8
येसु ख्रीस्त नवा करारना मोठा याजक सय
1 आनं आमं जा काही बी सांगत, तेसमं मुख्य गोस्टं मंजे, आपला साठी येक मोठा याजकला देवामं ईयेल सय. आनं तो सोरगंमं मोठा शक्तीवान देवनी जेवनी बाजुमं मंजे मोठा माननी जागामं बसना सय. 2 आनं तो मोठा याजक मनीसनं पक्की पवीत्र जागामं सेवा करय. आनं ती पवीत्र जागा मंजे परभुनी सेवा करानी करता येक खरा मांडव सय. आनं ती जागा मानसंसनी बनाडेल ना, पन परभुनी बनाडेल सय. 3 प्रतेक मोठा याजकंसला देवना नावमं आर्पन आनं बलीदान करानी करताज नीवाडामं ईयेल रहय. तेमन आपला मोठा याजकला बी काहीतरी आर्पन करालाज पायजे व्हताल. 4 आनं जर तो हाई जगमं रहता तं, तो मोठा याजक बनु शकता ना. कजं का हाई जगमं मोसाना नीयम प्रमानं देवला आर्पन करानी करता आगुदारज काही याजक व्हतलत. 5 आनं याजक मनीसनं ते जी सेवा करत, ती खरी ना सय. पन सोरगंमं जशी व्हई रहनी सय, ती तेनी सावली सारकी सय. तेमन जवं मोसा देवनी करता मांडव बांधी रहनाल, तवं देव तेला आज्ञा दीसनं जा सांगेल व्हताल, हाई सेवा बी तशीज सय. देव तेला सांगेल व्हताल का,
✞"तु ध्यान ठेव का, डोंगरवर तुला मी जो नमुना दखाडेल व्हताल, तेनी सारकाज तु आखंकाही कराला पायजे."
6 पन आतं येसु हातमं जी याजकनी सेवा सोपामं वनी सय, ती सेवा ते दुसरं याजकंसनी सेवानी पेक्षा बी पक्की मतवंनी सय. तशाज देव आनं लोकंसमं जो नवीन करार येसु ख्रीस्त बनाडना सय, तो बी जुना करारनी पेक्षा बी पक्का मतवंना सय. कजं का जवं देव हाई नवीन करार बनाडना, तवं मोसाला देयेल नीयम पेक्षा आजुन चांगला आशीर्वाद देवाना वचन तो आपुनला देयेल सय.
7 आनं आपुनला मायती सय का, जर मोसाना देयेल तो पयला करार बीगर चुकीना रहता तं, तेनी जागामं दुसरा करारनी काही गरज पडती ना. 8 पन देवला लोकंसमं दोस दखाला भेटना. तेमन तो सांगना,
✞"मी सांगय का, दखा, आशा दीवस ई रहना सय का, मी ईस्रायेल आनं यहुदानी पीढीसनं आनं यहुदी लोकंसनी संगं नवीन करार करसु. 9 जवं मी तेसनं वाडावडीलंसला समाळीसनं मीसर देश मयथीन बाहेर ली वना, तवं तेसनी संगं येक करार करेल व्हताल. पन तो जुना करारनी सारका हाई नवीन करार ना रव्हावु. कजं का ते लोकं मना करेल करार प्रमानं जीवन जगनत ना . तेमन मी तेसनी कडं पाठ फीराय दीना. 10 आनं आजुन मी सांगय का, येनारा दीवसमं जो नवीन करार मी ईस्रायेल लोकंसनी संगं करसु तो आशा सय का, मी मना नीयमंसला तेसना मनमं ठेवसु आनं तेसना रुदयमं ते लीखी ठेवसु. आनं मी तेसना देव बनसु आनं ते मनं लोकं बनीत. 11 तवं 'तुमं देवला वळखाला पायजे' मनीसनं कोनी बी तेसना शेजारनंसला नातं तेसना नातेवाईकंसला शीकाडानी गरज पडावु ना. कजं का तवं धाकलंस पईन तं मोठलंस परन आखं जन माला वळखीत. 12 कजं का मी तेसना आखं आपराधंसला माफ करसु आनं तेसना करेल पापला मी आजुन याद करावु ना."
13 मंग हाई करारला देव नवीन करार सांगना सय. आनं येला नवीन सांगीसनं देव तो पयला करारला जुना ठराय दीना सय. आनं जा काही बी जुना आनं बीगर कामना व्हई जाय, ता लवकर नास व्हई जाई.