10
लगीन आनं फारकटीनी बद्दल येसु शीकाडय
(मतय १९:१-१२; लुक १६:१८)
1 मंग येसु आनं तेनं चेलं कफरनाहुम शेहेर मयथीन नींगीसनं यहुदीया भागना यार्दन नदीनी तथानी बाजुमं गयत. तवं परत लोकंसनी गरदी येसुपन ईसनं तेनी चारीमेर गोळा व्हयनी. आनं जशा तो लोकंसला शीकाडता वना, तशा तेसला बी शीकाडाला लागना.
2 मंग काही परुशी लोकं ईसनं येसुला फसाडानी करता वीचारनत, येक मानुसला तेनी बायकोला फारकटी देवानी करता यहुदीसना नीयममं परवानगी देयेल सय का? 3 पन तो तेसला वीचारना, येनी बद्दल मोसा तुमला काय आज्ञा देयेल सय? 4 ते सांगनत, ✞येक कागदवर फारकटीनी बद्दल लीखी दीसनं बायकोला सोडाना मोसा परवानगी देयेल सय. 5 तो सांगना, तुमना रुदय कठीन सय मनीसनं तो हाई आज्ञा तुमना साठी लीखी दीना. 6 पन सुरुवातमं ✞देव मानुस आनं बाईला बनाडना.
7 ✞ "येनी करता मानुस तेना मायबापंसला सोडीसनं तेनी बायकोनी संगं येक व्हईसनं रही. आनं ते दोनी येक शरीर सारका व्हई जाईत".
8 आनं देवनी नजरमं ते पुडं दोन ना, पन येक शरीर सत. 9 येनी करता देव जा जोडेल सय, तेला मानुस तोडाला नोको पायजे.
10 नंतर घरमं येसुनं चेलं परत फारकटीनी बद्दल तेला वीचारनत. 11 तवं तो सांगना, जो कोनी सोतानी बायकोला सोडी देय आनं दुसरी बायको करय, तो तेनी बायकोनी वीरुद शीनाळीना काम करय. 12 आनं जर येखादी बाई तीना नवराला सोडीसनं दुसरा नवरा करनी तं, ती बी शीनाळीना काम करय.
येसु धाकलं पोरेसला आशीर्वाद देय
(मतय १९:१३-१५; लुक १८:१५-१७)
13 मंग काही लोकं तेसनं धाकलं पोरेसला येसुपन ली वनत. कजं का तो तेसवर हात ठेईसनं आशीर्वाद देवाला पायजे मनीसनं तेसनी ईशा व्हतील. पन तेनं चेलं तेसला डोकाडनत. 14 हाई दखीसनं येसुला पक्का वाईट वाटना. आनं तो सांगना, पोरेसला मापन येवु द्या, तेसला मना करु नोका. कजं का येसनी सारकंज लोकं देवना राज्यमं जाईत. 15 मी तुमला खरज सांगय का, जो कोनी धाकलं पोरेसनी सारका देवना राज्यला स्वीकार करय ना, तो तई कधी जावावु ना. 16 मंग तो ते पोरेसला कवटाळीनं आनं तेसवर हात ठेईसनं तेसला आशीर्वाद दीना.
कायमना जीवननी बद्दल येक श्रीमंत मानुस येसुला प्रश्नं वीचारय
(मतय १९:१६-३०; लुक १८:१८-३०)
17 मंग येसु आनं तेनं चेलं वाटधरी जावानी करता तयार व्हई रनलत. तवं येक मानुस पळत वना आनं येसुनी पुडं गुडगं टेकीसनं तेला वीचारना, हे चांगला गुरुजी, कायम देवनी संगं जीवन जगानी करता मी काय कराला पायजे? 18 मंग येसु तेला वीचारना, तु माला कजं चांगला सांगय? फक्त देव शीवाय कोनी बी चांगला ना सय. 19 तुला तं या देवनी आज्ञा मायती सत,
✞"खुन करु नोको, शीनाळीना काम करु नोको, चोरी करु नोको, दुसरंसनी बद्दल खोटा बोलु नोको, कोनला बी ठगाडु नोको आनं तुना मायबापना मान ठेव".
20 तो मानुस सांगना, गुरुजी, मी मना धाकलपन पईथीन या आख्या आज्ञा पाळी रहना सय. 21 मंग येसु तो मानुसवर पक्का मया करना आनं तेनी कडं दखीसनं सांगना, तुमं येक गोस्टंनी कमी सय. तुपन जा सय, ता आखं ईकीसनं गरीबंसला दी दे. आनं चाल, मनी मांगं ये. तवं तुला सोरगंमं देव पईन आत्मीक धन भेटी. 22 हाई आयकीसनं तो मानुसना तोंड ऊतरी गया. आनं तो पक्का दुखी व्हईसनं नींगी गया. कजं का तो पक्का श्रीमंत व्हताल आनं तेना धन सोडाना मन ना व्हताल.
23 तवं येसु चारीमेर दखीसनं तेनं चेलंसला सांगना, जे लोकं सोताना धनवर भरोसा ठेवत तेसला देवना राज्यमं जावानी करता पक्का कठीन सय. 24 हाई आयकीसनं तेनं चेलंसला ✞नवल वाटना. पन परत येसु तेसला सांगना, पोरेसवन, जे लोकं तेसना धनवर भरोसा ठेवत, तेसला देवना राज्यमं जावाला पक्का कठीन सय. 25 तेसला देवना राज्यमं जावा पेक्षा, हुटला सुयना नाक मयथीन जावाला सोपा सय. 26 हाई आयकीसनं तेसला आजुन पक्का नवल वाटना. आनं ते येकमेकंसला सांगाला लागनत का, तं मंग कोना तारन व्हई? 27 येसु तेस कडं दखीसनं सांगना, मानुसला हाई शक्य ना सय पन देवला शक्य सय. कजं का आख्या गोस्टी देवला शक्य सत.
28 मंग पेत्र येसुला सांगना, दख, आमं आखंकाही सोडीसनं तुनं चेलं बनेल सत. 29 तवं तो सांगना, मी तुमला खरज सांगय का, जो कोनी मना साठी आनं सुवार्ता सांगानी करता घरदार, भाऊबईन, मायबाप, पोरेसोरे आनं शेतीवाडी सोडेल सय, 30 तेला वीरोध वना तरी, हाई जगमं तेला शंबरपट घरदार, भाऊबईन, मायबाप, पोरेसोरे आनं शेतीवाडी भेटी. आनं येनारा काळमं तो कायम देवनी संगं जीवन जगी. 31 पन येनारा काळमं हाई जगमं मोठलं लोकं गरीब व्हई जाईत आनं गरीब लोकं मोठलं व्हई जाईत.
येसु तेना मरननी बद्दल तीसरा दाउ भवीस्यवानी सांगय
(मतय २०:१७-१९; लुक १८:३१-३४)
32 नंतर येसु आनं तेनं बारा चेलं यरुशलेम शेहेरनी वाटधरी जाई रनलत. तवं येसु तेसनी मोरं चालु लागनाल. तवं बारा चेलंसला नवल वाटना आनं तेसनी मांगं येनारं लोकं भीवाय गयत. मंग येसु परत तेनं बारा चेलंसला जवळ बलावना आनं तेना सोताना काय व्हयनार सय हाई तो तेसला सांगु लागना. 33 तो सांगना, दखा, आपुन यरुशलेम शेहेरमं जाई रहनं सत. तई माला मुख्य याजक लोकंसना आनं नीयम शीकाडनारंसना हातमं देवामं येई. आनं ते माला जीवता माराना दंड ठराईत. आनं ते माला बीगर यहुदी लोकंसना हातमं देईत. 34 आनं ते बीगर यहुदी लोकं मनी थट्टा करीत आनं मावर थुकीत. ते माला काकडाघाई हानीत आनं माला जीवता मारीत. पन तीन दीवसनी नंतर मी मरन मयथीन परत उठसु.
येसु येक दुसरंसनी सेवा करानी बद्दल शीकाडय
(मतय २०:२०-२८)
35 नंतर जबदीनं पोरे याकोब आनं योहान येसुपन वनत. आनं ते तेला सांगनत, गुरुजी, जा काही आमं तुपन मांगसुत, ता तु आमना साठी कराला पायजे. 36 तो सांगना, मी तुमना साठी काय करु सांगा. 37 ते सांगनत, जवं तु लोकंसवर राज्य करशी, तवं आम मयथीन येकला तुना जेवनी कडं आनं येकला डावी कडं बसीसनं तुनी संगं राज्य कराला आधीकार दीजी. 38 पन तो सांगना, तुमं मापन काय मांगी रहनं सत ता तुमला समजय ना. जो दुख मी भोगनार सय, तो तुमं भोगु शकसात का? आनं जशा मी मरनार सय तशा तुमं मरु शकसात का? 39 मंग ते सांगनत, आमला शक्य सय. तवं तो सांगना, हाई खरज सय का, जो दुख मी भोगनार सय, तो तुमं भोगशात आनं जशा मी मरनार सय तशा तुमं मरशात, 40 पन मना जेवनी कडं का मना डावी कडं बसीनं राज्य करु देवाना आधीकार मापन ना सय, पन देवबापपन सय. आनं तो पयलं पईन हाई नक्की करेल सय का, कोन मना जेवनी आनं कोन मना डावी कडं बसी.
41 मंग याकोब आनं योहान येसुला जा सांगनत, ता आयकीसनं बाकी दहा चेलं तेसवर संताप करनत. 42 तवं येसु ते आखंसला शेजार बलाईसनं सांगना,तुमला मायती सय का, जे हाई जगमं लोकंसवर सत्ता चालाडी रहनं सत, ते तेसवर जुलुम करत. आनं तेसनं मोठलं लोकं तेसवर आधीकार चालाडत. 43 पन तुमना मजार तशा नोको व्हवाला पायजे. तर जो कोनी तुमना मजार मोठा व्हवाला दखय, तो तुमना सेवक बनाला पायजे. 44 आनं जो कोनी तुमना मजार मोठा व्हवाला दखय, तो आखंसनी सेवा कराला पायजे. 45 कजं का दुसरं लोकं मनी सेवा कराला पायजे मनीसनं मी हाई जगमं वना ना. पन दुसरंसनी करता सेवा कराला आनं लोकंसना पापना दंड पईन सुटका देवानी करता सोताना जीवन बलीदान कराला मी वना सय.
आंधळा बार्तीमयला येसु दखता करय
(मतय २०:२९-३४; लुक १८:३५-४३)
46 नंतर येसु आनं तेनं चेलं यरीहो शेहेरमं वनत. मंग ते आनं मोठी लोकंसनी गरदी यरीहो मयथीन बाहेर जाई रनलत. तवं बार्तीमय नावना येक आंधळा मांगतारा वाटवर बसेल व्हताल. तो तीमयना पोर्या व्हताल. 47 तो आयकना का, नासरेथना येसु हाई वाटधरी जाई रहना सय. तवं तो आराळ्या दीसनं सांगाला लागना, हे येसु, ✞दावीदना पोर्या, मावर दया कर. 48 तवं बरज जन तेला ढटाडीसनं सांगनत, ऊगाज रह. पन तो जोरमं आराळ्या दीसनं सांगाला लागना, हे दावीदना पोर्या, मावर दया कर. 49 मंग येसु हुबा रहीसनं तेला बलावाला सांगना. मंग ते लोकं तो आंधळाला बलाईसनं सांगनत, धीर धर आनं उठ, येसु तुला बलाय रहना सय. 50 तवं तो आंधळा तेना पांघराना कपडा टाकीसनं लगेज उठना आनं येसु कडं वना. 51 येसु तेला सांगना, तुला काय पायजे? आनं मी तुना साठी काय करु? तो सांगना, गुरुजी, माला दखावाला पायजे. 52 येसु सांगना, जा, तु मावर वीस्वास ठेवना मनीसनं बरा व्हई गया सय. तवं लगेज तेला दखावाला लागना. आनं वाटधरी तो बी येसुनी मांगं चालाला लागना.