12
द्राक्षमळाना ऊदाहरन
(मतय २१:३३-४६; लुक २०:९-१९)
1 मंग येसु तेसला ऊदाहरन दीसनं सांगाला लागना, येकदाव कोनी येक मानुस द्राक्षमळा लावना. तो तेनी चारीमेर वडांग करना, आनं द्राक्षसना रसनी करता येक कुंडा बांधना. मंग जागल्‍यासनी करता मळामं येक झोपडी बांधना. मंग तो मळाला गवानद्यासपन दीसनं तो मालक बाहेर देश नींगी गया. 2 मंग द्राक्षसना दीवस वना. तवं तो तेना गवानद्यास प‍ईन काही द्राक्षसना फळ भेटाला पायजे मनीसनं मळा कडं येक नौकरला धाडना. 3 पन ते गवानदे तो नौकरला धरीसनं हाननत आनं रीकामा परत धाडी दीनत. 4 मंग तो मालक परत दुसरा नौकरला तेसनी कडं धाडना. पन ते तेना डोका फोडीसनं आनं तेना आपमान करीसनं तेला बी परत धाडी दीनत. 5 मंग तो मालक आखु येक जनला धाडना. पन तेला ते जीवता मारनत. आनं तो मालक दुसरं बरज जनंसला धाडना. पन ते तशेज करनत. मंजे तेस मयथीन कीतलं जनंसला हाननत आनं कीतलं जनंसना जीव लीनत. 6 नंतर धाडानी करता तो मालकपन फक्‍त तेना येकंज आवडता पोर्‍या व्हताल. तो वीचार करना का, मना पोर्‍याला दखीसनं ते मान देईत. आशा वीचार करीसनं शेवट तो तेना पोर्‍याला तेसनी कडं धाडना. 7 पन ते गवानदे येकमेकंसला सांगनत का, हाऊ वारीस सय, चाला, आपुन येला मारीज टाकुत. तवं मळा आपला व्हई जाई. 8 मंग ते तेला धरीसनं मारी टाकनत आनं मळानी बाहेर फेकी दीनत. 9 मंग तो मळाना मालक काय करी? तो ईसनं ते गवानदेसला नास करी आनं द्राक्षसना मळा दुसरंसना हातमं दी देई. 10 तुमं हाई देवना वचन वाचनत ना का?
"जो दगडला बांधकाम करनारं नाकारी दीनत, तोज कोपराना दगड बनी गया. 11 हाई परभु पईन व्हयना सय. आनं हाई आमला दखानी करता नवलना काम सय".
12 मंग ते मुख्य याजक, नीयम शीकाडनारं आनं परुशी लोकंसला मायती पडना का, हाऊ ऊदाहरन येसु तेसला लाईसनं सांगना. तेमन ते तेला धराला दखु लागनंलत. पन तेसला लोकंसना भीव वाटना. तेमन ते तेला सोडीसनं नींगी गयत.
परुशी लोकं येसुला फसाडानी कोशीत करत
(मतय २२:१५-२२; लुक २०:२०-२६)
13 नंतर ते येसुला बोलामं धरानी करता काही परुशी लोकंसला आनं काही हेरोद राजानी कडनं लोकंसला तेनी कडं धाडनत. 14 मंग ते ईसनं तेला सांगनत, गुरुजी, आमला मायती सय का, तु खरा सय आनं कोनलाज घाबरय ना. तु मानसंसना तोंड दखीसनं बोलय ना, पन देवनी वाट खरज शीकाडय. मंग आमला सांग का, कैसरला कर देवाला पायजे का ना? आमं तो देवुत का ना? 15 पन तो तेसना ढोंग वळखीसनं तेसला वीचारना, तुमं मला कजं फसाडानी कोशीत करत? मापन येक चांदीना रुपया लय या, तेला मी दखसु. 16 मंग ते येक चांदीना रुपया लय वनत. तवं येसु तो रुपया तेसला दखाडीसनं वीचारना, हाऊ रुपयामं कोना तोंड आनं नाव सय? ते सांगनत, कैसरना. 17 तो सांगना, जो कैसरना सय, तो कैसरला द्या आनं जो देवना सय, तो देवला द्या. तवं हाई आयकीसनं तेसला येसुनी बद्दल पक्‍का नवल वाटना.
मरन मयथीन उठानी बद्दल प्रशनं
(मतय २२:२३-३३; लुक २०:२७-४०)
18 मंग सदुकी नावना गठ मयला काही लोकं येसु कडं वनत. सदुकी लोकं शीकाडत का, येकदाव मानुस मरना तं तो परत जीवत व्‍हवु शकय ना. 19 ते ईसनं तेला वीचारनत, गुरुजी, मोसा आमना साठी आशा लीखी ठेयेल सय का,
"जर येखादाना भाऊ बीगर पोरेसोरेसना मरना आनं बायको रहनी तं, तो मरेल मानुसना भाऊ तीनी संगं लगीन करीसनं मरेल भाऊना कुटुमला पुडं वाढाला पायजे."
20 कोनीतरी सात भाऊ व्हतलत. तेस प‍ईन पईला जन बायको करना आनं तो बीगर पोरेसोरेसना मरना. 21 मंग दुसरा भाऊ तीनी संगं लगीन करना. पन तो बी बीगर पोरेसोरेसना मरना. तीसरा बी तशाज व्हयना. 22 तशेज साती भाऊ बीगर पोरेसोरेसनं मरनत. आखंसनी शेवट ती बाई बी मरनी. 23 मंग जवं लोकं मरेल मयथीन उठीत, तवं ती बाई ते साती भाऊसंस मयथीन कोनी बायको व्हई? कजं का साती जनंसनी संगं ती लगीन करेल व्हतील. 24 तो सांगना, तुमला देवना वचन आनं देवनी शक्‍ती मायती ना सय. तेमन तुमं देवना खरा वचनवर वीस्वास ठेवत ना. 25 कजं का जवं लोकं मरन मयथीन उठीत, तवं ते लगीन करावुत ना आनं लगीन करी देवावुत ना. पन ते सोरगं मयलं देव दुतंसनी सारका रहीत. 26 आतं मरेल मयथीन परत उठानी बद्दल मी तुमला सांगय का, मोसाना पुस्तकमं लीखेल झुडपानी गोस्टं तुमं वाचनत ना का? तई देव मोसाला सांगना,
"मी आब्राहामना देव, ईसहाकना देव आनं याकोबना देव सय".
27 तो मरेल लोकंसना देव ना सय, पन जीवतं लोकंसना देव सय. तुमं मरन मयथीन उठानी बद्दल पक्‍कं चुकाय रहनं सत.
आखंसमं मोठी आज्ञा
(मतय २२:३४-४०; लुक १०:२५-२८)
28 तवं नीयम शीकाडनारंस मयथीन येक जन ईसनं तेसनी गोट आयकना. आनं तो दखना का, येसु तेसला कीतला चांगला उतर दीना. मंग हाई दखीसनं तो तेला वीचारना, आख्या आज्ञासमं पयली मोठी आज्ञा कोनती सय? 29 तो सांगना, पयली आज्ञा हाई सय का,
"हे ईस्रायेलनं लोकं आयका, आपला परमेस्‍वर देव येकंज देव सय. 30 तेमन तुमं आपला परमेस्‍वर देववर पुरा रुदयथीन मया करा. आनं पुरा जीवनथीन, पुरी बुधीथीन आनं पुरी शक्‍तीथीन तेनी सेवा करा".
31 आनं दुसरी आज्ञा बी पयली सारकी मत‍वंनी सय. आनं ती हाई सय का,
"जशे तुमं सोतावर मया करत, तशे आपलं शेजारनंसवर बी मया करा."
या दोनी आज्ञा पेक्षा दुसरी कोनतीज आज्ञा मोठी ना सय. 32 मंग तो नीयम शीकाडनार तेला सांगना, गुरुजी, तु खरज बरोबर सांगना का, देव येकंज सय. आनं तेना शीवाय दुसरा कोनीज ना सय. 33 आनं पुरा रुदयथीन तेवर मया कराना आनं पुरा जीवथीन, पुरी बुधीथीन आनं पुरी शक्‍तीथीन तेनी सेवा कराना आनं जशा सोतावर तशा आपला शेजारनंसवर मया कराना हाई आखं आर्पन आनं बलीदान पेक्षा जास्त मत‍वंना सय. 34 मंग तो समझदारथीन उतर दीना हाई दखीसनं येसु तेला सांगना, तु देवना राज्‍य प‍ईन दुर ना सय. तवं प‍ईन आजुन तेला फसाडानी करता कोनी बी काही प्रशनं वीचारानी हीम्‍मत करनत ना.
ख्रीस्‍त दावीदना पोर्‍या परभु सय
(मतय २२:४१-४६; लुक २०:४१-४४)
35 नंतर येसु मंदीरमं शीकाडी रहनाल. तवं तो सांगना, नीयम शीकाडनारं कसाला सांगत का, ख्रीस्‍त दावीदना पोर्‍या सय? 36 कजं का दावीद सोता पवीत्र आत्माघाई सांगना का,
"परमेस्‍वर मना परभुला सांगना, मी तुना वैरीसला तुना पायनी खाल ली येय ताव तु मना जेवनी कडं बस."
37 जर दावीद सोता ख्रीस्‍तला परभु सांगय, तं ख्रीस्‍त कशा दावीदना पोर्‍या सय? तवं मोठी लोकंसनी गरदी आनंदमं तेना वचन आयकी रनलत.
येसु नीयम शीकाडनारंसनी बद्दल सांगय
(मतय २३:१-३६; लुक २०:४५-४७)
38 जवं येसु लोकंसला शीकाडी रहनाल, तवं तो सांगना, नीयम शीकाडनारंसनी बद्दल समाळीनं रहज्या. तेसला लांबं कपडं घालीसनं फीराला आवडय. आनं बाजारमं लोकं तेसला नमस्‍कार कराला पायजे, हाई तेसला आवडय. 39 तेसला प्राथना घरमं मुख्य जागा आनं जेवनला बसाला चांगली जागा आवडय. 40 ते वीधवासनं घरं खाई टाकत आनं दखावानी करता लांबी लांबी प्राथना करत. देव तेसला पक्‍का मोठा दंड देई.
गरीब वीधवाना दान
(लुक २१:१-४)
41 नंतर येसु मंदीरमं दानपेटीनी समोर बसेल व्हताल. लोकं कशे दानपेटीमं पैसा टाकत, हाई तो दखी रहनाल. तवं बरज धनवान लोकं पक्‍कं पैसा टाकनत. 42 मंग येक गरीब वीधवा वनी आनं दोन तांबाना पयसा टाकनी. ते येक रुपयानी बराबर बी ना व्हतलत. 43 तवं तो तेनं चेलंसला जवळ बलाईसनं सांगना, मी तुमला खरज सांगय का, जे दानपेटीमं टाकी रहनं सत ते आखंस पेक्षा हाई गरीब वीधवा जास्त टाकनी. 44 कजं का ते आखंसपन जो भरपुर व्हताल तेस मयथीन ते काही दान दीनत. पन ती गरीब रहीसनं बी तीपन तीना जीवन जगानी करता जा व्हताल, ता आखा टाकी दीनी.