3
शेवटना दीवसना संकट
1 तीमथी, तु समजी ले का, शेवटना काळमं पक्‍क्या वाईट गोस्टं घडीत. 2 कजं का लोकं सोताना दखनारं आनं धन संपतीवर लोभ करनारं आनं बढाई मारनारं आनं गर्व करनारं व्हई जाईत. ते नींदा करनारं आनं मायबापसला यंगरटपना करनारं आनं ऊपकार ना जाननारं आनं वाईट जीवन जगनारं व्हई जाईत. 3 ते मया ना करनारं आनं दुसरंसला माफी ना देनारं आनं दुसरंसन्या चुगली करनारं व्हई जाईत. आनं ते सोताना जीवला ताबामं ना ठेवनारं आनं कठीनपना जीवन जगनारं आनं चांगलं कामं ना व्‍हवु देनारं व्हई जाईत. 4 ते वीस्वासघात करनारं आनं घाई करनारं आनं दुसरंस पेक्षा सोताला मोठा समजारं आनं देववर मया ना करीसनं सुखनी आवड धरनारं व्हई जाईत. 5 ते लोकंसला दखावानी करता देवनी भक्‍ती करीत. पन जी शक्‍ती तेसला वाईट प‍ईन बदलीसनं चांगला जीवन देय, ती शक्‍तीला ते नाकारी देईत. आशे लोकंस प‍ईन दुर रह. 6 तेस म‍ईन काही लोकं आशे सत का, ते बागं बागं भोळ्या बायासना घरमं घुसीसनं तीसला फसाडी लेत. त्या भोळ्या बाया पापमं भरेल रहत आनं त्या आलंग आलंग वाईट ईशा ठेवत. 7 आनं त्या कायम आलंग आलंग शीक्षन आयकत पन खरा काय सय, हाई तीसला कधी समजय ना. 8 जशा यान्नेस आनं यांब्रेस मोसाला वीरोध करनत, तशाज ये लोकं बी देवना खरा वचनला वीरोध करत. ते लोकं कायम तेसना मनमं वाईट वीचार करत आनं सोताना वीस्वासना नाश करी टाकनत. 9 पन लोकंसला फसाडाना काममं ते कधी पुडं जावु शकावुत ना. कजं का जशा ते दोनी जनंसना मुर्खपना आखंसला मायती पडी गया, तशाज येसना मुर्खपना बी आखंसला मायती पडी जाई.
पौल तीमथीला शेवटना शीक्षन देय
10 पन मी जा शीकाडय, ता तुला मायती सय. आनं मी कशा जीवन जगय हाई बी तुला मायती सय. मना हेतु आनं मना वीस्वासनी बद्दल बी तुला मायती सय. आनं मी कशा सहन करय आनं कशा मया करय आनं कशा धीर धरय, हाई बी तुला मायती सय. आनं माला वीरोध करीसनं लोकं कीतला दुख दीनत हाई बी तुला मायती सय. 11 आंत्युखीया आनं ईकुनीया आनं लुस्त्रामं मावर जो काही व्हयना आनं मी जो वीरोध सहन करना, ता आखा तुला मायती सय. ता आखंस म‍ईन परभु माला वाचाडना.
12 हाई खरज सय का, जे लोकं परभु येसुमं रहीसनं चांगला जीवन जगाला दखत, ते आखंसला वीरोध करामं येई. 13 आनं खराब आनं फसाडनारं मानसं जास्त वाईट रस्तामं जाईत. ते दुसरंसला फसाडीत आनं दुसरं बी तेसला फसाडीत. 14 पन तु ज्या गोस्टी शीकना सय आनं ज्या गोस्टीसवर वीस्वास ठेवना सय, तीसला धरी ठेव. कजं का तुला मायती सय का, जेस प‍ईन तु त्या गोस्टी शीकना सय, तेसवर तु वीस्वास ठेवु शकशी. 15 आनं धाकलपन प‍ईन तुला देवना पवीत्र वचन मायती सय. तो वचन सांगय का, येसु ख्रीस्‍तवर वीस्वास ठेवानी द्वारा तारन भेटय. आनं हाई समजानी बुधी देवानी करता देवना पवीत्र वचन शक्‍तीवान सय. 16 देवना वचन लीखनारं आखंसनी द्वारा देव तेना वचनला लीखना. आनं खरा काय सय, हाई शीकाडानी करता तो देवना वचन उपयोगना सय. आनं दोस दखाडानी करता आनं सुजारानी करता बी तो उपयोगना सय. आनं तो चांगला काम कराना शीकाडानी करता बी उपयोगना सय. 17 तेमन जे लोकं देवनी सेवा करत, ते चांगला काम करानी करता तयार रव्हाला पायजे मनीसनं देव तेना वचनना उपयोग करय.