2
येसुना जल्म वय
(मतय १:१८-२५)
1 ते दीवसमं मोठा राजा कैसर आगुस्‍त आशा हुकुम दीना का, रोम सरकारनी खाल रहनार आखं लोकंसनी नाव नोंदनी व्‍हवाला पायजे. 2 जवं कीरीनीय नावना मानुस सुरीया राज्यना आधीकारी व्हताल, तवं हाई नाव नोंदनी व्हयनी. आनं हाई रोम सरकारनी पयली नाव नोंदनी व्हतील 3 तवं आखं लोकं नाव नोंदनी कराला जेनतेना वाडावडीलंसना गावंसला गयत. 4 आनं योसेफ दावीद राजानी पीढीना आनं तेना कुळना व्हताल. आनं दावीद राजा यहुदीया जील्‍लाना बेथलहेम गावना व्हताल. तेमन योसेफ बी गालील जील्‍लाना नासरेथ शेहेर मयथीन वर यहुदीया जील्‍लाना बेथलहेम गावमं गया.
5 तवं योसेफना साकरपुडा मरीयानी संगं व्हयेल व्हताल. आनं ती पवीत्र आत्माघाई दोनदीवसी व्हतील. तवं योसेफ मरीयाला बी तेनी संगं ली गया. 6 मंग जवं ते बेथलेहेममं व्हतलत, तवं तीना दीवस भरी गयात. 7 आनं ती तीना पयला पोर्‍याला जल्म दीनी. आनं तेला धुडकामं गुंडाळीसनं त‍ई गव्‍हानमं ठेवनी. कजं का तेसला रव्हानी करता धर्मशाळामं जागा ना व्हतील.
देवना दुत ठेलारी लोकंसला येसुना जल्मनी बद्दल सांगय
8 तवं त‍ई बेथलहेम भागमं काही ठेलारी लोकं वावरंसमं रहतत. ते रातना टाईमला तेसना मेंडीसना गवारा राखी रनलत. 9 तवं आचानक येक परभुना दुत तेसला दखायना. आनं परभुना तेज तेसनी चारीमेर पडना. आनं ते पक्‍का घा‍बरी गयत. 10 मंग तो देवना दुत तेसला सांगना, भीवु नोका. कजं का मी तुमला येक चांगली गोस्टं सांगय. हाई चांगली गोस्टं आखं लोकंसला आनंद देई. 11 ती गोस्टं हाई सय का, आज तुमना साठी दावीद राजाना गावमं तारन देनारना जल्म व्हयना सय. तोज देवना धाडेल राजा आनं परभु सय. 12 आनं तुमना साठी हाई नीशानी सय का, धुडकामं गुंडाळेल आनं गव्‍हानमं नीजाडेल येक पोर्‍याला तुमं दखशात. 13 तीतलामं आचानक सोरगं मयथीन देवनं बरज दुतं तो दुतपन गोळा व्हयनत. आनं देवनी स्‍तुती करीसनं ते सांगनत का, 14 आमं सोरगंमं देवनी स्‍तुती करत. आनं धरतीवर जे मानसंसवर देव खुश सय तेसमं शांती रही.
15 मंग ते देवनं दुतं तेस प‍ईन सोरगंमं नींगी गयत. तवं ठेलारी लोकं येकमेकंसला सांगाला लागनत का, चाला, आपुन आतंज बेथलहेम गावमं जावुत. आनं जी गोस्टं घडेल सय आनं देव आपुनला सांगना सय, ती दखुत. 16 मंग ते घाईघाईमं गयत. आनं तेसला मरीया, योसेफ आनं गव्‍हानमं नीजाडेल येक पोर्‍या दखायना. 17 आनं ते तो पोर्‍याला दखनत आनं तेनी बद्दल देवना दुत जी गोस्टं तेसला सांगेल व्हताल, ती आखंसला सांगनत. 18 आनं आखं आयकनारंसला ठेलारंसनी सांगेल गोस्टं वयथीन नवल वाटना. 19 पन मरीया या आख्या गोस्टी तीना मनमं ठेवनी आनं येनी बद्दल पक्‍का वीचार कराला लागनी. 20 नंतर ते ठेलारी लोकं तेसनं वावरंसमं परत नींगी गयत. आनं ते देवनी पक्‍की स्‍तुती करनत. कजं का जशा तेसला सांगामं ईयेल व्हताल, तशाज ते आख्या गोस्टी आयकनत आनं दखनत.
येसुनी सुन्नत वीधी करत आनं नाव ठेवत
21 मंग तो पोर्‍याना जल्मना आठवा रोजला तेनी सुन्नत वीधी करनत. तवं तेना नाव येसु ठेवनत. कजं का मरीया बाईला दीवस रव्हानी पयलंग हाई नाव देवना दुत तीला सांगेल व्हताल.
देवना मंदीरमं येसुला आर्पन करत
22 मंग मोसाना नीयम प्रमानं मरीया आनं योसेफना शुधं कराना दीवस वना. तवं ते येसुला यरुशलेमना मंदीरमं ली गयत. आनं तेला परभुनी समोर आर्पन करनत. 23 कजं का देवना नीयममं आशा लीखेल सय का,
"आखा पयला पोरेसला परभुना हातमं सोपी देवाला पायजे."
24 आनं देवना नीयममं लीखेल सय का, जे शुधं करानी करता जात,
"ते खबुदरना येक जोडा नातं पारवंसनं दोन पीलं देवना नावमं बलीदान करानी करता ली जावाला पायजे".
तेमन ते बी बलीदान करानी करता यरुशलेमना मंदीरमं गयत.
शीमोन येसुनी बद्दल भवीस्‍यवानी सांगय
25 तवं शीमोन नावना येक मानुस यरुशलेम शेहेरमं व्हताल. तो नीतीवान आनं देवनी भक्‍ती करनार व्हताल. आनं पवीत्र आत्मा तेनी संगं व्हताल. आनं ईस्रायेल लोकंसना दुख दुर करानी करता देवना धाडेल राजा येई मनीसनं तो पक्‍का वाट दखी रहनाल. 26 आनं पवीत्र आत्मा तेला सांगेल व्हताल का, परभुना धाडेल राजाला दखानी आगुदार तु मरावु ना. 27 आनं जवं मरीया आनं योसेफ धाकला येसुला मोसाना नीयम प्रमानं वीधी करानी करता मंदीरमं ली गयत, तवं पवीत्र आत्मानी ईशा द्वारा शीमोन बी मंदीरमं वना. 28 मंग तो येसुला दखीसनं तेला हातमं लीना. आनं देवना आभार मानीसनं सांगना, 29 हे परभु, जशा तु माला वचन देयेल व्हताल, तशाज तु करना सय. तेमन आतं तुना दासला शांतीमं मरु दे. 30 कजं का जो तारन देनारला तु धाडेल सय तेला मना सोताना डोळासघाई मी दखना सय. 31 तेला तु आखं लोकंसनी समोर धाडना सय. 32 आनं तो बीगर यहुदी लोकंसला तुनी वाट दखाडानी करता येक ऊजाळा सय. आनं तो तुनं ईस्रायेल लोकंसनी करता मोठा मान ली येई.
33 मंग येसुनी बद्दल शीमोन जा सांगाना, ता आयकीसनं मरीया आनं योसेफला नवल वाटना. 34 मंग शीमोन तेसना साठी देव कडथीन आशीर्वाद मांगना. आनं येसुनी माय मरीयाला तो सांगना, ईस्रायेल लोकंसमं बरज जनंसला दंड देवानी करता आनं बरज जनंसला तारन देवानी करता देव हाई पोर्‍याला धाडना सय. आनं लोकंसला देवनी हाई योजना प्रगट करानी करता देव येला नेमेल सय. पन बरज लोकं तेना वीरुद बोलीत. 35 आनं तो बरज लोकंसना मनना वीचार हुगडा करी. तेमन लोकं तेला पक्‍कं हाल करीत. आनं तेना दुख मुळे तुना रुदयला पक्‍का दुख भेटी.
हन्ना बाई येसुना दरशन करय
36 तवं त‍ई देवना वचन सांगनार येक बाई व्हतील. तीना नाव हन्ना व्हतील. ती आशेरनी पीढी मतला फनुयेलनी पोर व्हतील. आनं ती पक्‍की धयडी व्हई जायेल व्हतील. आनं ती लगीन करीसनं तीना नवरापन फक्‍त सात वरीस रहनील. नंतर तीना नवरा मरी जायेल व्हताल. 37 ती चौराशी वरीसनी व्हतील. आनं तो परन वीधवा रहीसनं जीवन जगनी. ती कधी मंदीर सोडनी ना. पन त‍ई रहीसनं रात नं दीवस देवनी सेवा करती आनं ऊपास आनं प्राथना करती. 38 मंग ती लगेज मरीया आनं योसेफनी जवळ वनी आनं तो पोर्‍यानी बद्दल देवना आभार माननी. आनं यरुशलेमनं लोकंसला देव सुटका करी मनीसनं जे वाट दखी रनलत, ते आखंसला तेनी बद्दल सांगाला लागनी.
येसुना धाकलपन
39 मंग मोसाना देयेल नीयम प्रमानं मरीया आनं योसेफ आखी रीत पुरी करनत. आनं ते गालील जील्‍लाना तेसना गाव नासरेथमं परत वनत. 40 मंग येसु मोठा व्हईसनं ताकतवान आनं बुधीवान व्हयना. आनं देवनी दया तेवर व्हतील.
41 आनं दर वरीस योसेफ आनं मरीया वल्‍हांडनना सन पाळानी करता यरुशलेम मंदीरमं जातत. 42 मंग जवं येसु बारा वरीसना व्हयना, तवं तेसनी रीत प्रमानं ते तेला लीसनं तो सन पाळाला यरुशलेम मंदीरमं गयत.
43 मंग जवं तो सनना दीवस सरना, ते घर परत जावाला नींगनत. तवं येसु यरुशलेम मंदीरमंज मांगं रही गया. आनं हाई तेनं मायबापंसला मायती पडना ना. 44 तेसला वाटना का, तो वाटधरी सोपतीसनी संगं व्हई. आशे वीचार करीसनं ते येक दीवसनी रस्ता चालीसनं नींगी गयत. नंतर जवं तो सापडना ना, ते नातेवाईकंसमं आनं वळखनंसमं तेला दखतं फीरनत. 45 पन त‍ई बी तो तेसला सापडना ना. तेमन तेला दखत दखत ते परत यरुशलेममं ई लागनत. 46 मंग तीन दीवसनी नंतर तो तेसला मंदीरमं सापडना. तो यहुदी गुरुजीसनी संगं बसीसनं तेसन्‍या गोस्टी आयकी रहनाल आनं तेसला प्रशनं वीचारी रहनाल. 47 आनं जे लोकं तेना बोलाना आयकनत, ते आखंसला तेनी बुधी आनं उतर वयथीन नवल वाटना.
48 मंग तेला दखीसनं तेना मायबापंसला बी नवल वाटना. आनं तेनी माय तेला वीचारनी, पोर्‍या, तु आमनी संगं कजं आशा करना? दख, तुना बाप आनं मी कीतला घाबरीसनं तुला दखतं वनत. 49 तो तेसला सांगना, तुमं कजं मला दखाला वनत? मी मना बापनी घरमं रव्हाला पायजे मनीसनं तुमला मायती ना सय का? 50 पन तो जा बोलना, ता तेसला समजना ना. 51 मंग तो तेसनी संगं नींगीसनं नासरेथमं गया आनं तेसनी आज्ञा पाळाला लागना. आनं तेनी माय या आख्या गोस्टी तीना मनमं ठेवनी. 52 मंग येसु बुधीमं आनं शरीरमं वाढाला लागना. आनं देव तेवर पक्‍का मया करना आनं लोकं बी तेवर मया करनत.