15
येसुला पीलातनी समोर ली जात
(मतय २७:१-२, ११-१४; लुक २३:१-५; योहान १८:२८-३८)
1 मंग पाहाटला मुख्य याजक लोकं, वडील लोकं, नीयम शीकाडनारं आनं आखं न्‍याय करनारं बेत करनत. आनं ते येसुला बांधीसनं ली गयत आनं पीलातना हातमं दीनत. 2 तवं पीलात तेला वीचारना, तु खरज यहुदीसना राजा सय का? मंग येसु उतर दीना, तु सांगय तशा. 3 तवं मुख्य याजक लोकं येसुवर बर्‍याज गोस्टीसना आरोप लावनत. 4 तेमन पीलात येसुला परत वीचारना, तु काही उतर देय ना का? दख, ते कीतल्‍या गोस्टीसना आरोप तुवर लावत. 5 पन येसु काही उतर दीना ना. ये वयथीन पीलातला नवल वाटना.
येसुला मरनना दंड देवामं येय
(मतय २७:१५-२६; लुक २३:१३-२५; योहान १८:३९-१९:१६)
6 मंग दर वरीस सनना दीवसला जो कैदीला लोकं पीलातपन मांगतत तेला तो सोडी दीता. 7 तवं बरब्‍बा नावना येक मानुस दुसरं कैदीसनी संगं जेलमं बांधी ठेयेल व्हताल. कजं का दंगामं तो लोकंसना खुन करेल व्हताल. 8 मंग लोकं पुडं ईसनं पीलातपन सांगनत का, आमना साठी तु आपली रीत रीवाज प्रमानं कर. 9 पीलात तेसला वीचारना, तुमनी ईशा काय सय? तुमना साठी मी यहुदीसना राजाला सोडी देवु का? 10 पीलातला मायती व्हताल का, मुख्य याजक लोकं येसुला आडावपना करीसनं धरी दीनलंत, तेमन तो तशा सांगना. 11 पन 'तेनी पेक्षा आमना साठी बरब्‍बाला सोड', आशा मागनी करानी करता मुख्य याजक लोकं लोकंसला चीनगाडी दीनत. 12 तवं पीलात परत वीचारना, मंग जेला तुमं यहुदीसना राजा सांगत तेला मी काय करु? 13 मंग ते परत आराळ्या दीसनं सांगनत, तेला कुरुस खांबावर ठोका. 14 पन तो वीचारना, कजं? तो काय गुनाह करना सय? पन ते पक्‍कं आराळ्या दीसनं सांगनत, तेला कुरुस खांबावर ठोका. 15 तवं लोकंसला खुस करानी करता पीलात बरब्‍बाला तेसना साठी सोडना. आनं येसुला काकडा मारीसनं कुरुस खांबावर ठोकानी करता सीपाईसना हातमं दीना.
सीपाई येसुनी थट्टा करत
(मतय २७:२७-३१; योहान १९:२-३)
16 मंग सीपाई येसुला पीलातना राजवाडामं ली गयत. तो राजवाडाला प्राटेरीयोम सांगत. आनं ते आखं सीपाईसनी टोळीला गोळा करनत. 17 मंग ते तेना आंगवर जामळा रंगना कपडं घालनत. आनं काटाना मुगुट गुफीसनं तेना डोकामं घालनत. 18 आनं ते तेला ढोंगं पडीसनं नमस्‍कार करनत. आनं तेला थट्टा करीसनं ते सांगाला लागनत का, हे यहुदीसना राजा, तुनी जय जयकार सय. 19 मंग ते येसुना डोकावर काठीघाई हाननत आनं तेवर थुकनत. आनं गुडगं टेकीसनं तेला नमन करनत. 20 आशे येसुनी थट्टा करानी नंतर ते सीपाई जामळा रंगनं कपडं तेना आंग वयथीन काडीसनं तेनं सोतानं कपडं घालनत. मंग कुरुस खांबावर ठोकानी करता ते तेला बाहेर ली गयत.
येसुला कुरुस खांबावर ठोकत
(मतय २७:३२-४४; लुक २३:२६-४३; योहान १९:१७-२७)
21 मंग शीमोन नावना येक मानुस येक गाव मयथीन ईयेल व्हताल. आनं तो वाटधरी जाई रहनाल. तो कुरेन शेहेरना व्हताल आनं आलेक्‍सांद्र आनं रुफना बाप व्हताल. मंग सीपाई तेला बळजुबरी येसुना कुरुस खांबा ऊचलानी करता लावनत. 22 मंग ते येसुला गुलगुथा नावनी जागामं लवनत. (गुलगुथा मंजे ‘कवटीनी जागा’) 23 त‍ई ते द्राक्षसना रसमं बोळ टाकीसनं येसुला पेवाला दीनत. पन तो पीना ना. 24 तवं ते तेला कुरुस खांबावर ठोकनत. आनं तेनं कपडंस मयथीन कोन कोनता कपडा लेवाला पायजे येनी करता तेवर चीठ्या टाकीसनं वाटी लीनत. 25 जवं ते येसुला कुरुस खांबावर ठोकनत, तवं सकासना नऊ वाजेल व्हताल. 26 आनं येसुवर ते जो दोस लावनंलत, तो तेनी वर येक पाटीमं लीखीसनं लायेल व्हताल. त‍ई आशा लीखेल व्हताल का, ‘हाऊ यहुदीसना राजा सय’. 27 मंग ते तेनी संगं दोन चोरंसला बी कुरुस खांबावर ठोकनत. येकला जेवनी कडं आनं दुसराला डावी कडं ठोकनत. 28 तवं येसुनी बद्दल देवना वचनमं जा लीखेल व्हताल, ता पुरा व्हयना. तो आशा सय का,
"तो आपराधीसमं गनाय गया."
29 मंग शेजारथीन जानारं मान हालाडीसनं येसुनी थट्टा करनत. ते थट्टा करीसनं सांगनत का, आरे मंदीर मोडीसनं तीन दीवसमं बांधनार, 30 सोताला वाचाड आनं कुरुस खांबा वयथीन खाल ये. 31 तशेज मुख्य याजक लोकं आनं नीयम शीकाडनारं बी तेनी थट्टा करनत. ते येक दुसरंसला सांगनत, तो दुसरंसना तारन करना, पन तेला सोताला वाचाडता येय ना. 32 ईस्रायेलना राजा ख्रीस्‍त, हाऊ आतं कुरुस खांबा वयथीन खाल येवाला पायजे. तवं ता दखीसनं आमं तेवर वीस्वास ठेवसुत. मंग तेनी संगं कुरुस खांबावर ठोकेल दोनी चोर बी तेनी नींदा करनत.
येसुना मरन
(मतय २७:४५-५६; लुक २३:४४-४९; योहान १९:२८-३०)
33 मंग दुफारना बारा वाजता आखा देशमं आंधारा पडी गया. आनं तो आंधारा दुफारना तीन वाजा परन रहना. 34 मंग तीन वाजता येसु जोरमं आराळ्या दीसनं बोलना, येलोई, येलोई, लमा सबकतनी? मंजे,
"मना देव, मना देव, तु मला कजं सोडी दीना?"
35 तवं शेजार हुबं रहनारंस मयथीन काही जन हाई आयकीसनं सांगनत, दखा, तो येलीयाला मदत करानी करता बलाय रहना सय. 36 मंग येक जन पळत जाईसनं येक स्पंज लीना. आनं तो स्पंजला आंबट रसमं बुडाईसनं आनं येक काठीवर ठेईसनं तेला पेवाला दीना. आनं तो सांगना, थांबा, येलीया ईसनं येला खाल ऊतारय का ना, हाई आपुन दखुत. 37 मंग येसु जोरमं आराळ्या दीसनं जीव सोडी दीना. 38 तवं मंदीरना पडदा वरथीन खाल परन फाटीसनं दोन भाग व्हई गया. 39 तवं सीपाईसना आधीकारी येसुनी समोर हुबा व्हताल. येसु कशा जीव सोडना हाई तो दखीसनं तो सांगना, खरज हाऊ मानुस देवना पोर्‍या व्हताल.
40 मंग काही बाया बी दुरथीन दखी रनल्‍यात. तेसमं मगदाला गावनी मरीया, धाकला याकोब आनं योसेनी माय मरीया, आनं सलोमे वतल्‍यात. 41 जवं येसु गालीलमं व्हताल, तवं तेनी मांगं चालीसनं त्‍या बाया तेनी सेवा करत्‍यात. आनं त‍ई बर्‍याज दुसर्‍या बाया बी वतल्‍यात. त्या येसुनी संगं यरुशलेम परन ईयेल व्हतल्यात.
येसुला कबरमं ठेवत
(मतय २७:५७-६१; लुक २३:५०-५६; योहान १९:३८-४२)
42 मंग संध्‍याकाळ व्‍हवामं व्हतील. आनं तो तयारीना दीवस मंजे शब्‍बाथना आगुदारना दीवस व्हताल. 43 तवं योसेफ नावना येक मानुस व्हताल. तो आरीमथाई शेहेरना व्हताल. तो न्‍याय करनारंसना मुख्य सभासद मयथीन येक जन व्हताल आनं सोता देवना राज्‍यनी वाट दखी रहनाल. मंग तो हीम्‍मत करीसनं पीलातपन गया आनं कबरमं ठेवानी करता येसुना शरीर मांगना. 44 तवं पीलातला नवल वाटना का, येसु ईतला लवकर कशा मरी गया. आनं तो सीपाईसना आधीकारीला बलाईसनं वीचारना, येसु खरज मरी गया का? 45 मंग सीपाईसना आधीकारी प‍ईन जवं मायती पडना, तवं पीलात योसेफला येसुना शरीर दीना. 46 मंग योसेफ येक तागाना कपडा ईकत लीना. आनं येसुना शरीरला खाल ऊतारीसनं तो तागाना कपडामं गुंडाळना आनं तेला खडकमं खंदेल येक कबरमं ठेवना. आनं कबरना तोंडावर येक मोठी दगड गचालीसनं ठेवना. 47 मंग तेला कई ठेयेल व्हताल, हाई मगदला गावनी मरीया आनं योसेनी माय मरीया दखन्‍यात.