24
यरुशलेम मंदीरना नासनी बद्दल येसु भवीस्यवानी सांगय
(मार्क १३:१-२; लुक २१:५-६)
1 मंग येसु आनं तेनं चेलं मंदीर मयथीन बाहेर नींगी जाई रनलत. तवं तेनं चेलं तेला मंदीरन्या हावाल्या दखाडानी करता तेनी शेजार वनत. 2 मंग येसु तेसला सांगना, ये आखं तुमं दखत नं? मी तुमला खरज सांगय का, येक दीवस आठी येक बी दगड दुसरा दगडवर रव्हावु ना. आनं तेस मईन आखंकाही पाडी टाकामं येई.✞
शेवटना दीवसनी बद्दल येसु भवीस्यवानी सांगय
(मार्क १३:३-२३; लुक २१:७-२४)
3 मंग येसु जैतुनना डोंगरवर बसेल व्हताल. तवं चेलं तेनी कडं ईसनं तेला गच्चुप वीचारनत, गुरुजी, आमला सांग का, या गोस्टी कवं व्हईत आनं जवं तु परत ईशी आनं हाई जगना शेवट व्हई, तवं काय काय नीशान्या दखाईत? 4 तो तेसला सांगाला लागना, कोनी बी तुमला फसाडाला नोको पायजे मनीसनं समाळीनं रहज्या. 5 कजं का बरज लोकं मना नाव लीसनं येईत आनं ‘मीज तो ख्रीस्त सय’ आशे सांगीसनं बरज जनंसला फसाडीत. 6 आनं जवं तुमं लढाईसनी बद्दल आनं लढाईसनी बोमनी बद्दल आयकशात तवं घाबरशा नोको. कजं का हाई नक्की व्हई. पन येवडामं शेवट व्हवावु ना. 7 कजं का येक जातनं लोकं दुसरा जातवर उठीत आनं येक देश दुसरा देशवर उठी. आनं जागा जागामं दुस्काळ पडीत आनं भुकंपं व्हईत. 8 पन या बठ्या गोस्टी मंजे येक बाई पोर्याला जल्म ✞देवानी येखं जशा दुख भोगय, तशा सारका सय. 9 जवं या गोस्टी व्हईत, तवं तुमला त्रास देवानी करता लोकं धरी देईत. आनं तुमं मावर वीस्वास ठेवनत मनीसनं आखं लोकं तुमला नाकारीत आनं तुमला जीवता मारीत. 10 तवं मावर वीस्वास ठेवनारं बरज लोकं वीस्वास मयथीन मांगं नींगी जाईत आनं येकमेकंसला नाकारीत आनं येकमेकंसला वीरोध करनारंसना हातमं धराई देईत. 11 तवं देवना खोटा वचन सांगनारं नींगीत आनं बरज लोकंसला फसाडीत. 12 आनं लोकंसमं वाईटपना वाढी जाई, तेमन बरज लोकं मया कराना सोडी देईत. 13 पन जो शेवट परन वीस्वासमं टीकी रही, तोज नरकना दंड पईन वाची जाई. 14 मंग जगनं आखं लोकंसला साक्षी व्हवानी करता देवना राज्यनी बद्दल सुवार्ता आखी जगमं सांगामं येई. तवं हाई जगना शेवट व्हई.
15 मंग येसु आखु सांगना, देवना वचन सांगनार दानीयेल तेना पुस्तकमं येक नास करनार भयानक आनं पक्की वाईट वस्तुनी बद्दल सांगेल सय. मंग येक दीवस तुमं दखशात का, ती वस्तु देवना मंदीरनी पवीत्र जागामं हुबी रहीसनं तेला खराब करी ✞. (मतय सांगय का, मी जा लीखना सय वाचनारं येना आर्थ समजी लेवाना). 16 तवं जे लोकं यहुदीया भागमं सत, ते सोताला वाचाडाला लवकर डोंगरंसवर पळी जावाला पायजे. 17 आनं जो कोनी ✞घरवर सय, तो खाल ऊतरीसनं घर मयथीन काही लेवानी करता टाईम घालाला नोको पायजे. 18 आनं जर कोनी वावरमं सय तं, तो तेनं कपडं लेवाला घर परत जावामं टाईम नोको घालाला पायजे. 19 मंग ते दीवसमं ज्या बाया दोनदीवस्या सत आनं ज्या दुध पाजनार्या सत, तीसना साठी हाई पक्का भयानक व्हई. कजं का ते पळु शकावुत ना. 20 प्राथना करा का, जवं तुमं पळी जाशात, तवं हीवाळाना दीवसमं नातं शब्बाथना दीवसमं नोको व्हवाला पायजे✞. 21 कजं का तवं आशा संकटना दीवस येईत का, जवं देव जग बनाडना तवं पईन आज परन कधी आशा व्हयना ना, आनं पुडं बी व्हवावु ना. 22 आनं जर ते दीवसला देव कमी ना करता तं, कोनी बी मानुस टीकता ना. पन जेला देव नीवाडेल सय, ते नीवाडेल लोकं टीकाला पायजे मनीसनं तो ते दीवसला कमी करी. 23 आनं ते दीवसमं जर कोनी तुमला सांगी का, दखा, ख्रीस्त आठी ईयेल सय नातं तई ईयेल सय, तर तेना खरा नोको मानज्या. 24 कजं का खोटा ख्रीस्त आनं देवना खोटा वचन सांगनारं येईत. आनं शक्य व्हई तं, ते नीवाडेल लोकंसला बी फसाडीत. आनं तेसला फसाडानी करता ते बरज मोठमोठलं चमतकारं करीत. 25 पन तुमं समाळीनं रहज्या. दखा, तुमं फसाला नोको पायजे मनीसनं मी तुमला आगुदारज आखा सांगी दीना सय. 26 तवं कोनी तुमला सांगना का, दखा, देवना धाडेल ख्रीस्त गावना बाहेर सुमसाम जागामं सय, तवं तेना आयकीसनं तई जावु नोका. आखु कोनी सांगना का, दखा, तो मजारनी खोलीमं सय, तवं तेना खरा मानु नोका. 27 कजं का जशी ईज चमकय आनं आकासनी येक बाजुथीन दुसरी बाजु परन ऊजाळा देय आनं आखं लोकं तेला दखु शकत, तशाज मानुसना पोर्या मंजे मी बी परत ईसु आनं आखं लोकं माला दखीत. 28 आनं जई मरेल वस्तु पडेल रही, तईज गीदडं गोळा व्हईत. तवं आखंसला मायती पडी जाय का, तई मरेल वस्तु पडेल सय✞.
येसु दुसरा दाउ जगमं येई
(मार्क १३:२४-२७; लुक २१:२५-२८)
29 मंग येसु आखु सांगना, ते संकटंसनी नंतर ते दीवसमं सुर्य लगेज आंधारा व्हई जाई आनं चंद्र ऊजाळा देवावु ना. आकास मयथीन चान्न्या पडीत. आनं आकास मयल्या आख्या गोस्टी बी हालीसनं आथ्यातथ्या व्हई जाईत. 30 तवं मी मंजे मानुसना पोर्याना परत येवानी नीशानी आकासमं दखाई. मंग जग मतलं आखं जातनं लोकं रडीत. आनं ते माला मोठी शक्तीथीन आनं मोठा मानमं ढगवर येताना दखीत✞. 31 मंग जवं जोरमं तुतारी वाजामं येई, तवं मी मनं दुतंसला धाडसु आनं ते आखा जग मयथीन मनं नीवाडेल लोकंसला गोळा करीत.
येसु परत येई मनीसनं जागं रहज्या
(मार्क १३:२८-३७; लुक २१:२९-३३; १७:२६-३०, ३४-३६)
32 मंग येसु तेसला येक ऊदाहरन सांगना का, आंजीरना झाड वयथीन येक गोस्टं शीका. आंजीरना झाडंसला फाट्या कवळ्या व्हईसनं पाला फुटाला लागन्यात तं, तुमला मायती पडय का, ✞ऊनाळाना दीवस जवळ ई लागना सय. 33 तशाज जवं या आख्या गोस्टी घडताना दखशात, तवं तुमं समजा का, मना येवाना दीवस पक्का शेजार ई लागना सय. 34 मी तुमला खरज सांगय का, या आखा पुरा व्हई ताव हाई पीढीनं काही लोकं मरावुतंज ना. 35 आकास आनं धरतीना नास व्हई जाई, पन मना वचन कधी बदलावु ना. 36 आनं मना परत येवाना दीवसनी बद्दल आनं येळनी बद्दल कोनलाज मायती ना सय. सोरगं मतला देवदुतंसला मायती ना सय नातं देवना पोर्याला मंजे माला बी मायती ना सय. पन फक्त देवबापलाज मायती सय. 37 कजं का जशा ✞नोहाना दीवसमं व्हयना, तशाज जवं मी परत ईसु तो दीवसमं बी व्हई. 38 पानीघाई धरतीना नास व्हवानी आगुदार जवं नोहा आनं तेना कुटुमनं लोकं जाहाजमं गयलत, तो दीवस परन बाकी लोकं खाईपीई रनलत आनं लगीन करी रनलत आनं तेसनं पोरेसोरेसना लगीन बी करी दी रनलत. 39 ईतलामंज सईनदार पानी पडना आनं मोठा पुर ईसनं आखंसना नास करी टाकय ताव ते समजनंलतज ना. तशाज मना येवाना बी आचानक व्हई. 40 तवं दोन जन वावरमं काम करतं व्हईत तं, तेस मईन येकला सोरगंमं लेवामं येई आनं दुसराला तईज सोडी देवामं येई. 41 आनं दोन बाया मीळीसनं दळी रहन्या व्हईत तं, येकला सोरगंमं ली जावामं येई आनं दुसरीला तईज सोडी जावामं येई. 42 तेमन तुमं कायम जागं रहज्या, कजं का कोनता दीवसला तुमना परभु मंजे मी परत ईसु, ता तुमला मायती ना सय. 43 आनं तुमला मायती सय का, जर येखादा घर मालकला मायती रहता का, रातना कोनता टाईमला चोर तेना घरमं चोरी कराला येई, तवं तो जागं रहता आनं तेना घर फोडीसनं चोरी करु दीता ना. 44 तेमन तुमं कायम तयारीमं रहज्या, कजं का तुमला मायती बी रवावु ना आशा टाईमला मानुसना पोर्या मंजे मी परत ईसु.
वीस्वासु आनं वाईट नौकरंसना ऊदाहरन
(लुक १२:४१-४८)
45 मंग येसु तेसला येक ऊदाहरन सांगना का, वीस्वासु आनं बुधीवान नौकर कोन सय? मालक तेना घरना दुसरं नौकरंसला बरोबर टाईमला जेवन देवानी जवाबदारी जेना हातमं सोपी देई, तोज सय. 46 आनं तो मालक परत ईसनं जो नौकरला तेना देयेल जवाबदारी चांगला रीतथीन करताना दखी, तो धन्य सय. 47 मी तुमला खरज सांगय का, तो नौकरला तेना मालक तेना आखा संपतीवर आधीकारी मनीसनं नीवाडी.
48 पन येखादा वाईट नौकर तेना मनमं वीचार करय का, मना मालक परत येवाला उशीर करी रहना सय, तेमन मी काय बी करु तं तेला समजावु ना. 49 आशा समजीसनं जर तो दुसरं नौकरंसला हानमार कराना चालु करी आनं दारुड्यासनी संगं खाई पीईसनं मजा करी. 50 मंग तो कारभारीना मनमं वाटावु ना आशा रोजला आनं तेला मायती बी पडावु ना आशा टाईमला तेना मालक आचानक परत येई. 51 आनं तेला पक्का मोठा दंड देई. आनं जी जागामं तो ढोंगी लोकंसला ठेवय, ती जागामं तेला बी ठेई. आनं तई तो जास्त रडी आनं दुखमं दात खाई.