2
येसु ख्रीस्तना चांगला सीपाई
1 तीमथी, तु मना पोर्या सारका सय. येसु ख्रीस्तनी दयामं तु भक्कम बनी जा. 2 मी बरज लोकंसनी समोर देवन्या गोस्टी सांगताना तु आयकेल सय. जे लोकंसवर आपुन भरोसा ठेवु शकत का, ते शीकाडीत आनं जे दुसरंसला शीकाडानी करता लायक सत, तेसना हातमं त्या गोस्टी तु सोपी दे. 3 आनं येसु ख्रीस्तना चांगला सीपाई सारका तु बी मनी संगं दुख सहन कर. 4 जो कोनी सीपाईना काम करय, तो सोवसारना आनं दुसरा कोनता बी काममं आटकय ना. आनं जर तो आटकना तं, तेना आधीकारीला खुश करु शकय ना. 5 तशाज जर येखादा मानुस कोनता बी खेळमं भाग लीना तं, तो नीयम प्रमानं रव्हालाज पायजे. नातं तेला बक्षीस भेटय ना. 6 आनं जो शेतकरी मेहनत करय, तो पयला पीकना वाटा लेवानी करता लायक सय. 7 मी जा सांगय, तेवर तु ध्यान दे, कजं का परभु तुला आख्या गोस्टी समजाडी देई.
8 दावीद राजानी पीढीमं जो येसु ख्रीस्त मरन मयथीन उठना सय, तेला कायम याद ठेव. मी हाई सुवार्ता लोकंसला सांगय. 9 हाई सुवार्ता सांगना मनीसनं माला येखादा आपराधी सारका साकळघाई बांधीसनं जेलमं कोंडेल सत आनं मी दुख भोगी रहना सय. तरी बी देवना वचन बांधायेल ना सय. 10 आनं जे लोकंसला देव नीवाडेल सय, ते लोकंसला बी येसु ख्रीस्तघाई तारन भेटाला पायजे आनं ते कायम देवनी संगं मोठा मान भेटानी जागामं जीवन जगाला पायजे. तेमन मी तेसना साठी हाई आखा दुख भोगी रहना सय. 11 हाई वचन खरज सय का, जर आपुन येसु ख्रीस्तनी संगं मरनत तं, तेनी संगं जीवन बी जगसुत. 12 आनं जर आपुन धीर धरीसनं येसु ख्रीस्तनी करता दुख भोगनत तं, तेनी संगं राज्य बी करसुत. पन जर आपुन तेला नाकारी दीनत तं, तो बी आपुनला नाकारी देई. 13 जर आपुन देवनी संगं वीस्वासु ना रहत, तरी बी तो जा कराना वचन देयेल सय, ता तो करय. कजं का तो कधीज तेना वचन बदलय ना आनं लबाड सांगय ना.
देवला आवडनार सेवक
14 तु या गोस्टी वीस्वासी लोकंसला याद करी दे. आनं तेसला देवनी समोर आज्ञा दीसनं सांग का, शब्दंसना आर्थनी बद्दल वादवीवाद करु नोका. कजं का येसघाई कोनला फायदा भेटय ना, पन आयकनारं आयकीनं बीगडी जात. 15 तु पक्का मेहनत कर. तवं ता दखीसनं देव तुला तेनी सेवानी करता लायक मनीसनं समजी. आनं तु चांगला काम करनार आनं देवना सत्य वचनला चांगला शीकाडनार बन. तवं तेनी द्वारा तुला लाज वाटावु ना. 16 जो शीक्षन देवना वचनना वीरुद शीकाडय ते पईन दुर रह. आनं बीगर कामना वादवीवाद पईन बी दुर रह. कजं का त्या गोस्टी मानसंसला देव पईन जास्त जास्त दुर ली जाईत. 17 आनं जशा खरुज लवकर आखा शरीरमं पसरी जाय, तशाज हाऊ खोटा शीक्षन बी लवकर लोकंसमं पसरी जाई. हाऊ खोटा शीक्षन देनारंस मयथीन हुमनाय आनं फीलेत सत. 18 ते खरा शीक्षन पईन भटकी जायेल सत. आनं ते सांगत का, मरेल लोकंसना जीवत व्हवाना व्हई जायेल सय. आशा सांगीसनं ते काही लोकंसना वीस्वासला नास करी टाकत. 19 तरी बी जे लोकं देववर खरा वीस्वास ठेवत, ते देवना बांधेल येक घरना मजबुत पाया सारकं सत. तेसना वीस्वास कधी नास व्हवावु ना, पन येक घरना मजबुत पाया सारका कायम टीकी रही. तेमन देवना वचनमं आशा लीखेल सय का,
✞"जे लोकं परभुनं सत, तेसला तो वळखय. आनं जे लोकं सांगत का, ते देवनं सत, ते वाईट काम पईन दुर रव्हाला पायजे."
20 येक मोठा घरमं फक्त सोना आनं चांदीना भांडं रहत ना, पन लाकडंसनं आनं मातीनं बी रहत. तेस मईन काही भारी काम साठी वापरत आनं काही हालका काम साठी वापरत. 21 तेमन जर येखादा मानुस वाईट पईन दुर रहीसनं सोताला चांगला करय तं, जो भांडा भारी काम साठी वापरामं येय, तो भांडानी सारका तो बनी. आनं तेना जीवन पवीत्र वय जाई. आनं तेला परभुनी करता आखा चांगला काममं उपयोग करामं येई. 22 तु तरुनपनाना आखा वाईट काम पईन दुर रह. आनं जे लोकं पवीत्र रुदयथीन परभुला हाक मारत आनं तेवर वीस्वास ठेवत, तेसनी जोडमं रह. आनं तु देवनी नजरमं नीतीवानना जीवन जग. तु भरोसाना लायक बन आनं दुसरंसवर मया कर. आनं आखंसनी संगं शांतीमं रह. 23 मुर्खपनाना आनं बीगर समजान्या वादवीवाद पईन दुर रह. कजं का हाई तुला मायती सय का, तेस पईन भानगडी तयार व्हत.
24 देवना सेवक भानगड कराला नोको पायजे. पन तो आखंसनी संगं चांगला वागाला पायजे. आनं तो देवना वचन चांगला शीकाडनार पायजे. तो आख्या गोस्टीसमं सहन करनार पायजे. 25 आनं जे तेला वीरोध करत, तेसला नम्र बनीसनं तो शीकाडनार पायजे. हाई आसा ठेईसनं तेसला शीकाडाला पायजे का, कदाचीत देव तेसला पस्तावा करानी करता मदत करी, आनं ते खरा वचनला वळखी लेईत. 26 कजं का ते सैताननी ईशाघाई चालानी करता तेना जाळामं फसेल सत. आनं ते चांगला शुधीवर ईसनं सैतानना फासा मयथीन सुटी जाईत.