6
नासरेथनं लोकं येसुवर वीस्वास ठेवत ना
(मतय १३:५३-५८; लुक ४:१६-३०)
1 मंग येसु कफरनाहुम शेहेर मयथीन नींगीसनं तेना गावला वना. आनं तेनं चेलं बी तेनी संगं वनत. 2 त‍ई शब्‍बाथना दीवसमं तो प्राथना घरमं देवना वचन शीकाडाला लागना. तेना आयकीसनं आखं लोकंसला नवल वाटना. आनं ते सांगनत का, येला हाई शीक्षन कथाईन भेटना सय? आनं येला कोनती बुधी भेटेल सय का, तो आशा मोठला मोठला चमत्कार करय? 3 आपुनला मायती सय का, हाऊ तो सुतार सय, जो मरीयाना पोर्‍या आनं याकोब, योसे, यहुदा आनं शीमोनना भाऊ सय. आनं येन्‍या बयन्‍या आठी आपली संगं सत.
मंग ते तेला स्वीकार करनत ना. 4 तवं येसु तेसला सांगना, देवना वचन सांगनारला फक्‍त तेना गाव आनं तेना नातेवाईक आनं तेना कुटुम सोडीसनं आखी जागामं मान भेटय. 5 मंग त‍ई लोकं तेवर वीस्वास ठेवनत ना. तेमन तो थोडासं आजारीसवर हात ठेईसनं तेसला बरा करना. येनी शीवाय तो दुसरा कोनता बी चमत्कार तई करु शकना ना. 6 मंग तेसना कमी वीस्वास मुळे येसुला नवल वाटना. आनं तो शीकाडता शीकाडता गाव गाव फीरना.
येसु बारा चेलंसला सेवा कराला धाडय
(मतय ९:३५; १०:१,५-१५; लुक ९:१-६)
7 मंग येसु तेनं बारा चेलंसला बलाईसनं तेसला दोन दोन जनंसला धाडु लागना. ते जावानी आगुदार तो तेसला लोकंस मयथीन भुतं काडाना आधीकार दीना. 8 आनं तेसला आज्ञा दीसनं सांगना का, प्रवासनी करता काठी शीवाय दुसरा काही नोको ली जाज्या. तुमं भाकरी, थयली, नातं खीसामं पयसा नोको ली जाज्या. 9 तुमं चपलं घाला पन दोन दोन कुडच्या नोको ली जाज्या. 10 जर तुमं क‍ई तरी येखादा घरमं रव्हाला जाशात तं, तो गाव सोडत ताव तईज रहज्या. 11 आनं जी जागामं लोकं तुमला स्वीकारावुत ना आनं तुमना आयकावुत ना, तथाईन नींगताना तेसना वीरुद पुरावानी करता तुमना तळपायनी धुळ तईज झटकी टाका.
12 मंग ते चेलं तथाईन गयत आनं लोकंसला सांगनत का, तुमं पापना पस्तावा कराला पायजे. 13 ते बरज भुतं काडनत आनं बरज आजारीसला तेल लाईसनं बरा करनत.
बापतीस्मा करनार योहानना मरन
(मतय १४:१-१२; लुक ९:७-९)
14 तवं हेरोद राजा येसुनी बद्दल आयकना. कजं का येसुना नाव गाजेल व्हताल. आनं काही लोकं सांगतत का, बापतीस्मा करनार योहान मरन मयथीन उठना सय. तेमन तेघाई ये चमत्कार व्हई रहना सय. 15 आखु काही लोकं सांगतत का, हाऊ येलीया सय. आनं दुसरं सांगतत का, पयलं जे देवना वचन सांगनारं व्हतलत तेसनी सारका हाऊ बी येक देवना वचन सांगनार सय. 16 पन हाई आयकीसनं हेरोद राजा सांगना, जो बापतीस्मा करनार योहाननी डोकी मी कापेल सय, तो उठना सय.
17 हेरोद तेना धाकला भाऊ फीलीपनी बायको हेरोदीयानी करता सोता मानसं धाडीसनं बापतीस्मा करनार योहानला धरनाल आनं जेलमं ठेवनाल. 18 कजं का हेरोद तीनी संगं लगीन करेल व्हताल. आनं योहान तेला सांगता का, तु तुना भाऊनी बायकोला ठेवाना बरोबर ना सय. कजं का हाई देवना नीयमना वीरुद सय. 19 तेमन हेरोदीया योहानवर डाव ठेईसनं तेला मारानी करता कोशीत करी रहनील. पन ती तेला मारु शकनी ना. 20 कजं का योहान नीतीवान आनं पवीत्र मानुस सय हाई वळखीसनं हेरोद तेला भीवाई रहता आनं तेला हेरोदीया प‍ईन समाळ करता. तो तेना आयकीसनं पक्‍का वीचारमं पडी जाता, तरी बी तेना आनंदमं आयकी लीता.
21 येकदाव हेरोद तेना वाढ दीवस ठेवना. आनं तो तेना मुख्य आधीकारी, सैनीकंसना सरदार आनं गालीलनं मुख्य लोकंसला जेवाला बलावना. तवं योहानला मारानी करता हेरोदीयाला संधी भेटनी. 22 तीनी पोर सोती मजार जाईसनं नाचनी आनं हेरोदला आनं तेनी संगं जेवाला बसेल लोकंसला खुस करनी. तवं हेरोद राजा ती पोरला सांगना, तुला जा काही पायजे ता मापन मांगं, मंजे मी तुला दीसु. 23 तो शपथ दीसनं सांगना का, मना आरदा राज्‍य परन जा काही तु मापन मांगशी, ता मी तुला दीसु. 24 मंग ती बाहेर जाईसनं तीनी मायला वीचारनी, मी काय मांगु? ती सांगनी का, बापतीस्मा करनार योहाननी डोकी मांगं. 25 मंग ल‍गेज ती पोर पळत पळत राजा कडं जाईसनं सांगनी, बापतीस्मा करनार योहाननी डोकी येक ताटमं ठेईसनं आतंज माला दे. 26 हाई आयकीसनं हेरोद राजाला पक्‍का दुख वाटना. पन शपथ मुळे आनं जेवाला बसेल लोकंस मुळे तो तीला मना करु शकना ना. 27 तेमन हेरोद राजा ल‍गेज तेना येक सीपाईला धाडना आनं योहाननी डोकी कापी लयाला सांगना. तो सीपाई जेलमं गया आनं योहाननी डोकी कापी टाकना. 28 आनं ती डोकी येक ताटमं ठेईसनं लयना आनं ती पोरला दीना. मंग ती पोर तीनी मायला दीनी.
29 हाई आयकीसनं योहाननं चेलं वनत आनं तेना शरीरला लीसनं मसानमं ठेवनत.
येसु पाच हाजारथीन जास्त लोकंसला जेवाडय
(मतय १४:१३-२१; लुक ९:१०-१७; योहान ६:१-१४)
30 मंग येसुनं चेलं परत वनत. आनं ते जा जा करनत आनं लोकंसला शीकाडनत, ता आखा येसुला सांगनत. 31 तई बरज लोकं येवजाव करी रनलत, तेमन तेसला जेवाला बी सवड भेटनी ना. तेमन येसु तेसला सांगना, चाला आपुन येक सुनी जागामं जावुत, आनं तई दम खावुत. 32 तवं ते डुंगामं बसीसनं येक सुनी जागामं नींगी गयत. 33 पन बरज लोकं तेसला जाताना दखनत आनं वळखनत. तवं आखं गावंसनं लोकं पळत गयत आनं तेसनी आगुदार तई जाई लागनत. 34 जवं येसु डुंगा मयथीन खाल उतरना, तवं तो लोकंसनी मोठी गरदी दखना आनं तेला तेसनी कीव वनी. कजं का ते बीगर मेंडक्‍यान्‍या मेंडया सारकं व्हतलत. मंग तो तेसला बर्‍याज गोस्टी शीकाडाला लागना.
35 तवं बरीज येळ व्हई जायेल व्हतील. मंग येसुनं चेलं तेपन ईसनं सांगनत, गुरुजी, हाई जागा सुनी सय आनं आतं पक्‍की येळ व्हई गयी सय. 36 लोकंसला आजुबाजुनं खेडं पाडंसमं जाईसनं सोतानी करता खावाला काहीतरी लेवाला धाड. 37 तो सांगना, तुमं तेसला काहीतरी खावाला द्या. ते सांगनत, ईतला लोकंसनी करता कमीतंकमी दोनशे दीनारना भाकरी लागीत. आनं आमं ईतला पयसाना भाकरी लीसनं तेसला खावाला देवु शकशुत का? 38 तो सांगना, तुमं जाईसनं दखा तुमपन कीतल्‍या भाकरी सत. तवं ते तपास करीसनं सांगनत, पाच भाकरी आनं दोन मासं सत. 39 तो सांगना, आखं लोकंसला नीळा चारावर पंगत करीसनं बसाडा. 40 मंग ते लोकं शंबर शंबर आनं पन्नास पन्नास जनंसना पंगत करीसनं बसनत. 41 मंग तो त्‍या पाच भाकरी आनं दोन मासं लीना आनं वर सोरगं कडं दखीसनं देवना ऊपकार मानना. आनं भाकरी मोडीसनं तेनं चेलंसपन वाढाला दीना आनं ते दोन मासं आखंसला वाटी दीना. 42 मंग आखं लोकं पोट भरी जेवन करनत. 43 नंतर ते भाकरीसनं आनं मासंसनं ऊरेल तुकडं बारा टोपलं भरनत. 44 आनं त‍ई जीतलं बी भाकरी आनं मासं खानत तेस म‍ईन फक्‍त मानसंज पाच हाजार व्हतलत.
येसु पानीवर चालय
(मतय १४:२२-३३; योहान ६:१५-२१)
45 मंग येसु ल‍गेज तेनं चेलंसला सांगना, तुमं डुंगामं बसीसनं मनी आगुदार तथानी बाजुना बेथसैदा शेहेरमं नींगी जावा. आनं तो लोकंसला बी परत धाडी दीना. 46 मंग तेसला धाडीसनं तो प्राथना कराला डोंगरवर गया. 47 जवं संध्‍याकाळ व्हयनी, तवं डुंगा समुद्रनी मजारीमं व्हताल आनं तो येखलाज जमीनवर व्हताल. 48 तो दखना का, चेलंसला पानी माराना कठीन जाई रहना सय. कजं का तेसना तोंड समोरथीन पक्‍का वारा व्हताल. मंग मोठी पाहाटला तो पानीवर चालत चालत तेसनी कडं गया. तेसनी जवळथीन पुडं जावाना तेना बेत व्हताल. 49 जवं चेलं तेला पानी वयथीन चालताना दखनत, तेसला वाटना का हाऊ भुत सय. तेमन ते आराळ्या दीनत. 50 कजं का तेला दखीसनं ते आखं भीवाय गयलत. तवं ल‍गेज येसु तेसनी संगं बोलाला लागना. तो सांगना, धीर धरा, मी सय, भीवु नोका. 51 मंग तो तेसना डुंगामं चडी गया. तवं वारा पडना. मंग चेलंसला पक्‍का नवल वाटना. 52 कजं का तेसला भाकरीसना चमत्कार समजनालंज ना, आनं तेसना रुदय कठीन व्हई जायेल व्हताल.
येसु बरज आजारीसला बरा करय
(मतय १४:३४-३६)
53 मंग येसु आनं तेनं चेलं तथानी बाजुना गनेसरेतना काटला गयत आनं त‍ई डुंगा बांधी ठेवनत. 54 ते डुंगा मयथीन उतरताज लोकं तेला वळखनत. 55 ते लोकं चारीमेरनं गावंसमं धावपळ करत फीरनत. आनं जई तो सय आशा तेसला मायती पडना, तई ते आजारीसला झोळीवर ऊचलीनं ल‍वु लागनंलत. 56 मंग तो खेडापाडामं का वावरंसमं कई बी जाय, तई लोकं आजारीसला लईसनं मोकळा जागामं ठेवतत. आनं तेना कपडाना काटला फक्‍त हात लावु देवाला रावन्‍या करतत. आनं जीतलं बी तेना कपडाना काटला हात लावनत, तीतलं बरा व्हईनत.