3
तीमथीना हातमं देयेल जवाबदारी
1-2 मंग शेवट आमं बराज दीवस तुम प‍ईन दुर रव्हु शकनत ना. तेमन तुमला वीस्वासमं भक्‍कम बनाडानी करता आनं हीम्मत देवानी करता आमं तीमथीला तुमपन धाडनत. आनं सीलवान आनं मी सोता आथेन‍स शेहेरमं रव्हाला नक्‍की करनत. तो तीमथी देवना येक सेवक सय आनं वीस्वासमं आमना भाऊ सय. आनं तो आमनी संगं येसु ख्रीस्‍तनी सुवार्ताना प्रचार करय. 3 येनी करता बी आमं तेला धाडनत का, आतं जो वीरोध व्हई रहना सय, तेनी मुळे तुमं कोनी बी घाबरीसनं वीस्वास मईन मांगं नोको जावाला पायजे. आनं तुमला मायती सय का, आपुन ख्रीस्‍ती लोकंसवर हाई वीरोध येनारंज सय. आनं हाई देवनी ईशा सय. 4 जवं आमं तुमनी संगं व्हतलत, तवं आमं तुमला सांगनंलत का, आपुन आखंसला संकट भोगना पडी. आनं हाई नक्‍की सय. आतं तशाज व्हई रहना सय, हाई तुमला मायती सय. 5 तेमन मी आजुन जास्त वाट दखु शकना ना. आनं तुमना वीस्वासनी बद्दल वीचारपुस करानी करता तीमथीला तुमपन धाडी दीना. कजं का माला भीवु वाटु लागनाल का, तो फसाडनार सैतान तुमला फसाडीसनं वीस्वास मईन मांगं ली गया व्हई तं, आमना मेहनत वाया गया व्हई. 6 पन आतं आमला आनंद वाटय. कजं का आतं तीमथी तुम प‍ईन परत वना आनं तुमना वीस्वास आनं मयानी बद्दल चांगला नीरोप सांगना. तो आमला सांगना का, तुमं कायम आमवर मया करीसनं आमनी याद करत. आनं जशा आमं तुमला भेटानी करता पक्‍की ईशा करनत, तशेज तुमं बी आमला भेटानी करता ईशा करत. 7 आनं तुमना वीस्वासनी बद्दल आयकीसनं आमला वीरोध आनं संकटमं हीम्मत भेटना सय. 8 कजं का जो परन तुमं वीस्वासमं भक्‍कम रहत, तो परन आमना जीवमं जीव रहय. 9 तुमनी बद्दल देवनी समोर जो आनंद आमला भेटेल सय, तेना साठी आमं देवना पक्‍का ऊपकार मानत. 10 आमनी भेट तुमनी संगं सोता व्‍हवाला पायजे आनं तुमना वीस्वासना जीवनमं जा काही पायजे, ता पुरा व्‍हवाला पायजे मनीसनं आमं रात नं दीवस तुमना साठी मन पईन प्राथना करत.
11 आतं आमं प्राथना करत का, तुमनी कडं येवानी करता आपला देवबाप आनं परभु येसु ख्रीस्‍त आमला वाट दखाडीत. 12 आनं जशा आमं तुमवर मया करत, तशा तुमं बी येक दुसरंसवर आनं आखंसवर जास्त मया करानी करता परभु तुमला मदत करी. 13 आशा करीसनं तो तुमना रुदयला भक्‍कम बनाडी. आनं परभु येसु तेना आखं पवीत्र लोकंसनी संगं परत येवाना टाईमला तो तेनी नजरमं तुमला पवीत्र आनं बीगर दोसना राखी.