लुकनी लीखेल सुवार्ता
1
लुक येसुना जीवननी बद्दल लीखय
1 थीयफील साहेब, आपलंसमं ज्या गोस्टी घडन्यात, त्या लीखानी करता बरज लोकं कोशीत करनत. 2 आनं ज्या गोस्टी काही दुसरं लोकंस पईन आमला समजामं ईयेल वतल्यात, त्याज गोस्टी ते लीखनत. ते दुसरं लोकं त्या गोस्टी पयला पईन दखेल व्हतलत आनं देवना वचन लोकंसला सांगीसनं तेनी सेवा करेल व्हतलत. 3 थीयफील साहेब, मी पयलं पईन या आख्या गोस्टीसना ध्यान दीसनं तपास करना. तेमन माला आशा वाटना का, या आख्या गोस्टीसनी बद्दल पईला पईन शेवट परन चांगला रीतथीन तुना साठी मी लीखाला पायजे. 4 आनं जा काही तुला पयला पईन शीकाडामं ईयेल व्हताल, ता खरज सय. आनं हाई तुला मायती रव्हाला पायजे मनीसनं मी हाई लीखी रहना सय.
जखर्यानी प्राथना देव आयकय
5 जवं हेरोद यहुदीया जील्लाना राजा व्हताल तवं येक याजक व्हताल. तेना नाव जखर्या व्हताल. तो आबीया नावना याजक गट मयला✞व्हताल. तेनी बायकोना नाव आलीशीबा व्हताल. ते दोनी जन आहरोननी पीढीनं व्हतलत. 6 आनं ते देवनी नजरमं नीतीवान व्हतलत. आनं देवन्या आख्या आज्ञा आनं नीयम बीगर चुकाना पाळतत. 7 पन तेसला येक बी पोर्या ना व्हताल. कजं का आलीशीबा वांज व्हतील. आनं ते दोनी जन धयड्ये व्हई जायेल व्हतलत.
8-9 येकदाव मंदीरमं सेवा करानी पाळी जखर्याना गटनी वनी. तवं मंदीरमं देवनी पुडं धुप जाळानी करता येक याजकला चीठ्या टाकीसनं नीवाडानी रीत व्हतील. तशाज चीठ्या टाकीसनं तेला नीवाडामं ईयेल व्हताल. तेमन तो याजक मनीसनं तई देवनी समोर सेवा करी रहनाल. 10 आनं जवं तो धुप जाळी रहनाल, तवं जे लोकं देवनी भक्ती करानी करता ईयेल व्हतलत, ते आखं लोकं मंदीरना बाहेर गोळा व्हईसनं प्राथना करी रनलत. 11 तवं तो दखना का, देवना येक दुत धुप वेदीनी जेवनी कडं हुबा सय. 12 मंग तेला दखीसनं जखर्या चमकाय गया आनं पक्का घाबरी गया. 13 तवं देवना दुत तेला सांगना, जखर्या, भीवु नोको. कजं का देव तुनी प्राथना आयकीसनं तुला उतर दीना सय. तुनी बायको आलीशीबाला येक पोर्या व्हई. तु तेना नाव योहान ठेव. 14 तेना कामघाई तुला आनंद आनं खुशी भेटी. आनं तेना जल्म मुळे बरज लोकंसला बी आनंद वाटी. 15 कजं का तो देवनी नजरमं मोठा व्हई. आनं तो द्राक्षसनी दारु आनं दुसरी कोनती बी दारु पेवावु ना. आनं तेनी मायना पोट मयथीनंज पवीत्र आत्मा तेनी संगं रही. 16 तो तुमना बरज ईस्रायेल लोकंसला तुमना देव परभु कडं फीराय ली येई. 17 तो सोता देवनी आगुदार येई. आनं येलीयामं जी शक्ती आनं आत्मा व्हताल तेमं बी तोज रही. आनं पोरेस कडं ध्यान देवानी करता तो बापसला शीकाडी. आनं जे लोकं परभुनी आज्ञा पाळत ना, तेसला तो नीतीवान कडं ली येई. परभुला स्वीकार करानी करता लोकंसला तयार कराला तो या आख्या गोस्टी करी.
18 मंग जखर्या देवना दुतला वीचारना, ये आखं व्हई मनीसनं माला कशाकाय मायती पडी? कजं का मी धयड्या व्हई गया सय आनं मनी बायको बी धयडी व्हई गयी सय. 19 मंग देवना दुत सांगना, मी गब्रीयेल दुत सय, आनं मी देवनी पुडं हुबा रहय. आनं हाई चांगली गोस्टं तुला सांगानी करता देव माला धाडेल सय. 20 दख, मी जा सांगना सय, ता बरोबर टाईमला पुरा व्हई. आनं हाई गोस्टंवर तु वीस्वास ठेवना ना तेमन हाई गोस्टं घडय ताव तु मुक्या रहशी आनं तुला बोलता येवावु ना.
21 तवं आखं लोकं बाहेर जखर्यानी वाट दखी रनलत. आनं तेला मंदीरमं कजं ईतला टाईम लागी गया मनीसनं तेसला नवल वाटी रहनाल. 22 मंग तो बाहेर वना आनं तेसनी संगं बोलु शकना ना, पन तो तेसला फक्त ईशारा करी रहनाल. तवं ते लोकंसला समजना का, तेला मंदीरमं काहीतरी दरशन भेटना सय.
23 मंग जवं जखर्याना सेवा कराना दीवस पुरा व्हयना, तो तेनी घर नींगी गया. 24 आनं काही दीवसनी नंतर तेनी बायको आलीशीबाला दीवस रहनात. तवं ती पाच मयना घरमं येकटी रहनी. 25 मंग ती सांगाला लागनी का, देवज मना साठी आशा करना सय. आनं लोकंसमं मना आपमान दुर करानी करता तो मावर दया करना सय.
कुवारी मरीयाला देवना दुत नीरोप सांगय
26 जवं आलीशीबाला सऊ मयनाना दीवस वतलात, तवं गालील जील्लाना नासरेथ गावमं येक ✞कुवारी पोर कडं देव गब्रीयेल दुतला धाडना. 27 ती कुवारी पोरना नाव मरीया व्हतील. आनं तीना साकरपुडा योसेफनी संगं व्हयेल व्हताल. तो योसेफ दावीद राजानी पीढीना व्हताल. 28 तवं देवना दुत तीपन ईसनं सांगना, सलाम, तुवर देवनी दया सय. परभु तुनी संगं सय आनं आख्या बायासमं तु धन्य सय. 29 पन हाई आयकीसनं ती पक्की घाबरी गयी. आनं हाई गोस्टंना आर्थ काय सय मनीसनं ती वीचार कराला लागनी. 30 देवना दुत तीला सांगना, मरीया, भीवु नोको. कजं का देव तुवर दया करना सय. 31 दख, तुला दीवस रहीसनं येक पोर्या व्हई. तु तेना नाव येसु ठेव. 32 तो आखंसमं मोठा व्हई आनं तेला आखंस पेक्षा मोठा देवना पोर्या सांगामं येई. आनं जो दावीदनी पीढीमं तो जल्म लेई, तो दावीदनी राजगादी देव तेला देई. 33 आनं तो ईस्रायेल लोकंसवर कायम राज्य करी. आनं तेना राज्य कधी सरावु ना.
34 मंग मरीया दुतला वीचारनी, हाई कशा व्हई? कजं का मी येक कुवारी पोर सय. 35 तो सांगना, पवीत्र आत्मा तुवर येई. आनं आखंस पेक्षा मोठा देवनी शक्ती तुनी संगं रही. तेमन जेला तु जल्म दीशी तेला पवीत्र आनं देवना पोर्या सांगामं येई. 36 दख, तुनी नातेवाईक आलीशीबाला बी धयडपनमं दीवस रहना सत. आनं जीला लोकं वांज सांगतत, तीला आतं सऊवा मयना चाली रहना सय. 37 कजं का देव आखंकाही करु शकय. 38 तवं ती सांगनी, मी परभुनी दासी सय. तु जशा सांगना सय, तशा माला व्हवु दे. मंग देवना दुत ती पईन नींगी गया.
मरीया आलीशीबाला भेटाला जाय
39 मंग मरीया लगेज तयारी करीसनं यहुदी जील्लाना डोंगर भाग मयथीन आलीशीबाना गावला गयी. 40 आनं जखर्याना घर जाईसनं ती आलीशीबाला सलाम सांगनी. 41 तवं आलीशीबा मरीयाना सलाम आयकताज तीना पोट मयला पोर्या हुडी मारना. तवं आलीशीबावर पवीत्र आत्मा वना. 42 आनं ती मोठा आवाजमं बोलनी, मरीया, आख्या बायासमं तु धन्य सय. आनं जो पोर्याला तु जल्म दीशी तो बी धन्य सय. 43 मना परभुनी माय माला भेटाला वनी सय. हाई मना साठी कीतला मोठा मान सय! 44 दख, मी तुना सलाम आयकताज मना पोट मयला पोर्या आनंदमं हुडी मारना. 45 मरीया, तु धन्य सय. कजं का परभु तुला ज्या गोस्टी सांगेल सय, ता पुरा व्हई मनीसनं तु वीस्वास ठेवनी सय.
मरीया देवनी स्तुती करय
46 तवं मरीया सांगनी का, मी परभुनी स्तुती करय. 47 आनं मना तारन देनार देवनी करता मना मनला पक्का आनंद वाटय. 48 कजं का मी तेनी गरीब दासी सय मनीसनं तो मनी काळजी लीना सय. आतं पईन आखं पीढीनं लोकं माला धन्य सांगीत. 49 कजं का मोठा शक्तीवान देव मना साठी मोठा काम करना सय. आनं तो पवीत्र सय. 50 आनं जे तेवर वीस्वास ठेईसनं तेला मानत, तो तेसनी पीढीनं पीढीसवर दया करय. 51 तो तेना ताकत द्वारा मोठा काम करना. आनं जे तेसना मनना वीचारमं गर्व करत, तेसला तो दानाफान करना. 52 तो आधीपती लोकंसला राजगादी वयथीन ऊतारी दीना आनं गरीब लोकंसला मोठा करना. 53 तो भुके लोकंसला चांगली चांगली वस्तु दीसनं तेसना पोट भरना. पन धनवान लोकंसला रीकामा करीसनं धाडी दीना. 54-55 देव आपलं वाडावडीलंसला वचन देयेल व्हताल का, तो आब्राहाम आनं तेनं पोरेसोरेसवर कायम दया करी. हाई वचनला याद करीसनं तो तेनी पुजा करनारं ईस्रायेल लोकंसला मदत करना.
56 नंतर मरीया आलीशीबाना घरमं तीन महीना रहीसनं तीना घर परत नींगी गयी.
बापतीस्मा करनार योहान जल्म वय
57 जवं आलीशीबाना दीवस पुरा व्हयनात, तवं ती येक पोर्याला जल्म दीनी. 58 मंग तीनं शेजारनं लोकं आनं नातेवाईक आयकनत का, परभु तीवर मोठी दया करना सय. आनं हाई आयकीसनं ते बी तीनी संगं आनंद कराला लागनत.
59 मंग पोर्याना जल्मना आठवा रोजला तेनी सुन्नत वीधी कराला तेज लोकं तेसना घरमं वनत. आनं तेना बापना नाव वयथीन ते तेना नाव जखर्या ठेवनारं व्हतलत. 60 पन तेनी माय सांगनी का, तो नोको. पन येना नाव योहान ठेवाना सय. 61 ते तीला सांगनत, पन हाई नावना तुना नातेवाईक कोनी ना सत. 62 मंग ते तेना बापला ईशारा करीसनं वीचारनत, येना नाव काय ठेवाना सय? 63 मंग तो येक पाटी मांगना आनं लीखीसनं सांगना का, येना नाव योहान सय. तवं आखंसला नवल वाटना. 64 मंग लगेज तेना तोंड हुगडीसनं तेनी जीब मोकळी व्हई गयी. आनं तो बोलाला लागना आनं देवनी स्तुती करना. 65 ये वयथीन तेनी चारीमेर बसनारं आखं भीवाय गयत. आनं यहुदी जील्लाना डोंगर भाग मतलं आखं लोकं हाई गोस्टंनी बद्दल चाव्याला लागनत. 66 आनं जे लोकं हाई आयकनत, ते आखं तेसना मनमं येनी बद्दल वीचार कराला लागनत. आनं देव तेनी संगं व्हताल. तेमन ते लोकं सांगनत का, मोरं हाऊ पोर्या येक मोठा मानुस बनी.
जखर्या देवनी स्तुती करय
67 मंग तो पोर्याना बाप जखर्यावर पवीत्र आत्मा वना. आनं देव तेला जा सांगनाल, ता तो लोकंसला सांगाला लागना. 68 तो सांगना का, ईस्रायेल लोकंसना देव परभुनी स्तुती करा. कजं का तेनं लोकंसला मदत कराला आनं वाचाडाला तो वना सय. 69 तो आपला साठी तेना दास दावीद राजानी पीढी मयथीन येक वाचाडनारला धाडनार सय. आनं तो शक्तीवान सय. 70 आनं बरज वरीसनी आगुदारंज तेना वचन सांगनारं पवीत्र दासंसघाई हाई कराला वचन तो देयेल व्हताल. आनं जशा तो सांगनाल, तशाज तो करना. 71 आनं आपलं दुशमन आनं जे आपुनवर मया करत ना, तेस पईन आपुननी सुटका व्हवाला पायजे मनीसनं तो हाई करना. 72 आनं आपलं वाडावडीलंसवर दया कराला आनं तेना देयेल पवीत्र वचनला पुरा करला तो हाई करना. 73 हाई वचन तो आपला बाप आब्राहामला देयेल व्हताल. 74 आनं तो वचन आशा सय का, मी तुमना दुशमनंसना हात मयथीन तुमला वाचाडसु. 75 तवं तुमं मनी समोर पवीत्र आनं नीतीवान बनीसनं आनं बीगर भीवाईसनं जीवन भर मनी सेवा करशात.
76 मंग जखर्या तेना पोर्याला सांगना, हे मना पोर्या, लोकं तुला आखंस पेक्षा मोठा देवना वचन सांगनार सांगीत. कजं का लोकं परभुला स्वीकार कराला पायजे मनीसनं तु तेनी आगुदार जाईसनं तेसला तयार करशी. 77 आनं तु देवना लोकंसला सांगशी का, देव तेसना पापनी माफी दीसनं तेसला तारन देई. 78 कजं का आपला देव पक्का दया करनार सय. तेमन तेनी दयाथीन जशा ✞सकासला सुर्य ऊगय, तशाज तारन देनार देव सोरगं मयथीन आपली कडं येई. 79 आनं जे लोकं पापना आंधारामं आनं मरनना भीवमं सत, तेसला तो ऊजाळा देई. आनं शांतीना जीवन जगानी करता तो आपुनला वाट दखाडी.
80 नंतर जखर्याना पोर्या वाढीसनं आत्मामं भक्कम व्हवाला लागना. आनं ईस्रायेल लोकंसला दखाय ताव, तो सुना रानमंज रहना.