थेसलनीक मंडळीला लीखेल पौलनी दुसरी चीठी
1
पौल चीठीनी सुरुवात करय
1 आमं, पौल, सीलवान आनं तीमथी देवबाप आनं परभु येसुमं रहनारं थेसलनीक मंडळीनं आखं वीस्वासी लोकंसला हाई चीठी लीखत. 2 आमं प्राथना करत का, देवबाप आनं आपला परभु येसु ख्रीस्त तुमवर दया करीत आनं तुमला शांती देईत.
शेवटना न्यायनी बद्दल पौल सांगय
3 मनं भाऊ आनं बईन, आमं कायम तुमना साठी देवला आभार मानालाज पायजे. कजं का देववर तुमना वीस्वास जास्त जास्त वाढी रहना सय. आनं तुमं आखं जन येकमेकंसवर जास्त जास्त मया करत. 4 आनं तुमं पक्कं वीरोध आनं संकट भोगीसनं बी देववर वीस्वास ठेवत. तेमन आमं देवन्या दुसर्या दुसर्या मंडळीसमं मोठयाळ करीसनं तुमनी बद्दल सांगत.
5 आनं ये आखं वीरोध आनं संकट तुमं सहन करनत मनीसनं न्यायना टाईमला देव तुमला तेना राज्यमं रव्हानी करता लायक ठराई. येनी द्वारा लोकंसला मायती पडी का, देव न्याय करामं खरा सय. 6 आनं जे लोकं तुमला दुख देत, तो बी तेसला दुख देई. कजं का खरज तो खरा न्याय करनार सय. 7 येक दीवस परभु येसु तेनं शक्तीवान दुतंसनी संगं सोरगं मईन ईस्तुनी जाळमं प्रगट व्हई. तवं तुमं दुख भोगनारंसला आनं आमला तो हाई दुख पईन सुटका करी. 8 आनं जे लोकं देवला नाकारत आनं आपला परभु येसुनी सुवार्ताला मानत ना, तेसला तो दंड देई. 9 तेसला कायमना नासना दंड देवामं येई. आनं जो परभुपन मोठी शक्ती सय आनं मोठा मान सय, ते पईन तेसला आलंग करामं येई. 10 आनं परभु येसुना करेल काम साठी तेनं लोकं तेला मोठा मान देईत मनीसनं तो परत येई. तवं या आख्या गोस्टी घडीत. आनं तेना करेल कामघाई तेनं पवीत्र लोकंसला नवल वाटी. आनं जवं या आख्या गोस्टी घडीत, तवं तुमं बी ते परभुनं लोकं आनं वीस्वासी लोकंसमं रहशात. कजं का आमं जा वचन तुमला सांगनत, तेवर तुमं वीस्वास ठेवनं सत. 11 तेमन आमं तुमना साठी कायम प्राथना करत. आमं प्राथना करत का, जशा जीवन जगानी करता देव तुमला बलावना सय, तशा जीवन जगाला तो तुमला मदत कराला पायजे. आनं तुमं येसु ख्रीस्तवर वीस्वास ठेवत मनीसनं जे चांगलं कामं करानी तुमनी ईशा सय, ते करानी करता तो तुमला शक्ती देवाला पायजे. 12 येनी करता आमं हाई प्राथना करत का, आपुन जो देवनी सेवा करत तेनी दयाघाई आनं परभु येसु ख्रीस्तनी दयाघाई तुमं आपला परभु येसुनी स्तुती कराला पायजे आनं तो तुमला ऊचा कराला पायजे.