5
येसु येक भुत लागेल मानुसला बरा करय
(मतय ८:२८-३४; लुक ८:२६-३९)
1 मंग येसु आनं तेनं चेलं समुद्रनी तथानी बाजु गरसेकरना देशमं वनत. 2 जवं ते डुंगा मयथीन उतरनत, ल‍गेज भुतना आत्मा लागेल येक मानुस मसान मयथीन नींगीसनं येसुला भेटना. 3 तो मानुस मसानमं रव्हु लागनाल. आनं कोनी बी तेला साकळघाई बांधीसनं ठेवु शकतत ना. 4 कजं का तेला बराज दाउ बेडयाजघाई आनं साकळीसघाई बांधी ठेवतत, पन तो साकळी आनं बेडया तोडी टाकता. तेमन कोनीज तेला ताबामं करु शकतत ना. 5 रात नं दीवस तो मसानीसमं आनं डोंगरंसमं रहीसनं आराळ्या दीता आनं दगडंसघाई तेना आंग ठेशी लीता. 6 तो येसुला दुरथीन दखीसनं दवडी वना आनं तेना पाय पडना. 7-8 मंग येसु तेला सांगना का, आरे भुतना आत्मा, हाई मानुस मयथीन नींग. तवं तो मानुस जोरमं आराळ्या दीसनं बोलना, हे येसु, आखंस पेक्षा मोठा देवना पोर्‍या, तुला मा प‍ईन काय पायजे? माला दुख दीशी तं तुला देवनी शपथ. 9 येसु तेला वीचारना, तुना नाव काय सय? तो उतर दीना, मना नाव सैन्‍य सय. कजं का आमं बरज सावटं सत. 10 मंग तो येसुला पक्‍का रावन्‍या करीसनं सांगना, आमला हाऊ देश मयथीन बाहेर धाडु नोको. 11 तवं त‍ई डोंगरपन डुकरंसना येक मोठा गवारा चरी रहनाल. 12 ते भुतं येसुला रावन्‍या करीसनं सांगनत, ते डुकरंसमं घुसाला आमला तेसमं धाड. 13 मंग तो तेसला डुकरंसमं घुसाला सांगना. तवं ते भुतंसनं आत्मा नींगीसनं ते डुकरंसमं घुसनत. आनं तो टोळा जोरमं पळत पळत कडा वरथीन समुद्रमं पडना. आनं ते डुकरं समुद्रमं बुडीसनं मरनत. ते जवळ जवळ दोन हाजार व्हतलत. 14 मंग डुकरं चारनारं पळत पळत जाईसनं गावमं आनं वावरंसमं आनं मळासमं हाई गोस्टं सांगनत. तवं काय व्हयना हाई दखाला लोकं वनत. 15 येसुना जवळ ईसनं ते दखनत का, जो मानुसला बरज सावटं भुतं लागेल व्हतलत, तो कपडं पांघरायेल आनं शुधीवर ईसनं बसेल व्हताल. मंग ते भीवाय गयत. 16 आनं जे लोकं हाई भुत लागेलनी बद्दल आनं डुकरंसनी बद्दल दखनंलत, ते हाई हाकीगत दुसरंसला सांगनत. 17 मंग ते लोकं येसुला रावन्‍या करीसनं सांगनत, आमना भाग मयथीन नींगी जा. 18 जवं येसु डुंगामं बसाला लागना, तवं जो मानुसला भुत लागेल व्हताल, तो तेला रावन्‍या करीसनं सांगना, मला तुनी संगं येवु दे. 19 पन येसु तेला येवु दीना ना, आनं सांगना, तुना घर आनं तुनं लोकंसपन जा, आनं परभु तुवर दया करीसनं तुना साठी केवडा मोठा काम करना सय, हाई तेसला सांग. 20 मंग तो मानुस दकापलीसमं गया आनं जो मोठा काम येसु तेना साठी करेल व्हताल तो सांगाला लागना. तवं आखंसला नवल वाटना.
येसु येक मरेल पोरला जीवता करय आनं येक पोगर लागेल बाईला बरा करय
(मतय ९:१८-२६; लुक ८:४०-५६)
21 मंग येसु आनं तेनं चेलं डुंगामं बसीसनं परत वनत. आनं तेसपन लोकंसनी मोठी गरदी गोळा व्हयनी. तवं येसु समुद्रपन व्हताल. 22 मंग याईर नावना प्राथना घरना येक आधीकारी तई वना आनं येसुला दखीसनं तेना पाय पडना. 23 आनं तो तेला पक्‍का रावन्‍या करीसनं सांगना का, मनी बारा वरीसनी पोर पक्‍की आजारी पडनी सय. आनं ती बरी व्हईसनं जीवती रव्हाला पायजे मनीसनं तु ये आनं तीवर हात ठेव. 24 मंग येसु तेनी संगं गया.
जवं तो जाई रहनाल, तवं लोकंसनी मोठी गरदी तेनी मांगं मांगं चालनी. आनं ते तेनी चारीमेर गरदी करी रनलत. 25 मंग त‍ई येक बाई व्हतील. तीला बारा वरीस प‍ईन पोगरना आजार लागेल व्हताल. 26 ती बरज डाक्टरंसघाई ईलाज करनील पन बरी व्हयनी ना. आनं तीना आजार जास्त व्हई गयाल. तीना आजारनी करता तीपन जा व्हताल, ता आखा खर्च करी टाकनील.
27 मंग येसुनी बद्दल आयकीसनं ती गरदीमं घुसनी आनं तेनी मांगं जाईसनं तेना कपडाला हात लावनी. 28 कजं का ती तीना मनमं वीचार करी रहनील का, जर मी फक्‍त येना कपडाला हात लावसु तं बरी व्हई जासु. 29 तवं ल‍गेज तीना रंगत बंद व्हई गया. आनं तीना आंगला आशा वाटना का, मी हाई आजार प‍ईन बरी व्हई गयी सय.
30 मंग ल‍गेज येसुला मायती पडना का, कोनीतरी माला हात लाईसनं बरा व्हयना सय. तेमन तो गरदीमं फीरीसनं वीचारना, मना कपडाला कोन हात लावना? 31 तेनं चेलं तेला सांगनत, गुरुजी, तु दखी रहना सय का, लोकं तुनी चारीमेर गरदी करी रहनं सत. आनं कशा तु वीचारय का, ‘माला कोन हात लावना’? 32 पन हाई कोन करना ता दखानी करता तो चारीमेर दखाला लागना. 33 तवं ती बाईला मायती पडना का, ती बरी व्हई गयी सय. तेमन ती भीवत भीवत आनं थरथर करीसनं येसुपन वनी. आनं तेना पाय पडीसनं तेला बठ्या गोस्टी खरं खरं सांगनी. 34 मंग तो तीला सांगना, पोर, तुना वीस्वासथीन तु बरी व्हयनी सय. सुखनी जा, तुला आजुन कधी हाऊ आजार व्‍हवावु ना.
35 जवं तो हाई सांगी रहनाल, तवं तो प्राथना घरना आधीकारीना घरथीन काही लोकं ईसनं तेला सांगनत का, तुनी पोर मरी गयी सय, गुरुजी‍ला आतं कसाला तकलीत देय? 36 पन येसु तेसना बोलना कडं ध्‍यान दीना ना. आनं तो प्राथना घरना आधीकारीला सांगना, भीवु नोको, फक्‍त वीस्वास ठेव. 37 मंग पेत्र, याकोब आनं तेना भाऊ योहान शीवाय दुसरा कोनला बी तो तेनी संगं येवु दीना ना. 38 मंग प्राथना घरना आधीकारीना घर ईसनं येसु दखना का, पक्‍कं आराळ्या दीसनं रडनारं गरदी करी रहनं सत. 39 मंग तो मजार जाईसनं तेसला सांगना, तुमं कसाला गरदी करत आनं रडत? हाई पोर मरेल ना, पन नीजेल सय. 40 हाई आयकीसनं ते तेला हासनत. पन येसु ते आखंसला बाहेर काडी दीना. आनं पोरनं मायबाप आनं जे तेनी संगं व्हतलत तेसला लीसनं जई पोर व्हतील तई मजार तो गया. 41 मंग तो ती पोरना हात धरीसनं सांगना, 'तलीथा कुम'. येना आर्थ आशा सय का, धाकली पोर, मी तुला सांगय, उठ. 42 आनं ल‍गेज ती पोर उठीसनं चालाला लागनी. तवं तेसला पक्‍का नवल वाटना. 43 मंग तो तेसला आज्ञा दीसनं सांगना का, हाई गोस्टं कोनला सांगु नोका. आखु तो सांगना, तीला काहीतरी खावाला द्या.