तीमथीला लीखेल पौलनी पयली चीठी
1
पौल सलाम सांगय
1-2 मी पौल सय आनं तीमथीला मी हाई चीठी लीखय. जो देवबाप आपुनला तारन देय आनं जो येसु ख्रीस्तवर आपुन आसा धरी ठेवत, ते माला आज्ञा दीसनं धाडेल सत.
तीमथी, तु वीस्वासमं मना खरा पोर्या सारका सय. कजं का मीज तुला देवना वचन सांगीसनं वीस्वासमं ली वना सय. मी प्राथना करय का, देवबाप आनं आपला परभु येसु ख्रीस्त तुवर दया आनं मया करीत आनं तुला शांती देईत.
खोटा शीक्षन पईन सावध रहज्या
3 मी जवं मासेदोनीया जील्लामं जाई रहनाल, तवं तुला वीनंती करीसनं सांगनाल का, तु ईफीस शेहेरमंज रहजी. कजं का आतं काही लोकं तई खोटा शीक्षन शीकाडी रहनं सत. तु तई रहीसनं तेसला जोर दीसनं सांग का, ते खोटा शीक्षन नोको शीकाडाला पायजे. 4 आनं जे मन घढन गोस्टी सत आनं कधी ना सरनार गोस्टी सत, तेसवर ते ध्यान नोको देवाला पायजे. कजं का तेसनी द्वारा फक्त वादवीवाद वाढय. आनं देववर वीस्वास ठेईसनं जीवन जगानी करता लोकंसला मदत भेटय ना. 5 डोकाडीसनं सांगाना कारन हाई सय का, आखं वीस्वासी लोकं येकमेकंसवर मया कराला पायजे. आनं हाई मया चांगला रुदयथीन आनं चांगला मन पईन आनं खरा वीस्वास मईन नींगय. 6 पन काही लोकं या गोस्टी सोडीसनं भटकी गयं सत. आनं ते वायबार वादवीवादंसमं टाईम घालत. 7 ते नीयम शीकाडनारं बनाला दखत. पन ते नीयमनी बद्दल जोर दीसनं काय बोलत, ता तेसलाज समजय ना. 8 आपुनला मायती सय का, जर कोनी देवना नीयमना चांगला रीतथीन ऊपयोग करय तं, ता नीयम चांगला सय 9 आनं आपुनला हाई बी मायती सय का, देवना नीयम नीतीवान लोकंसना दोस दखाडानी करता बनाडामं वना ना. पन जे नीयम मोडत, जे यंगरेटपनाना काम करत, जे देवला मानत ना, जे पापी लोकं सत, जे पवीत्र ना सत, जे वाईट जीवन जगत, जे मायबापसला जीवता मारत, जे खुन करत, 10 जे शीनाळीना काम करत, जे मानसं मानसंसनी संगं शीनाळीना काम करत आनं बाई बाईसनी संगं शीनाळीना काम करत, जे गुलामंसना बेपार करत, जे लबाड करत, जे खोटी साक्षी देत आनं जे लोकं काही बी चांगला शीक्षनना वीरुद काम करत, तेसना साठी नीयम बनाडामं वना सय. 11 आनं हाऊ चांगला शीक्षन जो देवला मोठा मान भेटय तेनी सुवार्ता मईन ईयेल सय. आनं तीज सुवार्ता सांगानी जवाबदारी माला देवामं ईयेल सय. आनं जो देवपन आखा आशीर्वाद सय, तोज माला हाई जवाबदारी देयेल सय.
देवनी दयानी बद्दल पौल आभार मानय
12 जो परभु येसु ख्रीस्त माला शक्ती दीना, मी तेना आभार मानय. कजं का तो मावर भरोसा ठेईसनं माला तेनी सेवा करानी करता नीवाडना सय. 13 मी पयलंग तेनी नींदा करनार आनं वीरोध करनार आनं आपमान करनार व्हताल. तरी बी तो मावर दया करना. कजं का ते आखं मी बीगर समजीसनं आनं बीगर वीस्वास मुळे करनाल. 14 आपला परभुनी दया माला भरपुर भेटनी. आनं ती दयानी संगं येसु ख्रीस्तमं जो वीस्वास आनं मया सय, ता बी माला भेटना. 15 हाई वचनवर वीस्वास ठेवालाज पायजे आनं स्वीकार करालाज पायजे का, येसु ख्रीस्त पापी लोकंसना तारन करानी करता हाई जगमं वना. आनं ते पापी लोकंस मईन मी येक मुख्य सय. 16 पन देव मावर दया करना. आनं तेमं कीतली सहन करानी शक्ती सय हाई येक ऊदाहरन मनीसनं लोकंसला दखाडानी करता मनी सारका मुख्य पापीला बी तो उपयोग करना. जे लोकं कायमना जीवन भेटाडानी करता पुडं तेवर वीस्वास ठेईत, तेसला तो हाई ऊदाहरन दखाडी. 17 आपला देव कायम राज करनार राजा सय. आनं तो कधी नास वनार ना सय आनं तेला कोनी बी दखु शकत ना. तो येकंज देवला कायम मोठा मान भेटाला पायजे. आमेन.
18 मना पोर्या तीमथी, तो देवनी करता तु काय कराला पायजे येनी बद्दल बरज लोकं भवीस्यवानी सांगेल सत. आनं जा सांगामं ईयेल सय, फक्त ताज कराला मी तुला सांगी रहना सय. आनं तशेज करीसनं तु येक शीपाईनी सारका ते खोटा शीक्षननी वीरुद लढाई करु शकशी. 19 तु वीस्वासमं भक्कम रहजी आनं तुना मनना वीचारला चांगला ठेवजी. कजं का काही लोकं मनना चांगला वीचारला नाकारी दीनत, तेमन तेसना वीस्वासना नास व्हई गया. 20 तेसमं हुमनाय आनं आलेक्सांद्र सत. तेसला मी ✞सैतानना हातमं देयेल सय. कजं का ते देवना वीरुद नींदा कराना नोको शीकाला पायजे.