14
येसुला मारानी बद्दल मोठलं लोकं बेत करत
(मतय २६:१-५; लुक २२:१-२; योहान ११:४५-५३)
1 मंग दोन दीवसनी नंतर वल्‍हांडन आनं बीगर खमीरनी भाकरना सन व्हताल. तवं मुख्य याजक लोकं आनं नीयम शीकाडनारं येसुला कशे गच्‍चुप धरीसनं जीवता मारवा, हाई दखी रनलत. 2 पन ते सांगनत, हाई सनना दीवसमं नोको कराला पायजे. जर करनत तं कदाचीत लोकंसमं दंगा व्हई जाई.
येक बाई येसुना डोकावर सुगंधी तेल टाकीसनं मान देय
(मतय २६:६-१३; योहान १२:१-८)
3 मंग येसु बेथानीमं कोडी शीमोनना घरमं जेवाला बसनाल. तवं येक बाई येक आलाबा‍स्‍त्र बाटलीमं तेल ली वनी. ता तेल जटामांसी प‍ईन तयार करेल पक्‍का चांगला, सुगंधी आनं मागायना व्हताल. मंग ती बाटलीना ढाकन हुगाडीसनं येसुना डोकावर ता तेल वतनी. 4 तवं त‍ई बसेल लोकंस मयथीन कीतलं जन राग करनत. आनं ते येकमेकंसला सांगनत, ती कजं हाई सुगंधी तेलला आशा नास करनी? 5 कजं का हाऊ सुगंधी तेल जास्त कीमतमं ईकीसनं तो पयसा गरीबंसला दीता ईता. आशे ते तीनी बद्दल कुरकुर कराला लागनत. 6 पन येसु तेसला सांगना, तीला सोडी द्या. तीला तुमं कजं त्रास देत? ती मना साठी येक चांगला आनं भारी काम करनी सय. 7 कजं का गरीब लोकं कायम तुमनी संगं रहीत, आनं कवं बी तुमं तेसला मदत करु शकसात. पन मी तुमनी संगं कायम रव्हावु ना. 8 जो काही तीला करता वना, ती करनी. ती मना शरीरला कबरमं ठेवानी आगुदारज सुगंधी तेल लाईसनं तयार करनी. 9 आनं मी तुमला खरज सांगय का, आखा जगमं जई जई सुवार्ता सांगामं येई, तई तई तीला याद करानी करता, ती जा करेल सय ता सांगामं येई.
यहुदा येसुनी संगं वीस्वास घात करय
(मतय २६:१४-१६; लुक २२:३-६)
10 मंग बारा चेलंस मयथीन यहुदा ईस्कंरीयोत नावना येक जन येसुला वीस्वास घातथीन धरी देवानी करता मुख्य याजक लोकंस कडं गया. 11 मंग तेना आयकीसनं, तेसला आनंद वाटना. आनं ते तेला पयसा देवानी भाशा करनत. तवं प‍ईन यहुदा ईस्कंरीयोत येसुला धरी देवाना येक टाईम दखु लागनाल.
येसु तेनं चेलंसनी संगं वल्‍हांडनना सनना जेवन करय
(मतय २६:१७-३०; लुक २२:७-२३; योहान १३:२१-३०; १ करींथ ११:२३-२५)
12 मंग बीगर खमीरनी भाकरना सनना पईला रोज वना. तो रोजला लोकं वल्‍हांडनना सननी करता मेंडीना बचाला बलीदान करत. मंग येसुनं चेलं तेला सांगनत, आमं वल्‍हांडनना सनना जेवन कई जाईसनं तयारी कराला पायजे आशी तुनी ईशा सय? 13 मंग तो तेनं चेलंस मयथीन दोन जनंसला सांगीसनं धाडना, तुमं यरुशलेम शेहेरमं जा. त‍ई पानीना मडका ली जाताना येक मानुस तुमला भेटी. तुमं तेनी मांगं जा. 14 आनं जो घरमं तो घुसी, तो घरना मालकला सांगा, गुरुजी वीचारना का, मी मनं चेलंसनी संगं वल्‍हांडनना सनना जेवन कोनती खोलीमं करु? 15 मंग तो तुमला येक हावालीना वरना तालमं येक मोठी खोली दखाडी. आनं आपुनला जा काही पायजे ता आखं ती खोलीमं तयार करेल व्हई. तुमं तई जाईसनं आपुननी करता तयार करा. 16 मंग ते चेलं नींगीसनं शेहेरमं गयत. तवं येसु तेसला जशा सांगेल व्हताल तशाज व्हयना. आनं ते वल्‍हांडनना सननी तयारी करनत.
17 जवं संध्‍याकाळ व्हयनी, तवं येसु बारा चेलंसनी संगं वना. 18 आनं जेवन करताना तो सांगना, मी तुमला खरज सांगय का, तुम मयथीन येक जन माला धरी देई. तो आतं मनी संगं आठी जेवन करी रहना सय. 19 मंग ते दुखी व्हईसनं येक येक जन तेला वीचाराला लागनत, गुरुजी, तो मी सय का? 20 येसु सांगना, तुमं बारा जनंस मयथीन तो येक सय, जो मनी संगं आतं ताटमं भाकर बुडाय रहना सय. 21 जशा मनी बद्दल लीखेल सय, तशा मी मरसु. पन जो माला धरी देई, तो मानुसनी हाल पक्‍की व्हई. तो मानुसना जल्म ना व्हता तं, तेना साठी चांगला रहता.
22 मंग जवं ते जेवन करी रनलत, तवं येसु भाकर लीना आनं देवना ऊपकार मानीसनं ती मोडना. आनं तेसला दीसनं तो सांगना, हाई ल्‍या आनं खा. हाई मना शरीर सारका सय. 23 तेनी नंतर तो द्राक्षरसनी वाटी लीना आनं देवना ऊपकार मानीसनं तेसला दीना. आनं ते आखं जन ते मयथीन पीनत. 24 मंग तो सांगना, हाई द्राक्षसना रस मना रंगत सारका सय. आनं मना मरनघाई देव बरज लोकंसनी संगं येक नवीन संमंध जोडी. 25 मी तुमला खरज सांगय का, जो परन देव तेनं लोकंसवर राज्‍य करय ना, तो परन मी आजुन क‍ई बी द्राक्षसना रस पेवावुज ना.
26 मंग जेवननी नंतर ते येक स्‍तुतीना गाना लावनत आनं जैतुनना डोंगर कडं नींगी गयत.
पेत्र तेला नाकारी मनीसनं येसु भवीस्यवानी सांगय
(मतय २६:३१-३५; लुक २२:३१-३४; योहान १३:३६-३८)
27 मंग येसु तेनं चेलंसला सांगना, मना जा हाल व्हई, ता दखीसनं तुमं आखं जन वीस्वासमं कमी पडी जाशात. कजं का देवना वचनमं आशा लीखेल सय का,
"मी मेंडरक्‍याला मारसु आनं मेंडरंसना दानाफान व्हई जाई."
28 पन जवं मी मरन मयथीन उठसु, तवं तुमनी आगुदार गालीलमं नींगी जासु.
29 पेत्र तेला सांगना, जर आखं जन वीस्वासमं कमी पडी जाईत, तरी बी मी कमी पडावु ना. 30 तो तेला सांगना, मी तुला खरज सांगय का, आज रातला कोमडा दोन दाउ कोकावानी आगुदार तु तीन दाउ माला नाकारशी. 31 पन पेत्र पक्‍का मोठयाळ करीसनं सांगना, जर तुनी संगं माला मरना पडी, तरी बी मी तुला नाकारावु ना. आनं आखं चेलं तशेज सांगनत.
येसु गेथशेमाने नावना बागमं प्राथना करय
(मतय २६:३६-४६; लुक २२:३९-४६)
32 नंतर येसु आनं तेनं चेलं गेथशेमाने नावना येक बागमं वनत. तवं तो चेलंसला सांगना, मी प्राथना करय ताव तुमं आठी बसा. 33 आशा सांगीसनं तो पेत्र, याकोब आनं योहानला तेनी संगं लीना. आनं तेवर जो दुख ये‍नार सय येनी बद्दल तो पक्‍का दुखी व्हईसनं तेना जीव काळावाळा करला लागना. 34 मंग तो पेत्र, याकोब आनं योहानला सांगना, मना जीव मरानी जशा दुखी व्हई रहना सय. तुमं आठी रहीसनं जागं रहज्या.
35 मंग तो जरासा पुडं जाईसनं सोता जमीनवर पडना. आनं तो आशी प्राथना करना का, देवबाप, व्हई शकी तं, हाई दुखना समय मा वयथीन टळी जावु दे. 36 आब्‍बा बाप, तुला आखंकाही शक्‍य सय. हाई दुख मा प‍ईन दुर कर. पन मनी ईशाथीन नोको, पन तुनी ईशाथीन व्‍हवु दे.
37 मंग येसु परत ईसनं दखना का, ते नीजी गयं सत. तवं तो पेत्रला सांगना, शीमोन, तु नीजी गया सय का? घटका भर बी तुला जागा रवाय ना का? 38 तुमं परीक्षामं पडशात नोको तेमन जागं रहज्या आनं प्राथना करज्या. तुमना मन तं जागं रव्हाला सांगय, पन तुमना शरीर कमजोर सय.
39 मंग येसु परत गया आनं तशाज सांगीसनं प्राथना करना. 40 नंतर तो परत ईसनं दखना का, ते आजुन नीजी गयं सत. कजं का तेसनं डोळं पक्‍कं लागी रनलत. आनं तेला काय उतर देवुत हाई तेसला समजु ना लागनाल.
41 मंग तो परत तीसरा दाउ ईसनं तेसला सांगना, तुमं आजुन नीजेल सत आनं दम खाई रहनं सत का? बस करा. दखा, माला धरीसनं पापी मानसंसना हातमं देवानी येळ ई लागनी सय. 42 उठा, आपुन जावुत. दखा, माला धरी देनार शेजार ई लागना सय.
यहुदा येसुला धरी देय
(मतय २६:४७-५६; लुक २२:४७-५३; योहान १८:३-१२)
43 जवं येसु बोली रहनाल, तीतलामं बारा चेलंस मयथीन येक जन यहुदा लगेज तई वना. तेनी संगं लोकंसनी येक मोठी टोळी तलवार आनं काठ्या लीसनं वनत. ती मोठी टोळीला मुख्य याजक लोकं, नीयम शीकाडनारं आनं वडील लोकं धाडेल व्हतलत. 44 आनं यहुदा ते लोकंसला आशी नीशानी सांगी ठेयेल व्हताल का, मी जेना मुक्‍का लीसु तोज तो मानुस सय. तुमं तेला धरा आनं समाळीसनं ली जावा. 45 मंग तो ईसनं ल‍गेज येसु कडं गया, आनं 'गुरुजी' आशा सांगीसनं तेना मुक्‍का लीना. 46 मंग ते लोकं येसुवर हात टाकीसनं तेला धरनत. 47 तवं जे चेलं त‍ई हुबं व्हतलत तेस मयथीन येक जन तलवार काडीसनं मोठा याजकना नौकरवर वार करना आनं तेना येक कान कापी टाकना. 48 तवं येसु तेसला सांगना, जशा येखादा चोरला धराला तलवार आनं काठ्या लीसनं जात, तशा तुमं माला धराला वनत का? 49 मी तं दर रोज मंदीरमं तुमनी संगं रहीसनं शीकाडी रहनाल. तवं तुमं माला धरनत ना. पन देवना वचनमं जा लीखेल सय, ता पुरा व्‍हवाला पायजे मनीसनं आशा व्हयना.
50 मंग येसुनं आखं चेलं तेला सोडीसनं पळी गयत. 51 तवं येक जुवान हुगडा आंगवर येक तागाना कपडा पांघरीसनं तेनी मांगं चाली रहनाल. मंग ते लोकं तेला धरनत. 52 पन तो जुवान तो तागाना कपडा टाकीसनं तथाईन हुगडाज पळी गया.
मोठा याजकनी समोर येसुला वीचारपुस करत
(मतय २६:५७-६८; लुक २२:५४-५५, ६३-७१; योहान १८:१३-१४, १९-२४)
53 नंतर ते येसुला मोठा याजक कडं ली गयत. आनं तेपन आखं मुख्य याजक, वडील लोकं आनं नीयम शीकाडनारं गोळा व्हयनत. 54 मंग पेत्र येसुनी मांगं दुरथीन चालता चालता मोठा याजकना आंगनमं जाई लागना. आनं तो सीपाईसनी संगं ईस्तुपन शेकत बसना.
55 तवं मुख्य याजक लोकं आनं न्‍याय करनारं येसुला जीवता मारानी करता तेना वीरुद पुरावा दखी रनलत. पन तेसला काही पुरावा भेटना ना. 56 बरज जन येसुनी वीरुद खोटा पुरावा दीनत, पन तेसना पुरावा येक सारका ना व्हताल. 57 मंग काही जन हुबं रहीसनं येसुनी वीरुद खोटा पुरावा दीसनं सांगनत, 58 हाऊ मानुस आशा बोलताना आमं आयकनं सत का, मानसंसना हातघाई बांधेल हाई मंदीरला मी पाडी टाकसु आनं जो मानसंसना हातघाई बांधेल ना सय, आशा दुसरा मंदीर तीन दीवसमं बांधसु. 59 पन तेसना हाई पुरावा बी येक सारका ना व्हताल.
60 तवं मोठा याजक मजार हुबा रहीसनं येसुला वीचारना, तु कजं काही उतर देय ना? ये तुनी वीरुद जो पुरावा दी रहनं सत, हाई काय सय? 61 पन येसु ऊगाज रहना आनं काही उतर दीना ना. मंग परत मोठा याजक तेला वीचारना, जो देव स्‍तुतीनी करता लायक सय, तो देवना पोर्‍या ख्रीस्‍त तुज सय का? 62 येसु उतर दीना, मी सय. आनं तुमं माला शक्‍तीवान देवना जेवनी कडं बसेल आनं आकासना ढग मयथीन येताना दखशात. 63 तवं मोठा याजक तेना सोतानं कपडं फाडीसनं सांगना, आपुनला आजुन पुरावासनी काय गरज सय? 64 हाई नींदा तुमं आयकनत नं, तुमला कशा वाटय? तवं आखं सांगनत, हाऊ मरनना दंडना लायक सय. 65 मंग काही जन येसुवर थुकाला लागनत. आनं ते तेना डोळा बांधीसनं आनं तेला बुक्‍याजघाई मारीसनं सांगनत, वळख बरं, तुला कोन मारना. मंग सीपाई तेला लीसनं थापड मारनत.
पेत्र येसुला नाकारय
(मतय २६:६९-७५; लुक २२:५६-६२; योहान १८:१५-१८, २५-२७)
66 जवं पेत्र आंगनमं व्हताल, तवं मोठा याजकनी येक काम करनार बाई त‍ई वनी. 67 आनं ती पेत्रला तापताना दखनी. आनं तेनी कडं दखीसनं सांगनी, तु बी नासरेथना येसुनी संगं व्हताल. 68 पन पेत्र नाकारीसनं सांगना, तु काय सांगी रहनी सय, ता माला काही समजय ना. आशा सांगीसनं तो आंगनना कोपराला नींगी गया. तेवडामं कोमडा कोकायना.
69 मंग ती काम करनार बाई आजुन पेत्रला दखनी. आनं जे शेजार हुबं व्हतलत तेसला ती परत सांगाला लागनी का, हाऊ मानुस बी तेस मतला सय. 70 पन पेत्र परत नाकारी दीना. मंग थोडा टाईमनी नंतर शेजार हुबं रहनारं पेत्रला परत सांगनत का, तु खरज तेस मतला सय. कजं का तु येक गालीलना सय. 71 पन तो सोतावर श्राप दीसनं आनं शपथ लीसनं सांगाला लागना का, हाऊ जो मानुसनी बद्दल तुमं बोलत, तेला मी वळखय ना. 72 मंग ल‍गेज दुसरा दाउ कोमडा कोकायना. तवं 'कोमडा दोन दाउ कोकावानी आगुदार तु तीन दाउ माला नाकारशी' आशा जो येसु पेत्रला सांगेल व्हताल, तो तेला याद वना. मंग पेत्र तेनी बद्दल वीचार करीसनं जोरमं रडाला लागना.