3
मंडळीना आगेवान
1 जर कोनी मंडळीना आगेवान बनाला दखय तं, तो चांगला काम करानी ईशा धरय. हाई वचन खरा सय. 2 मंडळीना आगेवान आशा जीवन जगाला पायजे का, कोनी बी तेनी नींदा करु शकाला नोको पायजे. तेनी येकंज बाई रव्हाला पायजे. आनं तो सोताना जीवला ताबामं ठेवनार पायजे. तो चांगला जीवन जगनार पायजे. तेला लोकं मान देवानी सारका तो रव्हाला पायजे. तो पावनसार करनार पायजे. आनं तो चांगला शीकाडनार पायजे. 3 आनं तो दारुड्या नोको रव्हाला पायजे. तो कज्या करनार ना, पन नम्र बनाला पायजे. तो धन दौलतनी लोभ करनार नोको पायजे. 4 तो सोताना कुटुमला चांगला समाळनार पायजे आनं तेनं पोरेसोरेसला वळन लाईसनं तेसला ताबामं ठेवनार पायजे. 5 कजं का जेला सोताना कुटमला समाळता येय ना, तो देवनी मंडळीना समाळ कशा करी? 6 तो येक नवीन वीस्वासी नोको पायजे. नातं तो जास्त गर्व करी आनं तेला सैताननी सारका दंड भेटी. 7 आनं दुसरं लोकंसनी समोर तेनी चांगली साक्षी रव्हाला पायजे. नातं लोकं तेनी नींदा करीत आनं तो सैतानना जाळामं फसी जाई.
मंडळीना वडील
8 तशाज मंडळीना वडील लोकं बी जेला लोकं जास्त मान देत, तशा रव्हाला पायजे. आनं ते दोन तोंडना नोको रव्हाला पायजे. आनं ते दारुड्या नोको रव्हाला पायजे. ते लोभ लालुस करीसनं पयसा कमावनार नोको पायजे. 9 वीस्वासना जो खरा वचन देव प्रगट करना, तेला ते चांगला मनमं धरी राखाला पायजे. 10 वडील बनानी आगुदार पयलंग तेसनी पारख व्हवाला पायजे. जर तेसना वीरुद काही दोस ना नींगना तं, ते वडीलना काम कराला पायजे. 11 तशाज वडीलंसन्या बाया बी आशा चांगला जीवन जगाला पायजे का, लोकं तीसला मान देईत. त्या चुगल्या करनार्या नोको पायजे. आनं आख्या गोस्टीसमं वीस्वासमं रव्हाला पायजे.
12 वडीलनी येकंज बाई पायजे. आनं तो सोताना कुटुमला आनं पोरेसोरेसला चांगला समाळनार पायजे. 13 तो वडील बनीसनं चांगली सेवा करय तं, लोकं तेला मान देत. आनं येसु ख्रीस्तवर जो वीस्वास तो ठेवना सय, ता दुसरंसला सांगानी करता तेला हीम्मत भेटी.
आपला वीस्वासना मोठा सत्य
14 मी तुनी बांग लवकर येवानी करता आसा करी रहना सय, तरी बी तुला हाई चीठी लीखय. 15 कजं का जर माला उशीर व्हई गया तं, देवना कुटुममं येखादा मानुस कशा रव्हाला पायजे, हाई तुला समजाला पायजे. हाई देवना कुटुम मंजे जीवता देवनी मंडळी सय आनं तो खरा वचनना खांबा आनं पाया सय. जशा खांबा आनं पाया घरला धरी राखत, तशाज मंडळी बी खरा वचनला धरी राखय. 16 आपला वीस्वासना खोल सत्य मोठा सय आनं तई काही शंका ना सय. तो आशा सय का, ख्रीस्त मानुसना रुप लीसनं जल्म लीना. आनं पवीत्र आत्मा तेला नीतीवान ठरावना. आनं तो देवदुतंसला दखायना. तेनी बद्दल देशंसमं प्रचार करामं वना. आनं जगमं लोकं तेवर वीस्वास ठेवनत. आनं तो मोठा मानमं सोरगंमं लेवामं वना.