28
येसु मरन मयथीन जीवता उठय
(मार्क १६:१-१०; लुक २४:१-१२; योहान २०:१-१०)
1 मंग शब्‍बाथना दीवस नींगी गया आनं आठोडाना पयला रोज मंजे रवीवारना रोज वना. तवं मोठी पाहाटला मगदंला गावनी मरीया आनं दुसरी मरीया येसुनी कबरपन गयात. 2 मंग लगेज तई मोठा भुकंपं व्हयना. कजं का परभुना येक दुत सोरगंथीन ऊतरीसनं ती कबरना तोंडा वयली दगडला येक बाजुला सरकाय दीना आनं तेवर तो बसना. 3 तेना रुप ईजनी सारका चमचम व्हताल आनं तेनं कपडं बरफं सारकं धवळंचप व्हतलत. 4 मंग ती कबरला राखनारं शीपाई तेला दखीसनं पक्‍का घाबरी गयत आनं थरथर कराला लागनत आनं मरेल सारकं खाल पडी गयत.
5 मंग तो देवदुत त्या बायासला सांगना, तुमं भीवु नोका. माला मायती सय का, कुरुस खांबावर ठोकेल येसुला तुमं दखी रहन्‍या सत. 6 तो आठी ना सय, पन जशा तो सांगेल व्हताल, तशा तो मरन मयथीन परत उठी गया सय. तुमं या आनं जई परभु येसुना शरीरला ठेयेल व्हतलत ती जागा दखा. 7 आनं लवकर जाईसनं तेनं चेलंसला सांगा का, तो मरेल मयथीन उठना सय. आनं दखा, तो तुमनी पयलंग गालील जील्लामं जाई रहना सय. तई तुमं तेला दखशात. दखा, मी तुमला हाई सांगी दीना सय.
8 मंग त्‍या बाया घाबरी गयात आनं पक्‍क्या आनंद करीसनं ती कबर मईन लवकर बाहेर नींगन्‍यात. आनं येसुनं चेलंसला हाई गोस्टं सांगाला पळत ग‍यात. 9 मंग त्या जाताना लगेज येसु तीसला भेटीसनं सांगना, सलाम. मंग त्या तेनी शेजार जाईसनं तेना पाय पडन्यात आनं नमन करन्यात. 10 तवं येसु तीसला सांगना, तुमं भीवु नोका आनं जाईसनं मनं भाऊसंसला हाई सांगा. येनी करता का, ते गालील जील्लामं जावाला पायजे आनं तई मी तेसला भेटसु.
पुढारी लोकं खोटा सांगाला शीपाईसला पयसा देत
11 मंग त्या बाया नींगी जाताना ते कबरला राखनारं शीपाईस मयथीन काही लोकं मुख्य याजकंस कडं गयत. आनं घडेल आखी गोस्टं ते तेसला सांगनत. 12 तवं ते मुख्य याजक लोकं आनं यहुदीसनं पुढारी लोकं मीळीसनं बेत करनत आनं ते शीपाईसला जास्त पयसा दीनत. 13 आनं तेसला सांगनत का, तुमं आशी गोस्टं पसराय द्या का, आमं रातला नीजेल व्हतलत तवं येसुनं चेलं ईसनं तेना शरीरला चोरी ली गयत. 14 आनं जर पीलातला येनी बद्दल मायती पडना तं, आमं तेला समाळी लीसुत आनं तुमला दंड पईन वाचाडी लीसुत. 15 मंग ते शीपाई पयसा लीनत आनं जाईसनं जशे ते मुख्य याजक लोकं आनं यहुदीसनं पुढारी लोकं सांगनंलत, तसेज पसराय दीनत. तेमन हाई गोस्टं यहुदी लोकंसमं पसरी गयी आनं आज पावत लोकं तशेज मानत.
येसु तेनं चेलंसला मोठी आज्ञा देय
(मार्क १६:१४-१८; लुक २४:३६-४९; योहान २०:१९-२३; प्रेशीत १:६-८)
16 नंतर त्या बायासना आयकीसनं येसुनं आकरा चेलं गालील जील्लाना येक डोंगरवर गयत. कजं का तई जावाला येसु तेसला सांगेल व्हताल. 17 आनं तई ते येसुला दखीसनं तेला नमन करनत. तरी बी काही लोकंसला शंका वाटना. 18 तवं येसु जवळ ईसनं तेसला सांगना, सोरगंमं आनं धरतीमं आखं लोकंसवर आनं आख्या गोस्टीसवर आधीकार देवबाप पईन माला देवामं ईयेल सय. 19 तेमन तुमं मना आधीकार लीसनं जाज्या आनं जगना आखं लोकंसला मना वचन सांगीसनं मावर वीस्वास ठेवनारं बनाडा. आनं तेसला देवबापना नावमं आनं पोर्‍याना मंजे मना नावमं आनं पवीत्र आत्माना नावमं बापतीस्मा द्या. 20 आनं जा काही बी मी तुमला आज्ञा दीसनं सांगेल सय, ता आखं पाळानी करता तेसला शीकाडा. आनं दखा, जगना शेवट परन मी कायम तुमनी संगं सय.