26
यहुदीसनं पुढारी लोकं येसुला मारानी बद्दल बेत करत
(मार्क १४:१-२; लुक २२:१-२; योहान ११:४५-५३)
1 मंग येसु तेना शीक्षन शेवट करीसनं तेना चेलंसला सांगना, 2 तुमला मायती सय का, दोन दीवसनी नंतर वल्‍हांडनना सन ई रहना सय. आनं मानुसना पोर्‍याला मंजे माला कुरुस खांबावर ठोकानी करता धरी देईत.
3 तवं कयफा नावना मोठा याजकना घरमं मुख्य याजक लोकं आनं यहुदी लोकंसना पुढारी लोकं येकजागं गोळा व्हयनत. 4 आनं येसुला गच्चुप धरीसनं जीवता माराना बेत करनत. 5 पन हाई सनना दीवसमं नोको कराला पायजे मनीसनं ते वीचार करनत. कजं का तेसला वाटनाल का, येनी मुळे कदाचीत लोकंसमं दंगा व्हई जाई.
येक बाई येसुना डोकावर सुगंधी तेल टाकीसनं मान देय
(मार्क १४:३-९; योहान १२:१-८)
6 मंग येक दीवस येसु बेथानी गावमं शीमोन नावना येक मानुस जेला पयलंग कोडीना आजार व्हताल, तेना घरमं व्हताल. 7 आनं जवं येसु जेवन करी रहनाल, तवं कोनी येक बाई येक आलाबा‍स्‍त्र बाटलीमं तेल लीसनं येसु कडं वनी. ता तेल पक्‍का सुगंधी आनं मागायना व्हताल. तवं ती बाई येसुला मान देवानी करता तेना डोकावर ता तेल वतनी. 8 हाई दखीसनं तेनं चेलं राग करनत. आनं ते येकमेकंसला सांगनत, ती कजं हाई सुगंधी तेलला आशा नास करनी? 9 कजं का हाऊ सुगंधी तेल जास्त कीमतमं ईकीसनं तो पयसा गरीबंसला देवामं ईथा. 10 पन हाई दखीसनं येसु तेसला सांगना, ता जावु द्या. आनं तीला तुमं कजं त्रास देत? ती तं मना साठी येक चांगला काम करनी सय. 11 कजं का गरीब लोकं कायम तुमनी संगं रहीत आनं तुमं कवं बी तेसला मदत करु शकसात, पन मी तुमनी संगं कायम रवावु ना. 12 आनं ती सुगंधी तेल मना डोकावर वतीसनं मना शरीरला कबरमं ठेवानी आगुदारज तयार करनी. 13 आनं मी तुमला खरज सांगय का, आखा जगमं जई जई सुवार्ता सांगामं येई, तई तई तीला याद करानी करता, ती जा करेल सय ता सांगामं येई.
यहुदा येसुनी संगं वीस्वास घात करय
(मार्क १४:१०-११; लुक २२:३-६)
14 मंग येसुनं बारा चेलंस मयथीन यहुदा ईस्कंरीयोत नावना येक जन मुख्य याजक लोकंस कडं गया. 15 आनं तेसला वीचारना, मी येसुला धरीसनं तुमना हातमं दीसु तं, तुमं माला काय दीशात? मंग ते तेला चांदीना तीस शीक्‍का दीनत. 16 आनं तवं प‍ईन यहुदा ईस्कंरीयोत येसुला धरी देवाना येक टाईम दखु लागनाल.
वल्‍हांडनना सनना जेवननी तयारी
(मार्क १४:१२-१७; लुक २२:७-१४)
17 मंग बीगर खमीरनी भाकरना सनना पईला रोज वना. तवं येसुनं चेलं तेनी कडं ईसनं तेला वीचारनत, आपला साठी वल्‍हांडनना सनना जेवन कई जाईसनं आमं तयारी कराला पायजे आशी तुनी ईशा सय? 18 मंग तो तेसला सांगना का, तुमं यरुशलेम शेहेरमं जा. त‍ई मना वळखना येक मानुस सय. मंग तुमं जाईसनं तेला सांगा का, गुरुजी सांगय, मना टाईम शेजार ई लागना सय. आनं मी मनं चेलंसनी संगं वल्‍हांडनना सनना जेवन तुना घरमं करसु. 19 मंग येसुना सांगेल प्रमानं ते चेलं गयत आनं वल्‍हांडनना सनना जेवननी तयारी करनत.
वीस्वास घात करनारनी बद्दल येसु सांगय
(मार्क १४:१७-२१; लुक २२:२१-२३; योहान १३:२१-३०)
20 मंग जवं संध्‍याकाळ व्हयनी, तवं येसु बारा चेलंसनी संगं जेवाला बसना. 21 आनं ते जेवन करताना तो सांगना, मी तुमला खरज सांगय का, तुम मयथीन येक जन माला धरी देई. 22 मंग ते पक्‍का दुखी व्हईसनं प्रतेक जन येक येक करीसनं तेला वीचाराला लागनत, गुरुजी तो मी सय का? 23 मंग येसु सांगना, जो मनी संगं आतं ताटमं भाकर बुडाई रहना सय, तोज माला धरी देई. 24 आनं हाई खरज सय का, जशा मानुसना पोर्‍यानी बद्दल मंजे मनी बद्दल देवना वचनमं लीखेल सय, तशाज मी मरसु. पन जो माला धरी देई, तो मानुसनी पक्‍की हाल व्हई. तो मानुसना जल्म ना व्हता तं, तेना साठी चांगला रहता. 25 मंग यहुदा ईस्कंरीयोत जो तेला धरी देनार व्हताल, तो बी तेला वीचारना, गुरुजी, तो मी सय का? येसु तेला सांगना, तु जा सांगना, हं, तुज सय.
येसु तेनं चेलंसनी संगं शेवटना जेवन करय
(मार्क १४:२२-२६; लुक २२:१५-२०; १ करींथ ११:२३-२५)
26 मंग जवं ते जेवन करी रनलत, तवं येसु भाकर लीना आनं देवना ऊपकार मानीसनं ती मोडना. आनं तेसला दीसनं तो सांगना, हाई ल्‍या आनं खा. हाई मना शरीर सारका सय. 27 तेनी नंतर तो द्राक्षरसनी वाटी लीना आनं देवना ऊपकार मानीसनं तेसला दीना आनं सांगना, तुमं आखं जन ये मयथीन प्या. 28 हाई द्राक्षसना रस मना रंगत सारका सय, जो वती देवामं ई रहना सय. आनं येनी द्वारा देव बरज लोकंसला तेसना पाप पईन सुटका देई. आनं मना मरनघाई देव बरज लोकंसनी संगं येक नवीन संमंध जोडी. 29 मी तुमला खरज सांगय का, जो परन मना देवबापना राज्‍यमं मी तुमनी संगं नवीन द्राक्षसना रस पेवावु ना, तो परन मी आजुन क‍ई बी द्राक्षसना रस पेवावुज ना.
30 मंग जेवननी नंतर ते येक स्‍तुतीना गाना लावनत आनं जैतुनना डोंगर कडं नींगी गयत.
पेत्र तेला नाकारी मनीसनं येसु भवीस्य सांगय
(मार्क १४:२७-३१; लुक २२:३१-३४; योहान १३:३६-३८)
31 मंग येसु तेनं चेलंसला सांगना, मना जो हाल व्हई, तो दखीसनं आज रातला तुमं आखं जन मावर वीस्वासमं कमी व्हई जाशात. कजं का देवना वचनमं आशा लीखेल सय का,
"मी मेंडरक्‍याला मारसु आनं कळपना दानाफान व्हई जाई."
32 पन जवं मी मरन मयथीन परत उठसु, तवं तुमनी आगुदार गालील जील्लामं नींगी जासु.
33 तवं पेत्र तेला सांगना, जर आखं जन तुवर वीस्वासमं कमी पडी जाईत, तरी बी मी कमी पडावु ना. 34 मंग येसु तेला सांगना, मी तुला खरज सांगय का, आज रातला कोमडा कोकावानी आगुदार तु माला वळखय मनीसनं तीन दाउ नाकारशी. 35 पन पेत्र सांगना, जर तुनी संगं माला मरना पडी, तरी बी मी तुला नाकारावु ना. मंग आखं चेलं तशेज सांगनत.
येसु गेथशेमाने नावना बागमं प्राथना करय
(मार्क १४:३२-४२; लुक २२:३९-४६)
36 नंतर येसु आनं तेनं चेलं गेथशेमाने नावना येक बागमं वनत. तवं तो तेनं चेलंसला सांगना, पोरेसवन, मी थोडासा पुडं जाईसनं प्राथना करय ताव तुमं आठी बसा. 37 मंग तो पेत्र आनं जबदीनं दोन पोरेसला तेनी संगं लीना. आनं तेवर जो दुख ये‍नार सय येनी बद्दल तो पक्‍का दुखी व्हईसनं तेना जीव काळावाळा करला लागना. 38 आनं तो तेसला सांगना, मना जीव मरानी जशा दुखी व्हई रहना सय. तुमं आठी रहीसनं मनी संगं जागं रहज्या.
39 मंग तो जरासा पुडं जाईसनं सोता जमीनवर ऊबडं पडना. आनं तो आशी प्राथना करना का, हे मना देवबाप, व्हई शकी तं हाई दुखना समय मा वयथीन टळी जावु दे. पन मनी ईशा प्रमानं नोको, पन तुनी ईशा प्रमानं व्‍हवु दे.
40 मंग येसु परत ते तीन चेलंस कडं ईसनं दखना का, ते नीजी गयं सत. तवं तो पेत्रला सांगना, काय, घटका भर बी तुमं मनी संगं जागा रव्हु शकत ना का? 41 जवं तुमना जीवनमं परीक्षा येई, तवं तुमं पडी नोको जावाला पायजे मनीसनं जागं रहज्या आनं प्राथना करज्या. तुमना मन तं जागं रव्हाला सांगय, पन तुमना शरीर कमजोर सय.
42 मंग येसु परत गया आनं प्राथना करीसनं सांगना का, हे मना देवबाप, जर हाई दुख माला भोगानाज सय तं, तुनी ईशा प्रमानं माला व्‍हवु दे.
43 नंतर येसु परत ईसनं दखना का, ते आजुन नीजी गयं सत. कजं का तेसनं डोळं पक्‍कं लागी रनलत. 44 मंग तो तेसला सोडीसनं परत गया आनं तीसरा दाउ बी तशीज प्राथना करला लागना.
45 मंग तेनं चेलंस कडं परत ईसनं तो तेसला सांगना, तुमं आतं परन नीजेलज सत का? दखा, मानुसना पोर्‍याला मंजे माला धरीसनं पापी मानसंसना हातमं देवाना टाईम शेजार ई लागना सय. 46 उठा, आपुन तेसला भेटाला जावुत. दखा, माला धरी देनार शेजार ई लागना सय.
ईस्कंरीयोत यहुदा येसुला धरी देय
(मार्क १४:४३-५०; लुक २२:४७-५३; योहान १८:३-१२)
47 जवं येसु बोली रहनाल, तीतलामं बारा चेलंस मयथीन येक जन ईस्कंरीयोत यहुदा लगेज तई वना. आनं तेनी संगं लोकंसनी येक मोठी टोळी वनी. ते तलवार आनं काठ्या लीसनं ईयेल व्हतलत. ती मोठी टोळीला मुख्य याजक लोकं आनं यहुदीसनं पुढारी लोकं धाडेल व्हतलत. 48 आनं येसुला धराय देनार यहुदा ते लोकंसला आशी नीशानी सांगी ठेयेल व्हताल का, मी जेना मुक्‍का लीसु तोज तो मानुस सय. तुमं तेला धरा. 49 मंग लगेज तो येसुना जवळ गया आनं 'गुरुजी सलाम' आशा सांगीसनं तेना मुक्‍का लीना. 50 मंग येसु तेला सांगना, भाऊ, जो कामनी करता तु वना सय, तोज कर. तवं ते लोकं जवळ वनत आनं येसुवर हात टाकीसनं तेला धरनत. 51 तवं येसुनी संगं जे चेलं व्हतलत तेस मयथीन येक जन लगेज तलवार काडना आनं मोठा याजकना नौकरला मारी टाकानी करता तेवर वार करना, पन फक्‍त तेना येकंज कान कापु शकना. 52 तवं येसु तो चेलाला सांगना, तुनी तलवार परत तीनी जागामं ठेव. कजं का जे लोकं तलवार वापरत, ते आखं तलवार घाईज मरी जाईत. 53 तुला काय वाटय, मी मना देवबापपन मदत मांगु शकावु ना का? मी जर मना देवबापपन मांगु तं, तो माला वाचाडानी करता हाजार हाजार देवदुतंसला धाडावु ना का? 54 पन जर मी तशा करय तं, देवना वचनमं जा लीखेल सय, ता कशाकाय पुरा व्हई? देवना वचनमं लीखेल सय का, मनी संगं आशा व्हवालाज पायजे.
55 मंग येसु ते लोकंसला सांगना, जशा येखादा चोरला धराला तलवार आनं काठ्या लीसनं जात, तशा तुमं माला धराला वनत का? मी तं दर रोज मंदीरमं तुमनी संगं बसीसनं शीकाडी रहनाल. तवं तुमं माला धरनत ना. 56 पन देवना वचन सांगनारं मनी बद्दल जा लीखेल सत, ता पुरा व्‍हवाला पायजे मनीसनं आशा व्हयना.
ईतलामं येसुनं आखं चेलं तेला सोडीसनं पळी गयत.
मोठा याजकनी समोर येसुला वीचारपुस करत
(मार्क १४:५३-६५; लुक २२:५४-५५, ६३-७१; योहान १८:१३-१४, १९-२४)
57 मंग जे लोकं येसुला धरनंलत, ते तेला मंदीरना मोठा याजक कयफाना घरमं ली गयत. तवं तई नीयम शीकाडनारं आनं यहुदीसनं पुढारी लोकं गोळा व्हयेल व्हतलत. 58 मंग पेत्र येसुनी मांगं मांगं दुरथीन चालता चालता मोठा याजकना आंगनमं जाई लागना. आनं येसुना शेवट काय व्हई, हाई दखानी करता तो मजार जाईसनं सीपाईसनी संगं बसना.
59 तवं मुख्य याजक लोकं आनं यहुदीसनं न्‍याय करनारं आखं लोकं येसुला जीवता मारानी करता तेना वीरुद खोटा पुरावा दखी रनलत. 60 आनं बरज लोकं खोटा पुरावा देवाला तयार व्हयनत, पन जीवता माराना सारका काही पुरावा तेसला भेटना ना. मंग शेवट दोन जन हुबं रहीसनं खोटा पुरावा दीसनं सांगनत का, 61 हाऊ मानुस आशा बोलताना आमं आयकनं सत का, देवना मंदीरला मोडीसनं तेला तीन दीवसमं मी बांधु शकय.
62 तवं मोठा याजक उठीसनं येसुला वीचारना, तु कजं काही उतर देय ना? ये तुना वीरुद जो पुरावा दी रहनं सत, तो काय सय? 63 तरी बी येसु काही उतर दीना ना आनं ऊगाज रहना. मंग ये वयथीन मोठा याजक तेला सांगना, मी जीवता देवनी शपथ लीसनं तुला वीचारय का, देवना पोर्‍या ख्रीस्‍त तु सय का ना हाई आमला सांग. 64 तवं येसु तेला सांगना, हं, तु जा सांगना, ता खरज सय. कजं का मानुसना पोर्‍या मंजे मी तोज सय. आनं आखु मी तुला सांगय का, येनारा दीवसमं तुमं मानुसना पोर्‍याला मंजे माला शक्‍तीवान देवना जेवनी कडं बसेल आनं आकासना ढगवर येताना दखशात. 65 तवं मोठा याजक तेना सोतानं कपडं फाडीसनं सांगना, हाऊ मानुस देवनी नींदा करी रहना सय. आपुनला आजुन पुरावासनी काय गरज सय? दखा, तुमं सोता हाई नींदा आयकनत. 66 तुमला कशा वाटय? तवं आखं जन सांगनत, हाऊ मानुस मरन दंडना लायक सय. 67 मंग काही जन येसुना तोंडवर थुकाला लागनत. आनं ते तेला बुक्‍याजघाई हाननत. आनं आखु काही तेला थप्पड मारीसनं सांगनत, 68 आरे ख्रीस्‍त, वळखीसनं सांग बरं, तुला कोन मारना?
पेत्र येसुला वळखय मनीसनं नाकारय
(मार्क १४:६६-७२; लुक २२:५६-६२; योहान १८:१५-१८, २५-२७)
69 मंग जवं पेत्र आंगनमं बसेल व्हताल, तवं येक काम करनार बाई तेनी कडं ईसनं तेला सांगनी, तु बी गालीलना येसुनी संगं व्हताल. 70 पन पेत्र आखंसनी समोर नाकारीसनं सांगना, तु काय सांगी रहनी सय, ता माला समजय बी ना. 71 मंग तो आंगननी बाहेर नींगी गया. तवं आजुन येक काम करनार बाई तेला दखीसनं शेजार हुबं रहनारंसला सांगनी का, हाऊ मानुस बी नासरेथना येसुनी संगं व्हताल. 72 पन पेत्र शपथ करीसनं परत नाकारी दीना आनं सांगना का, मी तो मानुसला वळखय बी ना.
73 मंग थोडा टाईमनी नंतर शेजार हुबं रहनारं पेत्रनी जवळ ईसनं तेला सांगनत का, खरज तु बी तेस मयला सय. कजं का तुना बोला वयथीनंज तु येक गलील भागना मानुस सय हाई मायती पडी जाय. 74 पन तो सोतावर श्राप दीसनं आनं शपथ लीसनं सांगाला लागना का, मी तो मानुसला वळखय ना. मंग लगेज कोमडा कोकायना. 75 तवं 'कोमडा कोकावानी आगुदार तु तीन दाउ माला नाकारशी' आशा जो येसु पेत्रला सांगेल व्हताल, तो तेला याद वना. मंग तो बाहेर जाईसनं पक्‍का दुखी व्हईसनं रडाला लागना.