23
पीलातनी समोर येसुला ली जात
(मतय २७:१-२, ११-१४; मार्क १५:१-५; योहान १८:२८-३८)
1 मंग ते आखं जन उठनत आनं येसुला गवर्नर ✞पीलातपन ली गयत. 2 आनं ते येसुवर दोस लाईसनं सांगनत का, हाऊ मानुस आमना लोकंसला गलत शीकाडय. आनं रोम सरकारना मोठा राजा कैसरला कर ना देवानी करता बी लोकंसला शीकाडय. आनं सोताला मी देवना धाडेल राजा सांगय. 3 तवं पीलात येसुला वीचारना, तु खरज यहुदीसना राजा सय का? मंग येसु तेला उतर दीना, खरज, तु जशा सांगय तशाज सय. 4 मंग पीलात मुख्य याजकंसला आनं लोकंसला सांगना, माला हाऊ मानुसमं काही दोस सापडना ना. 5 पन ते जास्त जोर दीसनं सांगनत का, हाऊ मानुस गालील जील्ला पईन सुरुवात करीसनं आठी परन आखा यहुदीया जील्लामं लोकंसला शीकाडीसनं भडकाय दी रहना सय.
येसुला हेरोद राजानी समोर ली जात
6 हाई आयकीसनं पीलात वीचारना का, हाऊ मानुस गालील जील्लाना सय का? 7 आनं जवं तेला मायती पडना का, येसु हेरोद राजाना भाग मतला सय, तवं तो येसुला हेरोद राजा कडं धाडी दीना. तवं हेरोद राजा बी यरुशलेम शेहेरमंज व्हताल.
8 मंग येसुला दखीसनं हेरोद राजाला पक्का आनंद वाटना. कजं का तेनी बद्दल आयकीसनं तेला भेटानी करता बराज दीवस पईन तेनी ईशा व्हतील. आनं येसुघाई करेल काही चमत्कार दखानी करता तेनी पक्की आसा व्हतील. 9 तेमन तो येसुला बराज प्रशनं वीचारना, पन येसु तेला काहीज उतर दीना ना. 10 तवं मुख्य याजक लोकं आनं यहुदीसनं नीयम शीकाडनारं हुबं रहीसनं जोरमं आराळ्या दीसनं येसुवर जास्त दोस लावनत. 11 मंग हेरोद आनं तेनं शीपाई येसुला येक राजा सय मनीसनं थट्टा करानी करता चमचम कपडं घालीसनं तेना आपमान करनत. तेनी नंतर हेरोद तेला आजुन पीलात कडं परत धाडी दीना. 12 आनं तेनी आगुदार येरोद आनं पीलात दोनीसनी दुशमनी व्हतील. पन तोज दीवसमं ते सोपती बनी गयत.
येसुला मरनना दंड देवामं येय
(मतय २७:१५-२६; मार्क १५:६-१५; योहान १८:३९-१९:१६)
13 मंग मुख्य याजक लोकंसला आनं यहुदीसना दुसरं आधीकारी लोकंसला आनं दुसरं लोकंसला पीलात येकजागं बलावना. 14 आनं तेसला सांगना, लोकंसला शीकाडीसनं भडकाय देय मनीसनं तुमं हाऊ मानुसला मापन ली वनत. पन दखा तुमनी समोरज मी तेला वीचारना. आनं ज्या गोस्टीसना आरोप तुमं हाऊ मानुसवर लावनत, तेवर माला काही दोस सापडना ना. 15 आनं हेरोद राजाला बी तेवर काही दोस सापडना ना. तेमन तो येला दंड ना दीसनं मापन परत धाडी दीना सय. आनं दखा, हाऊ मानुस मरनना दंड सारका काही गुनाह करना ना सय. 16 तेमन मी येला काकडाघाई हानीसनं सोडी दीसु. ( 17 कजं का दर सनना टाईमला पीलात तेसना साठी येक कैदीला सोडी दीता. हाई तेसनी रीत व्हतील.)
18 पन आखं जन येक सारका आराळ्या दीसनं सांगनत, हाऊ मानुसला जीवता मारा आनं आमना साठी बरब्बाला सोडा. 19 तवं तो बरब्बा शेहेरमं दंगा आनं खुन करेल व्हताल. तेमन तेला जेलमं कोंडामं ईयेल व्हताल.
20 पन येसुला सोडी देवानी करता पीलातनी ईशा व्हतील. तेमन तो परत तेसनी संगं बोलना. 21 पन ते आराळ्या दीसनं सांगाला लागनत का, येला कुरुस खांबावर ठोका. 22 तवं पीलात परत तीसरा दाउ तेसला वीचारना, कजं? हाऊ काय गुनाह करना सय? हाऊ मानुसमं मरनना दंड सारका काही गुनाह माला सापडना ना. तेमन मी येला काकडाघाई हानीसनं सोडी दीसु.
23 पन ते आजुन जास्त आराळ्या दीसनं सांगाला लागनत का, तेला कुरुस खांबावर ठोकाला पायजे. मंग शेवट ते जशे आराळ्या दीनत तशेज व्हयना. 24 ते जा मांगी रनलत, ता पीलात पुरा करी दीना. 25 जो बरब्बा दंगा आनं खुन करीसनं जेलमं कोंडायेल व्हताल आनं जेला ते मांगी रनलत, तेला पीलात सोडी दीना. आनं येसुला तेसनी ईशा पुरी करानी करता तेसना हातमं सोपी दीना.
येसुला कुरुस खांबावर ठोकत
(मतय २७:३२-४४; मार्क १५:२१-३२; योहान १९:१७-२७)
26 मंग जवं सीपाई लोकं येसुला ली जाई रनलत, तवं ✞कुरेन शेहेरना शीमोन नावना येक मानुस तेना गावथीन ई रहनाल. तवं ते तेला धरनत आनं तेवर कुरुस खांबा ठेवनत आनं ता ऊचलीसनं येसुनी मांगं चालाला लावनत.
27 तवं येसुनी मांगं लोकंसनी मोठी गरदी चाली रहनील. आनं तेना साठी पक्का दुख करीसनं रडनार्या काही बाया बी तेनी मांगं चाली रनल्यात. 28 मंग येसु तीस कडं फीरीसनं सांगना, हे यरुशलेमन्या बाया, मना साठी रडु नोका, पन तुमना सोताना साठी आनं तुमनं पोरेसोरेसना साठी रडा. कजं का भयानक गोस्टं घडाला जाई रहनी सय. 29 आनं आशा दीवस येईत का, तवं ज्या बायासला पोरे व्हत ना आनं ज्या कधी दोनदीवस्या वन्यात ना आनं ज्या कधी दुध पाजन्यात ना, तीसला लोकं नासीववान सांगीत. 30 आनं तो टाईमला त्या भयानक गोस्टीस पईन वाची जावाला लोकं डोंगरंसला सांगीत का, आमवर पडा आनं टेकड्यासला सांगीत का, आमला दपाडा. 31 कजं का मी वल्ला झाड सारका बीगर दोसना सय, तरी बी रोमी लोकं मावर आशा करत तं, जे लोकं सुकायेल झाड सारका दोसी आनं आपराधी सत तेसना काय व्हई?
32 मंग येसुनी संगं आजुन दोन जनंसला बी मरनना दंड देवानी करता ते ली गयत. ते दोनी जन आपराध करनारं व्हतलत. 33 नंतर ते कवटी नावनी जागामं वनत. आनं तई येसुला आनं ते दोन आपराधीसला ते कुरुस खांबावर ठोकनत. आनं ते आपराधीस मयथीन येकला येसुना जेवनी कडं आनं दुसराला डावी कडं ठोकनत.
34 तवं येसु प्राथना करीसनं सांगना, हे बाप, येसला तु माफ कर. कजं का ये काय करी रहनं सत हाई येसला समजय ना. मंग ते शीपाई लोकं चीठ्या टाकीसनं येसुनं कपडं आपसमं वाटी लीनत✞.
35 तवं बरज लोकं तई हुबं रहीसनं आखंकाही दखी रनलत. आनं यहुदीसनं आधीकारी आनं मोठलं मोठलं लोकं येसुनी थट्टा करीसनं सांगनत, तो दुसरंसला वाचाडना, पन जर तो खरज देवना धाडेल राजा ख्रीस्त सय आनं तेना नीवाडेल सय तं, तो सोताला वाचाडाला पायजे. 36 आनं शीपाई लोकं बी तेनी थट्टा करनत. आनं शेजार जाईसनं ते तेला आंबठ द्राक्षसना रस पेवाला दीनत. 37 आनं ते सांगनत, जर तु खरज यहुदीसना राजा सय तं, सोताला वाचाड. 38 मंग ‘हाऊ यहुदीसना राजा सय’ मनीसनं ते येक पाटीवर लीखीसनं तेना वर लाई दीनत.
39 मंग येसुनी संगं कुरुस खांबावर ठोकेल आपराधीस मयथीन येक जन येसुनी नींदा करीसनं सांगना, तु देवना धाडेल राजा ख्रीस्त ना सय का? जर तु खरज ख्रीस्त सय तं, सोताला आनं आमला बी वाचाड. 40 पन दुसरा आपराधी तेला डोकाडीसनं सांगना, तु देवला भीवय ना का? कजं का जो दंड येला भेटी रहना सय, तोज दंड आपुनला बी भेटी रहना सय. 41 आपुन दोनी जनंसला जो दंड भेटना सय, तो बरोबर सय. कजं का आपुन जो आपराध करनत तेना दंड आपुनला भेटी रहना सय. पन हाऊ मानुस काहीज चुक करना ना सय.
42 मंग तो येसुला सांगना, हे येसु, जवं तु राज्य कराला ईशी, तवं मनी याद कर. 43 तवं येसु तेला सांगना, मी तुला खरज सांगय का, आज तु मनी संगं ✞ सुखनी जागामं ईशी.
येसुना मरन
(मतय २७:४५-५६; मार्क १५:३३-४१; योहान १९:२८-३०)
44 तवं दुफारना बारा वाजेल व्हताल. आनं तो टाईम पईन दुफारना तीन वाजा परन सुर्य तेना ऊजाळा दीना ना. तेमन आखा देशमं आंधारा पडी गया. 45 मंग मंदीरना पडदा फाटीसनं दोन भाग व्हई गया✞. 46 तवं येसु जोरमं आराळ्या दीसनं सांगना, हे बाप, मी तुना हातमं मना जीव सोपी देय. आशा सांगीसनं येसु तेना जीव सोडी दीना.
47 तवं जा व्हयना ता दखीसनं रोमी सीपाईसना आधीकारी देवनी स्तुती करीसनं सांगना, खरज हाऊ मानुस नीतीवान व्हताल. 48 मंग जे लोकं दखानी करता तई गोळा व्हयेल व्हतलत, ते हाई दखीसनं पक्का दुखी व्हई गयत. आनं शाती ठोकी ठोकीसनं घर नींगी गयत. 49 पन येसुला वळखनारं आखं जन आनं ज्या बाया तेनी संगं गालीलथीन ईयेल व्हतल्यात, ते दुर हुबं रहीसनं हाई दखी रनलत.
येसुला कबरमं ठेवत
(मतय २७:५७-६१; मार्क १५:४२-४७; योहान १९:३८-४२)
50 तवं योसेफ नावना येक मानुस तई ईयेल व्हताल. तो आरीमथाई नावना यहुदी लोकंसना शेहेर मतला व्हताल आनं तई ईयेल व्हताल. आनं तो यहुदीसना न्याय करनारंसना सभासद मयथीन येक व्हताल. तो चांगला आनं नीतीवान मानुस व्हताल. 51 पन येसुला जीवता मारामं न्याय करनारंसना जो वीचार आनं काम व्हताल, तेमं तो साथ दीनाल ना. आनं कवं देव ईसनं राज्य करी मनीसनं तो वाट दखी रहनाल. 52 तो पीलातपन गया आनं कबरमं ठेवानी करता येसुना शरीरला मांगना. 53 आनं पीलात पईन परवानगी भेटानी नंतर तो आनं काही दुसरं लोकं येसुना शरीरला कुरुस खांबा वयथीन खाल ऊतारनत आनं तागानं कपडंसमं गुंडाळीसनं ली गयत. आनं जई कोनला कधी ठेयेल ना व्हताल आशी येक खडकमं खंदेल कबरमं तेला ठेवनत.
54 आनं सुर्य बुडानी नंतर शब्बाथना दीवस येनार व्हताल. तेमन तो तेनी करता तयारी कराना दीवस व्हताल. मंजे शुक्रवारना दीवस व्हताल. 55 मंग ज्या बाया गालीलथीन येसुनी संगं ईयेल व्हतल्यात, त्या योसेफनी मांगं जाईसनं ती कबरला दखन्यात. आनं येसुना शरीरला कशा ठेवामं वना हाई बी त्या दखन्यात. 56 मंग त्या परत घर गयात आनं येसुना शरीरवर लावानी करता सुगंधी वस्तु आनं सुगंधी तेल तयार करन्यात. पन शब्बाथना दीवसमं नीयम पाळीसनं त्या आराम करन्यात.