7
मलकीसदेकनी सारका येसु ख्रीस्त बी मोठा याजक सय
1 तो मलकीसदेक शालेम शेहेरना राजा व्हताल आनं तो आखंस पेक्षा मोठा देवना याजक व्हताल. ✞जवं आब्राहाम येक लढाईमं काही राजासला हाराईसनं परत ई रहनाल, तवं मलकीसदेक जाईसनं तेला भेटना आनं आशीर्वाद दीना. 2 तवं आब्राहाम जीकीसनं जा काही बी ली जाई रहनाल, ता आखंस मईन दाहावा भाग तेला दीना. मलकीसदेकना नावना आर्थ मंजे 'नीतीवान राजा' सय. आनं 'शालेमना राजा' मंजे 'शांतीना राजा' सय. तेमन पयली गोस्टं तो नीतीवान राजा व्हताल आनं दुसरी गोस्टं तो शांतीना राजा व्हताल. 3 आनं तो मलकीसदेकना मायबाप आनं वाडावडीलंसनी बद्दल कई बी लीखेल ना सय. आनं तेना जल्म आनं मरननी बद्दल बी कई लीखेल ना सय. तेमन तो देवना पोर्या सारका व्हताल आनं तो कायमनी करता रहनार येक याजकंज सय.
4 आब्राहाम ईस्रायेल लोकंसना पयला बाप व्हताल. आनं तो बी जा काही बी लुटीसनं ली जाई रहनाल ते मयथीन तेला दाहावा भाग दीना. मंजे तुमं वीचार करा का, तो मलकीसदेक कीतला मोठा व्हई! 5 आनं मोसाना देयेल नीयममं लीखेल सय का, लेवीनी पीढीमं जे लोकं याजक बनत, ते ईस्रायेल लोकंस पईन दाहावा भाग लेवाला पायजे. आनं लेवी आब्राहामनी पीढीना व्हताल. येना आर्थ मंजे जे ईस्रायेल लोकं आब्राहामनी पीढीनं व्हतलत, ते याजकंसना भाऊबंदज व्हतलत. तरी बी तेस पईथीन ते याजक लोकं दाहावा भाग लेवु लागनंलत. 6 आनं तो मलकीसदेक लेवीनी पीढी मतला ना व्हताल. तरी बी जो आब्राहामला देव वचन देयेल व्हताल, ते पईन तो दाहावा भाग लीना आनं तेला आशीर्वाद दीना. 7 आनं हाई गोस्टंमं काही शंका ना सय का, जो मानुस आशीर्वाद देय, तो आशीर्वाद लेनार मानुसनी पेक्षा बी मोठा सय. 8 आनं लेवीनी पीढीनं याजक लोकंसनी बद्दल दखाला गयत तं, ते कायमनी करता जीवता रहनार ना व्हतलत आनं येक दीवस मरनारज व्हतलत. आनं ते दाहावा भाग गोळा करनत. पन मलकीसदेकनी बद्दल दखाला गयत तं, देवना वचनमं लीखेल प्रमानं जो मानुस मरनाज ना, तो दाहावा भाग गोळा करना. 9 आनं आपुन आशा बी सांगु शकत का, जे लेवीनी पीढीनं याजक लोकं दाहावा भाग गोळा करतत, ते बी तेना बाप आब्राहामनी द्वारा मलकीसदेकला दाहावा भाग दीनत. 10 कजं का जवं मलकीसदेक आब्राहामला भेटनाल आनं दाहावा भाग लीनाल, तवं लेवीना जल्म बी ना व्हयेल व्हताल. आनं तो तेना बाप आब्राहामना पोटमंज व्हताल.
11 मंग ईस्रायेल लोकंसला लेवीनी पीढीनं याजक लोकंसनी पधतमं देवना नीयम देवामं वना. पन ते याजकंसनी पधत द्वारा लोकं पुरा रीतथीन नीतीवान बनु शकनत ना. तेमन देव आजुन येक याजकला धाडना. तो याजक लेवी आनं आहरोननी पीढीना ना व्हताल, पन तो मलकीसदेकनी सारका याजक व्हताल. 12 आनं जवं याजकपनामं बदल व्हय, तवं नीयम बी नक्की बदलालाज पायजे. 13 आनं जो याजकनी बद्दल मंजे येसु ख्रीस्तनी बद्दल या आख्या गोस्टी सांगामं वना सय, तो लेवीना कुळना ना, पन दुसरा कुळना व्हताल. आनं तो कुळना कोनी बी मानुस याजक मनीसनं देवनी वेदीपन सेवा करनंलत ना. 14 कजं का हाई खरज सय का, आपला परभु येसु यहुदानी पीढीमं जल्म लीयेल व्हताल. आनं हाई पीढीना कोनी बी याजक मनीसनं सेवा करनंलत मनीसनं मोसा तेना पुस्तकमं काहीज लीखेल ना सय. 15 आनं जवं मलकीसदेकनी सारका दुसरा याजक वना, तवं हाई याजकनी गोस्टंनी बद्दल आपुनला आजुन चांगला समजाला भेटना सय. 16 तेला मानसंसनी रीत आनं नीयम प्रमानं याजक बनाडामं वना ना. पन तेना जीवननी शक्ती कायम रहनार सय मनीसनं तेला याजक बनाडामं वना. 17 कजं का तेनी बद्दल देवना वचनमं लीखेल सय का,
✞"जशा मलकीसदेक येक याजक व्हताल, तशाज तु कायमना याजक सय."
18-19 मंग जो जुना नीयम व्हताल, तेला बाजुमं ठेवामं वना सय. कजं का तो नीयमघाई जा व्हवाला पायजे व्हताल, ता व्हयना ना. आनं तेघाई कोनला बी पुरा नीतीवान बनाडामं वना ना. तेमन तो बीगर कामना व्हई गया सय. पन आतं आपुनला येक चांगली आसा देवामं ईयेल सय. आनं ती आसानी द्वारा आपुन देवना जवळ जावु शकत. 20 आनं जवं देव दुसरं याजकंसला नीवाडना, तवं तो काही शपथ लीना ना. पन जवं येसु ख्रीस्तला याजक मनीसनं नीवाडना, तवं तो शपथ लीसनं तेला नीवाडना. 21 येनी बद्दल देवना वचनमं लीखेल सय का,
✞"परभु शपथ लीसनं सांगय का, तु येक कायमना याजक सय. आनं मी कधी मना मन बदलय ना."
22 आनं परभु हाई शपथ लीना मनीसनं येसु चांगला रीतथीन दखाडी दीना का तो नवा करार जुना करार पेक्षा पक्का चांगला सय.
23 आनं पयलं बरज याजक लोकं बी तेसना काम करी गयत. आनं ते मरी गयत मनीसनं तेस मयथीन कोनी बी याजक पद कायम साठी चालाडु शकनत ना. 24 पन येसु ख्रीस्त कायमना जीवता सय मनीसनं तो कायम साठी याजक पद चालाडय. 25 तेमन जे लोकं तेनी द्वारा देव कडं येत, तेसला कायमना तारन देवानी करता तो शक्तीवान सय. कजं का तेसना साठी देवपन प्राथना वीनंती करानी करता तो कायम जीवता सय.
26 तेमन येसु ख्रीस्त आपला साठी योग्य मोठा याजक सय. कजं का तो कायम आपली गरजला पुरा करय. आनं तो पवीत्र आनं बीगर दोसना सय. आनं तेला पाप पईन आलंग करामं ईयेल सय. आनं तेला सोरगनी ऊची जागामं लेवामं ईयेल सय. 27 आनं ते दुसरं याजक लोकं दर रोज बलीदानना आर्पन करतत. मंजे पयलं ते सोताना पापनी करता आर्पन करतत, तेनी नंतर दुसरंसना पापनी करता बी आर्पन करतत. पन येसु ख्रीस्तला तशा दर रोज बलीदान करानी काही गरज ना सय. कजं का जवं तो सोताला कुरुस खांबावर बलीदान करी दीना, तवं तो येकंज दाउ लोकंसनी करता कायमना बलीदान करी दीना सय. 28 कजं का मोसाना नीयम प्रमानं जे लोकंसला याजक मनीसनं नीवाडामं येय, ते पापना सोभावनं वतलत. पन मोसाना नीयमनी नंतर देव शपथ लीसनं तेना वचन दीना आनं तेना पोर्याला नीवाडना. आनं तो तेला पुरा रीतथीन चांगला आनं कायमना मोठा याजक बनाडी दीना.