4
बीवारा फोकनारना ऊदाहरन
(मतय १३:१-९; लुक ८:४-८)
1 मंग येसु समुद्रना काटपन परत लोकंसला शीकाडाला लागना. आनं तेनी जवळ लोकंसनी पक्‍की मोठी गरदी व्हयनी. तेमन तो समुद्रमं येक डुंगावर चडीसनं बसना. तवं आखं लोकं समुद्रना काटवर व्हतलत. 2 मंग तो ऊदाहरन दीसनं तेसला बर्‍याज गोस्टी शीकाडाला लागना. तेसला शीकाडता शीकाडता तो सांगना, 3 आयका, येकदाव येक शेतकरी तेना वावरमं बीवारा फोकाला नींगना. 4 आनं जवं तो फोकी रहनाल, तवं काही बीवारा वाटवर पडनत. आनं चीडं ईसनं तेसला खाई टाकनत. 5 काही बीवारा जई जास्त माटी ना व्हतील आशी खडकाई जमीनवर पडनत. आनं त‍ई जास्त माटी ना व्हतील तेमन ते बीवारा लवकर ऊगनत. 6 पन जवं सुर्य ऊगना तवं तेसला ऊन लागना. आनं तेसन्‍या मुळ्या जास्त खोल जावु शकन्‍यात ना. तेमन ते सुकाई गयत. 7 काही बीवारा काटंसनं झुडपंसमं पडनत. मंग ते काटंसनं झुडपं वाढनत आनं तेसला दडपी दीनत. तेमन तेसला काही पीक वना ना. 8 काही बीवारा चांगली माटीमं पडनत. आनं ते ऊगीसनं मोठं व्हयनत आनं तेसला पीक वना. तेसना काही तीस पोतं, आनं काही साठ पोतं आनं काही शंबर पोतं पीक व्हयना. 9 जर तुमं ध्यान दीसनं आयकशात, तवं तुमला समजी.
येसु ऊदाहरनना आर्थ सांगय
(मतय १३:१०-२३; लुक ८:९-१५)
10 मंग लोकंसनी गरदी येसुला सोडीसनं नींगी गयी. तवं येसुनं बारा चेलं आनं दुसरं जे तेनी संगं व्हतलत ते ऊदाहरनंसनी बद्दल तेला वीचारनत. 11 मंग तो तेसला सांगना, देव कशा तेनं लोकंसवर राज्य करी हाई गुपीत गोस्टं समजाला आधीकार तो तुमला देयेल सय. पन जे देवना वचनवर वीस्वास ठेवत ना, तेसना साठी आख्या गोस्टी मी ऊदाहरनघाई सांगय. 12 देवना वचनमं लीखेल सय का,
"ते दखी रहीत पन तेसला कधी दखायनार ना. आनं ते आयकी रहीत पन तेसला समजनार ना. जर ते दखी लीनत आनं समजी लीनत तं, कदाचीत तेसना मन देव कडं फीरी जाई, आनं देव तेसला माफी दीई."
हाई भवीस्यवानी पुरी व्‍हवानी करता मी तुमला ये आखं ऊदाहरन सांगय.
13 हाऊ ऊदाहरन तुमला समजना ना का? तं आखं ऊदाहरन तुमला कशाकाय समजी? 14 फोकनार जो बीवारा फोकय तो देवना वचन सारका सय. 15 आनं काही लोकं वाटनी सारकं सत, जई देवना वचन पयराय जाय. पन जवं ते आयकत, तवं ल‍गेज सैतान ईसनं ते पयरेल देवना वचनला भुलाडी देय.
16 तशाज, काही लोकं वचन आयकत आनं ल‍गेज आनंदमं स्वीकारी लेत. ते देवना वचन पयरेल खडकाई जमीन सारकं सत. 17 पन तेसमं जास्त वीस्वास ना रहय. तेमन तो देवना वचन तेसना जीवनमं काम करय ना. आनं ते थोडाज टाईम टीकत. मंग ते देवना वचनला स्वीकार करनत मनीसनं तेसवर संकट नातं वीरोध वना मंजे, ते ल‍गेज वीस्वास सोडी देत.
18-19 आनं काही लोकं देवना वचन आयकत, पन सोवसारनी चींता, धन दौलतनी लालुस आनं दुसर्‍या वस्तु मीळाडानी ईशा तेसमं घुसीसनं वचननी वाढला दडपी देत. ते लोकं काटंसनं झुडपंसनी खालनी जमीननी सारकं सत. ते पीक देत ना.
20 आनं काही लोकं वचन आयकीसनं स्वीकारी लेत. ते देवना वचन पयरेल चांगली माटी सारकं सत. ते कोनी तीस पोतं, कोनी साठ पोतं आनं कोनी शंबर पोतं पीक देत.
दीवाना ऊदाहरन
(लुक ८:१६-१८)
21 मंग येसु ते लोकंसला सांगना, दीवा चंपानी खाल नातं पलंगनी खाल ठेवाला कोनी बी लयत ना. पन गोखलामं ठेवानी करता लयत. 22 बठ्या झाकेल आनं दपाडेल गोस्टी हुगड्या व्हई जाईत. 23 जर तुमं ध्यान दीसनं आयकशात तवं तुमला समजी.
24 आजुन येसु तेसला सांगना, मी तुमला जा सांगय ता ध्यान दीसनं आयका. जीतला तुमं ध्यान दीसनं आयकशात तीतला तुमला समजाला भेटी. आनं तेनी पेक्षा जास्त बी तुमला शीकाडामं येई. 25 कजं का जे मना वचन आयकीसनं पाळत तेसला आजुन जास्त शीकाडामं येई. पन जे मना वचन आयकीसनं पाळत ना तेसपन जा काही बी सय ता बी ते दवडाय देईत.
बीवाराना ऊदाहरन
26 आजुन येसु तेसला सांगना, देवना राज्‍य येक बीवारानी सारका सय. जेला येखादा मानुस तेना वावरमं पयरय. 27 आनं तो रोज रातला नीजय आनं दीवसला उठीसनं काम करय. मंग तो बीवारा ऊतरय आनं वाढय. पन हाई कशा व‍य तेला काही मायती पडय ना. 28 जमीन तीना तीना पीक देय. पयलंग डीर नींगय, मंग कनसं लागत, मंग कनसंसमं भरेल दाना येत. 29 जवं पीक तयार वय, तवं तो मानुस ल‍गेज कापाला नींगय. कजं का कापनीनी येळ ई लागय.
राईना दानाना ऊदाहरन
(मतय १३:३१-३५; लुक १३:१८-१९)
30 येसु परत तेसला सांगना, देवना राज्‍य कशा सय, हाई समजाडानी करता मी तुमला आजुन येक ऊदाहरन सांगय. 31 देवना राज्‍य येक राईना दानानी सारका सय. जमीनमं पयरताना राईना दाना पक्‍का बारीक रहय. 32 पन पयराय जाय तवं, तो ऊगीसनं आखं भाजीपालंस पेक्षा मोठा व्हई जाय. आनं तेला आशा मोठल्‍या फाटा फुटत का, आकासनं चीडं तेन्‍या फाटासला घारा तयार करु शकत.
33 आशे बरज ऊदाहरन दीसनं येसु तेसला देवना वचन शीकाडना. जीतला ते समजु शकनत तीतला तो तेसला शीकाडना. 34 आनं बीगर ऊदाहरनना तो तेसला काहीज शीकाडना ना. पन जवं तो तेनं चेलंसनी संगं येखला व्हताल, तवं तेसला बठ्या गोस्टी समजाडीसनं सांगना.
येसु वावधनला थांबाडय
(मतय ८:२३-२७; लुक ८:२२-२५)
35 आनं तोज दीवस संध्याकाळला येसु तेनं चेलंसला सांगना, चाला, आपुन समुद्रनी तथानी बाजु जावुत. 36 तवं ते लोकंसनी गरदीला सोडनत. आनं तो डुंगावर व्हताल तशाज ते तेला ल‍ई गयत. आनं तेसनी संगं दुसरं डुंगं बी व्हतलत. 37 जवं ते समुद्रमं जाई रनलत, तवं मोठा वावधन वना. आनं लाटा डुंगंसला जोरमं हीदाडाला लागन्‍यात, आनं पानी भरावाला लागना. 38 तवं येसु मांगला तोंडापन ऊसीवर डोका ठेईसनं नीजेल व्हताल. ते तेला उठाडीसनं सांगनत, गुरुजी, आपुन बुडी रहनं सत, आनं येनी तुला चींता ना सय का? 39 तवं तो उठीसनं वाराला ढटाडना आनं समुद्रला सांगना, ऊगाज रह, शांतं व्‍ह. मंग ल‍गेज वारा थामना आनं तई आखंं शांतं व्हई गया. 40 मंग तो तेसला सांगना, तुमं कजं भीवाय गयत? आतं परन मावर तुमना वीस्वास ना सय का? 41 तवं ते पक्‍का घाबरी गयत आनं येकमेकंसला वीचाराला लागनत, हाऊ कोन सय? कजं का वारा आनं समुद्र बी येना आयकत.