5
1 प्रतेक मोठा याजकंसला मानसंस मईनंज नीवाडामं येय. आनं लोकंसना पाप पईन सुटका व्हवाला पायजे मनीसनं देव कडं जाईसनं बलीदान आनं आर्पन करानी करता तेसला नीवाडामं येय. 2 आनं ते मोठा याजकंसना सोताना जीवनमं बी काही काही गोस्टीसमं कमीपना रहय. तेमन जे लोकं बीगर मायती रहीसनं पाप करी देत आनं भटकी जात तेसनी संगं ते कठोरपनाथीन वागत ना. 3 आनं ते सोता काही गोस्टीसमं कमी सत मनीसनं ते फक्त लोकंसना पापनी करताज ना, पन सोताना पापनी करता बी बलीदान कराला पायजे.
4 आनं कोनी बी सोताला मान भेटाडानी करता सोता मोठा याजक बनु शकय ना. पन जशा आहरोनला देव नीवाडनाल, तशाज जर येखादाला देव नीवाडना सय तं, तोज मोठा याजक बनु शकय. 5 तशाज ख्रीस्त बी सोताला मोठा याजक बनाडीसनं सोता मान भेटाडी लीना ना. पन देव तेला मोठा याजक मनीसनं नीवाडना आनं सांगना का,
✞"तु मना पोर्या सय, आनं आज मी तुना बाप व्हयना सय."
6 आनं दुसरा वचनमं बी देव आशा सांगेल सय का,
✞"जशा मलकीसदेक येक याजक व्हताल, तशाज तु बी येक कायमना याजक सय."
7 जवं येसु हाई जगमं व्हताल, तवं जो देव तेला मरनना दंड पईन वाचाडानी करता शक्तीवान सय, तेनी कडं तो रडी रडीसनं जोरमं प्राथना वीनंती करना. आनं देव तेनी प्राथना आयकना, कजं का येसु नम्र बनीसनं तेनी भक्ती करनार व्हताल. 8 आनं तो देवना पोर्या व्हताल, तरी बी दुख सहन करीसनं तो देवनी आज्ञा पाळाना शीकना. 9 आशा रीतथीन देव तेला आशा बनाडी दीना का, तेना जीवनमं काही कमीपना रहना ना. तेनी नंतर जे लोकं तेनी आज्ञा पाळत, ते आखंसनी करता तो कायमना तारन देनार बनी गया. 10 आनं तो मलकीसदेकनी सारका मोठा याजक बनी मनीसनं देव तेला नीवाडना. तवं तुमं कशामं बी कमी पडावुत ना आनं तुमं पुरी रीतथीन चांगला बनशात
आपुन वीस्वास मईन मांगं नोको जावाला पायजे
11 येनी बद्दल सांगानी करता आमपन बराज काही सत. आनं त्या तुमला समजाडीसनं सांगानी करता पक्का कठीन सय. कजं का तुमं समजामं पक्कं कमी सत. 12 आतं परन तुमं दुसरंसला शीकाडनारं बनी जावाला पायजे व्हतलत. पन आतं बी देवना वचन सुरुवात पईन कोनीतरी तुमला परत शीकाडाला पायजे आशी गरज सय. आनं तुमला जड जेवननी सारका मोठा शीक्षन ना, पन धाकलं पोरेसला दुध पाजानी सारका सुरुवातना वचन शीकाडाला पायजे. 13 आनं जे दुधवरंज जीवन जगत, ते आतं परन धाकलं पोरेज सत. आनं ते आत्मीक जीवनमं वाढेल ना सत, तेमन तेसला बरा वाईट शीक्षननी बद्दल काहीज मायती ना रहय. 14 पन जे आत्मीक जीवनमं वाढेल लोकं सत, तेसना साठीज जड जेवननी सारका मोठमोठला शीक्षन पायजे. आनं बरा काय सय आनं वाईट काय सय, हाई तेसला मायती रहय. कजं का येनी बद्दल तेसना मनमं वीचार करी करीसनं तेसना जीवनमं सवय पडी जायेल रहय.