22
यहुदा ईस्कंरीयोत येसुनी संगं वीस्वासघात करय
(मतय २६:१-५; मार्क १४:१-२; योहान ११:४५-५३)
1 मंग दोन दीवसनी नंतर ✞वल्हांडनना सन, मंजे ✞बीगर खमीरनी भाकरना सन व्हताल. 2 तवं मुख्य याजक आनं यहुदी लोकंसना नीयम शीकाडनारं येसुला कशे धरीसनं जीवता मारवा हाई दखी रनलत. हाई गच्चुप करानी तेसनी ईशा व्हतील, कजं का कदाचीत येनी द्वारा लोकंसमं दंगा व्हई जाई मनीसनं ते भीवाय रनलत. 3 तवं येसुनं बारा चेलंस मयथीन ईस्कंरीयोत यहुदा नावना येक चेलामं सैतान घुसना. 4 मंग तो मुख्य याजक आनं मंदीरनं सीपाईसनं आधीकारी लोकंस कडं गया आनं येसुला कशे तेसना हातमं धरी देवाना येनी बद्दल गोस्टं करना. 5 तवं तेसला पक्का आनंद वाटना आनं ते तेला काही पयसा देवानी भाशा करनत. 6 मंग हाई करानी करता तो तयार व्हई गया. आनं जवं गरदी ना रवावु, तवं येसुला तेसना हातमं धरी देवानी करता टाईम दखु लागनाल.
वल्हांडनना सनना जेवननी तयारी
(मतय २६:१७-१९; मार्क १४:१२-१६; योहान १३:२१-३०)
7 मंग जो दीवसमं वल्हांडनना सननी करता मेंडीना बचाला बलीदान करत, तो दीवस वना. 8 तवं येसु पेत्र आनं योहानला आशा सांगीसनं धाडना का, आपुन वल्हांडनना सनना जेवन करुत. तेना साठी तुमं जाईसनं तयार करा. 9 मंग ते तेला सांगनत, आमं कई जाईसनं तयारी कराला पायजे आशी तुनी ईशा सय? 10 तवं येसु तेसला सांगना, दखा, जवं तुमं शेहेरमं जाशात, तवं तुमला पानीना मडका ऊचली ली जाताना येक मानुस भेटी. तो जो घरमं जाई, तो घरमं तुमं बी तेनी मांगं जा. 11 आनं तो घरना मालकला सांगा, गुरुजी तुला वीचारना का, मी आनं मनं चेलं वल्हांडनना सनना जेवन कोनती खोलीमं करुत? 12 मंग तो तुमला येक हावालीना वरना तालमं येक मोठी खोली दखाडी. आनं आपुनला जा काही पायजे, ता आखं ती खोलीमं लीसनं ठेयेल रही. आनं तुमं जाईसनं तई तयार करा. 13 मंग ते चेलं शेहेरना मजार गयत आनं येसु जशा सांगेल व्हताल, तशाज तेसला दखायना. आनं ते वल्हांडनना सननी तयारी करनत.
येसु तेनं चेलंसनी संगं शेवटना जेवन करय
(मतय २६:२६-३०; मार्क १४:२२-२६; १ करींथ ११:२३-२५)
14 मंग जवं वल्हांडनना सनना जेवनना टाईम व्हयना, तवं येसु तेनं चेलंसनी संगं जेवाला बसना. 15 तवं तो तेसला सांगना, मी दुख भोगीसनं मरानी आगुदार हाई वल्हांडनना सनना जेवन तुमनी संगं करानी मनी पक्की ईशा व्हतील. 16 कजं का मी तुमला सांगय का, देवना राज्यमं तेना योजना पुरा व्हई ताव, मी हाई जेवन आजुन करावु ना.
17 मंग येसु द्राक्षरसनी वाटी लीना आनं देवना ऊपकार मानीसनं सांगना, तुमं हाई ल्या आनं वाटीसनं प्या. 18 कजं का मी तुमला सांगय का, आतं पईन जो परन देव तेनं लोकंसवर राज्य करय ना, तो परन मी आजुन द्राक्षसना रस पेवावुज ना. 19 मंग तो भाकर लीना आनं देवना ऊपकार मानीसनं मोडना. आनं तेसला दीसनं सांगना, हाई मना ✞ शरीरनी सारका सय, जो तुमना साठी देवामं ईयेल सय. आनं माला याद करानी करता तुमं हाई करत रहज्या. 20 तशाज जेवननी नंतर येसु द्राक्षरसनी दुसरी वाटी लीसनं सांगना, हाई द्राक्षसना रस मना रंगत सारका सय. आनं जवं मी मना रंगत वताईसनं मरी जासु, तवं तेनी द्वारा देव बरज लोकंसनी संगं येक नवीन संमंध जोडी.✞
21 येसु आखु सांगना, दखा जो माला मना दुशमनंसना हातमं धरी देई तो बी आठी मनी संगं जेवन करी रहना सय. 22 पन जशा देव मनी बद्दल पयला पईन ठरायेल सय, तशाज व्हई. पन जो माला धरी देई, तो मानुसला पक्का दंड भेटी. 23 तवं आपुन मयथीन कोन हाई करनार सय मनीसनं ते चेलं येकमेकंसला वीचाराला लागनत.
कोन मोठा सय?
24 मंग जवं येसु राजा बनी, तवं तेना राज्यमं कोन मोठा बनी, येनी बद्दल चेलंसमं वादवीवाद चालु व्हयना. 25 तवं येसु तेसला सांगना, बीगर यहुदी लोकंसनं राजा लोकंसवर आधीकार चालाडत. आनं आशा करीसनं बी ते सोताला तेसना मदत करनारं सांगत. 26 पन तुमं तशे नोको रव्हाला पायजे. आनं तुम मजार जो कोनी देवनी नजरमं मोठा बनाला दखय, तो धाकलंसनी सारका बनाला पायजे. आनं जो आधीकारी सय, तो दुसरंसनी सेवा करनार सारका बनाला पायजे. 27 मोठा कोन सय? जो जेवाला बसेल सय तो का जो जेवाडय तो? खरज जो जेवाला बसेल सय, तोज मोठा सय. पन येक सेवा करनार मानुसनी सारका मी बी तुम मजार सय आनं तुमं बी मनी सारका बनाला पायजे. 28 आनं तुमं मनी परीक्षामं मनी संगं टीकी रहनारं सत. 29 तेमन जशा मना बाप आतं माला येक राज्य चालाडानी करता देयेल सय, तशाज मी बी तुमला तो राज्य चालाडाना आधीकार दीसु. 30 कजं का मनी ईशा सय का, तुमं मना राज्यमं मनी संगं जेवन कराला पायजे. आनं राजगादीवर बसीसनं ईस्रायेलनं बारा जातनं लोकंसवर न्याय कराला पायजे.
पेत्र तेला नाकारी देई मनीसनं येसु भवीस्य सांगय
(मतय २६:३१-३५; मार्क १४:२७-३१; योहान १३:३६-३८)
31 मंग येसु पेत्रला सांगना, शीमोन, शीमोन, दख, जशा गवुला गाळीसनं भुसा पईन आलंग करत, तशा तुमला मा पईन आलंग करानी करता सैतान देव पईन परवानगी मांगना सय. 32 पन तुना वीस्वास कमी नोको व्हवाला पायजे मनीसनं मी तुना साठी प्राथना करेल सय. आनं जवं तु मापन परत ईशी, तवं ये दुसरं चेलंसला हीम्मत दीसनं भक्कम बनाड. 33 पन पेत्र तेला सांगना, परभुजी, तुनी संगं जेलमं जावानी करता आनं मरानी करता बी मी तयार सय. 34 तवं येसु तेला सांगना, पेत्र, मी तुला खरज सांगय का, आज रातला कोमडा कोकावानी आगुदार तु माला ओळखय मनीसनं तीन दाउ नाकारशी.
तुमं तयारीमं रहज्या
35 आखु येसु तेनं चेलंसला सांगना, जवं मी तुमला बीगर थयलीना, बीगर झोळीना आनं बीगर चपलंसना धाडना, तवं तुमला काही कमी पडना का? ते सांगनत, काहीज ना. 36 मंग आतं तेसवर जास्त वीरोध व्हई आनं ते तयार रव्हाला पायजे हाई दखाडानी करता तो तेसला सांगना, आतं जर तुमपन थयली सय तं, ती लेवाला पायजे. तशाज झोळी बी तुमं लेवाला पायजे. आनं जर तुमपन तलवार ना सय तं, तुमनं कपडं ईकीसनं तुमं तलवार ईकत लेवाला पायजे. 37 आनं देवना वचनमं मनी बद्दल लीखेल सय का,
✞"तो आपराधीसमं गनायेल व्हताल."
आनं मी तुमला सांगय का, हाई देवना वचन पुरा व्हवालाज पायजे. कजं का मनी बद्दल जा लीखेल सय, ता पुरा व्हवामं ई रहना सय. 38 मंग ते सांगनत, परभुजी, दख, आठी दोन तलवार सत. येसु तेसला सांगना, तलवारनी बद्दल गोस्टं कराना ईतलाज बस करा.
येसु जैतुनना डोंगरवर प्राथना करय
(मतय २६:३६-४६; मार्क १४:३२-४२)
39 नंतर येसु यरुशलेम शेहेर सोडीसनं बाहेर वना. आनं जशा तो कायम जाता, तशा जैतुनना डोंगर कडं गया. आनं तेनं चेलं बी तेनी संगं गयत. 40 मंग ती जागामं ईसनं येसु तेनं चेलंसला सांगना, जवं तुमना जीवनमं परीक्षा येई, तवं तुमं पडी नोको जावाला पायजे मनीसनं प्राथना करा.
41 मंग येसु तेस पईन थोडाज पुडं गया आनं गुडगं टेकीसनं आशी प्राथना करना का, 42 हे बाप तुनी ईशा व्हई तं, हाई दुखना समय मा पईन दुर कर. पन मनी ईशाथीन नोको, तुनी ईशाथीन व्हवु दे. 43 तवं सोरगं मईन येक देवदुत प्रगट व्हयना आनं तेला शक्ती दीना. 44 मंग येसु पक्का दुखी व्हईसनं कळकळीसनं प्राथना करना. तवं तेना घाम रंगतना ठेम सारकं भुयवर पडाला लागनत.
45 मंग येसु प्राथना करीसनं उठना आनं तेनं चेलंस कडं ईसनं दखना का, ते सोता दुखी व्हईसनं नीजी गयं सत. 46 तवं तो तेसला उठाडीसनं सांगना, तुमं कजं नीजी गयं सत? उठा आनं जवं तुमना जीवनमं परीक्षा येई, तवं तुमं पडी नोको जावाला पायजे मनीसनं प्राथना करा.
येसुला यहुदा धरी देय
(मतय २६:४७-५६; मार्क १४:४३-५०; योहान १८:३-११)
47 जवं येसु बोली रहनाल, तीतलामं लोकंसनी गरदी तई वनी. आनं ✞यहुदा तेसला लय वनाल. मंग तो येसुना ✞मुक्का लेवानी करता तेनी शेजार वना. 48 तवं येसु तेला सांगना, यहुदा, येक चांगला सोपती सारका तु मुक्का लीसनं माला धरी दी रहना सय का?
49 मंग आतं काय व्हयनार सय, हाई येसुनी संगं रहनारं चेलंसला समजी गया. तेमन ते सांगनत, परभुजी, आमं तलवारघाई हानुत का? 50 आनं तेस मयथीन येक जन तलवार काडीसनं मोठा याजकना नौकरला मारानी करता तेवर वार करना आनं तेना जेवना कान कापी टाकना. 51 तवं येसु सांगना, बस, आजुन काही नोको करा. मंग तो तेना कानला हात लाईसनं तेला बरा करना. 52 आनं ते मुख्य याजक, मंदीरनं सीपाईसनं आधीकारी आनं पुढारी लोकं जे तेला धराला ईयेल व्हतलत तेसला तो सांगना, जशा येखादा मोठा लुटारुला धराला तलवार आनं काठ्या लीसनं जात, तशा तुमं माला धराला वनत का? 53 मी तं दर रोज मंदीरमं तुमनी संगं रहीसनं शीकाडी रहनाल. तवं तुमं माला कजं धरनत ना? पन हाई तुमना टाईम सय आनं हाई आंधाराना मंजे सैतानना राज सय.
पेत्र येसुला वळखय ना मनीसनं नाकारय
(मतय २६:५७-५८, ६९-७५; मार्क १४:५३-५४, ६६-७२; योहान १८:१२-१८, २५-२७)
54 नंतर ते येसुला धरीसनं मोठा याजकना घर ली गयत. तवं पेत्र दुरथीन येसुनी मांगं मांगं जाई रहनाल. 55 मंग काही लोकं आंगनमं ईस्तु चेटाडीनं येकजागं बसेल व्हतलत. आनं पेत्र बी तेसमं जाईसनं बसना. 56 तवं येक काम करनार बाई तेला ईस्तुना ऊजाळामं बसेल दखनी. आनं तेनी कडं बरोबर दखीसनं ती सांगनी, हाऊ मानुस बी येसुनी संगं व्हताल. 57 पन पेत्र नाकारीसनं सांगना, बाई, मी तेला वळखय ना.
58 मंग थोडा टाईमनी नंतर आजुन येक जन तेला दखीसनं सांगना, तु बी तेस मयला सय. पन पेत्र सांगना, भाऊ, मी तेस मयला ना सय.
59 आजुन येक तासनी नंतर दुसरा जन जोर दीसनं सांगना, खरज हाऊ मानुस बी येसुनी संगं व्हताल. कजं का येना बोलाना वयथीन मायती पडय का, हाऊ बी येक गालील भागना सय. 60 पन पेत्र सांगाना, भाऊ, तु काय बोलय, ता माला काही समजय ना. जवं तो बोली रहनाल तीतलामं येक कोमडा कोकायना. 61 आनं परभु येसु फीरीसनं पेत्र कडं दखना. मंग परभु येसुना सांगेल गोस्टं पेत्रला याद वना का, आज रातला कोमडा कोकावानी आगुदार तु माला वळखय ना मनीसनं तीन दाउ नाकारशी. 62 मंग पेत्र बाहेर जाईसनं पक्का रडाला लागना.
येसुला धरनारं तेनी थट्टा करत आनं हानत
(मतय २६:६७-६८; मार्क १४:६५)
63 मंग जे लोकं येसुला धरनंलत, ते तेनी थट्टा करनत आनं तेला हाननत. 64 आनं तेना डोळा बांधीसनं आनं तेला बुक्याजघाई हानीसनं वीचाराला लागनत, तु सांगय का देव तुला आखंकाही सांगी देय, मंग तुला कोन हानना, हाई वळख आनं आमला सांग. 65 आनं तेना वीरुद बर्याज गोस्टी सांगीसनं ते तेना आपमान करनत.
येसुला वीचारपुस करत
(मतय २६:५९-६६; मार्क १४:५५-६४; योहान १८:१९-२४)
66 मंग जवं ऊजाळा व्हयना, तवं वडील लोकं, मुख्य याजक लोकं आनं यहुदीसनं नीयम शीकाडनारं गोळा व्हयनत. आनं ते येसुला तेसना न्याय करानी जागामं ली गयत. 67 आनं सांगनत, जर तु देवना धाडेल राजा ख्रीस्त सय तं, आमला सांग. येसु तेसला सांगना, मी जर तुमला सांगसु तं, तुमला खरा पटावु ना. 68 आनं जर देवना धाडेल राजानी बद्दल मी बी तुमला येक प्रश्नं वीचारसु तं, तुमं बी उतर देवावुत ना. 69 पन येनी नंतर लवकर मी शक्तीवान देवना जेवनी कडं बससु. 70 तवं ते आखं जन वीचारनत, मंग तु देवना पोर्या सय का? तो सांगना, तुमं जा सांगत, ता खरज सय. कजं का मी तोज सय. 71 तवं ते सांगनत, आतं आपुनला येनी वीरुद आजुन पुरावासनी काही गरज ना सय. कजं का आपुन सोता तेना तोंडघाई आयकनत का, हाऊ सोताला देवना बरोबर गनय.