27
येसुला पीलातनी समोर ली जात
(मार्क १५:१; लुक २३:१-५; योहान १८:२८-३२)
1 मंग जवं पाहाट व्हयनी, तवं मुख्य याजक लोकं आनं यहुदी लोकंसना पुढारी लोकं येसुला जीवता मारानी करता तेना वीरुद बेत करनत. 2 आनं ते तेला बांधीसनं ली गयत आनं गवर्नर पीलातना हातमं दीनत.
ईस्कंरीयोत यहुदाना मरन
(प्रेशीत १:१८-१९)
3 मंग येसुला धरी देनार ईस्कंरीयोत यहुदाला मायती पडना का, येसुला मरन दंड देवामं वना. तवं तेला पक्का पस्तावा वना. तेमन तेला भेटेल चांदीना तीस शीक्का लीसनं तो मुख्य याजक लोकं आनं यहुदीसनं पुढारी लोकंस कडं परत गया. 4 आनं तेसला सांगना, मी बीगर दोसना मानुसला धरी दीसनं पाप करेल सय. तवं ते सांगनत, तेमं आमला काही लेवदेव ना सय. तो तुना काम सय, तेमन तु समज. 5 मंग यहुदा ते चांदीना शीक्कासला मंदीरमंज फेकीसनं नींगी गया✞ आनं फासी लीसनं मरी गया. 6 मंग मुख्य याजक लोकं ते चांदीना शीक्कासला लीसनं सांगनत, ये शीक्कासला मंदीरना दानमं टाकाना चांगला ना सय, कजं का येखादाना जीव लेवानी करता ये वापरामं ईयेल सय. 7 मंग ते आपसमं वीचार करनत आनं ते शीक्कासघाई कुमार लोकंसनी येक जमीन ईकत लीनत. आनं बाहेर देशना कोनी बी यरुशलेममं ईसनं मरनत तं, तेसला बुजांनी करता ती जमीन वापराला नक्की करनत. 8 तेमन आज पावत ती जमीनला 'रंगतनी जमीन' सांगामं येय. 9 तवं देवना वचन सांगनार यीर्मया जी भवीस्यवानी सांगेल व्हताल, ती पुरी व्हयनी. ती आशी सय का,
✞"मंग तेना जीवनना कीम्मत मनीसनं ईस्रायेल लोकं तीस चांदीना शीक्का ठरावनत आनं ते शीक्का ते लीनत. 10 आनं परभु माला जशा आज्ञा देयेल व्हताल, तोज प्रमानं ते शीक्कासघाई ते येक जमीन ईकत लीनत. ती जमीनना नाव 'कुमार लोकंसनी जागा' आशी व्हतील"
पीलात येसुना वीचारपुस करय
(मार्क १५:२-५; लुक २३:३-५, ६३-७१; योहान १८:३३-३८)
11 मंग येसु पीलातनी पुडं हुबा व्हताल. तवं पीलात तेला वीचारना, तु खरज यहुदीसना राजा सय का? मंग येसु सांगना, तु जशा सांगय तशाज सय. 12 तवं मुख्य याजक लोकं आनं यहुदीसनं पुढारी लोकं येसुवर बर्याज गोस्टीसना आरोप लावनत. पन येसु तेसला काहीज उतर दीना ना. 13 तेमन पीलात तेला सांगना, दख, ये लोकं कीतल्या गोस्टीसना आरोप तुवर लावत, ता तु आयकय ना का? 14 पन येसु तेला येक बी शब्द कही सांगना ना. ये वयथीन पीलातला पक्का नवल वाटना.
येसुला मरनना दंड देवामं येय
(मार्क १५:६-१५; लुक २३:१३-२५; योहान १८:३९-१९:१६)
15 मंग तवं आशी रीत व्हतील का, दर वरीस वल्हांडनना सनना दीवसला जो कैदीला लोकं पीलातपन मांगतत, तेला तो सोडी दीता. 16 तवं बरब्बा नावना येक मोठा कैदी जेलमं कोंडायेल व्हताल. 17 मंग जवं लोकं गोळा व्हयनत, तवं पीलात तेसला वीचारना, तुमनी ईशा काय सय? तुमना साठी मी कोनला सोडसु, बरब्बाला का जेला ख्रीस्त सांगत तो येसुला? 18 तवं पीलातला मायती व्हताल का, लोकं येसुला आडावपन करीसनं धरी दीनलंत, तेमन तो तशा वीचारना.
19 मंग जवं पीलात न्याय करानी गादीवर बसेल व्हताल, तवं तेनी बायको तेनी कडं नीरोप धाडीसनं सांगनी का, तो नीतीवान मानुसला काही करु नोको. कजं का आज सपनमं तेनी मुळे मी पक्का दुख भोगनी सय.
20 मंग मुख्य याजक लोकं आनं यहुदीसनं पुढारी लोकं दुसरंसला शीकाडी दीनत का, ते बरब्बाला सोडानी करता सांगाला पायजे आनं येसुला मरन दंडना मांगनी कराला पायजे. 21 तवं आखु पीलात तेसला वीचारना, ये दोनंस मयथीन मी कोनला तुमना साठी सोडाला पायजे आशी तुमनी ईशा सय? मंग लोकं सांगनत, बरब्बाला. 22 पीलात परत वीचारना, मंग जेला ख्रीस्त सांगत तो येसुला मी काय करु? आखं जन आराळ्या दीसनं सांगनत, तेला कुरुस खांबावर ठोका. 23 पन तो वीचारना, कजं? तो काय गुनाह करना सय? तवं ते आजुन पक्कं जोरमं आराळ्या दीसनं सांगनत, तेला कुरुस खांबावर ठोका. 24 मंग पीलात दखना का, तेना काहीज चालय ना पन जास्त गरबड व्हई रहना सय. तेमन तो पानी लीना आनं लोकंसनी दखत हात धईसनं सांगना, हाऊ नीतीवान मानुसना मरनमं मी दोसी ना सय. आनं हाई तुमनी जवाबदारी सय. 25 तवं आखं लोकं सांगनत, येना मरनना दोस आमवर आनं आमनं पोरेसोरेसवर येवु द्या. 26 मंग हाई आयकीसनं पीलात बरब्बाला सोडी दीना आनं येसुला काकडाघाई हानीसनं कुरुस खांबावर ठोकानी करता तेसना हातमं सोपी दीना.
सीपाई येसुनी थट्टा करत
(मार्क ७:२७-३१; योहान १९:२-३)
27 मंग पीलातनं सीपाई तेना राजवाडामं येसुला ली गयत. आनं ते आखं सीपाईसनी टोळीला तई गोळा करनत. 28 मंग ते येसुनं सोतानं कपडं काडीसनं तेला राजा मनीसनं थट्टा करानी करता तेना आंगवर जामळा रंगना कपडा घालनत. 29 आनं काटाना मुगुट गुफीसनं तेना डोकामं घालनत आनं तेना जेवना हातमं येक काठी दीनत. आनं तेनी थट्टा करीसनं ते ढोंगं पडनत आनं तेला नमन करनत. आनं सांगाला लागनत का, हे यहुदीसना राजा, तुनी जय जयकार सय. 30 मंग ते तेवर थुकनत आनं ती काठी लीसनं तेना डोकावर हानाला लागनत. 31 आशे तेनी थट्टा करानी नंतर तेना आंग वयथीन तो जामळा रंगना कपडा काडीसनं तेनं सोतानं कपडं घालनत. आनं कुरुस खांबावर ठोकानी करता ते तेला बाहेर ली गयत.
येसुला कुरुस खांबावर ठोकत
(मार्क १५:२१-३२; लुक २३:२६-४३; योहान १९:१७-२७)
32 मंग जवं ते जाई रनलत, तवं ✞कुरेन शेहेरना शीमोन नावना येक मानुसला रस्तावर दखनत. तवं ते तेला बळजुबरी येसुना कुरुस खांबा ऊचलाला लावनत. 33 मंग ते गुलगुथा नावनी येक जागामं जाई लागनत. ती गुलगुथा नावना आर्थ मंजे ‘कवटीनी जागा’ आशी सय. 34 तवं ते येसुला ✞द्राक्षसना रसमं पीत्त नावनी येक कडु वस्तु टाकीसनं पेवाला दीनत. पन येसु चाखीसनं दखना आनं पीना ना. 35 तवं ते शीपाई तेला कुरुस खांबावर ठोकनत. आनं तेनं कपडंस मयथीन कोन कोनता कपडा लेवाला पायजे येनी करता तेवर चीठ्या टाकीसनं वाटी लीनत✞. 36 नंतर तई ते तेला राखी बसनत. 37 आनं येसुवर लोकं जा दोस लावनंलत, ता येक पाटीमं लीखीसनं ते तेना डोकानी वर लाई दीनत. तई आशा लीखेल व्हताल का, ‘हाऊ यहुदीसना राजा येसु सय’. 38 मंग ते तेनी संगं दोन लुटारुसला बी कुरुस खांबावर ठोकनत. येकला जेवनी कडं आनं दुसराला डावी कडं ठोकनत. 39 मंग शेजारथीन जानारं मान हालाडीसनं येसुनी थट्टा करनत. 40 ते थट्टा करीसनं सांगनत का, आरे मंदीर मोडीसनं तीन दीवसमं बांधनार, तु सोताला वाचाड. जर तु खरज देवना पोर्या सय तं, कुरुस खांबा वयथीन खाल ये. 41 तशेज मुख्य याजक लोकं आनं नीयम शीकाडनारं आनं पुढारी लोकं बी तेनी थट्टा करनत. 42 ते थट्टा करीसनं येकमेकंसला सांगनत का, तो दुसरंसला वाचाडना, पन तेला सोताला वाचाडता येय ना. जर हाऊ खरज ईस्रायेलना राजा सय तं, आतं कुरुस खांबा वयथीन खाल येवाला पायजे. मंजे ता दखीसनं आपुन तेवर वीस्वास ठेवसुत. 43 आनं जर हाऊ देववर वीस्वास ठेवय आनं तेना आवडता सय तं, देव आतंज येला वाचाडाला पायजे. कजं का हाऊ सांगता का, मी देवना पोर्या सय. 44 मंग जे लुटारुसला येसुनी संगं कुरुस खांबावर ठोकामं ईयेल व्हताल, ते बी तेनी बद्दल तशाज सांगीसनं तेना आपमान करनत.
येसुना मरन
(मार्क १५:३३-४१; लुक २३:४४-४९; योहान १९:२८-३०)
45 मंग दुफारना बारा वाजता पईन तीन वाजा परन आखा देशमं आंधारा पडी गया. 46 आनं जवळ जवळ तीन वाजता येसु जोरमं आराळ्या दीसनं बोलना, येलोई, येलोई, लमा सबकतनी? मंजे,
✞"हे मना देव, हे मना देव, तु मला कजं सोडी दीना?"
47 तवं शेजार हुबं रहनारंस मयथीन कीतलं जन हाई आयकीसनं सांगनत, दखा, तो येलीयाला मदत करानी करता बलाय रहना सय. 48 मंग तेस मयथीन येक जन लगेज पळत जाईसनं येक स्पंज लीना. आनं तो स्पंजला आंबट रसमं बुडाईसनं येक काठीना तोंडावर ठेईसनं तेला पेवाला दीना✞. 49 आनं दुसरं लोकं तेला सांगनत का, थांब, येलीया ईसनं येला वाचाडय का ना, हाई आपुन दखुत. 50 मंग येसु आखु जोरमं आराळ्या दीसनं जीव सोडी दीना. 51 तवं मंदीरना पवीत्र जागाना ✞पडदा वरथीन तं खाल परन फाटीसनं दोन भाग व्हई गया. आनं जमीन हालाला लागनी आनं मोठल्या मोठल्या दगडी फुटन्यात. 52 मंग कबरी हुगड्या व्हई गयात आनं जे देवनं लोकं मरी जायेल व्हतलत, तेस मयथीन बरज जनंसना शरीर उठनत. 53 आनं येसु मरन मयथीन जीवतं व्हवानी नंतर ते कबरं मयथीन बाहेर नींगीसनं ✞पवीत्र शेहेर यरुशलेममं गयत आनं बरज लोकंसला दखायनत. 54 मंग तो भुकंपं आनं घडेल आख्या गोस्टीसला दखीसनं शीपाईसना आधीकारी आनं येसुला राखनारं शीपाई पक्का घाबरी गयत. आनं ते सांगनत का, खरज हाऊ मानुस देवना पोर्या व्हताल.
55 मंग तई बर्याज बाया दुरथीन हाई दखी रनल्यात. त्या गालील जील्ला मयथीन येसुनी सेवा करत करत तेनी मांगं तई ईयेल व्हतल्यात. 56 तीसमं मगदंला गावनी मरीया व्हतील आनं याकोब आनं योसेनी माय मरीया व्हतील आनं जबदीनी बायको बी व्हतील.
येसुला कबरमं ठेवत
(मार्क १५:४२-४७; लुक २३:५०-५६; योहान १९:३८-४२)
57 मंग जवं संध्याकाळ व्हयनी, तवं योसेफ नावना येक मानुस तई वना. तो आरीमथाई शेहेरना व्हताल आनं पक्का श्रीमंत व्हताल. आनं तो बी येसु वर वीस्वास ठेवनारंस मयथीन येक व्हताल. 58 मंग तो पीलातपन गया आनं कबरमं ठेवानी करता येसुना शरीरला मांगना. तवं पीलात तेला येसुना शरीर देवाला आज्ञा दीना. 59 मंग योसेफ तो शरीरला लीसनं येक तागाना चांगला कपडामं गुंडाळना. 60 आनं तेनी सोतानी करता खडकमं खंदेल येक नवीन कबरमं तेला ठेवना✞. आनं कबरना तोंडावर येक मोठी दगड गचालीसनं ठेई दीना आनं तथाईन नींगी गया. 61 मंग मगदंला गावनी मरीया आनं दुसरी मरीया तई कबरनी समोरज बसेल व्हतल्यात.
येसुनी कबरपन शीपाईसला ठेवत
62 मंग तेनी दुसरा रोजला शब्बाथना दीवस व्हताल. आनं तो रोजला मुख्य याजक लोकं आनं परुशी लोकं पीलात कडं गोळा व्हईनत. 63 आनं तेला सांगनत, महाराज, जवं तो लबाड मानुस जीवता व्हताल, तवं तो सांगेल व्हताल का, मी मरीसनं तीन दीवसनी नंतर जीवता व्हई जासु. हाई आमला याद सय. 64 तेमन तीसरा दीवस परन कबरला कडक रीतथीन राखानी करता शीपाईसला तई ठेव. नातं कदाचीत तेनं चेलं ईसनं तेना शरीरला चोरी ली जाईत आनं लोकंसला सांगीत का, तो मरेल मयथीन जीवता उठना सय. तवं पयला लबाड पेक्षा शेवटना लबाड जास्त वाईट व्हई जाई. 65 मंग पीलात तेसला सांगना, तुमं शीपाईसला ली जाज्या आनं जशा तुमला पटय तशा ती कबरना राखाना काम करा. 66 मंग ते तेसनी संगं शीपाईसला ली गयत आनं कबरना तोंडा वयली दगडवर शीक्का मारी दीनत. येनी करता का, जर कोनी ती दगडला सरकाई दीनत तं मायती पडी जाई. आनं राखानी करता शीपाईसला बी ते तई ठेवनत.