3
येसु येक लुळ्‍या हातना मानुसला बरा करय
(मतय १२:९-१४; लुक ६:६-११)
1 मंग येसु परत यहुदीसना प्राथना घरमं गया. तई लुळ्‍या हातना येक मानुस व्हताल. 2 आनं शब्‍बाथना दीवसमं येसु तेला बरा करय का ना, हाई दखीसनं तेवर दोस लावानी करता, काही लोकं टपी बसनत. 3 तवं येसु तो मानुसला सांगना, तु मजार हुबा रह. 4 आनं ते लोकंसला सांगना, मोसाना नीयममं काय लीखेल सय? शब्‍बाथना दीवसमं चांगला कराना सय का वाईट कराना सय? जीव वाचाडाना सय का माराना सय? पन ते ऊगंज रहनत. 5 तेसना मनना कठीनपना मुळे तो नाराज व्हईसनं ते आखंस कडं रागमं दखना आनं तो मानुसला सांगना, तुना हात पुडं कर. तो मानुस तेना हात पुडं करना आनं ल‍गेज तेना हात बरा व्हई गया. 6 मंग परुशी लोकं बाहेर जाईसनं तेना नास करानी बद्दल हेरोद राजानी कडनं लोकंसनी संगं बेत करनत.
येसु बरज आजारीसला बरा करय
7 मंग येसु तेनं चेलंसनी संगं समुद्र कडं गया. तवं गालील जील्ला मयथीन येक मोठी गरदी तेनी मांगं मांगं वनी. 8 तेना करेल चमत्कारं आयकीसनं यहुदीया, यरुशलेम, ईदोन आनं यार्दननी तथानी बाजुनं गावं, सोर आनं सीदोननी आजुबाजुनी मोठी गरदी बी तेनी कडं वनी. 9 तवं गरदी मुळे लोकं तेला दडपी ना देत मनीसनं तो तेनं चेलंसला येक डुंगा तयार ठेवाला सांगना. 10 कजं का तो बरज लोकंसला बरा करनाल, तेमन जे आखं आजारी व्हतलत ते तेला हात लावानी करता तेना आंगवर पडु लागनंलत. 11 आनं जवं जवं भुतंसनं आत्मा तेला दखतत, तवं तवं ते तेना पाय पडीसनं आनं आराळ्या दीसनं बोलतत का, तु देवना पोर्‍या सय. 12 मंग तो तेसला पक्‍का ढटाडीसनं सांगना, मी कोन सय हाई कोनला बी सांगु नोका.
येसु बारा चेलंसला नीवाडय
(मतय १०:१-४; लुक ६:१२-१६)
13 मंग येसु डोंगरवर चडना आनं जे तेना मनला वाटना तेसला बलावना. आनं ते तेनी कडं वनत. 14 तेनी संगं रव्हाला आनं देवना वचन प्रचार कराला तेसला धाडु शकी मनीसनं तो बारा जनंसला नीवाडना. 15 आनं आजारीसला बरा करानी आनं भुतं काडानी शक्‍ती बी तो तेसला दीना. 16 ते बारा जनंसना नाव: शीमोन, जेला तो पेत्र नाव दीना, 17 जबदीना पोर्‍या याकोब आनं याकोबना भाऊ योहान, येसला तो बेनेगेरेश मंजे गरजनारनं पोरे नाव दीना, 18 आंद्रीया, फीली‍प, बर्थलमय, मतय, थोमा, आलफीना पोर्‍या याकोब, तद्दय, शीमोन कनानी, 19 आनं यहुदा ईस्कंरीयोत, जो येसुला धरी दीना.
येसुमं परमेस्वरनी शक्‍ती सय
(मतय १२:२२-३२; लुक ११:१४-२३; १२:१०)
20 नंतर येसु आनं तेनं चेलं कफरनाहुम शेहेरना येक घरमं वनत. तवं आखु ईतलं लोकं गोळा व्हयनत का, तेसला भाकर खावाला बी सवड भेटनी ना. 21 आनं हाई आयकीसनं तेनं कुटुमनं लोकं तेला घर परत ली जावाला वनत. कजं का ते सांगतत का, तो येडा व्हई गया सय. 22 आनं यरुशलेमथीन जे यहुदीसनं नीयम शीकाडनारं ईयेल व्हतलत, ते सांगतत का, तेला बालजबुल लागेल सय आनं तो बालजबुलना मदतथीन भुतं काडय. 23 तवं येसु तेसला जवळ बलावना आनं ऊदाहरन दीसनं सांगना का, सैतान सैतानला कशा काडु शकय? 24 जर येखादा राज्‍यमं फुट पडी गया तं, तो राज्‍य टीकु शकय ना. 25 आनं येखादा कुटुममं फुट पडी गया तं, तो कुटुम बी टीकु शकय ना. 26 तशाज जर सैतान सोतावरंज उठय आनं तेसमं फुट पडी गया तं, तो बी टीकु शकय ना. आनं तेना नास व्हई जाई. 27 आनं येक शक्‍तीवान मानुसला बां‍धा शीवाय तेना घरमं घुसीसनं तेना माल कोनीज लुटु शकय ना. जर तेला बां‍धना तं, तो तेना घर लुटु शकय. 28 मी तुमला खरज सांगय का, मानुसना आखा पाप आनं जे जे वाईट गोस्टी ते करत, ते आखंसनी माफी व्हई जाई. 29 पन जो कोनी पवीत्र आत्मानी वीरुद नींदा करी, तेला कधी बी माफी भेटावु ना. तो कायमना पापना दोसी रही. 30 येसु आशा बोलना, कजं का ते सांगतत का, तेला भुतना आत्मा लागेल सय.
येसुनं खरं नातेवाईक
(मतय १२:४६-५०; लुक ८:१९-२१)
31 मंग येसुनी माय आनं तेनं भाऊ त‍ई वनत. ते बाहेर हुबं रहनत आनं दुसरंसला लाईसनं तेला बलावनत. 32 तेनी चारीमेर पक्‍कं लोकं बसेल व्हतलत. आनं ते तेला सांगनत, गुरुजी दख, तुनी माय आनं तुनं भाऊ बाहेर तुनी वाट दखी रहनं सत. 33 पन तो तेसला सांगना, कोन मनी खरी माय आनं कोन मनं खरं भाऊ सत, हाई मी तुमला सांगय. 34 मंग तेनी चारीमेर बसेल लोकंसनी कडं दखीसनं तो सांगना, दखा, येज मनं भाऊ आनं मनी माय सत! 35 कजं का जे कोनी देवनी ईशाथीन चालत तेज मनं भाऊ, बईन आनं माय सत.