2
येसु येक पक्षवादी मानुसला बरा करय
(मतय ९:१-८; लुक ५:१७-२६)
1 काही दीवसनी नंतर येसु परत कफरनाहुम शेहेरमं वना. आनं तो घरमं सय आशा लोकंसला मायती पडना. 2 तवं ईतलं लोकं गोळा व्हयनत का, दारनी आजुबाजुला बी जागा ना व्हतील. आनं तो तेसला देवना वचन सांगाला लागना.
3 मंग काही लोकं येक पक्षवादी मानुसला चार जन लाईसनं येसुपन ऊचली लई वनत. 4 पन गरदी मुळे तेला तेपन ली जावु शकनत ना. तेमन येसु जई व्हताल तई घरनी वरना कवुल वसारीसनं वाट करनत. आनं जी झोळीवर पक्षवादी मानुस नीजेल व्हताल, ती खाल सोडनत. 5 तवं येसु तेसना वीस्वास दखीसनं तो पक्षवादी मानुसला सांगना, पोर्या, मी तुना पापनी माफी करी दीना सय. 6 तवं काही यहुदीसनं नीयम शीकाडनारं तई बसेल व्हतलत. ते तेसना मनमं वीचार कराला लागनत का, 7 हाऊ मानुस कजं आशा बोलय? हाऊ तं देवना आपमान करी रहना सय. कजं का फक्त देवनी शीवाय आजुन कोनी बी पापनी माफी करु शकय ना. 8 तेसना मनना वीचार लगेज येसुला सोताना आत्माघाई मायती पडी गया. तेमन तो तेसला सांगना, तुमं तुमना मनमं कजं आशा वीचार करत? 9 जर मी हाऊ पक्षवादी मानुसला फक्त सांगना का, तुना पापनी माफी व्हई गयी सय, तवं तेला माफी भेटनी का ना, ता तुमला मायती पडावु ना. पन जर मी तेला सांगना का, उठ तुनी झोळी ऊचलीनं नींगी जा, तवं तुमला मायती पडी का, मापन बरा करानी शक्ती सय. 10 आतं मी तुमला दखाडय का, जगमं पापनी माफी देवाना आधीकार मानुसना पोर्यापन मंजे मापन सय. 11 (मंग येसु तो पक्षवादी मानुसला सांगना) मी तुला सांगय, उठ, तुनी झोळी ऊचलीसनं तुना घर नींगी जा. 12 मंग तो उठना आनं लगेज तेनी झोळी ऊचलीसनं आखंसनी दखत नींगी गया. येमं आखंसला नवल वाटना. आनं ते देवनी स्तुती करीसनं सांगनत, आशा आमं कधीज दखनत ना.
येसु पापी लोकंसनी करता जगमं वना
(मतय ९:९-१३; लुक ५:२७-३२)
13 मंग येसु नींगीसनं परत गालील समुद्रना काटपन गया. आनं आखं लोकं तेपन वनत. तवं तो तेसला देवना वचन शीकाडाला लागना.
14 नंतर जवं तो जाई रहनाल, तवं आलफीना पोर्या लेवीला कर वसुली करनार नाकावर बसेल दखना. आनं तेला सांगना, मनी संगं ये. तवं लगेज तो उठीसनं तेनी संगं गया.
15 नंतर येसु आनं तेनं चेलं लेवीना घरमं जेवाला बसनत. आनं बरज कर वसुली करनारं आनं पापी लोकं बी तेसनी संगं जेवाला बसनत. ते बरज व्हतलत आनं येसुनी मांगं मांगं फीरी रनलत. 16 तवं परुशी नावना गठ मयला काही यहुदीसनं नीयम शीकाडनारं तई व्हतलत. ते येसुला कर वसुली करनारं आनं पापी लोकंसनी संगं जेवताना दखीसनं तेनं चेलंसला सांगनत, हाऊ कर वसुली करनारं आनं पापी लोकंसनी संगं कजं जेवय? 17 हाई आयकीनं येसु तेसला सांगना, जशा चांगला लोकंसला डाकटरनी गरज ना रहय, पन आजारीसला गरज रहय, तशाज जे सोताला नीतीवान समजत, ते लोकंसला ना, पन पापी लोकंसला बलावानी करता मी वना सय.
यहुदीसनं जुना नीयम आनं नवा नीयमनी बद्दल येसु सांगय
(मतय ९:१४-१७; लुक ५:३३-३९)
18 येकदाव बापतीस्मा करनार योहाननं चेलं आनं परुशी लोकं ऊपास करी रनलत. तवं काही लोकं ईसनं येसुला वीचारनत, बापतीस्मा करनार योहाननं चेलं आनं परुशी लोकंसनं चेलं ऊपास करत, पन तुनं चेलं कजं ऊपास करत ना? 19 तो तेसला वीचारना, जो परन वराडनी संगं नवरदेव रहय, तो परन ते ऊपास करीत का? जो परन नवरदेव तेसनी संगं रहय, तो परन ते ऊपास करु शकत ना. 20 पन आशा दीवस येईत का, नवरदेवला तेस पईन लेवामं येई✞. ते दीवसमं ते ऊपास करीत. 21 कोनी बी नवा कपडाना ठीगळ जुना कपडाला लावत ना. जर लावनत तं, तो नवा कपडाना ठीगळ जुना कपडाला फाडी टाकय. आनं कपडा पयला पेक्षा जास्त फाटी जाय. 22 तशाज कोनी बी नवा द्राक्षसना रसला ✞कातडान्या जुन्या बाटलीसमं भरत ना. जर भरनत तं, नवा द्राक्षसना रस कातडान्या बाटलीसला फोडी टाकी. आनं कातडान्या बाटल्या फुटी जाईत आनं द्राक्षसना रस खाल वताई जाई. आशे दोनी नास व्हई जाईत. तेमन नवा द्राक्षसना रसला कातडान्या नव्या बाटलीसमं भरत.
येसु शब्बाथना दीवस पाळानी बद्दल शीकाडय
(मतय १२:१-८; लुक ६:१-५)
23 येक शब्बाथना रोजमं येसु आनं तेनं चेलं वावर मयथीन जाई रनलत. तवं तेनं चेलं रस्तावर चालता चालता कनसं मोडाला लागनत. 24 तवं परुशी लोकं येसुला वीचारनत, दख, शब्बाथना दीवसमं जा ना कराला पायजे, ता ये कजं करत? 25 तो सांगना, ✞जवं दावीदला आनं तेनी संगं जे व्हतलत तेसला भुक लागनील आनं गरज पडनील, तवं तो काय करना? हाई वचन तुमं वाचनत ना का? 26 मुख्य याजक आब्याथारना काळमं तो देवना मंदीरमं गया आनं देवला आर्पन करेल ज्या भाकरी मंदीरनं सेवक लोकं शीवाय कोनी खावाला ना पायजे, त्या खाई लीना. आनं जे तेनी संगं व्हतलत, तेसला बी तो खावाला दीना. 27 देव मानुसनी करता शब्बाथना दीवसला बनाडेल सय, पन शब्बाथना दीवसनी करता मानुसला बनाडना ना. 28 मी शब्बाथना दीवसना बी परभु सय. तेमन शब्बाथना दीवसमं काय कराना आनं काय ना कराना, हाई आधीकार मना हातमं सय.