25
दाहा कुवार्‍या पोरीसना दाखला
1 मंग येसु आखु तेसला सांगना, ते दीवसमं देव लोकंसवर राज्य कराना मंजे दहा कुवार्‍या पोरीसनी सारका व्हई. येकदाव त्या पोरी दीवा लीसनं नवरदेवला भेटाला गयात. 2 मंग त्या दहा पोरीस मयथीन पाच जनी बीगर बुधीन्‍या आनं पाच जनी समजदार व्हतल्यात. 3 मंग त्या बीगर बुधीन्‍या पोरी दीवा लीन्‍यात पन तीसनी संगं तेल लीन्‍यात ना. 4 पन त्या समजदार पोरी दीवामं तेल लीन्‍यात आनं तीसनी संगं डब्‍बंसमं तेल बी लीन्‍यात. 5 तवं नवरदेवला येवाला उशीर व्हयना. तेमन त्या आखीसला डुलक्या येवाला लागन्‍यात आनं त्या नीजी गयात.
6 मंग आरदी रातला कोनीतरी मोठा आवाज करीसनं सांगना का, दखा, नवरदेव ई लागना सय. बाहेर नींगीसनं तेला भेटा. 7 मंग त्या आख्या पोरी उठीसनं तीसना दीवा तयार कराला लागन्‍यात. 8 तवं त्या बीगर बुधीन्‍या पोरी समजदार पोरीसला सांगाला लागन्‍यात का, तुमना तेल मयथीन आमला थोडासा द्या, कजं का आमना दीवा वलाय रहनं सत. 9 पन त्या समजदार पोरी सांगन्‍यात, ना, कदाचीत हाऊ तेल आमला आनं तुमला पुरावु ना. तेमन तुमं दुकानदार कडं जाईसनं ईकत ली या. 10 मंग त्या बीगर बुधीन्‍या पोरी तेल लेवाला दुकानकडं गयात. पन तेवडामं नवरदेव ई लागना. आनं ज्या समजदार पोरी तयारीमं व्हतल्यात, त्या तेनी संगं मजार लगीनमं गयात. आनं दार लावामं वना. 11 नंतर त्या बीगर बुधीन्‍या पोरी वन्‍यात आनं दार ठोकीसनं सांगन्‍यात, परभु, परभु, आमनी करता दार हुगाड. 12 मंग तो तीसला सांगना, मी खरज सांगय का, मी तुमला वळखय ना.
13 मंग येसु आखु तेसला सांगना, तुमं जागं रहज्या. कजं का मी कवं परत ईसु तो दीवस आनं ती येळ तुमला मायती ना सय.
तीन नौकरंसना ऊदाहरन
(लुक १९:११-२७)
14 मंग येसु तेसला आजुन येक ऊदाहरन सांगना. मना परत येवाना मंजे दुसरा देशमं जानार येक मानुसनी सारका सय. मंग तो मानुस जावानी आगुदार तेनं नौकरंसला बलावना आनं धंदा करानी करता तेसना हातमं काही पयसा सोपी दीना. 15 जीतलं ते नौकरं कराना लायक सत, तो प्रमानं तो तेसला दीना. येकला तो पाच हाजार चांदीना शीक्‍का दीना. आनं दुसराला दोन हाजार चांदीना शीक्‍का दीना. आनं तीसराला येक हाजार चांदीना शीक्‍का दीना. मंग तो बाहेर देश नींगी गया.
16 मंग जेला पाच हाजार भेटनाल तो लगेज जाईसनं धंदा करना. आनं तो आजुन पाच हाजार कमावना. 17 तशाज जेला दोन हजार भेटनाल तो बी जाईसनं धंदा करना आनं आजुन दोन हाजार कमावना. 18 पन जेला येक हाजार भेटेल व्हताल तो जाईसनं खड्डा खंदना आनं त्या शीक्‍कासला तई दपाडी ठेवना.
19 मंग बराज दीवसनी नंतर तो मानुस परत वना आनं तेनं नौकरंसला बलाईसनं तेना देयेल पयसासना हीसोव लेवाला लागना. 20 तवं जेला पाच हजार भेटनाल तो आजुन पाच हजार शीक्‍का लीसनं वना आनं सांगना, मालक, तु माला पाच हाजार देयेल व्हताल. दख, ते वयथीन मी आजुन पाच हाजार कमावना सय. 21 मंग तो मालक तेला सांगना, शब्बास, तु पक्‍का चांगला नौकर सय आनं भरोसा ठेवाना लायक सय. तु धाकली गोस्टीमं वीस्वासु बनना, तेमन मी तुला आजुन जास्त गोस्टीसवर जवाबदारी दीसु. आतं तु ईसनं तुना मालकनी खुसीमं भागीदार बन.
22 मंग जेला दोन हाजार भेटेल व्हताल तो बी ईसनं सांगना, मालक, तु मला दोन हाजार देयेल व्हताल. आनं दख, ते वयथीन मी आजुन दोन हाजार कमावना सय. 23 तवं तेला बी तेना मालक सांगना, शब्बास, तु पक्‍का चांगला नौकर सय आनं भरोसा ठेवाना लायक सय. तु धाकली गोस्टीमं वीस्वासु बनना, तेमन मी तुला आजुन जास्त गोस्टीसवर जवाबदारी दीसु. आतं तु ईसनं तुना मालकनी खुसीमं भागीदार बन.
24 मंग जेला येक हाजार भेटेल व्हताल तो बी ईसनं सांगना, मालक, तुनी बद्दल माला मायती व्हताल. तु येक कडक मानुस सय. जई तु पयरय ना, तथाईन तु कापनी करय. आनं जई तु पसरय ना तथाईन तु पीक गोळा करय. 25 तेमन मी भीवाईसनं तुना हाजार शीक्‍कासला जमीनमं दपाडीसनं ठेयेल व्हताल. आतं दख, तुना देयेल शीक्‍का तुला भेटी गयात. 26 तवं तेना मालक तेला सांगना, आरे वाईट आनं आळसी नौकर, जई मी पयरय ना तथाईन मी कापनी करय. आनं जई मी पसरय ना तथाईन मी पीक गोळा करय, हाऊ तुला मायती व्हताल नं? 27 मंग तु मना शीक्‍कासला मुकंडदमंसना हातमं देवाला पायजे व्हताल. मंजे मी आठी येवानी नंतर मला तो पैसा व्याज समत परत भेटी जाता. 28 मंग तो मालक दुसरं नौकरंसला सांगना, ये पईन तो येक हजार शीक्‍का ली ल्या आनं जेपन दहा हजार सय तेला द्या. 29 कजं का जे लोकं वीस्वासु व्हईसनं मनी करता काम करीत, तेसला आजुन जास्त देवामं येई. आनं तेनी गरज पेक्षा तेपन जास्त व्हई जाई. पन जर कोनी वीस्वासु व्हईसनं मनी करता काम करावु ना तं, तेपन जा थोडासा सय, ता बी ते पईथीन लेवामं येई. 30 आनं हाऊ सुखाया नौकरला बाहेरना आंधारामं टाकी द्या. तई येला मोठा दंड भेटी आनं हाऊ कायम रडी आनं पक्‍का दुख मुळे दात खाई.
येसु शेवटना न्यायनी बद्दल सांगय
31 मंग येसु आखु तेसला सांगना, जवं मानुसना पोर्‍या मंजे मी मोठा मानथीन आनं शक्‍तीथीन परत ईसु, तवं मनी संगं मनं आखं देवदुतं बी येईत. आनं मी मना मोठा मानना राजगादीवर बससु. 32 तवं मनी समोर जगना आखं लोकं तेसना न्यायनी करता गोळा व्हईत. आनं जशा येखादा मेंडंरक्या तेनं मेंडरंसला बकर्‍यास पईन आलंग करय, तशाज ते लोकंसला बी मी आलंग आलंग दोन वाटा पाडी दीसु. 33 जे लोकं मेंडरं सारकं नीतीवान सत तेसला मी मनी जेवनी कडं ठेवसु आनं बकर्‍या सारका वाईट लोकंसला मनी डावी कडं ठेवसु. 34 तवं मी राजा बनीसनं मनं जेवनी कडनं लोकंसला सांगसु का, तुमला मना देवबापथीन आशीर्वाद भेटेल सय. तेमन तुमं या आनं देव जग बनाडानी पईलंग जो राज्य तुमनी करता बनाडीसनं ठेयेल व्हताल, तो राज्यना भागीदार बना. 35 कजं का जवं मी भुक्या व्हताल, तवं तुमं माला खावाला दीनत. आनं जवं मी तीसा व्हताल, तवं तुमं माला पेवाला दीनत. तशाज जवं मी पारका व्हताल, तवं तुमं माला घरमं जागा दीनत. 36 आनं जवं मी हुगडा व्हताल, तवं तुमं माला कपडं दीनत. आनं जवं मी आजारी व्हताल, तवं तुमं माला मदत करनत. जवं मी जेलमं कोंडायेल व्हताल, तवं तुमं माला भेटाला ईयेल व्हतलत. 37 मंग तवं ते नीतीवान लोकं माला वीचारीत का, परभु, कवं तुला आमं भुक्या दखीसनं खावाला दीनत? आनं कवं आमं तुला तीसा दखीसनं पेवाला दीनत? 38 कवं आमं तुला पारकं दखीसनं घरमं जागा दीनत? आनं कवं तुला हुगडा दखीसनं कपडं दीनत? 39 आनं कवं तुला आजारी नातं जेलमं कोंडायेल दखीसनं तुला भेटाला वनत? 40 तवं मी तेसला सांगसु, मी तुमला खरज सांगय का, जवं बी तुमं मावर वीस्वास ठेवनार येखादा भाऊ नातं बईन जेसला लोकं खुब नीचा मानत, तेसना साठी आशे करनत, तवं तुमं मालाज तशे करेल सत.
41 पन डावी कडनं लोकंसला मी सांगसु का, तुमला मना देवबाप पयथीन श्राप भेटेल सय. तेमन तुमं मना समोरथीन नींगी जाज्या आनं सैतान आनं तेनं चेलंसनी करता जो कायम ईस्तु पेटनार नरक ठेवामं ईयेल सय, तई तुमं जा. 42 कजं का जवं मी भुक्या व्हताल, तवं तुमं माला खावाला दीनत ना. आनं तीसा व्हताल, तवं तुमं माला पेवाला दीनत ना. 43 तशाज जवं मी पारका व्हताल, तवं तुमं माला घरमं जागा दीनत ना. आनं मी हुगडा व्हताल, तवं तुमं माला कपडं दीनत ना. आनं जवं मी आजारी व्हताल आनं जेलमं कोंडायेल व्हताल, तवं तुमं माला भेटाला वनत ना. 44 तवं ते बी माला वीचारीत का, परभु, कवं तुला आमं भुक्या आनं तीस्या दखनत? आनं कवं आमं तुला पारकं नातं हुगडं नातं आजारी नातं जेलमं कोंडायेल दखीसनं तुला मदत करनत ना? 45 तवं मी तेसला सांगसु, मी तुमला खरज सांगय का, जवं बी तुमं मावर वीस्वास ठेवनार येखादा भाऊ नातं बईन जेसला लोकं पक्‍का नीचा मानत, तेसना साठी आशे करनत ना, तवं तुमं माला बी तशे करनत ना. 46 मंग ते वाईट लोकं कायमना दंड भोगानी करता जाईत आनं ते नीतीवान लोकं देवनी संगं कायमना जीवन जगानी करता जाईत.