4
देवनं लोकंसनी करता आराम करानी जागा
1 तेमन जी आराम करानी जागा देवानी बद्दल देव वचन देयेल सय, ती आतं परन आपला साठी मोकळी सय. तेमन तुम मईन कोनी बी ती जागा सुटाला नोको पायजे मनीसनं काळजी ल्या. 2 कजं का जशा ते ईस्रायेल लोकंसला येक चांगली गोस्टं सांगामं ईयेल व्हतील, तशाज आपुनला बी सुवार्ता सांगामं ईयेल सय. पन तेसना साठी ती गोस्टं काही फायदानी व्हयनी ना. कजं का ते आयकनत, पन ती गोस्टंवर वीस्वास ठेईसनं तीला स्वीकार करनत ना. 3 पन आपुन जे ती सुवार्तावर वीस्वास ठेवनं सत, आपुन ती आराम करानी जागामं जावु शकत. पन जे वीस्वास ठेवनत ना, तेसनी बद्दल देव आशा सांगय का,
✞"मी संतापमं आशी शपथ लीसनं सांगना का, आराम करानी करता जी जागा मी तेसला देवानी नक्की करेल सय, ती जागामं ते कधीज जावु शकावुत ना."
आनं जवं देव जग बनाडना तवं पईन तेना काम पुरा व्हई गयाल, तरी बी तो आशा सांगना. 4 कजं का सऊ दीवसमं देव आखंकाही बनाडानी नंतर सातवा रोजनी बद्दल तेना वचनमं आशा लीखेल सय का,
✞"सातवा रोजमं देव तेना आखं काम पईन दम खाना."
5 आनं आखु तेना वचनमं आशा लीखेल सय का,
✞ "आराम करानी करता जी जागा मी तेसला देवानी नक्की करेल सय, ती जागामं ते कधीज जावु शकावुत ना."
6 आनं जे पयलं ती चांगली गोस्टं आयकनंलत, ते पाळनत ना, तेमन ते तई जावु शकनत ना. पन ती जागामं कोनीतरी जावालाज पायजे मनीसनं तवं पईन ती जागा मोकळीज सय. 7 तेमन देव आजुन येक दीवस नक्की करना सय आनं तो मंजे आजना दीवस सय. आनं बरज दीवसनी नंतर देव येनी बद्दल दावीदनी द्वारा तेना वचनमं सांगना सय. तई तो आशा सांगना सय का,
✞"आज जर तुमं देवना वचन आयकत तं, तुमना रुदयला कठीन करु नोका."
8 कजं का जर यहोशवा देवना देयेल आराम करानी जागामं लोकंसला ली जाता तं, आजुन दुसरा आराम कराना दीवस ई रहना सय मनीसनं देव सांगता ना. 9 तेमन जशा देव सातवा रोजला आराम करना, तशा देवनं लोकंसनी करता बी आजुन येक आराम कराना दीवस ठेवामं ईयेल सय. 10 कजं का जे लोकं ती आराम करानी जागामं जाईत, ते बी देवनी सारकं तेसना सोताना काम पईन आराम करीत. 11 तेमन ती आराम करानी जागा भेटाडानी करता आपुन पक्कं कोशीत कराला पायजे. येनी करता का जशे ते ईस्रायेल लोकं देवला ना मानीसनं चुकाय गयत, तशा आपुन मयथीन कोनी बी चुकावाला नोको पायजे.
12 खरज देवना वचन जीवता सय आनं काम करानी करता शक्तीवान सय. आनं तो वचन दोन धाराई तलवार पेक्षा बी पक्का धाराया सय. आनं जशा येखादा दोन धाराई तलवार शरीरना सांधा आनं हाडुकना आरपार घुसी जाय, तशाज देवना वचन बी आपला आत्मा आनं जीवनना आरपार घुसी जाय. आनं तो वचन आपला मनना वीचार आनं ईशाना तपास करीसनं तेसला हुगडा करी देय. 13 आनं बनाडामं ईयेल कोनती बी वस्तु देवनी नजर पईन दपाडेल ना सय. आनं तेनी समोर आखंकाही हुगडा आनं मोकळा सय. आनं तेपन आख्या गोस्टीसना हीसोब आपुनला देना पडी.
येसु ख्रीस्त आपला मोठा याजक सय
14 आपला साठी येक पक्का मोठा याजक सय, जो सोरगंमं गया सय, तो मंजे देवना पोर्या येसु. तेमन जो वीस्वास आपुन धरेल सत आनं जेनी बद्दल आपुन दुसरंसला सांगत, तेवर आपुन भक्कम रव्हाला पायजे. 15 आनं जवं आपुन पाप करीसनं वीस्वासमं कमजोर व्हई जात, तवं आपला मोठा याजक आपुनवर कीव करानी करता शक्तीवान सय. कजं का तो मोठा याजक आपली सारका आख्या गोस्टीसमं परीक्षामं पडना. तरी बी तो काही पाप करना ना. 16 तेमन आपुन आपला दया करनार देवनी राजगादीपन हीम्मत करीसनं जावाला पायजे. तवं आपुनला तेनी भरपुर दया भेटी आनं जवं आपुनला गरज पडी, तवं आपुनला तेनी मदत भेटी.