तीमथीला लीखेल पौलनी दुसरी चीठी
1
पौल सलाम सांगय
1 मी पौल सय आनं माला देव तेनी ईशाथीन येसु ख्रीस्‍तनी करता नीवाडेल सय. जे लोकं येसु ख्रीस्‍तवर वीस्वास ठेवत, तेसला जीवन देवानी करता देव वचन देयेल सय. येनी बद्दल दुसरंसला सांगानी करता देव माला धाडेल सय. 2 आनं मना आवडता पोर्‍या सारका तीमथीला मी हाई चीठी लीखय. तीमथी, मी प्राथना करय का, देवबाप आनं आपला परभु येसु ख्रीस्‍त तुवर दया करीत आनं तुला पक्‍का शांती देईत आनं पक्‍का मया करीत.
पौल देवना आभार मानय आनं तीमथीला वीस्वासमं रव्हाला सांगय
3 जो देवनी सेवा मना वाडावडील करनंलत, मी बी खरा मनथीन तेनी सेवा करय. तुना साठी मी तो देवना आभार मानय. ‍आनं कायम तुना साठी रात नं दीवस प्राथना करय. 4 जवं मी तु प‍ईन आलंग व्हयना, तवं तु रडी रहनाल. ता याद करीसनं, तुला भेटीसनं पक्‍का आनंद करानी मनी ईशा सय.
5 तु येसु ख्रीस्‍तवर कीतला खरा वीस्वास ठेवय, हाई मला याद येय. पयलंग तुनी आजी लोईस आनं तुनी माय युनीक बी देववर चांगला वीस्वास ठेवन्‍यात. आनं मला नक्‍की वाटय का, तोज वीस्वास आतं तुना जीवनमं बी सय. 6 येनी करता मी तुला याद करी देय का, जवं मी तुवर हात ठेईसनं प्राथना करना, तवं देवना जो दान तुला देवामं ईयेल सय, तेना तु चांगला उपयोग कर. 7 कजं का देव आपुनला भीवाय जावाना आत्मा ना देयेल सय. पन शक्‍तीवानना आत्मा आनं मया कराना आत्मा आनं सोताना जीवला ताबामं ठेवाना आत्मा देयेल सय. 8 तेमन आपला परभुनी बद्दल दुसरंसला सांगानी करता कधी लाज वाटु देवु नोको. आनं मी देवनी करता जेलमं कोंडायेल सय मनीसनं माला भेटानी करता बी लाज वाटु देवु नोको. पन मनी संगं तु बी सुवार्ता सांगानी करता देवनी देयेल शक्‍तीघाई दुख सोसाला तयार र‍ह. 9 देव आपुनला तारन दीना सय आनं येक चांगला जीवन जगानी करता बलावना सय. आनं आपुन चांगला काम करनत मनीसनं ना, पन तो आपुनवर पक्‍का दया करीसनं तेना सोताना हेतुना साठी आशा करना सय. कजं का जग बनाडानी आगुदारज देव तेनी दया दखाडीसनं येसु ख्रीस्‍तघाई आपुनला तो देवाना योजना बनाडी देयेल व्हताल. 10 आनं जवं आपला तारन करनार येसु ख्रीस्‍त जगमं वना, तवं ती दया प्रगट करामं वनी. आनं तो मरनला नास करी टाकना आनं जे लोकं तेनी सुवार्ताला स्वीकार करत, तेसला देवनी संगं कायमना जीवन जगाला संधी दीना. 11 आनं तीज सुवार्ता प्रचार करानी करता आनं शीकाडानी करता देव माला प्रेशीत मनीसनं नीवाडना सय. 12 तेमन तेना साठी मी हाई दुख भोगी रहना सय. तरी बी माला लाज वाटय ना. कजं का जेवर मी वीस्वास ठेवना सय, तेला मी वळखय. आनं मना वीस्वास सय का, जी सुवार्ताला देव मना हातमं देयेल सय, तीला शेवटना दीवस परन समाळ करानी करता तो शक्‍तीवान सय. 13 मी तुला जो खरा शीक्षन शीकाडना सय, तेला तु धरी ठेव. आनं तु बी येसु ख्रीस्‍तवर वीस्वास ठेईसनं आनं आखंसवर मया करीसनं तो खरा शीक्षनला दुसरंसला शीकाड. 14 जो खरा वचन तुला देवामं ईयेल सय, तेला आपुनमं रहनार पवीत्र आत्माना मदतथीन समाळीसनं ठेव.
15 तुला मायती सय का, आशीया देशना आखं वीस्वासी माला सोडीसनं नींगी गयत. तेसमं फुगल आनं हर्मगनेस बी नींगी गयत. 16 मी प्राथना करय का, आनेसीफर आनं तेना कुटुमवर परभु दया करी. कजं का जवं मी जेलमं कोंडायेल व्हताल, तवं माला भेटाला तेला लाज वाटनी ना. पन तो घडीघडी माला भेटाला वना आनं धीर दीना. 17 जवं तो रोम शेहेरमं व्हताल, तवं मी सापडय ताव, तो पक्‍का मेहनत करीसनं मना तपास करना. 18 मी प्राथना करय का, परभु तेला शेवटना न्‍यायना दीवसमं दया करी. कजं का तुला चांगला मायती सय का, तो ईफीसमं माला पक्‍का मदत करीसनं देवनी चांगली सेवा करना.