3
पौल सांगय का, आमना साठी प्राथना करा
1 मनं भाऊ आनं बईन, शेवट आमं तुमला सांगत का, आमना साठी प्राथना करज्या. प्राथना करा का, जशा तुममं व्हयना, तशाज परभुना वचन लवकर दुसरी दुसरी जागामं बी प्रचार व्हवाला पायजे. आनं ते आयकनारं तेला मान दीसनं स्वीकार कराला पायजे. 2 आनं प्राथना करा का, देव आमला वाईट लोकंसना हात मईन वाचाडाला पायजे. कजं का बरज लोकं देववर वीस्वास ठेवत ना आनं वीरोध करत. 3 पन परभु जा कराला सांगय, ता तो करय. तेमन तो तुमला वीस्वासमं भक्कम बनाडी आनं वाईट सैतान पईन तुमला समाळ करी. 4 देववर आमना भरोसा सय का, आमं तुमला जा शीकाडनत, ता तुमं पाळत आनं तुमं पुडं बी तशाज करशात. 5 आमं प्राथना करत का, परभु येसु ख्रीस्त तुमला मायती करी देई का, देव तुमवर कीतला मया करय. आनं जशा तो दुख सहन करना, तशाज तुमं बी सहन करानी करता तो तुमला वाट दखाडी.
आळसी वीस्वासी लोकंसला पौल काम कराला सांगय
6 मनं भाऊ आनं बईन, आपला परभु येसु ख्रीस्तना नावमं आमं तुमला आज्ञा दीसनं सांगत का, जे वीस्वासी लोकं आळसी जीवन जगत, आनं जे आमना शीक्षनला पाळत ना, तेसनी जोडमं रव्हु नोका. 7 कजं का तुमला चांगला मायती सय का, जशा आमं करनत, तशाज तुमं बी कराला पायजे. आनं जवं आमं तुमनी संगं रहनत, तवं आमं आळसी जीवन जगनत ना. 8 आनं आमं कोन पईन फुकट जेवन करनत ना. पन कोनवर बी भार नोको पडाला पायजे मनीसनं आमं रात नं दीवस कठीन काम करनत. 9 येना आर्थ आशा ना सय का, तुमपन मदत मांगाना आधीकार आमला ना सय. पन आमं जा करनत, तुमं बी ता करला पायजे मनीसनं येक नमुना दखाडानी करता आमं तशे करनत. 10 जवं आमं तुमनी संगं व्हतलत, तवं सांगनंलत का, जर येखादाला काम करानी ईशा ना सय तं, तेला जेवन बी तुमं देवु नोका. 11 आमला आयकाला भेटना सय का, तुम मयथीन काही लोकं आळसीपनाना जीवन जगत. आनं ते काही काम करत ना, पन दुसरंसना काममं दखल देत. 12 आशे लोकंसला परभु येसु ख्रीस्तना नावमं आमं आज्ञा करत आनं शीकाडीसनं सांगत का, ते शांतीमं काम कराला पायजे आनं सोता काम करीसनं सोता खावाला पायजे.
13 मनं भाऊ आनं बईन, तुमं चांगला काम कराना बंद करु नोका. 14 जर कोनी हाई चीठीना लीखेल गोस्टंला पाळय ना तं, तो कोन सय हाई वळखी ल्या. आनं तेला लाज वाटाला पायजे मनीसनं तेनी जोडमं रहु नोका. 15 पन तेला तुमना दुशमन समजु नोका, पन वीस्वासी भाऊ समजीसनं तेला सुजारा.
पौल शेवटना सलाम सांगय
16 आमं प्राथना करत का, शांती देनार परभु आख्या गोस्टीसमं कायम तुमला शांती देई आनं तुमनी आखंसनी संगं रही.