रोम मंडळीला लीखेल पौलनी चीठी
1
पौल सालाम सांगय
1 मी येसु ख्रीस्‍तना सेवक पौल हाई चीठी लीखय. तेनी सुवार्ता प्रचार करानी करता येसु देव माला नीवाडीसनं धाडेल सय. 2 बराज वरीसनी आगुदार देव तेनं वचन सांगनारंसनी द्वारा वचन देयेल व्हताल का, तो हाई सुवार्ता लोकंसना हातमं देई. आनं ते वचन सांगनारं येनी बद्दल देवना पवीत्र वचनमं लीखेल व्हतलत. 3 हाई सुवार्ता तेना पोर्‍या आपला परभु येसु ख्रीस्‍तनी बद्दल सय. आनं तो येसु ख्रीस्‍त दावीद राजानी पीढीमं मानुसना रुपमं जल्म लीसनं वना. 4 आनं पवीत्र आत्मा तेला मरन मयथीन जीवता उठाडना. आशा करीसनं तो पवीत्र आत्मा तेनी मोठी शक्‍तीथीन दखाडी दीना का, तोज येसु ख्रीस्त देवना पोर्‍या सय. 5 आनं तो येसु ख्रीस्‍तनी द्वारा देव आमवर दया करना सय आनं आमला प्रेशीत मनीसनं धाडेल सय. येनी करता का आमं जगनं आखं लोकंसला, मंजे बीगर यहुदी लोकंसला बी तेनी सुवार्ता सांगाला पायजे. आनं ते आखं लोकं तेवर वीस्वास ठेईसनं तेनी आज्ञा पाळाला पायजे. 6 आनं तुमं रोम शेहेरनं लोकं बी येसु ख्रीस्‍तनं बनाला पायजे मनीसनं ते आखं लोकंसमं तुमला बी देव बलायेल सय.
7 रोम शेहेरनं जे लोकंसवर देव मया करीसनं तेनं सोतानं लोकं बनाडानी करता नीवाडेल सय, ते आखंसला मी हाई चीठी लीखय. मी प्राथना करय का, आपला देवबाप आनं परभु येसु ख्रीस्‍त तुमवर दया करीत आनं तुमला शांती देईत.
रोम शेहेरनं वीस्वासी लोकंसला भेटानी पौल ईशा ठेवय
8 तुमना वीस्वासनी बद्दल जगना आखं लोकंसला मायती पडी रहना सय. आनं येसु ख्रीस्‍तनी करताज आशा व्हयना सय. तेमन तुमं आखंसनी करता पयलंग मी आपला देवना आभार मानय. 9-10 आनं तेना पोर्‍यानी बद्दल सुवार्ता सांगीसनं जो देवनी सेवा मी पुरा मनथीन करय, तोज मना पुरावा सय का, मी कायम मनी प्राथनामं तुमला याद करय. मी प्राथना करय का, तुमनी कडं येवानी करता देव तेनी ईशाघाई मला कशा बी करीसनं संधी देवाला पायजे. 11 तुमला भेटानी करता मनी पक्‍की ईशा सय. कजं का तुमला भेटीसनं मी तुमला आत्मीक जीवनमं मदत कराला पायजे. तवं तुमं आत्मीक जीवनमं भक्‍कम बनशात. 12 मंजे मी तुमनी कडं ईसनं वीस्वासना जीवनमं भक्‍कम बनानी करता तुमला हीम्मत दीसु आनं तुमं बी माला तशाज हीम्मत दीशात.
13 मनं भाऊ आनं ब‍ईन, तुमला मायती रव्हाला पायजे का, तुमनी कडं येवानी करता मी बराज दाउ कोशीत करनाल. कजं का जशे दुसरं दुसरं बीगर यहुदी लोकंसला मी देव कडं ली वना, तशाज तुम मयथीन बरज लोकंसला बी ली येवानी मनी ईशा सय. पन आतं परन काही ना काही आडचन मुळे मी येवु शकना ना. 14 मी आखं लोकंसला सुवार्ता सांगालाज पायजे. ते आपला यहुदी समाजनं व्हईत नातं दुसरा समाजनं व्हईत, आनं शीकेल व्हईत नातं आडानु व्हईत, पन आखंसला मी सांगालाज पायजे. 15 तेमन रोम शेहेरमं रहनारं तुमं आखंसला सुवार्ता सांगानी मनी पक्‍की ईशा सय. 16 आनं सुवार्ता सांगानी करता माला कधी लाज वाटय ना. कजं का यहुदी लोकंस पईन सुरुवात करीसनं बीगर यहुदी लोकंस परन, जे हाई सुवार्तावर वीस्वास ठेवत, ते आखंसला तारन देवानी करता हाई देवना येक शक्‍तीवान रस्ता सय. 17 कजं का सुवार्ता सांगय का, जे लोकं सुरुवात प‍ईन शेवट परन फक्‍त येसु ख्रीस्‍तवर वीस्वास ठेवत, तेसला देवनी नजरमं नीतीवान ठरावामं येय. आनं येनी बद्दल देवना वचनमं आशा लीखेल सय का,
"जे लोकं नीतीवान सत, ते तेसना वीस्वास मुळे जीवन जगीत."
पापी लोकंसवर देव संताप करय
18 पन पापी आनं वाईट लोकंसवर देव सोरगं मयथीन संताप करय. कजं का तेसना वाईट काम लोकंसनी करता रुकावट बनी जाय आनं देवना खरा शीक्षन लोकंसला मायती पडय ना. 19 आनं ते वाईट लोकंसला देवनी बद्दल मायती रहय. कजं का देव तेसलाज हाई प्रगट करना सय. 20 देवना मोठमोठला गुन आनं तेनी कायम रहनार शक्‍तीला कोनी बी दखु शकत ना. पन जवं देव जग बनाडना सय, तवं प‍ईन तेना गुन आनं शक्‍तीनी बद्दल लोकंसला मायती पडीज रहना सय. आनं तेना देवपना बी लोकंसला दखाय रहना सय. तो जा काही बी बनाडना, ता आखंसघाई लोकंसला मायती पडय. तेमन कोनी बी सांगु शकावुत ना का, आमं देवला वळखनत ना. 21 कजं का ते वाईट लोकं देवला वळखीसनं बी तेला मान दीनत ना आनं तेना आभार माननत ना. पन ऊलटा तेसना मनना वीचारना काही फायदा व्हयना ना. आनं तेसला जा मायती रव्हाला पायजे मनीसनं देवनी ईशा सय, ता ते तेसना बीगर समजनार मनमं समजु शकनत ना. 22 ते सोताला बुधीवान सांगत, पन खरा सांगाला गयत तं, ते मुर्ख व्हई गयं सत. 23 आनं कायम रहनार देवला ते सोडी दीनं सत. आनं तेनी जागामं नास वनार्‍या वस्तुसनी पुजा करनत. मंजे मानुसना आनं चीडंसना आनं चार पायनं जनावरंसना आनं जमीनवर सरकनारं जनावरंसना मुरत्या बनाडीसनं ते तेसनी पुजा करनत.
24 येनी करता देव ते लोकंसला तेसनी ईशाघाई वाईट काम करु दीना. तेमन ते येकमेकंसना शरीरनी संगं शीनाळीना काम करीसनं सोताना आपमान करी लेत. 25 आनं ते देवना खरावर वीस्वास ठेवनत ना. ऊलटा जो खोटा सय, तेला स्वीकार करनत. आनं जो देव आखंकाही बनाडेल सय, तेला ते सोडी दीनं सत. पन तेना बनाडेल वस्तुसनी पुजा ते करनत आनं तेसनीज सेवा करनत. पन मी सांगय का, फक्‍त तो बनाडनार देवनीज स्‍तुती कायम व्‍हवाला पायजे. आमेन.
26 ते लोकं आशे करनत मनीसनं देव तेसला तेसनी ईशाघाई वाईट काम करु दीना. आनं तेस मयल्या बायासला मानसं आवडनत ना, तेमन त्या दुसर्‍या दुसर्‍या बायासनी संगं शीनाळी काम करन्‍यात. 27 तशाज तेस मतलं मानसंसला बी बाया आवडन्यात ना. तेमन ते येकमेकंसनी संगं वाईट काम करानी पक्‍की ईशा ठेवनत आनं दुसरं दुसरं मानसंसनी संगं वाईट काम करनत. तेमन तेसना वाईट काम मुळे जो दंडना लायक ते सत, तो दंड देव तेसला दी रहना सय.
28 आनं ते लोकं तेसना मनमं आशे वीचार करनत का, देवला वळखीसनं काही फायदा ना सय. तेमन देव तेसला फक्‍त वाईट वीचार करानी करता सोडी दीना सय. आनं जो नोको कराला पायजे आशे वाईट कामं ते करत. 29 ते आखा प्रकारना पाप करानी ईशा ठेवत आनं दुसरंसनी संगं पक्‍का वाईट काम करानी बी ईशा ठेवत. आनं ते दुसरंसन्या वस्तुसवर लोभ करत आनं येकमेकंसना वाईट करत. ते दुसरंसना हेवा करत आनं खुन करत. ते कज्या करत आनं कपट करत. ते दुसरंसनी करता वाईट वीचार करत आनं दुसरंसन्या चुगल्या करत. 30 आनं ते दुसरंसनी बद्दल वाईट बोलत. ते देवला नाकारत आनं येक दुसरंसना आपमान करत. ते गर्व करत आनं बढाई मारत. ते वाईट काम करानी करता वाट दखी काडत आनं मायबापसना आयकत ना. 31 ते बीगर बुधीनं सत आनं जा कराला सांगत, ता करत ना. ते सोताना कुटुमनं लोकंसवर बी मया करत ना आनं कोनवर बी दया करत ना. 32 देवना नीयममं आशा लीखेल सय का, जे लोकं आशे जीवन जगत, ते मरन दंडना लायक सत. हाई देवना नीयम ते लोकंसला मायती रहीसनं बी ते तशेज करत. ईतलाज ना, पन जे लोकं आशे कामं करत, तेसला बी ते हीम्मत देत.