3
येसु मोसानी पेक्षा बी मोठा सय
1 मनं वीस्वासी भाऊ आनं बईन, तुमं आखंसला सोरगंना भागीदार बनानी करता देव नीवाडना सय. जो येसुला देव धाडेल सय आनं जो आपला मोठा याजक सय मनीसनं आपुन स्वीकार करेल सत, तेवर तुमं ध्यान देवाला पायजे. 2 कजं का जशा मोसा देवनं आखं लोकंसनी सेवा करामं वीस्वासु व्हताल, तशाज तो बी तेना नीवडनार देव साठी वीस्वासु व्हताल. 3 आनं जशा येखादा मानुस घर बांधना तं, तो घरनी पेक्षा तो घरना मालकला जास्त मान भेटय, तशाज येसु ख्रीस्तला बी मोसानी पेक्षा जास्त मान भेटाडाना योग्य बनाडामं ईयेल सय. 4 कजं का प्रतेक घर कोनीतरी मानुसघाई बांधेल रहय, पन आखंकाही बांधनार देवज सय. 5 देवना सेवक मनीसनं मोसा देवना लोकंसला मदत करामं पक्का वीस्वासु व्हताल. आनं येनारा दीवसमं जो वचन देव सांगनार व्हताल, तो वचन मोसा लोकंसला सांगना. 6 पन देवना पोर्या मनीसनं येसु देवनं लोकंसनी जवाबदारी लेवामं पक्का वीस्वासु व्हताल. आनं आपुन येसु ख्रीस्तवर जी आसा ठेवनं सत, ती आसामं जर धीर धरीसनं आनं हीम्मत धरीसनं आपुन शेवट परन टीकी रहसुत तं, आपुन देवनं लोकं सत.
आपला रुदय बीगर वीस्वासना नोको रव्हाला पायजे
7 तेमन पवीत्र आत्मा आशा सांगय का,
✞"आज जर तुमं देवना वचन आयकत तं, 8 तुमना रुदयला कठीन करु नोका. तुमनं वाडावडील ईस्रायेल लोकं बी तशेज करनत. जवं ते सुना रानमं देवनी परीक्षा लेवानी करता तेना वीरुद उठनत, तवं ते बी तशेज करनत. पन तुमं तशे करु नोका. 9 तेसनी बद्दल देव सांगना का, तई चाळीस वरीस परन ते मनं करेल शक्तीवान कामंसला दखनत, तरी बी ते मनी परीक्षा लीनत. 10 तेमन ते पीढीसनं लोकंसवर मी संताप करना आनं सांगना का, ये लोकंसना मन कायम मा पईन दुर नींगी जाय. आनं मी येसला जा सांगय, ता ते करत ना. 11 तेमन संतापमं मी शपथ लीसनं सांगना का, येसला आराम करानी करता जी जागा मी देवाना नक्की करेल सय, ती जागामं ये लोकं कधीज जावु शकावुत ना."
12 मनं भाऊ आनं बईन, तुमं सावध रहज्या. येनी करता का, तुम मयथीन कोना बी रुदय वाईट आनं बीगर वीस्वासना नोको रव्हाला पायजे. कजं का ते आपुनला जीवता देव पईन दुर ली जात. 13 पन जो परन तुमला संधी सय, तो परन तुमं येकमेकंसला दर रोज हीम्मत द्या. येनी करता का, तुम मयथीन कोनी बी पापमं फसीसनं तेना रुदयला कठीन नोको कराला पायजे. 14 कजं का सुरुवातमं आपुन जो भरोसा ठेवनंलत, तेला जर आपुन शेवट परन धरी ठेवनत तं, आपुन आखं जन ख्रीस्तनी संगं तेना काममं भागीदार बनेल सत. 15 तेमन याद करा का, देवना वचनमं लीखेल सय,
✞"आज जर तुमं देवना वचन आयकत तं, तुमना रुदयला कठीन करु नोका. तुमनं वाडावडील जे देवना वीरुद उठनंलत ते बी तसेज करनत."
16 जे लोकं देवना वचन आयकीसनं बी तेना वीरुद उठनंलत, ते लोकं कोन व्हतलत? जे लोकंसला मोसा मीसर देश पईन सुटका करीसनं ली वनाल तेज व्हतलत ना का? 17 आनं चाळीस वरीस परन देव कोनवर संताप करनाल? जे लोकं पाप करनंलत आनं सुना रानमं मरीसनं पडनत तेसवर ना का? 18 आनं शपथ लीसनं देव कोनी बद्दल सांगनाल का, आराम करानी करता जी जागा मी देवाना नक्की करेल सय, ती जागामं ये लोकं कधीज जावु शकावुत ना? जे लोकं तेना आज्ञा मोडनंलत तेसलाज तो सांगनाल ना का? 19 मंग आतं आपुनला समजय का, ते लोकं वीस्वास ठेवनत ना मनीसनं ती जागामं जावु शकनत ना.