6
1 जे गुलामगीरीमं सत, ते तेसना मालकंसला आख्या गोस्टीमं मान देवाला पायजे. कजं का देवना नावनी आनं तेना जो वचन आपुन शीकाडत, तेला कोनी बी नींदा नोको कराला पायजे. 2 आनं जेसना मालक वीस्वासी सत, ते मालकंसला वीस्वासी भाऊ समजीसनं कमी मान देवाला नोको पायजे. पन ते तेसना काम जास्त जास्त कराला पायजे. कजं का तेसघाई जे मालकंसला फायदा भेटय, ते देववर वीस्वास ठेवनारं तेसना भाऊ सत आनं देव तेसवर मया करय. या गोस्टी दुसरंसला सांगीसनं शीकाड आनं पाळानी करता तेसला हीम्मत दे.
खोटा शीक्षन आनं खरा धननी बद्दल पौल सांगय
3 जो कोनी खोटा शीक्षन देय आनं आपला परभु येसु ख्रीस्तना खरा वचनला आनं तेना शीक्षनला मानय ना, 4 तो गर्व करय आनं तेला काही मायती ना सय. तो शब्दंसवर वादवीवाद करामं आनं कज्या करामं येडा व्हई जायेल सय. येस पईन हेवा कराना, भानगड कराना, आनं दुसरंसनी बद्दल वाईट बोलाना आनं शंका कराना नींगत.
5 तेस मईन काही लोकंसना मन बीगडेल सय आनं तेसना जीवनमं सत्य ना सय. ते वीचार करत का, देवनी भक्ती कराना येक कमावाना साधन सय. तशे लोकंसमं कायम कज्या चालुज रहय. 6 खरज दखाला गयत तं, येक मानुसला जीतला भेटेल सय, तीतलामंज जर तो आनंदमं देवनी भक्ती करना तं, तेला मोठा फायदा भेटय. 7 आपुन हाई जगमं काही लीसनं वनत ना आनं हाई जग मयथीन काही ली जावावुत ना. 8 तेमन जर आपुनला खावाला धान्य आनं वापराला कपडं रहनत तं, तेमज खुश रव्हाला पायजे. 9 पन जे धनवान बनाला दखत, ते परीक्षामं पडत आनं फसी जात. ते मुर्खपनानी आनं नास करनारी ईशामं फसी जात. आनं ती ईशा तेसला नासना रस्तामं ली जाय. 10 कजं का पयसासना लालुस आखा वाईटंसना येक मुळ सय. तेनी मांगं लागीसनं कीतलं लोकं वीस्वास मईन भटकी गयं सत. आनं ते तेसना सोताना रुदयला पक्का दुख ली वनं सत.
तीमथीना सोताना जीवननी बद्दल पौल सांगय
11 हे देवना मानुस, या गोस्टीस पईन दुर पळीसनं रह. आनं धार्मीकपना, देवनी भक्ती, वीस्वास, मया, सहन कराना आनं नम्रपना या गोस्टीसनी मांगं तु लाग. 12 वीस्वास मईन मांगं ली जावानी करता तुवर पक्का संकट येईत. तवं तु मांगं नोको नींगी जावाला पायजे मनीसनं पक्का मेहनत कर. तोज वीस्वासला तु बरज लोकंसनी समोर कबुल करेल सय. कायमना जीवनला तु गमाडु नोको, कजं का येनी करताज देव तुला नीवाडेल सय. 13 जो देव आखंसला जीवन देय, तेनी समोर आनं जो येसु ख्रीस्त पंतय पीलातनी समोर सोतानी बद्दल चांगली साक्षी दीना✞, तेनी समोर मी तुला आज्ञा दीसनं सांगय का, 14 आपला परभु येसु ख्रीस्त येय ताव, तु हाई आज्ञा चांगला रीतथीन आनं बीगर काही दोसना पाळत रह. 15 आनं तोज परभु येसुला स्तुतीना योग्य देव बरोबर टाईमला प्रगट करी. तो देव शक्तीवान सय आनं राजासना राजा आनं देवंसना देव सय. 16 तो कायम रहनार सय आनं तेला कोनी दखनत ना आनं कोनी दखु शकावुत ना. आनं तो आशा ऊजाळामं रहय का, तेपन कोनला बी जाता येवावु ना. तेलाज कायम मान भेटी आनं तेना राज्य कायम रही. आमेन.
17 हाई जगना धनवान वीस्वासी लोकंसला आज्ञा दीसनं सांग का, तुमं गर्व करु नोका. आनं जो धन लगेज नींगी जाय, तेवर भरोसा ठेवु नोका. पन जो देव आपुनला आनंदमं रवावानी करता आखंकाही देय, तेवर भरोसा ठेवा. 18 ते चांगला कामं कराला पायजे आनं चांगला काममं धनवान बनाला पायजे. ते दुसरंसला मदत कराला पायजे आनं दुसरंसला मोकळा मनथीन दान देवाला पायजे. 19 आशा करीसनं जो धन तेसला सोरगंमं ली जाई, तो धन ते गोळा करीत. आनं तो धन येनारा काळनी करता येक चांगला पाया बनी. तीनी द्वारा तेसला खरा जीवन भेटी.
20 हे तीमथी, देव तुला जो खरा वचन देयेल सय, तेला लोकंसला ✞शीकाडत रह. जो शीक्षन देवना वचनना वीरुद शीकाडय ते पईन दुर रह. आनं बीगर कामना वादवीवाद पईन बी दुर रह. काही लोकं आशा गोस्टीसला 'ज्ञान' सांगत. पन ते चुकीना सांगत. 21 आनं काही लोकं हाई ज्ञान स्वीकार करीसनं वीस्वास मईन भटकी गयं सत.
मी प्राथना करय का, देवनी दया तुमनी आखंसनी संगं रही.