6
1 तेमन आपुन आतं ख्रीस्‍तनी बद्दल सुरुवातना शीक्षनवर ना, पन तेना मोठमोठला शीक्षनवर ध्यान देवानी करता कोशीत कराला पायजे. ते सुरुवातना शीक्षन मंजे पापना वाईट काम प‍ईन पस्तावा करानी बद्दल आनं देववर वीस्वास ठेवानी बद्दल सय. 2 आनं आजुन ते मंजे बापतीस्मा लेवानी बद्दल आनं डोकावर हात ठेईसनं प्राथना करानी बद्दल सय. आनं मरन मयथीन परत उठानी बद्दल आनं देव लोकंसना न्याय करीसनं तेसला कायमनी करता कशा दंड देई येनी बद्दल सय. ये सुरुवातना शीक्षनंज आपुन शीकत रव्हाला नोको पायजे. 3 आनं जर देवनी ईशा व्हई तं, या गोस्टीसना शीक्षनवर ना, पन मोठमोठला शीक्षनवर आपुन ध्यान देवाला पायजे. 4-6 कजं का जे लोकंसला देवना सत्य समजी जायेल सय आनं जेसला देव प‍ईन आशीर्वाद भेटी जायेल सय आनं जे लोकंसना जीवनमं पवीत्र आत्मा भेटी जायेल सय, आनं देवना वचन चांगला सय मनीसनं जे लोकंसला मायती पडी गया सय आनं येनारा देवना राज्‍यनी शक्‍तीनी बद्दल जेसला मायती पडी गया सय, ते जर वीस्वास मईन मांगं गयत तं, तेसला पस्तावा करीसनं आजुन परत ली येवाना पक्‍का कठीन सय. कजं का ते सोता देवना पोर्‍याला परत कुरुस खांबावर ठोकीसनं तेला आखंसनी समोर आपमान करनारं सारकं सत.
7 जर येखादा वावरमं पानी घडीघडी पडय आनं तो वावर पानीला सोसी लेय तं, तो वावर शेतकरीनी करता चांगला पीक देय. आनं पुढं आजुन चांगला पीक येवानी करता देवना आशीर्वाद तो वावरला भेटय. तशाज जे लोकं देवना वचन आयकीसनं चांगला जीवन जगत, तेसला बी देव आशीर्वाद देय. 8 पन जर येखादा वावरमं फक्‍त काटंसनं झुडपं आनं तन ऊगय तं, तो वावर काही उपयोगना ना सय. आनं तो वावर देवना श्रापना लायक सय. आनं शेवट तेला ईस्तुमं चेटाडीसनं नास करामं येई. तशाज जे लोकं चांगला जीवन जगत ना, ते बी देवनी करता उपयोगना ना सत. आनं तेसला बी देवना श्राप भेटी आनं ते बी नास व्हई जाईत.
9 मनं भाऊ आनं ब‍ईन, आमं तुमला या गोस्टी सांगत, तरी बी आमना भरोसा सय का, तुमं येसनी पेक्षा बी पक्‍कं चांगलं सत. आनं तारन भेटेल लोकं जे कामं करत, तेज तुमं बी करत. 10 तुमं पक्‍का कठीन काम करनं सत. आनं देवनं लोकंसला मदत करीसनं दखाडी दीनं सत का, देववर तुमं कीतला मया करत. आनं आतं परन बी तुमं तशेज करी रहनं सत. देव या आख्या गोस्टी कधी भुलायनार ना, कजं का तो चांगला न्‍याय करनार सय. 11 आनं ते चांगला कामं करानी आवड शेवट परन तुमं आखंसपन रव्हाला पायजे आशी आमनी पक्‍की ईशा सय. तवं जी आसा तुमं धरी ठेवनं सत, ती पुरी व्हई जाई. 12 आखु आमनी ईशा सय का, तुमं आळसी नोको बनाला पायजे. पन जे लोकं वीस्वास ठेवत आनं धीर धरत तेसनी सारका तुमं बनाला पायजे. कजं का देव जा देवाना वचन देयेल सय, ता तेज लोकंसला भेटय.
देव तेना देयेल वचनला नक्‍की पुरा करय
13 जवं देव आब्राहामला वचन दीना, तवं तेनी सोतानी पेक्षा आजुन दुसरा कोनी बी मोठा ना सय मनीसनं तो सोतानी शपथ लीसनं आशा वचन दीना का,
14 "मी तुला नक्‍कीज आशीर्वाद दीसु. आनं मी तुन्या पीढीसला नक्‍कीज वाढ करसु."
15 मंग आब्राहाम पक्‍का धीर धरीसनं तो आशीर्वादना वाट दखना. तेमन जो आशीर्वादना वचन देव तेला देयेल व्हताल, तो तेला भेटना.
16 जवं लोकं शपथ लेत, तवं तेसनी पेक्षा येखादा मोठा मानुसनी शपथ ते लेत. मंग जी शपथ ते लेत, ती नक्‍की व्हई जाय आनं तेनी नंतर आखु काही बी वाद वीवाद रहय ना. 17 तशाज देव जो वचन देय, तो नक्‍की पुरा करय, हाई गोस्टं जे लोकं तो वचनना वारीस सत तेसला दखाडी देवानी करता तेनी ईशा व्हयनी, तेमन तो बी शपथ लीना. 18 देवन्या दोन गोस्टी कधी बदलय ना, त्या मंजे तेना देयेल वचन आनं तेनी लीयेल शपथ. कजं का तो कधी खोटा बोलय ना. तेमन सोताना समाळ करानी करता आपुन देवना हातमं सोताला सोपी देयेल सत. आनं जी आसा आपुनला देवामं ईयेल सय, तीला धरी ठेवानी करता तेना देयेल वचनंसघाई आपुनला हीम्मत भेटय. 19 आनं ती आसा आपला जीवनी करता येक आकडा सारकी सय. आपुन वीस्वास म‍ईन मांगं नोको जावाला पायजे मनीसनं ती आपुनला धरी ठेवय. आनं ती आसा आपला जीवला भक्‍कम बनाडय आनं समाळ करय. आनं आपुनला देवनी पक्‍की पवीत्र जागामं ली जाय. 20 आनं आपुनला मदत करानी करता येसु ख्रीस्त ती पवीत्र जागामं आपली आगुदारज जाई लागना आनं मलकीसदेकनी सारका कायमनी करता याजक बनी गया.