मार्कनी लीखेल सुवार्ता
1
बापतीस्मा करनार योहान आनं तेना वचन
(मतय ३:१-१२; लुक ३:१-९, १५-१७; योहान १:१९-२८)
1 हाई देवना पोर्‍या येसु ख्रीस्‍तनी बद्दल सुवार्तानी सुरुवात सय. 2 आनं जशा देवना वचन सांगनार यशया तेना पुस्तकमं लीखेल सय, तशा ती सुवार्तानी सुरुवात व्हयनी. तो आशा लीखेल सय का,
"दखा, मी मना नीरोप सांगनारला तुनी पुडं धाडसु. आनं तो तुना साठी वाट तयार करी. 3 जई लोकं घर बांधीसनं रहत ना आशी येक सुमसाम जागामं येक आराळ्या देनारना आवाज येई. आनं तो आशा सांगी का, परभुनी करता वाट तयार करा आनं तेना रस्ता सरळ करा."
4 हाई देवना वचन पुरा व्‍हवानी करता बापतीस्मा करनार योहान वना. आनं तो सुना रानमं प्रचार कराला लागना का, तुमना पापना पस्तावा करा, तवं देव तुमला माफी देई. आनं देवला स्वीकार करीसनं तेनी मांगं चालानी करता तुमं बापतीस्मा ल्‍या. 5 तवं यहुदीया देशनं आनं यरुशलेम शेहेरनं बरज लोकं बापतीस्मा करनार योहानपन ईसनं सोताना पाप कबुल करनत. आनं ते योहान कडथीन यार्दन नदीमं बापतीस्मा लीनत.
6 तो योहान हुटनं केशंसनं कपडं घालु लागनाल आनं तेना कंबरला कातडाना पट्टा लावु लागनाल. आनं तो तीड आनं जंगलना मद खावु लागनाल. 7 तो आराळ्या दीसनं सांगु लागना का, मनी मांगयथीन जो ई रहना सय, तो मनी पेक्षा जास्त शक्‍तीवान सय. मी तेना चपलं ऊचलाना बी लायक ना सय. 8 मी तुमना बापतीस्मा पानीघाई करना, पन तो तुमना बापतीस्मा पवीत्र आत्माघाई करी.
देवना पोर्‍या येसुना बापतीस्मा
(मतय ३:१३-१७; लुक ३:२१-२२)
9 तवं येसु गालील जील्‍लाना नासरेथ गावथीन वना आनं यार्दन नदीमं योहानना हातघाई बापतीस्मा लीना. 10 आनं पानी मयथीन वर नींगीसनं ल‍गेज तो दखना का, आकास हुगडी गया आनं देवना आत्मा खबुदरनी सारका तेवर उतरना. 11 तवं आकास मयथीन आशा आवाज वना का, तु मना आवडता पोर्‍या सय आनं तुना साठी माला आनंद वाटय.
सैतान येसुला पापमं फसाडानी कोशीत करय
(मतय ४:१-११; लुक ४:१-१३)
12 तवं ल‍गेज देवना आत्मा येसुला सुना रानमं ली गया. 13 त‍ई येसु चाळीस दीवस परन रहनाल आनं सैतान तेला पापमं फसाडानी कोशीत करी रहनाल. तो जंगलनं जनावरंसनी संगं रहना आनं त‍ई देवनं दुतं तेनी सेवा करनत.
येसु तेनी सेवानी सुरुवात करय
(मतय ४:१२-१७; लुक ४:१४-१५)
14 जवं बापतीस्मा करनार योहान धराई गया, तवं देवनी सुवार्ता गाजाडत गाजाडत येसु गालील जील्लामं वना. 15 आनं तो सांगु लागना का, टाईम पुरा व्हई गया सय आनं लवकर देव लोकंसना जीवनमं राज्य करी. तेमन तुमं पस्तावा करा आनं देवन्‍या चांगल्या गोस्टीसवर वीस्वास ठेवा.
16 मंग जवं येसु गालील समुद्रनी काटला चाली रहनाल, तवं शीमोन पेत्र आनं तेना भाऊ आंद्रीयाला समुद्रमं जाळा टाकताना तो दखना. कजं का ते मासं मारनारं व्हतलत. 17 तो तेसला सांगना, मनी संगं या, मी तुमला लोकंसला मनी मांगं लयाना शीकाडसु. 18 तवं ते ल‍गेज जाळा सोडीसनं येसुनी मांगं गयत.
19 मंग तो तथाईन थोडा पुडं जाईसनं जबदीना दोन पोरे याकोब आनं योहानला डुंगामं जाळा सुवार्ताना दखना. 20 आनं ल‍गेज तेसला बलावना. मंग ते तेसना बाप जबदीला मजुरंसपन सोडीसनं येसुनी संगं गयत.
येसु येक भुत लागेल मानुसला चांगला करय
(लुक ४:३१-३७)
21 मंग येसु आनं तेनं चेलं कफरनाहुम शेहेरमं गयत. आनं तो शब्‍बाथना रोजला ल‍गेज प्राथना घरमं जाईसनं देवना वचन शीकाडाला लागना. 22 तो जा शीकाडना, ता आयकीसनं लोकंसला नवल वाटना. कजं का यहुदीसनं नीयम शीकाडनारंसनी सारका ना, पन जेला आधीकार भेटना सय, आशा तो तेसला शीकाडना.
23 तवं तो प्राथना घरमं येक भुत लागेल मानुस व्हताल. 24 तो आराळ्या दीसनं सांगना, हे नासरेथना येसु, तुला आम प‍ईन काय पायजे? तु आमना नास कराला वना सय का? तु कोन सय, हाई मला मायती सय. तु देवना पवीत्र जन सय! 25 येसु तेला डोकाडीसनं सांगना, ऊगाज रह, आनं हाऊ मानुस मयथीन नींगी जा. 26 तवं भुतना आत्मा तो मानुसला पीळी टाकना, आनं पक्‍का आराळ्या दीसनं ते मयथीन नींगी गया. 27 तवं आखंसला नवल वाटना, आनं ते येकमेकंसला वीचाराला लागनत का, हाऊ काय सय बवा? हाऊ तं येक नवीन शीक्षन सांगय! हाऊ मानुस भुतना आत्मासला बी आधीकारथीन आज्ञा करय, आनं ते तेना आयकत. 28 मंग ल‍गेज येसुना नाव आनं तेना कामनी बद्दल आखा गालील जील्‍लाना गावंसमं पसरी गया.
येसु पेत्रनी सासुला आनं बरज लोकंसला बरा करय
(मतय ८:१४-१७; लुक ४:३८-४१)
29 आनं ल‍गेज येसु प्राथना घर मयथीन नींगीसनं याकोब आनं योहाननी संगं शीमोन आनं आंद्रीयाना घर गया. 30 तवं शीमोननी सासु तावमं पडेल व्हतील. आनं ते ल‍गेज येसुला तीनी बद्दल सांगनत. 31 मंग तो जवळ गया आनं तीना हात धरीसनं तीला उठाडना. तवं तीना ताव ल‍गेज ऊतरी गया. आनं ती तेसला जेवाडाला लागनी.
32 तोज रोज संध्याकाळला जवं सुर्य बुडना, तवं लोकं बरज आजारीसला आनं भुत लागेल लोकंसला येसुपन लयनत. 33 आनं गावनं बरज लोकं दारपन गोळा व्हयनत. 34 तवं नारा नारा आजारमं पडेल बरज लोकंसला तो बरा करना आनं बरज भुतंसला काडना. मंग 'हाऊज देवना धाडेल राजा ख्रीस्‍त सय' मनीसनं ते भुतंसला मायती व्हताल. तेमन येसु तेसला बोलु दीना ना.
येसुनी प्राथना आनं सेवा
(लुक ४:४२-४४)
35 मंग येसु मोठी पाहाटला उठीसनं गावनी बाहेर येक सुमसाम जागामं गया आनं तई प्राथना करना. 36 तवं शीमोन आनं तेनं सोपती तेला दखाला गयत. 37 जवं येसु तेसला सापडना, तवं ते तेला सांगनत, आखं लोकं तुला दखतं फीरी रहनं सत. 38 तो सांगना, चाला, आपुन शेजारनं गावंसमं जावुत. आनं तई बी मी देवना वचन सांगसु. कजं का तोज कामनी करता मी जगमं ईयेल सय. 39 तशाज तो आखं गालील जील्लामं जाईसनं प्राथना घरंसमं देवना वचन सांगना आनं भुतं काडता फीरना.
येसु येक कोडी मानुसला चांगला करय
(मतय ८:१-४; लुक ५:१२-१६)
40 मंग येक कोडी मानुस येसुपन वना. आनं तेनी पुडं गुडगं टेकीसनं आनं रावन्‍या करीसनं सांगना, गुरुजी, माला चांगला कर. कजं का जर तुनी ईशा व्हई तं, तु माला चांगला करु शकशी. 41 तवं येसुला तेनी कीव वनी. आनं तो हात पुडं करीसनं तेला हात लावना आनं सांगना, मनी ईशा सय का, तु चांगला व्हई जा. 42 तवं तेना कोड ल‍गेज नींगी गया आनं तो चांगला व्हई गया. 43 मंग येसु तेला आशी आज्ञा दीसनं धाडना का, 44 दख, दुसरा कोनला हाई सांगु नोको. पन जाईसनं सोताला याजकला दखाड. आनं तुमना चांगला व्‍हवानी करता जा काही मोसा ठरायेल सय, ता लीसनं लोकंसनी समोर भेट चडाव. तवं ता दखीसनं तेसला मायती पडी का, तु बरा व्हई गया सय. 45 पन तो मानुस गया आनं गालील जील्‍लानं गावंसमं हाई गोस्टं सांगीसनं पसराय दीना. तेमन येसु गावमं मोकळा जावु शकना ना. आनं तो बाहेर सुमसाम जागामंज रहना. तरी बी लोकं चारीमेरथीन तेपन वनत.