4
देवला आवडनार जीवन
1 मनं भाऊ आनं ब‍ईन, देवला खुस करानी करता कशा जीवन जगाला पायजे येनी बद्दल तुमं आम प‍ईन शीकी लीनं सत. आनं तुमं तशाज जीवन जगत. आतं आमं तुमला परभु येसुना नावमं वीनंती करीसनं सांगत का, तुमं जास्त जास्त तशाज जीवन जगा. 2 कजं का परभु येसुना देयेल आधीकारथीन जा काही आमं तुमला शीकाडनं सत, ता तुमला मायती सय. 3 देवनी ईशा आशी सय का, तुमं आखं जन पवीत्र बनाला पायजे आनं शीनाळीना काम प‍ईन दुर रव्हाला पायजे. 4 तुमं आखं लोकं तुमना सोताना शरीरला ताबामं ठेवाना शीकाला पायजे. आनं दुसरं लोकं तुमला मान देवानी सारका पवीत्र जीवन तुमं जगाला पायजे. 5 आनं जे देवला वळखत ना, आशा बीगर ख्रीस्‍ती लोकंसनी सारका तुमं शीनाळीना काम करानी ईशा ठेवाला नोको पायजे. 6 आनं तुमं कोनी बी येनी बद्दल चुकी नोको कराला पायजे आनं तुमना भाऊ आनं ब‍ईनीसला फसाडीसनं तेसनी संगं शीनाळीना काम नोको कराला पायजे. कजं का आमं तुमला आगुदारज सांगी देयेल सत का, जे आशे पाप करत परभु तेसला दंड देई. 7 देव आपुनला वाईट काम करानी करता ना, पन पवीत्र जीवन जगानी करता बलावना सय. 8 तेमन जो कोनी हाई शीक्षनला नाकारी देय, तो मानुसना शीक्षनला नाकारय ना, पन जो देव आपुनला पवीत्र आत्मा देय, तेला तो नाकारय.
9 माला वाटय का, येकमेकंसवर मया करानी बद्दल तुमला लीखानी गरज ना सय. कजं का देव सोता तुमला शीकाडेल सय का, तुमं येकमेकंसवर मया कराला पायजे. 10 आनं खरज तुमं मासेदोनीया जील्लाना आखं वीस्वासी भाऊ आनं बईनीसवर मया करत. तरी बी आमं तुमला वीनंती करत का, तुमं आजुन जास्त जास्त येकमेकंसवर मया कराला पायजे. 11 जशा आमं तुमला सांगेल सत, तशा तुमं शांतीना जीवन जगानी ईशा ठेवा. आनं दुसरंसना काममं दखल ना दीसनं सोताना काम करा. आनं सोता काम करीसनं जीवन जगानी ईशा ठेवा. 12 तवं बीगर ख्रीस्‍ती लोकं बी तुमना जीवनला दखीसनं तुमला मान देईत. आनं तुमला जा काही बी गरज सय, तेना साठी तुमं दुसरंसवर भरोसा ठेवानी गरज पडावु ना.
परभु येसुना दुसरा दाउ येवानी बद्दल पौल लीखय
13 मनं भाऊ आनं ब‍ईन, आमनी ईशा सय का, मरेल वीस्वासी लोकंसना काय व्हई, येनी बद्दल तुमला मायती रव्हालाज पायजे. कजं का बीगर ख्रीस्‍ती लोकंसनी सारका तुमं पक्‍का दुख नोको कराला पायजे. ते बीगर ख्रीस्‍ती लोकंसना जीवनमं काही आसा ना सय. तेमन ते मरेल लोकंसनी करता पक्‍का दुख करत. 14 आपुन वीस्वास ठेवत का, येसु मरना आनं परत जीवत व्हयना. तेमन आपुन हाई बी वीस्वास ठेवत का, जवं येसु ख्रीस्‍त परत येई, तवं मरेल वीस्वासी लोकंसला देव मरन मयथीन उठाडी. तवं ते बी येसु ख्रीस्‍तनी संगं परत येईत. 15 आतं आमं जा तुमला सांगत, ता परभुना सांगेल वचन सय. तो वचन आशा सय का, जवं परभु येसु परत येई, तवं मरेल वीस्वासी लोकंज आगुदार जाईसनं तेला भेटीत. तेनी नंतरज आपुन जे जीवतं रहनारं सत, तेला भेटाला जासुत. 16 तवं मोठा आवाजमं आज्ञा व्हई आनं मुख्य देवदुतना मोठा आवाज ये‍ई. आनं देवनी तुतारी वाजामं येई. तवं परभु येसु सोता सोरगं मयथीन खाल ऊतरी. आनं जे येसु ख्रीस्‍तवर वीस्वास ठेईसनं मरेल सत, ते प‍ईलंग उठीत. 17 तेनी नंतर आपुन जे जीवतं रहनारं सत, आपुनला आकासमं परभु येसुला भेटानी करता तेसनी संगं ढगमं वर लेवामं येई. तशाज आपुन कायम परभु येसुनी संगं रहसुत. 18 तेमन येनी बद्दल तुमं येकमेकंसला सांगीसनं धीर द्या.