5
काही लोकंसनी संगं कशा रव्हाना येनी बद्दल पौल सांगय
1 कोनता बी वडील लोकंसला यंगरटपनामं बोलु नोको. पन तेसला बापनी सारका समजीसनं बोल. आनं तरुन लोकंसला भाऊनी सारका बोल. 2 आनं बाईसला मायनी सारका समजीनं बोल. आनं तरुन बयीनीसला पुरा चांगला मनथीन बयनी समजीनं बोल.
3 ज्या वीधवा बाईसना कोनी आधार ना सत, आशा बाईसनी काळजी तु ले. 4 जर येखादी वीधवा बाईला पोरेसोरे आनं नात्र सत तं, ते पोरेसोरे आनं नात्र पयलंग सोताना कुटुमनं लोकंसनी काळजी लेवाला पायजे. आशा करीसनं ते सोताना मायबाप आनं आजीआजासना ऊपकारना परतफेड करत. आनं हाऊ देवनी आज्ञा सय आनं तेनी नजरमं चांगला सय.
5 जर येखादी वीधवा बाई येकटी सय, आनं तीला समाळानी करता कोनीज आधार ना सय, आनं ती देववर भरोसा ठेईसनं रात नं दीवस प्राथना वीनंती करत रहय तं, तीज खरी वीधवा सय. आनं तीलाज मदत कराला पायजे. 6 पन जी वीधवा बाई जगना मजामं रहय, ती जीवती रहीसनं बी मरेल सारकी सय. 7 हाई वचन बी पाळानी करता वीस्वासी लोकंसला आज्ञा दीसनं सांग. कजं का कोनी बी तेसनी नींदा कराला नोको पायजे. 8 जर कोनी तेनं नातेवाईक आनं सोताना कुटुमनं लोकंसनी काळजी करत ना तं, तो वीस्वासला नाकारी दीना सय. आनं तो बीगर वीस्वासी लोकंस पेक्षा बी जास्त वाईट सय.
9 जी वीधवा साठ वरीस पेक्षा जास्त व्हयनी सय, आनं येकंज मानुसनी संगं लगीन करेल व्हतील, 10 आनं जीना नाव चांगला काम करानी करता गाजेल सय, आनं जी पोरेसला चांगला समाळ रक्षन करय, जी चांगली पावनसार करय, जी नम्र बनीसनं वीस्वासी लोकंसनी सेवा करय, जी संकटमं पडेल लोकंसनी मदत करय आनं आखा चांगला काम करानी करता तयार रहय, आशी वीधवाना नाव मदत भेटनारनी यादीमं लीखाला पायजे. आनं तीला मंडळी मदत कराला पायजे. 11 पन तरुन वीधवासना नाव मदत भेटनारनी यादीमं नोको लीखाला पायजे. कजं का जवं त्या सोतानी ईशा पुरी करानी करता येसु ख्रीस्‍तला सोडी देत, तवं त्या लगीन कराला दखत. 12 तीसला दोसी ठरावामं येई. कजं का जो वचन त्या पयला देयेल व्हतल्यात, तेला त्या सोडी दीन्‍यात. तो वचन आशा व्हताल का, ते आखु लगीन नोको कराला पायजे, पन येसु ख्रीस्‍तनी भक्‍ती करीसनं मंडळीमं सेवा कराला पायजे. 13 मंग त्या आळसी व्हई जात. आनं ईतलाज ना, पन बीगर कामन्‍या घरंघर फीरत आनं चुगल्या लावाना काम करत. आनं जा बोलाला नोको पायजे, ता त्या बोलत. 14 तेमन मनी ईशा हाई सय का, ज्या वीधवा तरुन सत, त्या लगीन कराला पायजे आनं पोरेसोरेसला जल्म दीसनं घर चालाडाला पायजे. कजं का वीरोध करनारंसला सांगानी करता काही चुक सापडाला नोको पायजे. 15 काही वीधवा भटकीसनं सैताननी मांगं नींगी गया सत. 16 जर येखादी वीस्वासी बाईना घरमं वीधवा बाई व्हई तं, ती तीना समाळ कराला पायजे आनं मंडळीवर तीना भार नोको पडु देवाला पायजे. तवं ज्या वीधवा बायासला खरज मदतनी गरज सय, तीसला मंडळी मदत करु शकी.
17 जे आगेवान लोकं मंडळीमं चांगली सेवा करत आनं प्रचार करामं आनं वचन शीकाडामं मेहनत करत, तेसला जास्त मान भेटाला पायजे. 18 कजं का देवना वचनमं लीखेल सय का,
"जवं तुमं खळामं पाळत फीरावत, तवं बैलना तोंडला मुंगसं बांधु नोका"
आनं
"काम करनारंसला मजुरी भेटालाज पायजे"
19 जर येखादा आगेवान मानुसवर लोकं काही आरोप लावतं व्हईत तं, तेसना दोनतीन पुरावा पायजे. नातं तो आरोपला स्वीकार करु नोको. 20 पाप करनारं लोकंसला आखंसनी समोर डोकाडीसनं सांग. कजं का दुसरं वीस्वासी लोकं बी हाई दखीसनं भीवाला पायजे. 21 देवनी आनं येसु ख्रीस्‍तनी आनं देवदुतंसनी समोर मी तुला आज्ञा दीसनं सांगय का, मोकळा मन करीसनं ये आखा पाळ. आनं भेदभाव करीसनं काही करु नोको.
22 मंडळीना पुढारी बनाडानी करता घाई करीसनं कोनवर बी हात ठेवु नोको. आनं दुसरं लोकंसना पापमं भागीदार बनु नोको आनं सोताला पवीत्र राख. 23 येनी पुडं फक्‍त पानीज पेवु नोको, पन तुना पोटमं घडीघडी जो दुखावा व्हय‍, तो बंद व्‍हवानी करता थोडासा द्राक्षरस पे.
24 काही लोकं पाप करत आनं देव तेसना न्याय करानी आगुदार लोकंसला मायती पडी जाय का, ते पापी सत. पन आजुन काही लोकं दपाडीसनं पाप करत आनं न्यायना दीवस परन कोनला बी मायती पडय ना. 25 तशाज काही लोकंसना चांगला काम बी लोकंसला आतं मायती पडय ना, पन नंतर प्रगट करामं येयी आनं तो काम कायम दपु शकावु ना.