंमं येक बक्षीस ठेयेल सय. तो मंजे नीतीवानना मुगुट. जवं न्‍याय करनार नीतीवान परभु न्‍याय कराला येई, तवं तो माला बक्षीस मनीसनं तो मुगुट देई. आनं फक्‍त मालाज ना, पन जे लोकं तेनी येवानी वाट दखी रहनं सत, ते आखंसला तो देई.
पौल शेवटना सलाम सांगय आनं तीमथीला लवकर तेनी कडं येवाला सांगय
9 तीमथी, तुला जीतला लवकर येता व्हई, तीतला लवकर मनी कडं ये. 10 कजं का देमासला हाई जगना सुख आवडना, तेमन तो माला सोडीसनं थेसलनीक शेहेरमं नींगी गया. क्रेसकेस गलती देशमं गया आनं तीता दाल्मतीय देशमं गया. 11 आतं फक्‍त लुक मनी संगं येखलाज सय. आनं जवं तु ईशी, तवं मार्कला तुनी संगं ली ये. कजं का तो मनी सेवामं माला मदत करानी करता पक्‍का उपयोगना सय. 12 तुखीकला मी ईफीसमं शेहेरमं धाडेल सय. 13 मी त्रोवसा शेहेरमं मना कोट कर्पाना घरमं भुलाय वना सय. जवं तु ईशी, तवं तो कोट ली ये. आनं मनं पुस्तक, खास करीसनं जे मेंडीना चामडाना बनाडेल सत, ते बी ली ये. 14 आलेक्‍सांद्र जो तांबाना भांडं बनाडय, तो माला पक्‍का दुख दीना सय. आनं तो जा करना, तेना हीसोब परभु ते प‍ईन लेई. 15 तेनी बद्दल तु बी सावध र‍हजे. कजं का आपुन जा शीकाडनत, तेला तो पक्‍का वीरोध करनाल.
16-17 जवं पयला दाउ रोम शेहेरमं मना न्‍याय कराला माला ली गयत, तवं कोनी बी मनी कडथीन माला वाचाडानी करता बोलनत ना. कजं का आखं जन माला सोडीसनं नींगी जायेल व्हतलत. तरी बी परभु मनी संगं हुबा रहीसनं माला शक्‍ती दीना. तेमन तई मी पुरा सुवार्ता प्रचार करु शकना. आनं बीगर यहुदी लोकं ता आयकनत. आनं देव माला वाघना डाचा म‍ईन वाचाडना. मी प्राथना करय का, जो लोकं माला सोडीसनं नींगी जायेल व्हतलत देव तेसला माफी देई. 18 माला नास करानी करता लोकं जीतला बी वाईट कामं आनं बेत करत, तेस प‍ईन परभु माला वाचाडी. आनं तेना सोरगंना राज्यमं माला सुखना ली जाई. तेलाज कायम आपुन स्तुती कराला पायजे. आमेन.
19 प्रीस्का, आक्‍वीला आनं आनेसीफरना कुटुमनं आखं लोकंसला मना सलाम सांग. 20 येरास्‍त करींथ शेहेरमं रही गया सय. आनं त्रफीम आजारी ‍पडना सय. तेमन मी तेला मीलेत शेहेरमं सोडी वना सय. 21 आनं हीवाळानी आगुदार तु मनी कडं येवानी पक्‍की कोशीत कर. युबल, पुदेस, लीन, क्‍लौदीया आनं आखा वीस्वासी भाऊ बयीनी तुला सालाम सांगत. 22 मी प्राथना करय का, परभु तुनी संगं रही आनं तुमं आखंसवर तो दया करी.