16
येसु मरेल मयथीन जीवता उठय
(मतय २८:१-८; लुक २४:१-१२; योहान २०:१-१०)
1 मंग शब्‍बाथना दीवस नींगी गया. तवं मगदला गावनी मरीया, याकोबनी माय मरीया आनं सलोमे कबरपन जाईसनं येसुना शरीरला लावानी करता सुगंधी वस्तु ईकत लीन्‍यात. 2 आनं दुसरा दीवस मंजे रवीवारना सकासमं सुर्य नींगताज त्‍या कबरपन वन्‍यात. 3 तवं त्‍या येकमेकंसला सांगी रनल्‍यात का, कबरनी तोंडा वयली दगड आपुननी करता कोन सरकाय देई? कजं का तो दगड पक्‍का मोठा व्हताल.
4 मंग जवं त्‍या कबर कडं दखन्‍यात, तवं तो दगड येक कडं सरकायेल तीसला दखायना. 5 मंग त्‍या कबर मजार गयात. तवं त्या दखन्‍यात का, धवळ्‍या कपडं घालेल येक तरुन जेवनी कडं बसेल सय. हाई दखीसनं त्या चमकाय गयात. 6 पन तो तरुन तीसला सांगना, भीवु नोका. माला मायती सय का कुरुस खांबावर ठोकेल नासरेथना येसुला तुमं दखी रहन्‍या सत. तो आठी ना सय, पन उठना सय. जई तेला ठेयेल व्हताल ती जागा दखा. 7 पन तुमं जाईसनं तेनं चेलंसला आनं पेत्रला सांगा का, तो तुमनी पयलंग गालीलमं जाई रहना सय. तो जशा तुमला सांगेल सय, तशा तुमं तेला तई दखशात. 8 मंग त्‍या बाया बाहेर नींगन्‍यात आनं भीवाईसनं थरथर करी रनल्‍यात. आनं त्या कबर प‍ईन पळन्‍यात. कजं का हाई गोस्टं मुळे तीसला पक्‍का नवल वाटना. पन त्‍या कोनला काही सांगन्‍यात ना, कजं का त्‍या भीवाई गयल्‍यात.
येसुनं चेलं आनं मगदला गावनी मरीया येसुला दखत
(मतय २८:९-१०, १६-२०; लुक २४:१३-४९; योहान २०:११-२९; प्रेशीत १:६-८)
9 येसु आठोडाना पईला दीवस मंजे रवीवारना रोजला उठना. आनं तो दीवसला सकासमंज मगदला गावनी मरीयाला तो पईलंग दखायना. ती मरीया मयथीन तो सात भुतं काडेल व्हताल. 10 मंग ती गयी आनं येसुनी मांगं फीरनारंसला हाई गोस्टं सांगनी. तवं ते रडी रनलत आनं दुखमं व्हतलत. 11 पन जवं ते आयकनत का, येसु जीवता सय आनं तीला दखायना सय, तवं ते हाई गोस्टंवर वीस्वास ठेवनत ना.
12 नंतर येसुनं चेलंस मयथीन दोन जन बाहेर गाव जाई रनलत. तवं येसु तेसला दुसरा रुप लीसनं दखायना. 13 मंग ते दोनी जन परत जाईसनं दुसरं चेलंसला सांगनत. पन तेसवर बी ते वीस्वास ठेवनत ना.
14 नंतर येसुनं आकरा चेलं जेवाला बसेल व्हतलत. तवं येसु तेसला दखायना. आनं जे तेला दखेल व्हतलत तेसवर ते चेलं वीस्वास ठेवनत ना मनीसनं तेसना कमी वीस्वास आनं कठीन रुदय मुळे तेसला तो बोलना.
15 नंतर तो तेसला सांगना, आखा जगमं जाईसनं आखं लोकंसला सुवार्ता सांगा. 16 जो मावर वीस्वास ठेई आनं बापतीस्मा लेई, तेना तारन व्हई. पन जो मावर वीस्वास ठेवय ना, तेला दंड देवामं येई. 17 आनं जे मावर वीस्वास ठेईत, तेसनी संगं हाई नीशानी रही का, ते मना नावमं भुतं काडीत, ते नवीन नवीन भाशा बोलीत, 18 आनं जर ते हातमं सापडा ऊचलीत आनं कोनती बी जीव लेनार वस्तु पेईत, तरी बी तेसला काहीज व्‍हवावु ना. आनं ते आजारीसवर हात ठेईत तं, ते बरं व्हई जाईत.
येसुला सोरगंमं लेवामं वना
(लुक २४:५०-५३; प्रेशीत १:९-११)
19 मंग परभु येसु चेलंसनी संगं बोलानी नंतर तेला वर सोरगंमं लेवामं वना. आनं तो देवनी जेवनी कडं बसना. 20 मंग येसुनं चेलं तथाईन नींगनत आनं आखी जागामं जाईसनं सुवार्ता सांगनत. आनं देव तेसनी संगं काम करी रहनाल. आनं देव तेसला चमत्कार करानी शक्‍ती दीसनं दखाडी दीना का, जो वचन ते सांगी रनलत तो खरा सय. आमेन.