2
थेसलनीक शेहेरमं पौलनी सेवा
1 मनं भाऊ आनं बईन, आमं तुमपन वनत आनं भेटनत, तो वाया गया ना. हाई तुमला सोताला मायती सय. 2 आनं तुमला हाई बी मायती सय का, तुमपन येवानी आगुदार फीलीप शेहेरनं लोकं आमला कीतला दुख दीनत आनं आमना कीतला आपमान करनत. पन आपला देवनी मदतथीन आमला हीम्मत भेटनी, तेमन आमं तुमपन वनत. आनं तुमना शेहेरमं बी लोकं आमला पक्का दुख आनं त्रास दीनत. तरी बी आमं देवनी सुवार्ता तुमला सांगु शकनत. 3 कजं का आमना शीक्षन चुकीना ना सय. आनं तुमला फसाडीसनं तुम पईन काही ली जावानी करता आमं तुमला ता सांगनत ना. 4 पन देव आमला पारख करीसनं नीवाडना आनं आमना हातमं सुवार्ता सांगाना काम सोपी दीना सय. तेमन आमं ती सुवार्ता सांगत. आमं मानसंसला खुश करानी करता ना, पन आमना रुदयला पारख करनार देवला खुश करानी करता बोलत. 5 तुमला मायती सय का, तुमनी बढाई करीसनं तुमला खुश करानी कोशीत आमं कधी करनत ना. आनं आमना लोभला दपाडीसनं आमं कधी तुमनी संगं बोलनत ना. येनी साक्षी देवज सय. 6 आनं तुम पईन नातं दुसरं लोकंस पईन आमला मान भेटाला पायजे मनीसनं आमनी ईशा ना व्हतील. 7 आमं परभु येसु ख्रीस्तना धाडेल चेलं मनीसनं तुमवर आधीकार चालाडु शकतत. पन आमं तशे करनत ना, पन जशी येक माय तीनं पोरेसला मया करीसनं दुध पाजय आनं तेसनी काळजी लेय, तशेज आमं तुमनी संगं नम्र बनीसनं रहनत. 8 आमं तुमवर ईतला मया करनत का, तुमला फक्त देवनी सुवार्ता सांगनत ना, पन तुमना साठी सोताना जीव बी देवानी करता तयार व्हई गयत. कजं का तुमं आमला पक्कं आवडु लागनंलत.
9 मनं भाऊ आनं बईन, आमं कीतला कठीन मेहनत करनत हाई तुमला याद व्हई. जवं आमं तुमला देवनी सुवार्ता सांगी रनलत, तवं तुमवर आमना भार नोको पडाला पायजे मनीसनं आमं सोता रात नं दीवस कठीन मेहनत करनत. 10 तुमं आखं वीस्वासी लोकंसनी संगं आमं पवीत्र आनं नीतीवान रीतथीन आनं बीगर चुकीना वागनत. हाई गोस्टं देव दखेल सय आनं तुमं सोता बी दखनं सत आनं साक्षी देवु शकत. 11 तुमला मायती सय का, जशा बाप पोरेसला हीम्मत आनं धीरावा देय आनं वीनंती करीसनं सांगय, तशे आमं तुमनी संगं करनत. 12 आनं देवला आवडय आशे वागानी करता आमं तुमला हीम्मत दीनत आनं धीरावा दीनत आनं वीनंती करीसनं सांगनत. येनी करता का, तुमं देवनं लोकं बनाला पायजे आनं तो तुमवर राज्य कराला पायजे आनं तेला जो मान भेटी तेमं तुमं बी भागीदार रव्हाला पायजे मनीसनं तो तुमला नीवाडेल सय.
13 जवं आमं तुमनी कडं ईसनं देवना वचन सांगनत, ता तुमं आयकीसनं स्वीकार करनत. येनी करता आमं कायम देवना ऊपकार मानत. जो वचन तुमं स्वीकार करनत, तो मानसंसना वचन मनीसनं ना, पन देवना वचन मनीसनं तुमं स्वीकार करनत. आनं खरज हाई मानसंसना ना, पन देवना वचन सय. आनं तो वचनवर तुमं वीस्वास ठेवनं सत मनीसनं देव तुमनी मजार काम करी रहना सय.
14 मनं भाऊ आनं बईन, येसु ख्रीस्तमं रहनारं यहुदीया मंडळीनं वीस्वासी लोकंसला जशा व्हयना, तशाज तुमनी संगं बी व्हयना सय. ते लोकं यहुदी लोकंस पईन वीरोध आनं दुख सहन करनत. तशाज तुमं बी तुमना सोताना लोकंस पईन वीरोध आनं दुख सहन करनत. 15 ते यहुदी लोकं परभु येसुला आनं बरज देवना वचन सांगनारंसला मारी टाकनत. आनं ते आमला बी वीरोध करीसनं बाहेर हाकली दीनत. ते देवला खुश करत ना आनं आखं मानसंसला वीरोध करत. 16 बीगर यहुदी लोकंसना तारन व्हई जाई मनीसनं ते तेसनी संगं आमला बोलु देत ना. आशा करीसनं ते शेवटना दीवस परन तेसना सोताना पाप जास्त वाढाय रहनं सत. आनं शेवट देव तेसवर संताप करी आनं दंड देई.
थेसलनीक मंडळीला परत भेटानी करता पौल ईशा करय
17-18 मनं भाऊ आनं बईन, आमं थोडाज टाईम साठी तुम पईन आलंग व्हतलत. तवं फक्त आमना शरीर तुम पईन आलंग व्हताल, पन कायम आमं तुमनी बद्दलज वीचार करी रनलत. आनं तुमपन ईसनं तुमला परत भेटानी करता आमनी पक्की ईशा व्हतील. तेमन आमं पक्कं कोशीत करनत. मी, पौल सोता बराज दाउ कोशीत करना. पन सैतान आमला आटकाडी ठेवना. 19 तुमला भेटानी आमनी ईशा सय. कजं का आमना भरोसा सय का, परभु येसु परत येई ताव तुमं वीस्वासमं टीकी रहशात आनं हीम्मतथीन तेनी पुडं तुमं हुबं रहशात. तवं आमला पक्का आनंद वाटी. आनं जशा येक रवनारला बक्षीस भेटय तं, तेला गर्व वाटय, तशाज तुमला दखीसनं तवं आमला बी गर्व वाटी. 20 खरज आतं बी तुमना साठी आमला गर्व आनं आनंद वाटय.