11
येसु यरुशलेम शेहेरमं राजा सारका जाय
(मतय २१:१-११; लुक १९:२८-३८; योहान १२:१२-१९)
1 मंग येसु आनं तेनं चेलं यरुशलेम शेहेरनी शेजारना जैतुनना डोंगरपन बेथफगे आनं बेथानी गाव जवळ वनत. तवं तो तेनं दोन चेलंसला आशा सांगीसनं धाडना का, 2 तुमं समोरना गावमं जाज्या. आनं तई जाताज जेवर कोनी मानुस बसेल ना सय, आशा येक गदडा तुमला बांधेल दखाई. तेला सोडीसनं मापन लय या. 3 जर कोनी तुमला वीचारना का, तुमं हाई गदडाला कजं सोडी रहनं सत? तवं सांगा का, परभुला येनी गरज सय, आनं तो येला लगेज आठी परत धाडी. 4 तवं ते दोन चेलं नींगनत. आनं तेसला येक गल्लीमं दारपन बांधेल येक गदडा दखायना. मंग ते तेला सोडाला लागनत. 5 तवं तई हुबं रहनारं तेसला वीचारनत, हाई गदडाला तुमं कजं सोडी रहनं सत? 6 मंग येसु जशा सांगनाल तशा ते उतर दीनत. तवं ते लोकं तो गदडाला ली जावु दीनत. 7 नंतर ते चेलं तो गदडाला येसु कडं लीनत आनं तेवर तेसनं कपडं टाकनत. मंग येसु तो गदडावर बसना.✞ 8 मंग बरज लोकं तेसनं कपडं वाटवर आथरनत. आनं दुसरं लोकं बी वावर मयथीन झईडं तोडी लयनत आनं वाटवर पसारनत. 9 आनं पुडं चालनारं आनं मांगं चालनारं आराळ्या दीसनं सांगनत,
✞"होसान्ना, जो परभुना नावमं ई रहना सय तो धन्य सय. 10 आमना बाप दावीदना येनार राज्य धन्य सय. सोरगंमं होसान्ना."
11 नंतर येसु यरुशलेममं ईसनं मंदीरमं गया आनं चारीमेर आखंकाही दखना. मंग जवं संध्याकाळ व्हयनी, तवं तो तेनं बारा चेलंसनी संगं बेथनी गावमं नींगी गया.
येसु आंजीरना झाडला श्राप देय
(मतय २१:१८-१९)
12 मंग दुसरा रोजला येसु आनं तेनं चेलं बेथानी मयथीन नींगनत. तवं तेला भुक लागनी. 13 आनं तो पानंसना भरेल येक आंजीरना झाड दुरथीन दखना. आनं कदाचीत तेवर काहीतरी फळ भेटी हाई आसा लीसनं तो झाडपन गया. पन तो तई जावा नंतर पानं शीवाय तेला काही फळ दखायना ना. कजं का तवं आंजीरना सीजन ना व्हताल. 14 तवं येसु तो झाडला सांगना, येनी पुडं कोनी बी तुना फळ कधीज खावावुत ना. तवं तेनं चेलं हाई आयकनत.
येसु मंदीरला चांगला करय
(मतय २१:१२-१७; लुक १९:४५-४८; योहान २:१३-२२)
15 मंग येसु आनं तेनं चेलं आजुन यरुशलेम शेहेरमं वनत. तवं येसु मंदीरमं जाईसनं तई ✞बेपारीसला बाहेर काडाला लागना. आनं तो ✞पैसासना आदल बदल करनारंसना टेबल फेकी दीना, आनं खबुदर ईकनारंसन्या खुडच्या ऊलट्या करी दीना. 16 आनं तो मंदीरमं लागी कोनला बी काही वस्तु ली जावु दीना ना. 17 आनं तो तेसला शीकाडताना सांगना, देवना वचनमं आशा लीखेल सय का,
✞"हाई मना मंदीरला आखं देशनं लोकंसनी करता प्राथनाना घर सांगामं येई."
पन तुमं तेला लुटारुसना घर करी टाकनं सत.
18 हाई आयकीसनं मुख्य याजक लोकं आनं नीयम शीकाडनारं तेला जीवता मारानी बेत करनत. कजं का आखं लोकंसला तेना शीक्षन वयथीन नवल वाटनाल. तेमन ते मुख्य याजक लोकं आनं नीयम शीकाडनारंसला भीव वाटाला लागना का, येसु आम पेक्षा जास्त नावाजाय जाई.
19 मंग संध्याकाळ व्हयनी तं येसु आनं तेनं चेलं यरुशलेमनी बाहेर नींगी गयत.
येसु वीस्वासनी शक्तीनी बद्दल शीकाडय
(मतय २१:२०-२२)
20 मंग येसु आनं तेनं चेलं सकासला वाटधरी जाई रनलत. तवं ते दखनत का, तो आंजीरना झाड मुळास पईन सुकाय गया सय. 21 तवं पेत्रला याद वना आनं तो येसुला सांगना, गुरुजी दख, तु जो आंजीरना झाडला श्राप दीनाल तो सुकाय गया सय. 22 येसु तेसला सांगना, देववर वीस्वास ठेवा. 23 मी तुमला खरज सांगय का, जो कोनी तेना रुदयमं शंका ना धरता 'मी जो सांगना तो व्हई' आशा वीस्वास ठेईसनं हाई डोंगरला सांगी का, 'तु ऊपडीसनं समुद्रमं टाकाय जा' तं, तेना साठी तशाज व्हई. 24 मी तुमला सांगय का, जा काही तुमं प्राथना करीनं मांगशात, ता तुमला भेटेलज सय आशा वीस्वास ठेवा. तवं ता तुमला भेटी. 25 जवं तुमं प्राथना करशात, तवं तुमना मनमं कोनी बद्दल काही बी व्हई तं, तेला माफ करा. येनी करता का तुमना सोरगं मतला देवबाप बी तुमना पापनी माफी देवाला पायजे. 26 पन जर तुमं दुसरंसला माफी ना दीनत तं, तुमना सोरगं मतला देवबाप बी तुमना पापनी माफी देवावु ना.
येसुना आधीकारनी बद्दल प्रशनं
(मतय २१:२३-२७; लुक २०:१-८)
27 मंग येसु आनं तेनं चेलं परत यरुशलेममं वनत. आनं येसु मंदीरमं फीरी रहनाल. तवं काही मुख्य याजक, नीयम शीकाडनारं आनं परुशी लोकं ईसनं तेला वीचारनत, 28 तु कोनता आधीकारथीन या गोस्टी करय? आनं या गोस्टी कराला तुला कोन आधीकार दीना सय? 29 तो तेसला सांगना, मी बी तुमला येक प्रशनं वीचारय. जर तुमं माला तो प्रशनंना उतर दीशात तं, कोनता आधीकारथीन मी या गोस्टी करय ता मी तुमला सांगसु. 30 माला सांगा का, बापतीस्मा करनार योहानला बापतीस्मा देवानी करता कथाईन आधीकार भेटेल व्हताल, देव पईन का मानुस पईन? 31 तवं ते आपसमं वीचार कराला लागनत, जर आपुन 'देव पईन व्हताल' आशा सांगु तं, तो सांगी का, मंग तुमं कजं तेवर वीस्वास ठेवनत ना? 32 आनं जर आपुन 'मानुस पईन व्हताल' आशा सांगु तं, लोकं आपुनवर राग करीत’. लोकंसना तेसला भीव वाटना. कजं का आखं लोकं मानतत का योहान खरज देवना वचन सांगनार व्हताल. 33 मंग ते तेला सांगनत, आमला मायती ना सय. तवं तो तेसला सांगना, मंग मी बी तुमला सांगावु ना का, कोनता आधीकारथीन मी या गोस्टी करय.