13
मंदीरना नास आनं शेवटना दीवसनी बद्दल येसु भवीस्यवानी सांगय
(मतय २४:१-२८; लुक २१:५-२४)
1 मंग येसु आनं तेनं चेलं मंदीर मयथीन नींगी जाई रनलत. तवं तेना येक चेला तेला सांगना, गुरुजी दख, कीतल्या भारी हावाल्या सत, आनं कीतल्या मोठल्या दगडीसघाई बांधेल सत. 2 तो तेला सांगना, या ज्या मोठल्‍या हावाल्‍या तु दखना नं, आतं जशा तु दखय तशा येक दीवस आठी येक बी दगड दुसरा दगडवर रवावु ना. आनं तेस मईन आखा पाडामं येई.
3 मंग येसु आनं तेनं चेलं मंदीरनी समोर जैतुनना डोंगरवर बसेल व्हतलत. तवं पेत्र, याकोब, योहान आनं आंद्रीया तेला गच्चुप वीचारनत, 4 गुरुजी, आमला सांग का, या गोस्टी कवं व्हईत. आनं ज‍वं मंदीर नास व्‍हवाना दीवस जवळ ई लागी तवं काय काय व्हई? आनं काय दखीसनं आमला मायती पडी का, तो दीवस जवळ ई लागना सय? 5 तो तेसला सांगाला लागना, तुमला कोनी फसाडाला नोको पायजे मनीसनं समाळीनं रहज्या. 6 कजं का बरज लोकं मना नावथीन येईत, आनं ‘मी तो ख्रीस्‍त सय’ आशे सांगीसनं बरज जनंसला फसाडीत. 7 आनं जवं तुमं लढाईसनी बद्दल आनं लढाईसनी बोमनी बद्दल आयकशात तवं घाबरशा नोको. कजं का हाई नक्‍की व्हई. पन येवडामं शेवट व्‍हवावु ना. 8 येक जातनं लोकं दुसरा जातवर उठीत. आनं येक देश दुसरा देशवर उठी. जागा जागामं भुकंपं व्हईत आनं दुस्काळ पडीत. या बठ्या गोस्टी मंजे येक बाई पोर्‍याला जल्म देताना सुरुवातमं जशा दुख भोगय, तशा सारका सय. 9 जवं या गोस्टी व्हईत तवं तुमं सोताला समाळजा. कजं का लोकं तुमला पंचंनी समोर हुबं करीत आनं प्राथना घरमं तुमला हानीत. आनं तुमं मावर वीस्वास ठेवनत मनीसनं तुमला ते राज करनार राजासनी समोर हुबं करीत. तवं त‍ई तुमला देवना राज्यनी सुवार्ता सांगानी करता संधी भेटी. 10 हाई जगना नास व्‍हवानी पयलंग आखा देशनं लोकंसला सुवार्ताना प्रचार व्‍हवाला पायजे. 11 लोकं मना साठी तुमला धरीसनं वीचारपुसनी करता तेसना हातमं देईत. तवं तुमं काय बोलना येनी बद्दल आगुदार वीचार नोको करज्या. पन तो टाईममं तुमला जो काही देव प‍ईन सुचाडामं येई तोज बोला. कजं का बोलनारं तुमं ना, पन पवीत्र आत्मा तुमना साठी बोली.
12 लोकं तेसना सोताना भाऊबईनला मारानी करता धरी देईत. आनं मायबाप सोतानं पोरेसला मारानी करता धरी देईत. आनं पोरे मायबापंसवर उठीत, आनं तेसला दुसरंसघाई माराला लाईत. 13 तुमं मावर वीस्वास ठेवनत मनीसनं बरज लोकं तुमला धीकारीत. पन जो मरय ताव वीस्वासमं टीकी रही तेनाज तारन व्हई.
14 (मार्क सांगय का, मी जो लीखी रहना सय, वाचनारं येना आर्थ समजी लेवाना) येक दीवस तुमं दखशात का, देवना मंदीरनी पवीत्र जागाला जो वस्तु खराब करय (जेनी बद्दल दानीयेल तेना पुस्तकमं सांगेल सय), आनं जो त‍ई नोको रव्हाला पायजे, तेला लोकं त‍ई बसाडी देईत. तवं जे लोकं यहुदीयामं सत ते सोताला वाचाडाला डोंगरवर पळी जावाला पायजे. 15 आनं जो कोनी घरवर सय, तो खाल ऊतरीसनं काही लेवानी करता घरमं जाशात नोको. 16 आनं जर येखादा मानुस वावरमं सय तं, तो तेनं कपडं लेवाला घर परत नोको ईजी. 17 ते दीवसमं ज्‍या बाया दोनदीवस्‍या सत आनं ज्‍या दुध पाजनार्‍या सत तेसना साठी हाई पक्‍का भयानक व्हई. 18 हाई हीवाळाना दीवसमं नोको व्‍हवाला पायजे मनीसनं प्राथना करा. 19 कजं का आशा संकटना दीवस येईत का, जवं देव जग बनाडना तवं प‍ईन आज परन कधी आशा व्हयना ना, आनं पुडं बी व्‍हवावु ना. 20 आनं जर ते दीवसला देव कमी ना करता तं, कोनी बी मानुस टीकता ना. पन जेला देव नीवाडेल सय, ते नीवाडेल लोकंसनी करता तो ते दीवसला कमी करेल सय. 21 आनं ते दीवसमं जर कोनी तुमला सांगी का, दखा, ख्रीस्‍त आठी ईयेल सय नातं तई ईयेल सय, तर तेना खरा नोको मानज्या. 22 कजं का खोटा ख्रीस्‍त आनं देवना खोटा वचन सांगनारं येईत. आनं शक्य व्हई तं, ते नीवाडेल लोकंसला फसाडानी करता बराज चमत्कार दखाडीत. 23 पन तुमं समाळीनं रहज्या. दखा, मी तुमला आगुदारज आखा सांगी दीना सय.
येसु दुसरा दाउ जगमं येई
(मतय २४:२९-३१; लुक २१:२५-२८)
24 मंग येसु आखु सांगना, ते संकटंसनी नंतर ते दीवसमं सुर्य आंधारा व्हई जाई आनं चंद्र ऊजाळा देवावु ना. 25 आकास मयथीन चान्न्या पडीत. आनं आकासमं जे काही सत ते बी हालीसनं आथंतथं व्हई जाईत. 26 तवं मानुसला पोर्‍याला मंजे माला मोठी शक्‍तीथीन आनं मोठा मानमं आबुठवर येताना लोकं दखीत. 27 मंग मी मनं दुतंसला धाडीसनं आखा जग मयथीन मनं नीवाडेल लोकंसला गोळा करसु.
येसु परत येई मनीसनं जागं रहज्या
(मतय २४:३२-३५; लुक २१:२९-३३)
28 मंग येसु सांगना, आंजीरना झाड वयथीन येक गोस्टं शीका. आंजीरना झाडंसला पाला फुटाला लागनत तं, आखंसला मायती पडय का, ऊनाळा जवळ ई लागना सय. 29 तशाज जवं या गोस्टी घडताना दखशात, तवं तुमं समजा का, मना येवाना दीवस पक्‍का शेजार ई लागना सय. 30 मी तुमला खरज सांगय का, हाई आखा पुरा व्हई ताव हाई पीढीनं काही लोकं मरावुतंज ना. 31 आकास आनं धरती नास व्हई जाई, पन मना वचन कधी बदलावु ना. 32 ते दीवसनी बद्दल आनं ती येळनी बद्दल कोनलाज मायती ना सय. सोरगं मयलं देव दुतंसला मायती ना सय का पोर्‍याला मंजे माला बी मायती ना सय. पन फक्‍त देवबापलाज मायती सय. 33 तेमन तुमं कायम तरकमं रहज्या आनं तेनी वाट दखीसनं तयारीमं रहज्या. कजं का ती येळ कवं येई ता तुमला मायती ना सय.
34 आतं ती येळनी बद्दल मी तुमला येक ऊदाहरन सांगय, तुमं आयका. येक मानुस व्हताल. येक दीवस तो तेना घर सोडीसनं दुर देशमं गया. मंग जावानी आगुदार तो तेनं नौकरंसला आधीकार दीसनं जेना तेना काम नेमी दीना. आनं राखनारंसला दारपन जागं रव्हानी तो आज्ञा दीना. 35 तशाज तुमं बी जागं रहज्या. कजं का मी कवं ईसु, हाई तुमला मायती ना सय. मी संध्‍याकाळला का आरदी रातला का पाहाटला का सकासला परत ईसु, हाई तुमला मायती ना सय. 36 नातं मी आचानक ईसु आनं तुमला बीगर तयार व्‍हयेल दखसु. 37 आनं जो मी तुमला सांगय, तो आखंसला सांगय, जागं रहज्या.