योहाननी लीखेल सुवार्ता
1
देवना वचन मानुसना रुपमं वना
1 हाई जग तयार व्हवानी पयलंग फक्‍त वचनंज व्हताल. आनं तो वचन देवनी संगं व्हताल आनं तोज वचन देव व्हताल. 2 आनं तोज वचन सुरुवात पईन देवनी संगं व्हताल. 3 आनं तो वचननी द्वारा देव आखंकाही बनाडना आनं तेनी शीवाय काही बी बनाडामं वना ना. 4 आनं जा काही बी बनाडामं वना, ते आखंसला तोज वचन जीवन दीना. आनं जशा आंधारामं जा काही बी दपाडेल रहय, तेवर ऊजाळा पडना तं, ता आखा दखाय जाय, तशाज देवनी बद्दल सत्यला तो ऊजाळा सारका लोकंसमं प्रगट करी दीना. 5 आनं जवं जगनं लोकं आंधारामं व्हतलत, तवं येक ऊजाळा तेसवर चमकना, पन ते लोकं तो ऊजाळाला तेसवर प्रगट व्हवु दीनत ना.
6 मंग देव येक मानुसला धाडना. तेना नाव योहान व्हताल. 7 आनं तो योहान तोज ऊजाळानी बद्दल लोकंसला सांगानी करता वना. येनी करता का बरज लोकं तेना आयकीसनं तो ऊजाळावर वीस्वास ठेवाला पायजे. 8 तो बापतीस्मा करनार योहान सोता तो ऊजाळा ना व्हताल. पन ऊजाळानी बद्दल लोकंसला सांगानी करता तो ईयेल व्हताल. 9 तवं तो खरा ऊजाळा जगमं येनार व्हताल. आनं जशा आंधारामं जा सय, तेला ऊजाळा प्रगट करी देय, तशाज देवनी बद्दल सत्य लोकंसला मायती करी देवानी करता तो ऊजाळा सारका व्हताल.
10 आनं तो ऊजाळा हाई जगमंज व्हताल आनं तेनी द्वाराज जग बनाडामं वनाल, तरी बी जगनं लोकं तेला वळखनत ना. 11 तो सोताना देशमं वना. पन तेना सोतानं लोकं बी तेला स्वीकार करनत ना. 12 पन काही लोकं तेला स्वीकार करनत आनं तेवर वीस्वास ठेवनत. तेमन तो तेसला देवनं पोरेसोरे बनाना आधीकार दीना. 13 आनं जशे मानसंसनी पीढीमं आनं शरीरनी ईशाघाई आनं नवरा बायकोना संमंधघाई पोरेसोरे जल्म लेत, ते लोकं देवनं तशे पोरेसोरे ना सत. पन देव सोतानी ईशाघाई तेसला पोरेसोरे बनाडेल सय.
14 तो देवना वचन मानुसना रुप लीसनं वना आनं आपली मजार रहना. आनं तो कीतला मोठा सय, हाई आपुन दखेल सत. फक्‍त तोज देवबाप पईन ईयेल व्हताल आनं तेनी सारका आजुन कोनी बी मोठा ना व्हताल. आपुन दखनत का, आपुन लायक ना सत, तरी बी तो कायम आपुनवर पक्‍का दया करय. आनं देवनी बद्दल खरा काय सय, हाई आपुनला तो सांगी दखाडना. 15 बापतीस्मा करनार योहान तेनी बद्दल साक्षी सांगना. तो जोरमं आराळ्या दीसनं सांगना का, जेनी बद्दल मी तुमला सांगनाल, हाऊ तोज सय. येनी बद्दलज मी तुमला सांगेल व्हताल का, जो मनी मांगयथीन ई रहना सय, तो मनी पेक्षा बी पक्‍का मोठा सय. कजं का मना जल्मनी आगुदारज तो आठी सय. 16 आनं तो आपुनवर पक्‍का दया करय मनीसनं आपुन आखंसला आशीर्वादवर आशीर्वाद भेटेल सय. 17 खरज देवना सेवक मोसानी द्वारा देव तेनं लोकंसला नीयम देयेल व्हताल, पन तेना पोर्‍या येसु ख्रीस्‍तनी द्वारा तो आपुनवर दया करना आनं सोतानी बद्दल खरा काय सय, हाई प्रगट करना. 18 आनं कोनी बी कधी देवला दखेल ना सत. पन तेना येकुलता येक पोर्‍या जो देवबापना पक्‍का आवडता सय, तोज देवला लोकंसमं प्रगट करना सय.
बापतीस्मा करनार योहान येसुनी बद्दल सांगय
(मतय ३:१-१२; मार्क १:१-८; लुक ३:१-१८)
19 तवं यरुशलेम शेहेरना काही यहुदीसना पुढारी लोकं बापतीस्मा करनार योहान कोन सय, हाई मायती करानी कोशीत करनत. तेमन येक दीवस तेला वीचारानी करता ते काही याजक आनं मंदीरना सेवामं मदत करनारं लेवी लोकंसला तेनी कडं धाडनत. मंग ते गयत आनं योहानला वीचारनत, तु कोन सय? 20 तवं बापतीस्मा करनार योहान तेसला उतर देवानी करता मना करना ना, पन तेसला आखंकाही खरा खरा सांगना. तो सांगना का, मी देवना धाडेल राजा ख्रीस्‍त ना सय. 21 तवं ते याजक आनं लेवी लोकं तेला वीचारनत, मंग तु कोन सय? जो देवना वचन सांगनार येलीया परत येनार व्हताल, तो तुज सय का? तो तेसला सांगना, मी तो ना सय. तवं ते वीचारनत, मंग देव तेना येक वचन सांगनारला धाडाना वचन देयेल सय, तो तुज सय का? तवं बी तो तेसला सांगना का, मी ना सय. 22 शेवट ते तेला सांगनत का, तु कोन सय आनं सोतानी बद्दल काय सांगय, हाई आमला सांग. कजं का जे आमला धाडेल सत तेसला जाईसनं आमं सांगालाज पायजे. 23 मंग देवना वचन सांगनार यशया तेना पुस्तकमं जा लीखेल सय, ता योहान तेसला सांगना. तो तेसला सांगना का,
"सुना रानमं जो मानुस आराळ्या दीसनं सांगय मी तोज सय. आनं मी आराळ्या दीसनं आशा सांगय का, परभु तुमनी मजार येवाला पायजे मनीसनं तुमं तेना रस्ता तयार करा."
24-25 मंग परुशी लोकं बी आजुन काही लोकंसला बापतीस्मा करनार योहान कडं धाडेल व्हतलत. तवं योहानना आयकीसनं ते तेला वीचारनत, जर तु देवना धाडेल राजा ना सय, नातं येलीया ना सय, नातं येखादा देवना वचन सांगनार ना सय तं मंग, कजं तु लोकंसला बापतीस्मा दी रहना सय? 26 तो तेसला सांगना, मी फक्‍त पानीघाई बापतीस्मा दी रहना सय. पन तुम मजार येक जन हुबा सय, जेला तुमं वळखत ना. 27 आनं मनी नंतर ई रहना सय मनीसनं जेनी बद्दल मी सांगेल व्हताल, तो हाऊ सय. आनं तेना नौकर बनीसनं तेना बुटंसन्‍या दोर्‍या सोडाना बी मी लायक ना सय.
28 या आख्या गोस्टी बेथानी नावना शेहेरमं वयन्यात. तो शेहेर यार्दन नदीना तथानी बाजुमं व्हताल आनं तई योहान लोकंसला बापतीस्मा दी रहनाल.
29 मंग दुसरा दीवसला बापतीस्मा करनार योहान दखना का, येसु तेनी कडं ई रहना सय. तवं तो लोकंसला सांगना, दखा, हाऊ मानुसला देव येक मेंडीना बच्‍चानी सारका धाडेल सय. येनी करता का तो सोताला बलीदान करीसनं जगना आखं लोकंसला पाप पईन सुटका करी. 30 आनं येनी बद्दलज मी तुमला सांगनाल का, जो मनी मांगयथीन ई रहना सय, तो मनी पेक्षा बी पक्‍का मोठा सय. कजं का मना जल्मनी आगुदारज तो आठी सय. 31 तो देवना धाडेल राजा सय मनीसनं मी बी पयलं तेला वळखता ना. पन आतं तेला मी वळखी लीना सय आनं लोकंसला पानीघाई बापतीस्मा देवानी करता मी ई लागना सय. येनी करता का, आखा ईस्रायेल लोकं बी तेला वळखालाज पायजे.
32-33 मंग योहान येसुनी बद्दल आखु साक्षी दीसनं सांगना का, पयलं मी देवना धाडेल राजाला वळखता ना. पन जवं देव माला पानीघाई बापतीस्मा करानी करता धाडनाल, तवं सांगनाल का, जेवर पवीत्र आत्मा ऊतरीसनं रहताना तु दखशी, तोज लोकंसला पवीत्र आत्माघाई बापतीस्मा करी. मंग तेना बापतीस्मा करताना मी दखना का, सोरगं मयथीन पवीत्र आत्मा खबुदरनी सारका उतरना आनं तेवर थामना. 34 आनं खरज मी हाई दखेल सय आनं तुमला सांगय का, तोज देवना पोर्‍या सय.
येसुनं पयलं चेलं
35 मंग दुसरा दीवसला बी बापतीस्मा करनार योहान तेनं दोन चेलंसनी संगं तईज हुबा व्हताल. 36 आनं तो दखना का, येसु वाटधरी जाई रहना सय. तवं तो सांगना, दखा, हाऊज मानुसला देव धाडेल सय. येनी करता का, येक मेंडीना बच्‍चानी सारका तो सोताला बलीदान करी. 37 मंग हाई आयकीसनं ते दोनी चेलं येसुनी मांगं नींगी गयत. 38 तवं येसु फीरीसनं तेसला तेनी बांग येताना दखना. आनं तेसला सांगना, तुमला काय पायजे? मंग ते वीचारनत, गुरुजी, तु कई रहय? 39 येसु सांगना, मनी संगं या आनं मी कई रहय हाई दखा. मंग ते तेनी संगं गयत आनं तेनी रव्हानी जागा दखनत. तवं दुफारना चार वाजेल व्हताल, तेमन तो दीवसमं ते तेनी संगं तईज रही गयत.
40 जे दोनी जन बापतीस्मा करनार योहानना आयकीसनं येसुनी मांगं गयलत, तेस मयथीन येक जनना नाव आंद्रीया व्हताल. आनं तो शीमोन पेत्रना भाऊ व्हताल. 41 मंग येसु पईन जाईसनं पयलं तो तेना भाऊ शीमोन पेत्रला भेटना. आनं तेला सांगना, देवना धाडेल राजा ख्रीस्‍त आमला भेटी गया सय. 42 आशा सांगीसनं तो पेत्रला बी येसुपन ली वना. मंग येसु शीमोन कडं दखीसनं सांगना, भाऊ, तुना नाव शीमोन सय आनं तुना बापना नाव योहान सय. पन आज पईन मी तुना नाव केफा ठेवना सय. आरामी भाशामं केफा मंजे 'मोठा खडक' सय आनं ग्रीक भाशामं येला 'पेत्र' सांगत.
येसु फीलीप आनं नथनेलला चेला बनाडय
43-44 मंग दुसरा रोजला येसु गालील जील्लामं जावाना नक्‍की करना. आनं जवं तो जाई रहनाल, तवं रस्तामं फीलीप नावना येक जनला तो भेटना. आंद्रीया आनं पेत्रनी सारका तो फीलीप बी बेथसैदा शेहेरना व्हताल. मंग येसु तेला सांगना, मनी संगं ये. तवं फीलीप तेनी मांगं चालाला लागना. 45 नंतर तो फीलीप गया आनं नथनेलला भेटना. आनं तेला सांगना, जेनी बद्दल मोसा तेना नीयमना पुस्तकमं लीखेल सय आनं देवना वचन सांगनारं बी तेसनं पुस्तकंसमं लीखेल सत, तो आमला भेटी गया सय. तो नासरेथ गावमं रहनार योसेफना पोर्‍या येसु सय. 46 पन नथनेल सांगना, नासरेथ मईन बी काही चांगली गोस्टं नींगु शकय का? फीलीप तेला सांगना, तु सोता ईसनं दख. 47 मंग ते येसु कडं गयत. तवं येसु नथनेलला तेनी कडं येताना दखना आनं तेनी बद्दल सांगना, हाऊ मानुस खरज ईस्रायेल सय. येमं काही बी कपट ना सय. 48 मंग नथनेल येसुला वीचारना, मनी बद्दल तुला कशाकाय मायती सय? येसु तेला सांगना, फीलीप तुला बलावानी आगुदार जवं तु आंजीरना झाड खाल व्हताल, तवंज मी तुला दखेल व्हताल. 49 मंग नथनेल सांगना, गुरुजी, आतं माला मायती पडना का, खरज तु देवना पोर्‍या सय. आनं देवना धाडेल ईस्रायेल लोकंसना राजा तुज सय. 50 येसु तेला सांगना, मी तुला आंजीरना झाडनी खाल दखेल व्हताल मनीसनं तुला सांगना, येनी करता मी देवना पोर्‍या सय मनीसनं तु वीस्वास करय का? पन येनी पेक्षा बी मोठमोठला चमत्कार मी करताना तु दखशी. 51 मी तुला खरज सांगय का, येक दीवस तुमं दखशात का, सोरगं हुगडी जाई आनं देवनं दुतं वर जाईत आनं तथाईन जई मानुसना पोर्‍या मंजे मी सय, तई ते खाल ऊतरीत.