24
येसु मरन मयथीन जीवता उठय
(मतय २८:१-१०; मार्क १६:१-८; योहान २०:१-१०)
1 मंग आठोडाना पयला रोजला मंजे रवीवारना रोजला मोठी पाहाटला त्या बाया तयार करेल सुगंधी वस्तु लीसनं कबरपन गयात. 2 तवं त्या दखन्यात का, कबर वयली दगड बाजुला सरकाईसनं ठेयेल सय. 3 मंग त्या बाया ती कबर मजार गयात. पन तीसला परभु येसुना शरीर सापडना ना. 4 मंग त्या वीचारमं पडी गयात. तवं लगेज धवळंचप कपडं घालेल दोन ✞जन तीसनी शेजार हुबं रहनत. 5 मंग त्या पक्का घाबरी गयात आनं तेसला नमन कराला लगेज खाल मान करन्यात. मंग ते दोन जन त्या बायासला सांगनत, जो जीवता सय, तेला तुमं मरेलंसमं कजं दखत? 6 तो आठी ना सय, पन तो मरन मयथीन परत उठी गया सय. जवं तो गालील जील्लामं व्हताल, तवं तो तुमला जा सांगेल व्हताल ता याद करा. 7 तो आशा सांगेल व्हताल का, मानुसना पोर्याला मंजे माला पापी लोकंसना हातमं धरी देवामं येई. आनं कुरुस खांबामं ठोकामं येई. पन तीसरा रोजला मी परत जीवता उठसु.
8 तवं येसु जा सांगेल व्हताल ता तीसला याद वना. 9 आनं कबर पईन परत जाईसनं त्या येसुनं आकरा चेलंसला आनं बाकी दुसरं जनंसला हाई आख्या गोस्टी सांगन्यात. 10 त्या बाया मगदालीया मरीया, योहान्ना आनं याकोबनी माय मरीया व्हतल्यात. आनं तीसनी संगं ज्या दुसर्या बाया व्हतल्यात, त्या बी हाई हाकीगत चेलंसला सांगन्यात. 11 पन ते चेलंसला त्या बाईसना खरा पटना ना. कजं का हाई गोस्टं तेसला आशाज वाटना. 12 पन पेत्र उठीसनं कबर कडं पळत गया आनं खाल डुकीसनं दखना. तवं तेला फक्त तो गुंडाळेल तागानं कपडं दखायनत. आनं हाई गोस्टंनी बद्दल तेला नवल वाटना आनं तो घर नींगी गया.
दोन जन येसुला दखत
(मार्क १६:१२-१३)
13 तोज रोजला येसुनी मांगं फीरनारंस मयथीन दोन जन यरुशलेमथीन कमीतं कमी आकरा कीलोमीटरनी आंतरमं आमायुस नावना येक गावमं जाई रनलत. 14 तवं जी गोस्टं घडेल व्हतील, तीनी बद्दल ते चावयंत जाई रनलत. 15 मंग येसु सोता तेसनी शेजार ईसनं तेसनी संगं चालाला लागना. 16 ते येसुला दखनत पन वळखु शकनत ना. कजं का तेला वळखानी करता देव तेसनी नजर बांधनुक करी देयेल व्हताल.
17 मंग येसु तेसला सांगना, तुमं वाटधरी जी गोस्टं चावयंत जाई रनलत, ती कोनती गोस्टं सय? तवं तेसना तोंड ऊतरी गया आनं ते हुबं रही गयत. 18 आनं तेस मयला कलपया नावना येक जन येसुला सांगना, यरुशलेमला येनारंस मयथीन तु येखलाज सय, जेला हाई दीवसमं घडेल गोस्टं मायती ना सय. 19 मंग येसु तेसला वीचारना, कोनती गोस्टं? ते सांगनत, नासरेथना येसुनी बद्दल. तो येक देवना वचन सांगनार व्हताल. आनं तो देवनी समोर आनं मानसंसनी समोर तेना काममं आनं तेना बोलामं शक्तीवान व्हताल. 20 तेला मुख्य याजक लोकं आनं आमनं आधीकारी लोकं मरनना दंड दीसनं कुरुस खांबावर ठोकनत. 21 पन आमनी आशी आसा व्हतील का, तोज ईस्रायेल लोकंसला सुटका करनार सय. पन आतं ता शक्य ना सय, कजं का या आख्या गोस्टीसला आज तीन रोज व्हई गया सय. 22 आम मईन काही बाया मोठी पाहाटला तेनी कबरपन गयल्यात. आनं त्या आमला जा सांगन्यात, ता आमला पक्का नवल वाटना. 23 तीसला येसुना शरीर सापडना ना. तवं त्या ईसनं सांगन्यात का, आमला देवनं दुतं दखायनत. आनं ते देवनं दुतं सांगनत का, तो जीवता व्हई गया सय. 24 मंग आम मयथीन काही जन तेनी कबर कडं गयत. आनं जशा त्या बाया सांगन्याल्यात तशाज तेसला बी दखायना. पन येसु तेसला दखायना ना.
25 मंग येसु तेसला सांगना, तुमं पक्कं कमी बुधीनं लोकं सत. आनं देवना वचन सांगनारंसना वचनवर पक्कं कमी वीस्वास ठेवनारं लोकं सत. 26 देवना धाडेल राजा मंजे ख्रीस्त दुख आनं मरन सहन कराला पायजे आनं तो सोरगंमं जावाला पायजे आनं तेला मोठा मान भेटाला पायजे, हाई नक्की व्हताल.
27 मंग मोसा आनं देवना वचन सांगनारं आखंस पईन सुरुवात करीसनं तेनी बद्दल देवना वचनमं जा काही लीखेल सय, ता आखा येसु तेसला समजाडीसनं सांगना.
28 मंग जो गावला ते जाई रनलत, तो गाव शेजार वना. तवं येसु मुदाम तेसनी पुडं जावाला रस्ता काडना. 29 पन ते येसुला वीनंती करीसनं सांगनत, तु आमनी संगं रही जा. कजं का आतं याळ बुडामं सय. तवं येसु तेसनी संगं रव्हाला गया.
30 मंग तो तेसनी संगं जेवाला बसना. आनं भाकर लीसनं देवना ऊपकार मानना आनं मोडीसनं तेसला दीना. 31 तवं तेसना डोळा हुगडना आनं ते तेला वळखनत. आनं लगेज येसु तेसनी समोरथीन गायब व्हई गया. 32 मंग ते येकमेकंसला सांगाला लागनत का, जवं तो वाटधरी आपली संगं बोली रहनाल आनं देवना वचन समजाडीनं सांगी रहनाल, तवं आपला रुदयमं पक्का आनंद वाटु लागनाल ना का? 33 मंग लगेज ते उठीसनं यरुशलेम शेहेरला परत गयत. आनं येसुनं आकरा चेलंसला आनं तेसनी संगं गोळा व्हयेल लोकंसला ते भेटनत. 34 मंग ते आखं जन ये दोनी जनंसला सांगनत का, खरज येसु उठेल सय. आनं तो शीमोन पेत्रला बी दखायना सय.
35 मंग ते दोनी जन बी वाटधरी जा व्हयनाल ता तेसला सांगनत. आनं जवं येसु भाकर मोडनाल तवं कशे ते तेला वळखनत हाई हाकीगत बी तेसला सांगनत.
येसुनं आखं चेलं तेला दखत
(मतय २८:१६-२०; मार्क १६:१४-१८; योहान २०:१९-२९; प्रेशीत १:६-८)
36 जवं ते दोन जन त्या गोस्टी सांगी रनलत, तवं येसु ते आखंसनी मजार हुबा रहना. आनं तेसला सांगना, तुमं शांतीमं रहज्या. 37 पन ते लगेज घाबरी गयत. आनं तेसला वाटना का, आपुन येखादा भुतला दखी रहनं सत. 38 मंग येसु तेसला सांगना, तुमं कजं घाबरी गयत? आनं तुमना मनमं कजं शंका करत? 39 मना हात पायासला दखा. हाई मीज सय. आनं माला हात लाईसनं दखा. जशे तुमं दखत का माला हाडमास सय, तशा भुतला रहय ना. 40 आशा सांगीसनं येसु तेना हातपाय तेसला दखाडना. 41 मंग तेसला पक्का आनंद आनं नवल वाटना. तेमन तेवर तेसला खरा पटना ना. तवं येसु तेसला वीचारना, तुमपन खावाला काहीतरी सय का? 42 मंग ते येसुला भुजेल मासाना येक तुकडा दीनत. 43 मंग येसु तो मासाना तुकडा लीसनं तेसनी दखत खाना.
44 मंग तो तेसला सांगना, जवं मी तुमनी संगं व्हताल, तवं तुमला सांगेल व्हताल का, मनी बद्दल मोसाना नीयममं आनं देवना वचन सांगनारंसना पुस्तकमं आनं स्तोत्रना पुस्तकमं जा काही लीखेल सय, ता पुरा व्हवालाज पायजे.
45 मंग तेनी बद्दल देवना वचन तेसला समजाला पायजे मनीसनं येसु तेसना मन हुगडना. 46 आनं तेसला सांगना, देवना वचनमं आशा लीखेल सय का, देवना धाडेल राजा मंजे ख्रीस्त दुख सहन करी आनं तीसरा दीवसमं मरेलंस मयथीन परत उठी. 47 आनं यरुशलेम शेहेर पईन तं आखा देशमं पस्तावा करानी बद्दल आनं पापनी माफीनी बद्दल तेना नावमं प्रचार करामं येई. 48 आनं या गोस्टीसना पुरावा तुमंज सत. 49 दखा, मना बाप जो पवीत्र आत्मा देवाना वचन तुमला देयेल सय, लवकर तो पवीत्र आत्माला मी तुमनी कडं धाडसु. पन जो परन तुमला सोरगं मयथीन शक्ती भेटय ना, तो परन तुमं हाऊ शेहेरमंज रहज्या.
येसु सोरगंमं जाय
(मार्क १६:१९-२०; प्रेशीत १:९-११)
50 मंग येसु तेनं चेलंसला यरुशलेम शेहेर मयथीन बेथनी गाव परन ली गया. आनं हात वर करीसनं तो तेसला आशीर्वाद दीना. 51 आनं जवं तेसला आशीर्वाद दी रहनाल, तवं तेस पईन आलंग व्हईसनं तो सोरगंमं नींगी गया. 52 तवं ते ढोंगं पाडीसनं तेला नमन करनत आनं पक्का आनंदमं यरुशलेम शेहेरमं परत नींगी वनत. 53 आनं ते कायम देवना आभार आनं स्तुती करीसनं मंदीरमं रहु लागनत.